Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला वाटतं की ती मेधा
.
वोटिंग लाईन्स सुरु झाल्या का
वोटिंग लाईन्स सुरु झाल्या का,की या वेळेस फक्त मेकर्स किंवा चँनेल चॉईस?
bakiche spardhak mhanje
bakiche spardhak mhanje phaltu kivva kimmatshunya? >>> किंमतशून्य कसे? त्यांना त्यांचे आठवड्याचे ठरलेले पैसे मिळतातच की!
मी बिचुकलेंची बाजू घेत नाही पण ते अजून आरोपी आहेत. Every person is innocent till proven guilty.
बिचुकले निरोप समारंभ आहे
बिचुकले निरोप समारंभ आहे म्हटल्यावर शेवटची दहा मिनिटंच पाहिलं. बालपणापासून या बाथरूमशी नातं आहे असं काय काय म्हणाले ते.
त्यांनी आधी कधी आत्महत्येची धमकी दिली होती का तिथून?
उद्या प्रेस कॉन्फरन्स.
काही म्हणा, स्पर्धक नसताना
काही म्हणा, स्पर्धक नसताना देखील प्रचंड फुटेज घेऊन गेले बिचुकले अख्खा सिझन>>> twitter वर पाहिलं होतं,नेहाने ठेवणीतलं विदुषकी हसत गौप्यस्फोट केला की तिच्या संगीताच्या तीन परीक्षा झाल्यात....यावर बिचुकले," गुरु बसलाच कसा बाजुला"?
तसेच AB आपल्या बायकोला पेट्रोल पंपावर विसरले होते म्हणे 
बिग बॉस मध्ये people from
बिग बॉस मध्ये people from different walks of life हा concept आहे सो बिचुकले त्यात फिट बसतात.
बाकी बिग बॉस च्या घरातही लोक हिंसाचार करतात, दुसऱ्या स्पर्धकाला कुत्र्यासारखं चावतात, दुसऱ्याला फिजिकली टॉर्चर करतात, एक तथाकथित टास्क क्वीन बाई पुरुषाला नको तसे स्पर्श करते. तिथे तर गुन्हा सिद्ध होण्याचाही प्रश्न नाही आपण सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलंच आहे. त्यामुळे बिचुकलेला कशाला एकट्याला गुन्हेगार म्हणून सिंगल आउट करायचं. तो बरा निदान हसू तरी येतं त्याच्यामुळे.
Big boss cha gharat entry
Big boss cha gharat entry detana kahi criminal record nahiye as certificate anayala sangital hot.tyancha var adhich ek gunha dakhal zalela ahe.mag tyanni khot certificate dilay he tar sidda hotach na?
क्रिमिनल रेकॉर्ड आहे की नाही
क्रिमिनल रेकॉर्ड आहे की नाही एवढे विचारलेही असेल
पण ते असेल तर बिबॉ मधे घेणार नाही अशी पॉलिसी असेल असे वाटत नाही. कारण या आधीही आलेत की असले कन्टेस्टन्ट्स. हिंदीत तर होतेच.
अर्थात हा सीझन एकूणच काहीच्या काही गंडलेला आहे. बिचुकलेला घरातून अटक काय, पराग प्रकरण, शिवानीचा किस्सा, ही सगळीच त्या लोकांना गोष्टी नीट हातळता न आल्याची उदाहरणं आहेत.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण
गुन्हेगारांचे उदात्तीकरण
हा सिझन फार आधी सोडला बघायचा
हा सिझन फार आधी सोडला बघायचा, काल अचानक विन्केन्डचा डाव बघितला तेव्हा शिवानी-विणा भान्डण पाहुन गमत वाटली, शिवानी आणी नेहा पहिल्या फायनलिस्ट झाल्या हे इन्स्टा वर कळले ,बीबॉची गणीत त्यानाच ठाउक! नियम बनवतात तोड्तात मोडतात सगळच अनाकलनिय आहे अशाने शो स्क्रिप्टेड वाटतो (जो असेलच) प्रेक्षकाचा इन्टरेस्टही जातो, मागचा सिझन धमाल झाला त्यामानाने हा फुसकाच निघाला अस दिसतय.
बिव्हकुले आणी शिवानिलाच परत आणायची अशी काय मजबुरी असेल? मराठित त्यापेक्षा बर लोक नाहित का? का कुणी यायलाच तयार नाही याच्या शोला?मग तर कठिणच आहे पुढच्या सिझन्सच!
No, Gauri is adopted daughter
मला वाटतं की ती मेधा मांजरेकरांची आधीच्या नवर्यापासूनची मुलगी आहे. ती खूपच आईसारखी दिसते पण.
<<<<
No, Gauri is adopted daughter of Mr.Manjrekar.
Her biological parents are from Satara, not privileged financially so she's adopted. (Source: Twitter, YouTube)
No, Gauri is adopted daughter
No, Gauri is adopted daughter of Mr.Manjrekar. ..>> रियली? शक्य आहे! कारण माझी माहिती काही रिलायेबल सोर्सकडून नव्हती.
मला तिच्या आणि मेधाताईंच्या चेहरेपट्टीत साम्य वाटलं खरं! असो. (माझी या संदर्भातली वरची पोस्ट काढून टाकली आहे. दीपांजली थँक्स ! )
बिचुकले गेले...आरोह चं जॅकेट
बिचुकले गेले...आरोह चं जॅकेट पण घेऊन गेले....
जाम बोअर झालं आजचं, यंदा
जाम बोअर झालं आजचं. यंदा टिआरपी नव्हता, तो बिचुकलेनी दिला असावा म्हणून इतकं केलं का, काय माहीती. आतमधे बाकीच्यांना पण माहीतेय का, बाहेरचं. आरोह आणि शिवानीला माहीतेय. बाकी विकेंडच्या डावात घुमवायचे म मांना तेव्हा एकदोनदा मजा वाटलेली, पण नंतर पाठ झालं. कधी कधी शिवानी त्यांना उगाच बोलली असं वाटलं, कधी कधी ते हीना वगैरे बरोबर वागायचे त्याची किळस वाटायची. वीणा चक्क रडली, त्यांची किंमत नाही सांगणारी, म्हणजे त्यांच्यात सर्व नीट झालं होत की काय.
आरोहचं सूत्रसंचालन चांगलं वाटलं. तोच एकटा छान दिसत होता सर्वांत. वीणा आधी गुलाबी वनपीस मिडीत छान दिसत होती पण नंतर तिने तो का बदलला काय माहिती. डान्स नाही आवडला शिव वीणाचा.
नेहाची कविता आवडली.
बिव्हकुले आणी शिवानिलाच परत आणायची अशी काय मजबुरी असेल? मराठित त्यापेक्षा बर लोक नाहित का? का कुणी यायलाच तयार नाही याच्या शोला?मग तर कठिणच आहे पुढच्या सिझन्सच! >>> अगदी अगदी.
आरोह चं जॅकेट पण घेऊन गेले.... >>>
हे लय भारी. बुट पण त्यानेच दिलेले का, तेही घालून गेले बहुतेक. शिवानी म्हणत होती ना त्याला, तुझे ते बूट दे.
Shivani हिरोईन आहे का अंकुश ची? >>> काय माहिती. मध्ये अंकुश आणि बाजूला दोघी अर्धवट दिसतायेत पोस्टरमध्ये एक ही आणि दुसरी पल्लवी पाटील.
मागच्यासारखे जाणाऱ्या
मागच्या सीजनसारखे गेलेल्या कन्टेस्टंट वर फुल्या मारा प्लीज फोटोंवर. हा शो केंव्हाच पाहायचा सोडलाय...निदान फुल्यांवरून कळेल की कोण राहिले आहे आता.
आधिच एका गाण्यामुळे जनतेनी
आधिच एका गाण्यामुळे जनतेनी त्यांना सळोकीपळो केल, आता जनतेच्या भावना दुखावणारे काहीही करणार नाहीत.
>>>> कुठल गाण आणि कुणाच?
Voting सुरु झालेलं दिसतंय.
Voting सुरु झालेलं दिसतंय. ते इतक्या लवकर करायचं का प्रश्न पडलाय. आठवडाभर असेलना, का मिडविक eviction करतील, आता खरंतर करायला नको. बिचुकले गेले ना. सहा गेले शेवटी तरी हरकत नाही.
कुठल गाण आणि कुणाच?>>> एक
कुठल गाण आणि कुणाच?>>> एक धमाल गाणं आहे, त्यांना नेटीझन्स नी 'ढिन्च्याक पीळगावकर' असं नाव दिलंय त्या गाण्यानंतर.
मुंबई अॅन्थम असं काहीसं आहे नाव.
बिचुकल्यांनी खरंच टीआर्पी
बिचुकल्यांनी खरंच टीआर्पी दिला का? इथे मायबोलीवरच बहुतेक सगळे बिचुकल्यांना काढा, कधी जाणार ते वगैरे बोलत होते. मला ते नव्हते तर काही फरक पडला नाही. आणि होते तरी त्यांच्यामुळे बोअर झाले नाही की प्रचंड करमणूक होतेय असंही वाटलं नाही. मग कोण ही लोकं ज्यांना ते खूप हवेहवेसे होते? मी यु ट्युबवरचं एक अॅनॅलिसिस फॉलो करते, त्यावरही ते कधी येणार, त्यांना आणा वगैरे चर्चा चालू असल्याचं सांगितलं नाही. मग हा कुठला टीआरपी जो त्यांच्यामुळे मिळाला? असो.
आरोहनी इंटरव्ह्यू चांगला घेतला. प्रश्नही चांगले होते. बिचुकल्यांची उत्तरंही बरी होती. नेहाची कविता अतिशय अॅप्रोप्रिएट होती.
मग कोण ही लोकं ज्यांना ते खूप
मग कोण ही लोकं ज्यांना ते खूप हवेहवेसे होते? >>> फेसबुकवर दिसायच्या अधूनमधून त्यांच्या बाजूने पोस्टस. पण grand send off देण्याइतकं काय केलं त्यांनी, हा प्रश्न पडलाय. परत त्यांच्या नावांची सिल्व्हर पाटी करून एक नं वर ठेवली खास. ते बाहेर पडले तरी पाटी आहेच. जुनी पाठवली बरोबर.
Btw बिचुकले सुंदर सुंदर म्हणत असतात, कोण आहे सुंदर. बायकोचं नाव तर अलंकृता आहे ना. मुलीबद्दल काही बोललेच नाहीत, महाराज महाराज करत होते आणि त्या महाराजलाच मारलं होतं त्यांनी बहुतेक जे आपल्याला दाखवलं नाही.
बिचुकले एक सदस्य म्हणून आले.
बिचुकले एक सदस्य म्हणून आले. बराच काळ बाहेर जावं लागलं त्यामुळे आल्यावर त्यांना पाहुणे म्हणून ठेवलं. त्यावेळेला त्यांना सांगितलं असावं की त्यांचा रोल एंटरटेनरचा असणार आहे. त्यांनी तसा प्रयत्न जरुर केला. त्याची पावती म्हणून, आपण पाव्हण्यांना सन्मानानी पाठवतो म्हणून आणि फिनालेपर्यंतचा एक दिवस कटला म्हणून अशा कारणांसाठी तो ग्रॅन्ड सेंड ऑफ असावा.
बायकोचं निकनेम ठेवलय त्यांनी
बायकोचं निकनेम ठेवलय त्यांनी सुंदर ,मुलाचं बहुतेक महाराज
अच्छा बायको का, मुलाचं महाराज
अच्छा बायको का, मुलाचं महाराज माहिती होतं. Thank u डीजे.
आपण पाव्हण्यांना सन्मानानी पाठवतो म्हणून आणि फिनालेपर्यंतचा एक दिवस कटला म्हणून अशा कारणांसाठी तो ग्रॅन्ड सेंड ऑफ असावा. >>> असेल तसंच.
आरोहला प्रश्न लिहून दिलेले
आरोहला प्रश्न लिहून दिलेले होते. अर्थात भर घालायची सोय असेलच. बिचुकलेंनापण अदालतसाठी आरोप लिहून मिळालेले.
सेंड ऑफ आहे ते हाउसमेट्सना आधीच सांगितलेलं.
आधीच्या एका भागात बोलण्यात तसा उल्लेख आलेला. आजही टास्क अनाउन्स व्हायच्या आधीच शिवानी आणि नेहा बिचुकलेंना काय कपडे घाला इ.इ. सांगत होत्या.
बिचुकलेंच्या बाहेरच्या पराक्रमाबद्दल सगळ्या हाउसमेट्सना कळलेलं असणारच. एकट्या शिवानीच्या तोंडून ते निघून गेलं. त्याबद्दल बोलू नका अशा सूचना असतील तसंच ते आपल्याला दाखवत नसतील.
जाताना तर तुमच्यावर अरिष्ट आलंय आणि त्यातून तुम्ही बाहेर पडाल इ.इ.
अर्थात काहीही शक्य आहे.
मी शनिवारी पहिल्यांदाच अनसीन अनदेखा पाहिलं. नेहा आणि शिवानी वीणा-शिव, स्पेशली वीणाबद्दल बोलत होत्या. नेहा शिवानी- वीणाच्या वादांबद्दल वीणाशी बोलली. वीणाने तिला अगदी गंमतीतही माझ्या आणि शिवबद्दल बोललेलं मला आवडणार नाही, असं सांगितलं. शिवानीने ते तेव्हा तरी मान्य केलं.
शेवटचा आठवडा डॉग आणि कॅट फाइट्स शिवाय गेलेला मला आवडेल.
----------
बिग बॉस सतत सौजन्य सप्ताहात असल्या सारखं चाललं तर बघायला मजा येणार नाही, असं कोणीतरी म्ह्टलंय. ते बरोबर आहे. पण भांडणं , वादावादी ठरवून केलेल्या नसाव्यात. या सीझनमधल्या मुली कॅमेर्यात यायला अगदी सुरुवातीपासूनच इश्यु शोधून किंवा निर्माण करून भांडणंकरता हेत असं अगदी धाग्याच्या सुरुवातीलाच लिहिलं गेलंय. रूपालीने तर ते मान्यच केलं होतं.
------
हिंदी बिग बॉसमध्ये कंटेस्टंट आणि होस्ट्स क्रिमिनल रेकॉर्डवाले होते / आहेत. आणि तेही बरेच गंभीर क्राइम्स. जे लोक गोंधळ घालू शकतील अशा लोकांना प्राधान्याने घेतलं जातं असं दिसतंय. टीआरपी का खेल.
शेवटचा आठवडा डॉग आणि कॅट
शेवटचा आठवडा डॉग आणि कॅट फाइट्स शिवाय गेलेला मला आवडेल. >>> मलाही आवडेल.
शिवानी जास्त, अतीच बोलते वीणाबद्दल पण आरोह आणि नेहापण बोलतात पण हे हे म्हणताना वीणाला ते ठामपणे मांडता नाही आलं, आरोह आणि नेहाने मस्त सर्व शिवानीवर घातलं. तेव्हा शिवानी असं नाही बोलू शकली की तुम्ही दोघेही बोलता तिच्याबद्दल, तिला नावं ठेवता भले कमी असेल. पण आरोहला जरा वीणाबद्दल soft कॉर्नर आहे, नेहालाही आहे. आरोह जास्त शिव वर जळतो, नेहा ताईवर आणि शिवानी वीणावर. असा सर्व मामला दिसतो एकंदरीत बरेचदा
किंवा निदान आपल्याला तसं दाखवतात, ते एकमेकांशी बोलून solved करतात ते आपल्याला दाखवलं जात नाही.
ऑनेस्टली इनसेन आणि इत बहुतेक
ऑनेस्टली इनसेन आणि इत बहुतेक सर्वच सोशल मीडिया पोल्समध्ये शिव सगळ्यात पुढे आहे व दोन नंबरवर किशोरी आहे. नंतर वीणा आहे. सगळ्यात तळाशी नेहा शिवानी आरोह. मला शिवचं प्लेबुक आवडलं नाही- बिनदिक्कत बळाचा वापर करणं आणि आरोहसारख्यासमोर स्वतःचं बळ कमी पडलं तर चक्क चावणं .
किशोरी मोस्ट एलिजीबल आहे.
पण एकूणच बिग बॉसचं गुन्हेगारी बद्दल धोरण पाहता चावणं त्यांना योग्यच वाटलेलं दिसतं.
असोच. फायनल वीक पर्यंत बहुतेकांनी बघायचंच सोडलंय यातून तरी क्रिएटिव्ह टीमला फायर करून टाका. मला ममा चा दोष वाटत नाही. जे ब्रिफ देतात त्यानुसार तो बोलत असेल पण तोच बेस्ट होस्ट आहे.
मी अजून voting केलं नाहीये पण
मी अजून voting केलं नाहीये पण मला शिव पहिला आणि वीणा दुसरी हवी आहे. तर कसं करायचं, किती द्यायचे प्रश्न पडलाय. शिवला जास्त द्यायचे मनात आहेत पण शिवला मिळत असतील तर वीणाला जरा झुकतं माप द्यावं का असं वाटतंय. असो आहे वेळ.
कुटुंबीयाच्या फोनवर पण अॅप
कुटुंबीयाच्या फोनवर पण अॅप डाउनलोड करून व्होटिंग करा.
भरत .नवऱ्याने परवा स्वतःहुन
भरत
.नवऱ्याने परवा स्वतःहुन केलं डाउनलोड. बाकी भावा बहिणीला मी voting वगैरे करते तेच पसंत नाही, त्यामुळे सांगण्यात अर्थ नाही
.
अन्जू मी पण शिव विणाला च
अन्जू मी पण शिव विणाला च देणार आहे मतं, आमच्या कडे पण मी एकटीच बिबॉ बघणारी.
भरत, अन्जू ++१११
Pages