मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

दिसतायेत काहीजण बाजूने बोलणारे ती फिनालेला गेल्यापासून, बाहेर आलेत बिळातून. पण हेटर्स नक्कीच खूप आहेत, fans पेक्षा.

अर्थात मी fanclub कोणाचाच चेक केला नाहीये, मी फेसबुक वाचते फक्त. युट्युब बघते.

वर कोणीतरी कौतुक केलंय विणाच्या कानातल्याचं, मलाही आवडतात तिचे कानातले. ती आत्ता कालच्या भागात शिव सोबत बाहेर चकरा मारत होती तेंव्हाचेही झुमके मस्त होते विशेष लक्षात राहिले माझ्या. बादवे कुठे मिळतात असे सुरेख कानातले?

आहेत आहेत ! ट्विटरवर भरपूर फॅन्स आहेत शिवानीला , किंवा तिचं पी.आर चांगलय !
ट्विटरवरच्या वोटींग ट्रेंड्सवर माझा विश्वास नाही , पण बर्याच पब्लिकने घेतलेल्या पोल्स मधे शिवच्या खालोखाल तिलाच असतात वोट्स, आता हे फेक आयडीज आहेत किंवा काय माहित नाही पण भरपूर ‘शिवानियन्स’ आहेत खरे !

तसंही तिला fans ची गरज नाही, मेकर्स आणि म मां आहेत ना तिच्या बाजूने, त्यामुळे ती nominate होणार नाही कधीच ही व्यवस्थाही केली.

अगदी तटस्थपणे विचार केला तर शिवानी तिच्या जागी बरोबर होती, वीणावर तिचा राग आहेच आणि ती थ्रेटपण वाटत असेल किशोरीताईपेक्षा, वरून वीणाची आई तिला रागाने बोलून गेलेली प्लस, वीणाने तिचे तोंड काळे केलेलं task मध्ये, प्लस शिव वीणा जोडी एकदा जिंकलेली लक्झरी task मध्ये, प्लस सुशांत मेघा रेशम आलेले तेव्हाही वीणामुळे हरावे लागलं. ह्या सर्वांचा बदला तर घेणारच ना ती. इतका चांगला चान्स ती का सोडेल. मग बाकीचे वीणाला फेवर करत असले तरी काय झालं. ती तिचा गेम खेळली.

याउलट ताईंने तिला वाचवलं होतं nomination पासून, so ok.

शिवानी वीणावर पर्सनल ग्रजेस काढून तिला नॉमीनेशनकडे ढकलत होती. नेहानी किशोरीला नॉमिनेशनला टाकायचे म्हणून दिलेली कारणं खरंच व्हॅलीड होती. किशोरीला नॉमीनेशनला टाकायचेच त्यामुळे वीणा सेव्ह होईल तर होऊ दे, वीणाला फेवर करणं हा काही हेतु नाही ह्या नेहाच्या स्टॅंड्मुळे शिवानीला आणखीनच चेव आला. नेहा तिची किशोरीबद्दलची कारणं देऊन तिथेच थांबली असती तर बरं झालं असतं. त्यानी शिवानीचं मत बदलवायला मदत झाली असती आणि तिचा हेतु पण सफल झाला असता, टास्क पूर्ण झालं असतं आणि वीणाच्या गुडबुक मधेही राहता आलं असतं. मनातली प्रत्येक गोष्ट ओठात आलीच पाहिजे असं नसतं हे नेहानी खरंच शिकायला हवं. (आणि बिबॉचं घर ही ती जागाही नाही. )

नेहानी किशोरीला नॉमिनेशनला टाकायचे म्हणून दिलेली कारणं खरंच व्हॅलीड होती. >>> अगदी अगदी.

नेहा बरेचदा मुद्देसूद बोलते. आरोह काल मात्र जास्त फेवर करत होता वीणाला taskच्या दृष्टीकोनातून तरी, नेहा वीणाच्या चांगल्या task खेळण्याबद्दल आधी बोलत नव्हती फक्त ताई का नकोत सांगत होती पण आरोहने ठामपणे दोन तीनदा म्हटल्यावर, नेहाने पण विणाचे खेळणे आवडतं हे कबुल केलं मग शिवानीबाई त्यालाही विरोध करू लागल्या.

त्यानी शिवानीचं मत बदलवायला मदत झाली असती >>> नाही बदलत ती. ती कोणाचेच ऐकत नाही. तो एक फालतू मुद्दा गरीबीचा, ते नेहा म्हणाली तिला की सोडून दे, तर नाही. वीणाचं हे मी शनिवारी सांगणारच. ती जेवढा करता येईल तेवढा नेहाला विरोध करते आणि विणावर पण खार खाते.

खरंतर bb यांनी आधीच सांगितलं असते की निकाल तुम्ही नीट लाऊ शकला नाहीत तर सगळेच nominate व्हाल किंवा शेवटी तरी सगळ्यांना nominate करायला हवं होतं.

जाउदे bb च्या जीवावर उड्या मारतेय ना मारूदे. पण वीणा गेली तर मला खरंच फार वाईट वाटेल, चांगली खेळतेय. तिला कधीही immunity मिळाली नाही.

पण वीणा गेली तर मला खरंच फार वाईट वाटेल>>> नाही जात ती, डोन्ट वरी! गेले २ आठवडे बरीच बरी वाटलीये ती...आरोह किंवा किशोरी जातील. वीणा, शीव व नेहा फायनल ३ असतील...पण विनर शिव किंवा नेहापैकी कोणीतरी होईल. Happy

आरोहनंतर शिवने खाली उतरायची त यारी लगेच दाखवली होती. पण वीणाने वि चारलं की डील आहे का तेव्हा आरोहने नाही सांगितलं.
आरोह डीला झाली या एका कारणासाठी खाली उतरला का ते आठवत नाही. पण सगळ्या वादावादीनंतर आणि बिग बॉसच्या वॉर्निंगनंतर आरोह म्हणाला डील झाली होती आणि शिव पु ढल्याच क्षणी खाली उतरला. डील झाली होती हे आधी म्हणायला आरोहला काय प्रॉब्लेम होता नक्की?
वीणा शिवला एक्स्पोझ करणं हा त्याचा हेतू होता आणि तो साध्य झाला, असं तो म्हणाला. हे प्रेक्षकांना दाखवून देण्यासाठी होतं म्हणे. नक्की काय दाखवलं काही कळलं नाही.

काल शिवानीच्या जोडीला नेहाही वीणाला तिच्या एक्स्प्रेशन्स आणि मुड स्विं ग्जबद्दल बोलली. यावर शिवने तिला आठवण करून दिली की मांजरेकर तिला तिचा चेहरा कसा असतो याबद्दल सतत तीन आठवडे बोलत होते. त्यावर पण हे आता माझ्याबद्दल चाललं नाही, हे नेहाचं उत्तर.
वीणाच्या चेहर्‍यावरच्या भावांबद्दल बोलताना शिवा नी समोर आरसा ठेवायला हवा होता.

अजब तुम्ही म्हणता तसं होऊदे.

भरत तुम्ही लिहिल्यावर मला नीट समजलं काय ते. मी नीट बघत नव्हते म्हणून समजेना, बराच वेळ tv mute केलेला. नक्की कसे एक्स्पोज झाले शिव वीणा आरोहच्या मते काय माहिती. त्या दोघांनी स्वत:साठी पण stand घेतला आणि एकमेकांसाठी पण. शिव डील झालं असेल किंवा सहा लाख हवेत म्हणून ती शिवला उतर म्हणून सांगत होती प्लस तो उतरत नसेल तर मी उतरते हेही म्हणाली.

अच्छा नेहा आणि शिवचा असा वाद झाला का, मला काही कळेनाच, काय झालं. बोट लागलं तर टच करू नको म्हणाली का ती.

वीणाच्या चेहर्‍यावरच्या भावांबद्दल बोलताना शिवा नी समोर आरसा ठेवायला हवा होता. >>> अगदी अगदी.

माझे डायलॉग्ज missed बरेच पण शिव वीणा माझ्यामते स्वत:साठी आणि एकमेकांसाठीही बोलत होते. त्यांची परीक्षा घेणारे हे सर्व कोण आणि, जळकुटे कुठले.

वीणाचं ऐकून शिव उतरला असता तरी बघ तुझा बळी दिला म्हणाले असते आणि उतरत नव्हता तर मी उतरते असं म्हणाली तर सगळे नाही, तू नेहेमी त्याची बाजू घेतेस असं म्हणाले.

डीलचा मुद्दा शिव बरोबर रेटत होता माझ्यामते. तो त्याने कबूल केल्याशिवाय उतरला नाही हे बरंच केलं त्याने.

काय यार bb, या शिव वीणाने वागायचं कसं.

हल्ली वादावादी सुरु असेल आणि नेमका tv चा आवाज मोठा असेल तर नवरा सांगतो आवाज लहान ठेव, मग मी mute चं करते कारण मलाही त्रास होतो त्यामुळे बरेचदा कळत नाही नक्की काय झालं.

या सिझनला पहिल्यांदाच कमेंट लिहीत आहे. बिग बॉस मराठी पासून BB पाहू लागले BB मराठी 1, BB हिंदी 12 आणि आता BB मराठी 2. हा खेळ कमालीचा आवडला. BB हिंदी नाही बघू शकणार यापुढे, थोडा जास्ती ugly प्रकार आहे.

तुम्हा सर्वांसारखीच BB मराठी ची खूप मोठी चाहती आहे. BB मराठी 1 ला मेघाची दिवानी होते. या वर्षी कामांचा व्याप वाढल्याने एखादी हि कंमेंट टाकता आली नाही आत्तापर्यंत. तुम्हा सगळ्यांच्या कंमेंट्स खूप एन्जॉय करत आहे .तुम्ही सगळेच छान लिहिता आणि असेच लिहीत राहा. वेळेच्या अभावामुळे आवडता हा एकमेवच कार्यक्रम पाहाते. हल्ली बऱ्याचदा फॉरवर्ड करूनच बघणं होतं इतकं कंटाळवाणं झालं आहे . DSK Talk, Honestly insane या चॅनेल्स वरचे episodes reviews जाता येता ब्लूटूथ लावून ऐकते :-).
सकाळी ब्रश झाल्यावर पहिली ऍक्टिव्हिटी हि फोनवर मायबोली वरचे तुम्हा सगळ्यांचे अपडेट्स बघणे हीच असते. Happy

हा सिझन जाम म्हणजे जाम फ्लॉप आहे. काय जे चाललंय ते बघवत नाही. तरी पण मी BB का बघते हे कळत नाहीये . तुम्हा सर्वांसारखेच शोच्या शेवटाकडे डोळे लागून राहिले आहेत . संपू दे आता . मागच्या सिझन सारखी excitement या वेळी नाही.
खूपच बायज्ड होस्ट, बायज्ड मेकर्स आणि शिवानी सारखे horrible कॉन्टेस्टन्डस !!
त्यातल्या त्यात शिव, किशोरी, विण, माधव, हिना - याच क्रमाने आवडीचे. शिव जिंकावा असे वाटते. खूप काही ग्रेट नाही पण बरा आहे त्यातल्या त्यात .

त्या शिवानीला एकदा मागच्यासारखी MM नी एकदा सणकून झोडपावं अशी इच्छा आहे. पण ती पूर्ण होणार नाहीच.

शिवानी फॅन क्लब का वाढलाय
>> मेघा धाडे चा पी आर हायर केलाय तिने ! बाहेर आल्यावर सर्व सेटिंग्ज लावून पुन्हा आत मध्ये गेली आहे.
ती बया जिंकली तर काहीच अर्थ नाही .

त्या बिचुकुले का य अजून पाळला आहे?
स्पर्धक नाहीये ? मग आत काय करतोय ?

कालचा भाग पाहिल्यावर मला नेहाचे टॉप 2 मधले चान्सेस कमी वाटत आहेत.शिवानीला.मी धरतच नाही.
गेले 3 आठवडे वीणाचा गेम चांगलाच उंचावला आहे,अशीच जर खेळली असती ही मुलगी आधीपासून तर विनर होऊ शकली असती.असो
पण आता टॉप 2 मध्ये शिवसोबत येऊ शकते
वीणा आणि किशोरी चालतील
पण मला आता किशोरी आणि शिव वाटत आहेत.जिंकेल शिव.

जिंकेल शिव.>>>>आमेन ! युपी तुमच्या तोंडात साखर पडो.
शिव जिंकेल आणि विणा जिंकली तरी चालेल मला Happy

काय यार bb, या शिव वीणाने वागायचं कसं.>>> हो , काही झालं तरी शिवानी खार खाणार, आणि बाकीचे ही. पण विणा सगळ्यांना पुरून उरते. छान हँडल करते ती सिच्युएशन

शिव आज एकदाचा बोलला :टाळ्या:
काही केल्या नेहा आवडत नाही म्हंटले तरी तिच्या बुध्दीचातुर्यावर कधी डाउट घेतला नव्हता , आजही तिचे काही मुद्दे योग्य शब्दात मांडले होते , किशोरीच्या बाबतीत तर एकदम योग्य बोलली होती, पण आज अचानक फार लो लेव्हलला जाऊन वागली, वुमनकार्ड अ‍ॅट धिस लेव्हल? सिरीयस्स्ली नेहा ? माझ्या अंगाला हात लाऊ नको म्हणून शिवला ओरडली, सो चिप ! हातवारे करत चुकून बोट लागलं शिवच, त्याचा इश्यु ? हिपॉक्रसी अ‍ॅट पिक लेव्हल , बुध्दीचातुर्य वगैरे क्षणात धुळीला मिळालं!
मग आता पराग सारख्याला अजुन कांगावा करायला निमित्त नाही मिळणार ?
असो, किशोरीला आधी बोलताना नेहा - शिवानी दोघी कित्ती खुनशी नजरेनी, नाकपुड्या फुगवून किंचाळत होत्या, नंतर शिवानीने जेंव्हा वीणाशी कंपेअर करताना किशोरीला प्रेफर केलं तेंव्हा जाम हसु आलं Happy
आरोह योग्य खेळला, तो त्याच्या जागी बरोबर होता, वीणाशी भांडण असो नसो, त्याला अर्थात नॉमिनेशनमधे वीणापेक्षा किशोरी परवडली असती !
हा सिजह्न असा चाल्लाय कि कोणीच फेवरेट नाही, इतर लोक ज्या दिवशी जितके वाईट वागतात त्या तुलनेने त्या दिवशी जो कमी अनॉयिंग असेल तो आवडतो !
या अख्या सिझनला अनॉयिंग वाटणारी वीणा गेले २ दिवस शिवानी-नेहाच्या तुलनेत चांगली वाटायला लागली आहे (आय कान्ट बिलिव्ह आयॅम सेइंग धिस), अर्थात काही म्हणायची सोय नाही, कोणी आवडलं म्हणता म्हणता दुसर्या दिवशी माती खातात!
किशोरी पुन्हा डंबेस्ट ! शिवानी ओरडली कि ५ वेळा सॉरी म्हण आणि ही येडी म्हंटली, त्या आधी ह्या बाईने आरोह पेक्षा कमी प्राइसवर स्वतःला सेट्ल केलं, कै च्या कै लाचारी Uhoh
सध्या माझे टॉप २ शिव -वीणा , करा एकत्र लाइट बन्द , मग उचलून आण वीणाला स्टेजवर नाहीतर डोक्यावर घेऊन पण नेहा शिवानीला हरवा Biggrin

शिवानीला मनीबॅग ऑफर नक्की मिळणार आहे आणि ते तिला माहितेय असं फार वाटतय मला, ही कमी झालेली किंमत टॉप ३ उरल्यावर त्यांना ऑफर करतात ना गेम क्विट करायला?
नक्की म्हणूनच शिवानीने वीणा+ आरोह दोघांचे पैसे वाया जाऊ दिले आणि निर्णय होऊ दिला नाही, आठ लाख आले ना आता मनीबॅगमधे तिच्यासाठी ? Happy

मला कालच्या भागात किशोरी नाही आवडली. मी ग्रुपमध्ये होते तरी इंडिव्हिज्युअल खेळत होते, हे सतत सांगतेय ते अगदी केविलवाणं वाटतं.
मला वाटलं वीणाला टारगेट करताना तिला सेफ पास मिळतो की काय..

पण मला तिचे ते पाच सॉरी आवडले. सॉरी म्हटलं तरी बॉडी लँग्वेज आणि टोन काही सॉरी नव्हता. शिवानीने पहिल्या आठवड्यांत एका शनिवारी प्रेक्षकांच्या सांगण्यावरूनही तिला सॉरी म्हणायला नकार दिला होता आणि उलट किशोरीनेच तिच्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला होता यामुळे शिवानीच वाईट ठरली.

तुम्ही मला सायको आणि काय काय म्हणालात असं म्हणताना शिवानी लोकांनाच आठवण करून देत होती, तिच्या पहिल्या तीन आठवड्यांची. Lol

आता सेटिंग किंवा ऑडियन्स शॉकर नसेल तर आरोह आणि किशोरी यांच्यातलं कोणीतरी बाहेर पडेल.
किशोरी बाहेर पडली तर नेहा- शिवानी- आरोह त्रिकुट संख्याबळात वरचढ राहील. आणि ते वीणाला आणि सोबत प्रेक्षकांना टॉर्चर करतील.
किशोरी कुठल्या दिशेला जाईल हे काही सांगता येत नाही, पण ती निदान कोणाला चावायला जात नाही .
दुसरीकडे वीणा- शिवला जेवढं जास्त टॉर्चर होईल, तितकी त्यांना सिंपथी व्होट्स जास्त मिळतील., provided they keep their cool. अख्खा आठवडाभर.

शिव आज वादविवादाच्या परीक्षेत पास झाला की नाही?
त्याने आपले काही पत्ते राखून ठेवले होते, असं म्हणता येईल>>>>>>>>> बघायला हवी वूट वर ही वादावादी. भरत तुमची आणि डि़जे ची पोस्ट पटली.

ते नेहा अंगाला हात लाउ नको म्हणुन ओरड्ली की शिव ने तिचा हात बाजूला केला असं म्हणत होती कळलं नाही निट.
पण कहीही कांगावा करत होती. एरवी कितितरी वेळा नाचताना शिव ने तिला उचललय, हे काय मधेच हात लाउ नकोस म्हणुन? राखी बांधली ना शिव ला ?असं कसं शिव च्या इन्टेन्शन वर डाऊट घेते ?

शिव आज एकदाचा बोलला :टाळ्या: >>>>>>>> शिव काय बोलला ? ( वूट वर बघेपर्यंत धीर नाही :जीभ काढ्णारी बाहुली: )
किशोरिने शिवानीला पाच वेळा सॉरीबिरी म्हणणे सगळच मिसलं मी.

शिवचा ऑडियन्स वर विश्वास नाही

वीणा prize money कमी झाली म्हणून रडत होती की नॉमिनेट झाली म्हणून

bb ला टास्क रद्दच करायचा होता

बिचकुले २४ तासांचा प्रेक्षक आहे

किशोरी वीणा पेक्षा जास्त fit आहे. वीणा खाली बसली तेव्हा किशोरी उभी होती.

शिव बोलला म्हणजेही नेहमीसारखं मुळूमुळू, गोडगोड न बोलता खणखणीत, तोडीस तोड बोलला.
प्रतिपक्षाचे शब्द त्यांच्यावरच उलटवले.
वीणा नॉमिनेट व्हायला तयार होती. टास्क कंप्लीट झालं नाही म्हणून अपसेट असावी.

>>नेहाचा जो मारक्या म्हशीचा लूक आहे तो लूक शिवानीकडे पण असतो कितीदा! केळ्याही तसा बघायचा. पण त्या दोघांना गोरं गोमटं नाजूक साजूक रुप आणि नॉर्मल आवाज मिळाला आहे. त्याबाबतीत मला नेहासाठी खूप वाईट वाटतं. ह्या सगळ्या "वरलिया रंगा" ला महत्व असणार्‍या दुनियेत ती स्वबळावर पाय रोवून उभी आहे याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं.

Submitted by शुगोल on 22 August, 2019 - 20:55

हा प्रतिसाद वाचला तेंव्हाच आवडला होता शुगोल..... सांगायचे राहून गेले!

किशोरीला आधी बोलताना नेहा - शिवानी दोघी कित्ती खुनशी नजरेनी, नाकपुड्या फुगवून किंचाळत होत्या, नंतर शिवानीने जेंव्हा वीणाशी कंपेअर करताना किशोरीला प्रेफर केलं तेंव्हा जाम हसु आलं Happy>>>>>>>>>>>+११११

सध्या माझे टॉप २ शिव -वीणा , करा एकत्र लाइट बन्द , मग उचलून आण वीणाला स्टेजवर नाहीतर डोक्यावर घेऊन पण नेहा शिवानीला हरवा Biggrin..........................+११११

पण मला आरोहचा हा मुद्दा नाही कळला की ,जेव्हा वीणा पहिल्या फेरीत बाहेर जायला तयार होती तर त्या एकट्यानेच का विरोध केला ?

शेवटची फेरी अनिर्णीत राहिली ती शिवानी मुळे. वीणाला फिनाले तिकीट मिळावे याला सगळे सहमत होते शिवानी वगळता,म्हणून शिवानीच तिकीट काढून घ्यायला हवं होत.

वर मी नेहाने किशोरीबद्दल बरोबर मुद्दे मांडले असं लिहिलं खरं पण नेहा स्वतः सुध्दा दुसर्यांच्या मेहेरबानीवरच इथ पर्यन्त आली आहे आणि कॅप्टनही वीणा किशोरीचा खांब त्या टास्कमधे डिस्ट्रॉय झाला म्हणूनच झाली आहे, दोघांच्या गोंधळाचा लाभ घेऊनच नेहा झाली कॅप्टन !
बाप्पा, मॅडीने नेहाला वाचवलं म्हणून दोनदा लाइफलाइनही मिळाली आहे आणि आताच्या एक्स काँटेस्टन्ट टास्क मधेही दुसर्यांच्या मेहेरेबानीवर टास्क न करता तिकिट टु फिनाले घेतलं आहे.

>>नेहा स्वतः सुध्दा दुसर्यांच्या मेहेरबानीवरच इथ पर्यन्त आली आहे

प्रचंड मोठ्ठा जोक Rofl

बाय द वे, आरोहला ९९ मते देवून आलो..... किशोरी बाहेर पडली पाहिजेल आता!

>>नेहा स्वतः सुध्दा दुसर्यांच्या मेहेरबानीवरच इथ पर्यन्त आली आहे
काहिहि... तसे तर मग वीणा च्यानेल मुले इथवर आली आणि शिव वीणा फेक लवस्टोरी मुले इथवर आला असे म्हणावे लागेल.

शिवानी प्रचंड आवडते (कारण तिला हेच करायला पाठवले आहे) ती विनर नसेल हे तिला माहिती आहे तसेच कोण व्यक्ती आपली इतकी निगेटिव इमेज स्वतः हून करेल ? काही काही वेळा खरी शिवानी डोकावते तिच्यातून.
असो मत आपले आपले.

@ अंजू ताई त्याच त्याच पोस्ट येत आहेत तुमच्या आणि १०० मधल्या ९० पोस्ट तुमच्याच येतात.

मला अजिबात वाटले नाही की नेहा वुमन कार्ड खेळत होती. सुरुवातीपासूनच त्यांचे तू चुटकी वाजवू नको माझ्यापुढे, तू फिंगर पॉइन्ट करू नको यावरून भांडण चालू होते काल. त्याचेच एक्सटेन्शन होते तिचे वाक्य.
मला काल नेहाचे पॉइन्ट पटले सगळेच. किशोरीबद्दलचे तर अगदीच. शिव ने शेवटी चांगले पॉइन्ट मांडले पण सुरुवातीला बैलपणा करत होता. अर्ग्युम्नेट काहीच नाही पण मला टिकेट हवंय असं काहीतरी. काल तो आणि वीणा स्वतंत्र खेळत होते. वीणा स्ट्राँग वाटली वाद विवादात.
अ‍ॅक्चुअली किशोरी एकटीच डंब वाटली. बाकी सगळ्यांनी काही ना काही डोके लढवून पॉइन्ट्स मांडले कालच्या टास्क मध्ये. पण सध्याच्या त्यांच्या इक्वेशन्स मधे एकमत होणे अवघड च होते.
बाकी त्या बिचुकलेची दयनीय स्थिती आहे. नुस्ते विदूषकगिरी करा, बाकी कसल्याच टास्क चा हिस्सा नाही. किती इन्सल्टिंग आहे ते.

@ अंजू ताई त्याच त्याच पोस्ट येत आहेत तुमच्या आणि १०० मधल्या ९० पोस्ट तुमच्याच येतात. >>> तुम्ही ignored करा हो. न वाचण्याचा ऑप्शन आहे की तुम्हाला.

मला अजिबात वाटले नाही की नेहा वुमन कार्ड खेळत होती. सुरुवातीपासूनच त्यांचे तू चुटकी वाजवू नको माझ्यापुढे, तू फिंगर पॉइन्ट करू नको यावरून भांडण चालू होते काल. त्याचेच एक्सटेन्शन होते तिचे वाक्य.>>>>>>>> हो ना? मला पण तसंच वाटलं , फक्त नीट लिहीता आलं नाही.
आणि नीट बघितलं नाही, म्हणुन मला आश्चर्य वाट्लं कि अशी कशी शिवच्या हेतूविषयी शंका घेतेय ही?

Pages