मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

आठवत नाही, मला नवऱ्याने करून दिलं voot app download आणि मराठी जत्रापण. मागच्यावर्षी मी desktop वरून voot वर जाऊन करायचे. पण यावेळी तिथे नाही ठेवलं त्यांनी.

पण फेसबुक, गुगल मार्गे log in करायला लागत असेल, रजिस्ट्रेशनपण लागत असेल.

ओके थैंक्स अन्जू . बघते .
बिग्ग बॉस ची प्राईझ मनीयावेळी 25लाख होती. मागच्या वेळी मेघा जिंकली तेंव्हा किती होती ?
बिग्ग बॉस हिंदीची पहिली प्राईझ मनी 1करोड होती. आणी आता 50लाख झालीये .

मी कदाचित खूप अपेक्षा ठेवत असेन बिबॉस कडून,पण मला अस अजूनही वाटत आहे की 6 जण फिनँलेला जातील
कारण खूप लोकांनी वोटिंग मध्ये प्रॉब्लेम्स येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत
त्यामुळे बिचुकल्यांच्या बाबतीत जे कारण देतात तसच टेक्निकल फॉल्ट मुळे वोटिंग प्रक्रिया सुरळीत पार न पडल्याने कोणीच बाहेर जाणार नाही,अस बिबॉस सांगू शकतात.
तसही वोटिंग लाईन्स एकच दिवस चालू ठेवल्या आहेत.

>>नेहा स्वतः सुध्दा दुसर्यांच्या मेहेरबानीवरच इथ पर्यन्त आली आहे>>> सही पकडे है Wink

शिवानी अजूनही तिसर्या आठवडयातच अडकली आहे. टास्क खेळायच सोडून किशोरीशी पर्सनल मुद्दयान्वर भाण्डत बसली. तिला किशोरीताईचे युझलेस सारखे माइल्ड शब्द खटकतात, स्वत: मात्र मूर्ख, गाढव, बेअक्कल सारखे अपमानजनक शब्द काढते.

काल शिव, विणा, नेहाने छान मते माण्डली. शिव मागच्या दोन दिवसान्पासून स्मार्ट झाला आहे. बोलायला लागला आहे. चान्गलच आहे!

विणा किशोरीलाही म्हणाली ते बरोबर होत, ' आरोहपेक्षा तुमची किम्मत जास्त असायला हवी होती वै वै.

आरोह किव्वा किशोरीपैकी एक जाव कुणीतरी.

शिवानी फॅन क्लब का वाढलाय
>> मेघा धाडे चा पी आर हायर केलाय तिने ! बाहेर आल्यावर सर्व सेटिंग्ज लावून पुन्हा आत मध्ये गेली आहे. >>>>>>> नैतर काय. हिन्दिमधून सुद्दा तिला वोटिन्ग होत असेल.

सध्या माझे टॉप २ शिव -वीणा , करा एकत्र लाइट बन्द >>>>> डिजे, तुमची हि कमेण्ट वाचून एका क्षणासाठी हदय बन्द पडल, पण नन्तर ट्यूबलाईट पेटली माझी. Biggrin

कालच वेक अप सॉन्ग स्पेशली शेवटच कडव शिव - वीणासाठी होत वाटत. Wink

काही काही वेळा खरी शिवानी डोकावते तिच्यातून >>>>>>>>> gajanan59, खरी शिवानी कशी आहे हे माहित आहे का तुम्हाला? असल्यास सान्गाल का?

@ अंजू ताई त्याच त्याच पोस्ट येत आहेत तुमच्या आणि १०० मधल्या ९० पोस्ट तुमच्याच येतात. >>> तुम्ही ignored करा हो. न वाचण्याचा ऑप्शन आहे की तुम्हाला. >>>>>>> ज्जे बात, अन्जू. लगे रहो. Happy

Welcome manila, असेल लिहित राहा. Happy

वीणा नॉमिनेट व्हायला तयार होती. टास्क कंप्लीट झालं नाही म्हणून अपसेट असावी. >>>>>>> हो. खूप वाईट वाटल तिला बघून.

आज बिचकुलेला डान्स पार्टी देऊन अलविदा करणार वाटत.

हो डीजे, सर्वरवर ताण आलेला, एक दिवस आहे फक्त तर लागोपाठ वोटींग होत होतं, voot ने सांगितलं हे . फक्त शिव नाही वीणाला पण voting जात नव्हतं अशा तक्रारी आल्या होत्या.

संध्याकाळी सहा वाजताचा ट्रेंड कोणीतरी डीक्लेअर केला, शिव एक नं, विणा दोन आणि आरोह तीन, ताई चारवर आहेत.

शिव वीणा वोटींग मधे नऊ टक्के फरक आहे आणि वीणा आरोह दरम्यान खूप फरक आहे, २० ते २५ टक्के.

शिव वीणा तावून सुलाखून निघतायेत, वीणाला तर किती वेळा nominate केलं गेलं. God bless them Happy .

मागच्या पानावरील स्वरुप आणि मैत्रेयीच्या पोस्टना + १११११

या वीकेंडला किशोरी जायला हवी.

मला नेहा जिंकलेली बघायला आवडेल.

सेकंड चॉइस वीणा. गेले दोन आठवडे तिच्यात बरेच पॉझीटीव बदल आहेत जे मला आवडतात.

तिच्यामागे fan base पेक्षा man and money power असावी. >>> भरत., तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळलं नाही.

भरत आता किशोरीताई पुढे आणि आरोह मागे गेलाय असं बघितलं पण या सगळ्या news वर किती विश्वास ठेवायचा समजत नाहीये.

कारण मागे ह्या सगळ्यांनी विणाला एक नं voting दाखवलं पण आरोहला आधी सेफ करून तिला danger zone मध्ये दाखवलं, तेव्हापासून आरोह tonting करतोय तिला की तुला माझ्यापेक्षा कमी votes होते.

अशी एक न्यूज आहे,इंन्स्टा बीबी अकाउंटवर की बीबी मेकर्स आणि आरोहमध्ये त्याला टॉप 5 मध्ये आणण्याच सेटिंग झाल आहे कारण जेव्हा कोणीही वाईल्ड कार्ड यायला तयार नव्हत तेव्हा या सेटिंग वर म्हणे तो आला,म्हणून रुपालीच्या वेळेस तो नं चारवर असूनही ती बाहेर गेली.कदाचित म्हणूनच हीनाने त्याला नॉमिनेट केल नसेल.
खरखोट माहित नाही.पण मला नाही तथ्य वाटत
अर्थात वोटिंग ट्रेंड तरी कितपत खरे आहेत देवाला माहित
पण मग सहाही जणांना नेल असत ना.किंवा मग ती कमी केलेली रक्कम त्याला देउन पाठवणी करणार असतील.

काय माहिती काय, यात वीणाचा बळी देऊ नका म्हणजे मिळवलं, शिवचा देऊ शकत नाहीत कारण त्याचं voting जबरदस्त आहे.

आरोह, टॉप ५ मधे जायलाच हवा! म्हणूनच त्याला आणले असावे. कारण केळ्याला होणारे कमी व्होटींग बघता तो टॉप ५ पर्यंत पोचू शकणार नाही याची बिबॉला खात्री असावी. वैयक्तिक खेळ सुरु झाला की त्याला नॉमिनेशन पासून वाचवणे शक्य होणार नाही हे ही बिबाँना माहित होते.
त्यामुळे शिवला टशन द्यायला एखादा मेल कँडीडेट असायलाच हवा होता.
अन्जू वीणाचा बळी जाणार नाही.
किशोरी जाणार. आणि तो बळी नसेल, तर ती जायलाच हवी आहे.

नेहा, शिवानी फॅन्सनी आरोहला वोटींग करायला पाहिजे.
इतके दिवस वाटले नाही पण आता मी वोट करु शकत नाही याचं वाईट वाट्तं.

शुगोल आमेन वीणासाठी. शिवानी तिला घालवायला बसलीय ना, म्हणून काळजी वाटते, तिची वट वीणापेक्षा जास्त आहे, आजही म्हणाली, वीणा जायला हवी.

आरोहला करतायेत voting त्या दोघींचे फॅन्स.

आता अफवा तर भरपूर पसरतयेत, किशोरीने शो जिंकावा म्हणून मांजरेकरने सेटींग लावली आहे वगैरे..
मागच्याही वर्षी पुष्करसाठी अफवा पसरल्या पण जिंकली मेघाच, त्यामुळे शक्यतो अफवा नाही खर्या होणार असं वाटतय !
आरोह आवडता नसला तरी डोकं आहे त्याच्याकडे, किशोरीपेक्षा नक्कीच चांगला खेळतो, तो रहावा आणि मग ५नंबरवर आउट व्हावा, मग शिवानी, मग नेहा आणि टॉप २ शिव-वीणा Happy .

किशोरीला सोमि वर भरपूर सपोर्ट दिसतोय की. तिचं पेड पीआर मला अजिबातच दिसलं नाही. मुळातच ती तशी ९०s हिरॉईन असल्यामुळे सोशल मीडियाचा पैसे फेकून नीट वापर करण्याची attitude दिसला नाहीये. पण दरवेळी नॉमीनेट झाल्यावर प्रेक्षकच तिला वाचवतात.
अर्थात बिग बॉस टीम ज्या लेव्हलचं चिटिंग करते आहे ते पाहता काहीपण होऊ शकतं. किशोरी बाहेर गेली तर एका मोठ्या वर्गाचा बिग बॉसमधील रस पूर्णच संपेल हे नक्की.

आज शिवानी, आरोह छान दिसतायेत. शिवानी ग्लॅमरस एकदम, बाकी सगळे so so. नेहा तो चष्मा घालून अगदीच काहीतरी दिसतेय.

वीणाला नाचता येत नाही आणि वाजले की 12 का दिलं, शिवानी शिकवत होती.

कि. ताईसाठी परागने पण अपील केलंय असं बघितलं युट्युबवर.

अन्जू.....वीणा कशी जाईल,कलर्सचा फेस आहे ती.त्यांना एक फेस लागतोच.लास्ट सिझनला इच्छा नसूनही त्या सरस्वतीवाल्या आस्तादला शेवटपर्यंत बघाव लागल होत.लास्ट टाईम तो होता ना ,कलर्सचा फेस
आणि पुढच्या वीकमधल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवानीला भांडायचय ना वीणाशी.

आहे फेस, ती खेळतेयही छान पण तरी मनात शंका येतेच.

हो आस्तादने फार काही न करून, राडा वगैरे करूनही 5 नं मिळवला.

माझ्या बहिणीची मैत्रिण बिबॉस सिझन 1 च्या एडिटिंग टीम मध्ये होती .खूप हेक्टिक असत काम ,म्हणून नंतर सोडल.पण ती म्हणाली की शेवटी शेवटी सगळ चँनेल ठरवत.बिबॉस च काही नसत
आता वीणाला जर चँनेल ने जबरदस्त प्रोजेक्ट,वायकॉमची मराठी फिल्म ऑफर केली असेल,तर तीच स्वत:हून बाहेर जाईल,शेवटी ते करियर आहे.
पण तस नसेल कारण मग लव्ह
स्टोरी संपेल बिबॉसच्या घरातली.
ते शिवानीच बोलण मुद्दाम,वीणाला सिंपथी मिळवून द्यायला,कारण वीणाच्या तोंडात पण ओव्या नव्हत्या ना.........हसणारी बाहुली
म्हणून तिला आता राधा करत असतील,हा आठवडा तर ती अलका कुबल, माहेरची साडी मोडमध्ये आहे,बिचुकल्यांशी काय चांगल बोलत आहे,नेहाशी काय सूत जुळल आहे,विचारायलाच नको.

मागेही इथेच कोणीतरी लिहिलं होतं ना , कि तडतडी कंप्लेंट बॉक्स वीणा सुसह्य वाटावी म्हणून शिवानीला परत आणलय? Happy

आजचा एपिसोड फारच पकाऊ आणि झगामगा मला (BB ला) बघा असा वाटला.
BB हाऊस मध्ये स्वतःचाच वाढदिवस साजरा करायला आणि काय ते पांचट फुगे फुगवा, केक संपवा पकाऊ टास्क होते... Sad
दीड तास वाया गेला यार, उद्या पासून voot वर fwd करत बघावे लागणार वाटतं BB.
श्या !!!

या वीक मध्ये ममांचा सल्ला शिव आणि वीणाने फारच मनावर घेतल्याने उद्या ममांना त्यावरून त्यांना काहीही बोलता येणार नाही.
या आठवड्यात कोर्ट टास्क आणि मुद्रा टास्क दोघही छान खेळल्याने त्यावर पण बोलता येणार नाही,आता हीनाही नाही,आणि बिचुकले बरेच बरे होते.
उद्याचा शेवटचा वीकएंडचा डाव आहे,त्यामुळे बहुतेक शिवानीवर बरसतील ममां
सगळी भडास काढतील
भरपूर कंटेंट दिला आहे तिने या आठवड्यात .

Pages