मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

काल शिवने बरोब्बर कॉमेंट टाकली शिवानीबद्दल त्या बिचुकले भांडणात, ‘गेली ना फिनालेला आता यांची गरज संपली , आता घालेल लाथ’ !

नेहामध्ये खरंच बदल झाला आहे असं वाटतंय तरी. अंतिम दोनमध्ये नेहा आणि शिवच हवेत. या पैकी कोणीही जिंकलं तरी चालेल.>>+१११

Btw , आठवतय का? म.मांनी आधी शिवानी आणि शिव पेअर जमवायचा प्रयत्नं केला होता, त्याला तिला प्रोपोझ करायचे अ‍ॅक्टही करायला लावले होते वीकेन्डला , वर हे ही म्हंटले होते कि बघा तुमच्या दोघांची नावेही मेड फॉर इच अदर आहेत !
शिवानीने अगदीच झिडकारले , अ‍ॅक्ट पुरतच ठिक आहे असं काहीतरी म्हंटली होती.

हो कारण पहिल्या दिवशी शिव शिवानी च्या मागे पडला होता त्यावरुन ती खुप चिडली होती. म पहिल्या वीकेंड च्या डावाला महेश सरानी शिवला जरा अंदाज घेउन सिग्नल द्यायचास घाई कशाला केलीस असे बोलले. अणि शिवानी ला प्रोपोज करयला सांगितले . पहिल्यांदा ती नाही बोलली तसे करायला म ऐक्टिंग करायची तर एक charactor म्हणून करते असे बोलून तिने केलेले ते.

नेहाचा जो मारक्या म्हशीचा लूक आहे तो लूक शिवानीकडे पण असतो कितीदा! केळ्याही तसा बघायचा. पण त्या दोघांना गोरं गोमटं नाजूक साजूक रुप आणि नॉर्मल आवाज मिळाला आहे. त्याबाबतीत मला नेहासाठी खूप वाईट वाटतं. ह्या सगळ्या "वरलिया रंगा" ला महत्व असणार्‍या दुनियेत ती स्वबळावर पाय रोवून उभी आहे याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं.

खास for धनुडी.>>>>बघितली क्लिप अन्जू, विणा आवडली पण त्यात बोलणाऱ्या बाईचा आवाज टोन, जाम इरिटेटींग वाटला,

आज नुसती कचकच आहे.

शिव आज वादविवादाच्या परीक्षेत पास झाला की नाही?
त्याने आपले काही पत्ते राखून ठेवले होते, असं म्हणता येईल.

Show owner or producer wateva यांना काही self respect नाहीय का..कशा साठी शिवानी ला ठेवलंय show मध्ये..

Show owner or producer wateva यांना काही self respect नाहीय का..कशा साठी शिवानी ला ठेवलंय show मध्ये..

Show owner or producer wateva यांना काही self respect नाहीय का..कशा साठी शिवानी ला ठेवलंय show मध्ये..

Show owner or producer wateva यांना काही self respect नाहीय का..कशा साठी शिवानी ला ठेवलंय show मध्ये..

आज किती कचकच होती, शिवानी बोलायला लागली ताईंना आणि त्यानंतर मी टीव्ही म्युट केला. आज सिद्ध झालं की शिवानी हिना आणि वीणाला घालवायला आलीय. आरोहने आज वीणाच्या टास्कचं कौतुक केलं आणि नेहानेही, बाकी नावं ठेवली पण केवळ टास्कमुळे ताई आणि वीणात त्यांनी वीणाची निवड केली. पण शिवानी विरुद्ध तीन यामुळे केवळ शिवानीच्या एका मतामुळे वीणा फिनालेत पोचली नाही.

वीणानेही मस्त स्टँड घेतला की एकट्या शिवानीसाठी मी नाही उतरणार, सगळे सांगत असतील तर उतरेन. करेक्ट कारण परवा म मांच म्हणाले ना टास्क थांबला तरी चालेल पण सर्व सहमती झाली पाहीजे. पण बिग बॉस चिडलेच असं केलं म्हणून सर्वांवर.

सगळ्यांनी जर बिग बॉसचा डीसरीस्पेक्ट केला तर मग सगळ्यांना का नाही नॉमिनेशनला टाकलं. नाहीतर असंच करायचं होतं तर कालपासून वोटींग लाईन्स सुरु का नाही केल्या.

एनीवे आता वीणा शिव दोघांना वोटींग करायला लागणार पण यावेळी वीणाला जास्त द्यावी लागतील कारण शिवला मिळतील मतं.

आज फायनली काय झाले, कोण कोण गेलं नॉमिनेशन मध्ये?? माझी नेमकी शेवटची 10 मिनिटं गेली... चौघेही नॉमीनेट झाले का?
आरोह जाईल यावेळेस बाहेर असं वाटतंय.... तो नवीन आणि फॅन पण कमी आहेत त्याचे.

हो मीनाक्षी, त्या दोघी आणि बिचुकले सोडून बाकीचे नॉमिनेटेड.

UP उद्या रात्री अकरापर्यंत voting lines सुरु आहेत.

आरोह जाईल यावेळेस बाहेर असं वाटतंय.... तो नवीन आणि फॅन पण कमी आहेत त्याचे. >>> त्याला शिवानी आणि नेहा fans ची votes मिळतील.

काय माहिती. शिवानीची अट असेल वीणा नको फायनलला. हिनाला काढलं आता वीणाला काढायचं आहे तिला. आरोह नेहा ने वीणाचं टास्कवरून कौतुक केलं तर किती राग आला होता. पूर्ण विरोध केला त्यांना.

थँक्स अंजू..
Btw काल शिवानी बिचुकले यांच्यावर नक्की एवढी का भडकली होती, म्हणजे ते नक्की कोणाबद्दल आणि काय बोलत होते ते कळलं नाही मला , शिवानी ला काय खटकलं?
बिचुकले फार गोल गोल बोलतात, मला त्यांचा मुद्दाच कळत नाही नेमका, काल काय झालं होतं नक्की??

काल उगाच भडकली, बिचुकले वीणा आणि ताईंशी कसे काय गप्पा मारत बसले, त्यातल्यात्यात वीणाशी का हसून खेळून बोलतायेत हे खटकलं असेल मूळ, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरून काहीतरी निमित्य मिळालं तिला.

Btw , आठवतय का? म.मांनी आधी शिवानी आणि शिव पेअर जमवायचा प्रयत्नं केला होता, त्याला तिला प्रोपोझ करायचे अ‍ॅक्टही करायला लावले होते वीकेन्डला , वर हे ही म्हंटले होते कि बघा तुमच्या दोघांची नावेही मेड फॉर इच अदर आहेत ! >>> ते पहिल्या दिवशी शिव म्हणालाना की बिचुकले फक्त शिवानीचं ऐकतात अगदी आल्या आल्या काहीतरी झालेलं, त्यावर शिवानी तेव्हाच उखडलेली शिववर मग किशोरीताई, सुरेखाताई यांनी समजावलं त्याला, ओळख नाहीये अजून तर मस्करी करू नकोस. त्यामुळे म मां नी तो मुद्दा उचलला होता विकेंडला. त्यावेळीचं त्यांनी आजूबाजूला दुसरीकडे पण सिग्नल दे म्हटलेलं. तसंही bb ना एक जोडी हवीच असते, त्यासाठी तर रुपाली आणि माधवला एकत्र पाठवलं पण workout नाही झालं म्हणून बाहेर काढलं.

त्याने दुसरीकडे सिग्नल दिले आणि तो अडकला. मला नाही वाटत दोघांचे फेक आहे असं. आज सर्वानुमते शिव उतरायला तयार नव्हता, तीही सांगत होती. मग म्हणाली हा नसेल उतरत तर मी उतरून nominate होते तर नेहा चिडली की प्रत्येकवेळा त्याची बाजू का घेतेस, खरंतर ती बाजू तशी घेत नव्हती त्यालाच सांगत होती पण तो ऐकत नव्हता म्हणून ऑप्शन दिला तिने, ती म्हणाली task नको थांबायला. पण नेहा आणि आरोहने विरोध केला. नेहा आणि आरोहचं आज मात्र निवडायचेच असेल फायनलसाठी तर वीणाला निवडूया असं मत दिसलं एकंदरीत, शिवानीचा तीव्र विरोध Lol

वीणा असंही म्हणालेली बहुतेक तेव्हा की मी एकदा दुसऱ्या पायरीवर चढले की नाही उतरणार, पण सर्वानुमत झालं तर उतरेन, तसं झालं नाही.

वीणासाठी शिवने वाद घातला सर्वांशी पण त्याच्या मताशी सहमत task बाबतीत तरी आरोह आणि नेहा झाले. टास्कमध्ये नेहा आणि वीणा या दोघी चांगल्या असतात म्हणजे डोकं छान चालते, वेगळा विचार करतात असं म्हणाला आरोह.

आज वीणा अजुनच आवडली आणि शिव ने ते आधी आरोहबरोबरच्या डीलला नकार देवून माती खाल्ली असे वाटले.... नशीब वेळीच माघार घेतली त्याने!
आरोह आणि नेहाने वीणाच्या नावाचा आग्रह धरण्यामागे वीणापेक्षा किशोरी नॉमीनेशन मध्ये आरोहला कमी टफ देईल हे गणितही असावे!

पण यासगळ्यात सगळ्यांनी मिळून किशोरी आणि वीणाच्या अनेक चुका बाहेर काढल्या!
तरीही वीणा खुप स्पोर्टीव्ह आणि सॉर्टेड वाटली आज!

हो स्वरूप, गेले दोन आठवडे वीणा चांगल्या पद्धत्तीने पुढे जातेय.

नेहा आणि आरोहचं पण कौतुक की ते खरं बोलले तिच्या task बद्दल. शिवानी मात्र डूख धरून बसली. नेहा आणि वीणाची मैत्री आहे त्यामुळे तिला कुठेतरी soft कॉर्नर आहे पण आरोहने पण केलं कौतुक. तिच्याबरोबर task खेळल्याने वीणाची कामगिरी माहितेय त्याला.

Btw पण शिवानी कि ताईंशी वाद घालताना, मी tv mute केला पण तिचे अविर्भाव बघून ती dangerous वाटत होती मात्र. खाऊ की गिळू करते समोरच्याशी भांडताना. ती खरंच सायको वाटते.

Voting lines opened.>>>> :haha: finally Happy केलं वोट दोघांना, पण शिवला 50 आणि विणा ला ४८ दिले अजून एक देत होते विणा ला तर वोटस् संपले माझे असं आलं. आज उशीरा लावलं बिबॉ, विणा किशोरी ताईंचा टास्क संपत आलेला तेव्हा बघितलं. शिवानी विणा ला मत द्यायला तयार नव्हती, आरोह (अत्ता आरो नाही म्हणत Wink ) नेहा तयार होते, किशोरी नेहा चं मन वळवाचा प्रयत्न करत होती आणि मग बिबॉ चिडले, त्यांनी टास्क रद्द करण्याची शिक्षा (?) दिली सगळ्यांना. हे सगळं मी बघितलं( त्या आधी काय झालं?)
पण मला एक समजत नाही शिवानी ला ओरडायचं ना तिच एकटी हटवादीपणा करत होती, आधी कसे मेजॉरिटी ने निर्णय घ्यायचे तसा घ्यायचा. नाही तरी आधी पाहूणीच होती ना, परत पाहूणी करायचं

९९ votes असतात. मी वीणाला यावेळी जास्त दिली कारण शिवला मिळतील. मागे मी सगळी शिवला दिलेली. यावेळी शिवला २७ आणि वीणाला ७२ दिली.

शिवसाठी अमरावतीत rally काढलेली काल. त्याची काळजी नाही मला.

आरोह (अत्ता आरो नाही म्हणत Wink ) >>> हो तो task बाबत कौतुक करतो तिचे, मागेही केलेलं. शिवानी जळते जाम तिच्यावर. एकीकडे म्हणते मला ती महत्वाची नाहीच आणि सतत तिचेच नाव बोलण्यात असतं.

पण मला एक समजत नाही शिवानी ला ओरडायचं ना तिच एकटी हटवादीपणा करत होती, >>> असं कसं करतील लाडक्या पिल्लाला, trophy द्यायची आहेना मग.

Pages