मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वीणाच्या आपण साधे कपडे घातल्याने गरीब दिसलो या वाक्याने शिवानीच्या अंगात मार्क्स संचारला. टीव्हीवर बिग बॉस पाहणार्‍या साधे कपडे घालणार्‍या सगळ्या गरिबांचा अपमान तिला त्यात दिसला.>>>> Lol हे बघून मला ऑं झालं! का ही ही तर्क काढतेय शिवानी. तरी नेहा तिला दोन तीन दा म्हणाली कि तु हे मुद्दे घेउन बोलू नकोस. (कारण त्यात वाटतो तेवढा दम नाही) पण ती शिवानी आहे ना, ती बोलणार, आणि इतक्या फुसक्या गोष्टीचा इश्यू करणार

भरत लय म्हणजे लय भारीच कंमेंट, शेवटचा पॅरा वगळता हसून हसून पुरेवाट, काय एकेक नावं ठेवली आहेत तिकडीला जबरदस्त=+१११११

घरातल्या आणि घराबाहेरच्या लोकांना शिव वीणाच्या रिलेशनशिपबद्दल इतका प्रॉब्लेम का आहे कळत नाही.... खरे- खोटे-शो पुरते जे काही असेल ते त्यांचे ते बघून घेतील.... बिग बॉसच्या घरात जुळलेली अशी नाती बाहेर टिकलीयत पण आणि मोडलीयत पण.... हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!

बर यात कुणी एकाने दुसऱ्याला वापरुन घेतलय वगैरे असे मला तर अज्जिबात वाटत नाही.... दोघांनाही एकमेकांचा फायदाच झालाय.... फोकस हलतोय वगैरे सारखेसारखे शिववर बिंबवून आणि उगा उभ्या विदर्भाचे दडपण त्याच्यावर आणून काही फायदा नाही..... त्याचा फोकस जर वीणावर असेल तर तो त्याचा प्रश्न आहे ना.... खेळू द्या की त्याला त्याच्या मनाप्रमाणे (आणि खर म्हणजे कुणीही कितीही सांगितले तरी तो त्याच्या मनाप्रमाणेच खेळतोय.... रादर सांगणारे तोंडावर पडतायत!)

ते सुखी आहेत ना एकमेकांसोबत; तर मग उन्हे उनके हालपर छोड दो!

तिकीट टु फिनाले म्हंजे वर्गातल्या नापास पोरांनी हुशार पोरांचे पेपर तपासण्यासारखा होता Wink

फिनालेमधे पोचल्यावर शिवानी पिसाळली लग्गेच, ओरडते काय, डोळे काय फिरवतेय, आयोडेक्सचा स्टॉक संपला वाटतं! Biggrin

मला शिव आणि शिवानी सोडून कुणीही झाल तरी चालेल.. नेहा व्हावी अस मनापासून वाटत. का कोण जाणे पण शिव खूप चांगला असल्याचे नाटक करतोय अस वाटत. त्याने ठरवून वीणाला पटवल आहे. रोडीज मधेही असच केल होत. शिवानी तर डोक्यात जाते.

>>तिकीट टु फिनाले म्हंजे वर्गातल्या नापास पोरांनी हुशार पोरांचे पेपर तपासण्यासारखा होता Wink

बऱ्याच जणांकडून ही किंवा अश्या पद्धतीची कॉमेंट ऐकली...
पण बिग बॉस हा खेळ हुश्यारीने टास्क खेळण्याबरोबरच लोकांची मने जिंकण्याचाही आहे आणि ज्यात सहस्पर्धकही आले..... आपण प्रेक्षक संपूर्ण दिवसभरातला बिग बॉसच्या मर्जीने एडीट झालेला तास-दीड तास बघून आपापली मते बनवतो पण जे लोक आता उरलेल्या स्पर्धकांबरोबर किमान काही दिवस/आठवडे २४ तास राहून आलेत.... त्यांचा संघर्ष सहस्पर्धक म्हणून फार जवळून अनुभवलाय.... भले बुरे सगळे अनुभव घेतलेत..... त्यांची मते आपल्या पेक्षा वेगळी आणि (कदाचित जास्त) खरी असू शकतील ना!
त्यामुळे बाहेर पडलेल्यांनी तिकिट टू फिनालेचे कॅंडीडेट निवडणे यात मला तरी काही फार चुकीचे वाटले नाही.
आता बाहेर पडलेल्यांनी किती प्रामाणिकपणे ही निवड केलीय किंवा त्यांच्या निवडीवर बिग बॉसचा प्रभाव होता का हे वादाचे मुद्दे होवू शकतात पण सरसकट त्यांना नापास विद्यार्थी म्हणून हिणवणे नक्कीच पटत नाही!

तिकीट टु फिनाले म्हंजे वर्गातल्या नापास पोरांनी हुशार पोरांचे पेपर तपासण्यासारखा होता >>>हा हा हा.. एकदम खर बोललात.. Lol

https://www.youtube.com/watch?v=gqH5c_Kl7uM
वीणाचे नाईटसूट आणि कानातले फेमस आहेत म्हणे युथ मध्ये. >>>>>>>> अन्जू ,छान दिस्तेय गं वीणा, थँक्यु लिंक दिल्याबद्दल. मला ती राधा प्रेम रंगी रंगली मधे पण आवडायची ( दिसायला) . टायट्ल ट्रॅक मधे तर खुपच सुरेख दिसलीये. ( मावैम )

आता मॉल टास्क असल्याच्या न्युज येतायेत, शिवानी- नेहावर पब्लिकचा राग आहे म्हणून त्यांना लोकांसमोर आणणं वाचवलं म्हणे!
हिन्दी बिबॉमधे इनॉर्बिट मॉलमधे हिना खानचे कोणी हेटरनी केस ओढले होते म्हणे Happy

त्या मग्न तरण तलावाकाठी बसुन वीणाने केलेलं विश्लेषण 'भन्नाटच' होते...मैत्रीमध्ये Heart Shapes मध्ये Sorry (आणि बऱ्याचशा गोष्टी) निदान माझ्या तरी बघण्यात नाही...त्याशिवाय मैत्री नाही होत का?

पण मग रुपालीला आणि WCD ला 'तो मला आवडायला लागला आहे' सांगणं कशासाठी होतं?

व्यक्तीगत आयुष्यात ते काय निर्णय घेतात याबद्दल कोणी भाष्य करणं योग्य नाही होणार पण इथे ७५ Cameras समोर जे घडतंय त्यावर कोणी काही बोलुच नये का?

त्यात शिव वीणासाठी घराबाहेरही जायला तयार आहे. तो Murder Mystery Task त्याने तिच्यासाठी मध्येच सोडला होता. सगळे माजी स्पर्धक त्याला तेच समजावू पाहत आहेत.

वीणाला जर एवढीच मैत्री ठेवायची होती तर ज्यावेळी मांजरेकर तिला शिव वरून चिडवायला लागले तेव्हाच थांबवायचं ना त्यांना...तेवढी स्पष्टवक्ती ती आहेच की.

त्यात ते मांजरेकर म्हणाले तुमचं जोडी आवडतीये बाहेर प्रेक्षकांना...त्यावेळेपासून तर जास्तच 'प्रोत्साहन' मिळाले त्यांना...मग matching कपडे (कुणी दिले हा वेगळा मुद्दा) आणि बरेचशे प्रकार वाढले.

असो. मी माझं प्रामाणिक मत मांडले.

वा धन्य तो भिक बॉस.. जितकी positive प्रसिद्धी season 1 नी मिळवली त्यापेक्षा जास्त negativity या season नी मिळवली.. शिवानीला परत आणल्यानंतर काही दिवसांनी हा show बघणं बंद केलं आणि ticket to finale पासून comments वाचणं सुद्धा बंद केलं... अर्थात सगळेच चांगले लिहितात आणि हा show अजूनही चिकाटीने बघणार्यांच्या सहनशक्तीचं मला कौतुक वाटतं.. अधूनमधून एखादा फेरफटका मारतेय या धाग्यावर... मागच्या वर्षी मी मेघाची die hard fan होती.. Finale ला मेघा जिंकावी अशी खूप इच्छा होती पण एकंदरीत तिच्यासोबतची वागणूक पाहून शंका होतीच... तरीही तिचे मिस्टर जे बोलले ते खूप आवडलं होतं... Finale ला अगदी कानात प्राण आणून प्रत्येक शब्द ऐकत होती इतकी attachment झाली होती.. माझ्यासोबत कधीही bigg Boss न बघणारे माझे सासू, सासरे,नवरा यांनीही finale एपिसोड interest घेऊन बघितला होता.. पण यावेळी bigg boss ने फार म्हणजे फारच निराशा केली... यासाठी contestants पेक्षा creative team जास्त जबाबदार आहे असं मला वाटतं कारण त्यांनी इतके फालतू disicion घेतले की show ची मजाच नाहीशी झाली..

पण शिवानी आणि वीणाच्या भांडणांमुळे जरा तरी स्पाईस आहे, नाहीतर राहिलंय काय त्या बिबॉमध्ये? सगळे ग्रुप करून गप्पा मारत बसतात. बिचुकले प्रत्येक ठिकाणी घुसतो आणि शिव्या खातो. शिवानी काल त्याला "आपण सुट्टीवरून आलो आहोत" वरून बोलली ते फार आवडलं. तो माणूस किती निर्लज्ज आहे हे त्यावरून दिसलंच. जेल, जेलटाईम वगैरे त्याला कॉलर टाईट करण्यासारख्या गोष्टी वाटतात... आणि याला समाजात फॉलॉअर्स आहेत! Angry

वीणामुळे शिवच्या गेमवर परिणाम होतोच. तो काल किशोरीशी किती छान गप्पा मारत होता. त्यात मध्येच वीणा आली, आणि स्पोर्टिंगली चाललेल्या गप्पा उगाच बंद पडल्या. तिचं भलतंच असतं दर वेळी काहीतरी. मला सगळंच माहिते आणि मी जे बोलते तेच बरोबर या समजुतीत असते कायम. शिव तिच्या मागे लागला होता, तर तिने त्याला भाव द्यायचा नव्हता ना. पराग तर रूपालीबद्दल वाट्टेल ते बोलायचा, तिने मैत्री ठेवली, पण त्यापलीकडे त्याला जाऊ दिलं नाही. वीणा शिवच्या बाबतीत नेहेमीच दोलायमान राहिलेली आहे. त्यामुळेच लोक शिवला सावध करतात.

नेहामध्ये खरंच बदल झाला आहे असं वाटतंय तरी. अंतिम दोनमध्ये नेहा आणि शिवच हवेत. या पैकी कोणीही जिंकलं तरी चालेल.

मल काही केल्या नेहा नाहीच आवडत, मारक्या म्हशीची दुष्ट नजर, सतत कॅमेरे अ‍ॅडजस्ट करत रडण्याची अ‍ॅक्टींग, खोट्या मैत्रीची नाटकं आणि अनॉयिंग आवाज असं डेड्ली पॅकेज आहे.
अर्थात तरीही उरलेल्या वासरात लंगडी म्हैस नेहा आणि एक लंगडा वळु शिव हेच टॉप २ असावेत यात दुमत नाही.
यावेळी त्यातल्या त्यात कोण चांगलं इतपतच रिझल्टमधे इंटरेस्ट आहे.

काल पाहिला तो पूल जवळचा सीन. वीणा त्यांची फक्त मैत्री आहे असे नव्हती म्हणत. उलट म्हणाली की मैत्री असती तर ते वेगळे , आपले रिलेशन वेगळे आहे म्हणून लोक बोलतात. असो.
ममां जाऊ देत पण घरात बाकीचे लोक शिव ला वीणापासून दूर रहायला सांगतील तर त्याने का ऐकावे? फिनाले मधे ते त्याचे काँपिटिटर आहेत! स्पर्धेत त्याच्या भल्यासाठी ते त्याला कशाला सल्ला देतील ?!! वीणाने फेर्‍या मारताना शिव ला सांगितलेले बरोबर होते - की त्यांच्या बोलण्यावरून आपण बदलण्याची गरज नाही. अर्थात ते कॅमेर्‍र्‍यासाठीही बोलत होती. झोपाळ्यावर बसल्यावर म्हणाली की थांब झोके घेऊ नकोस रेशम ताईने सांगितलेय की माइक मधून झोक्याच्या आवाजात बोलणे ऐकू जात नाही Happy
शिवानी जळतेय त्यांना मिळणार्‍या अटेन्शन मुळे. ती आता पुढचे ८ दिवस शिव आणि वीणाला खुसपटे काढून काढून टार्गेट करणार. मुद्दम शिव - वीणाची बुराई करणे, त्यांच्या चुका बोलून दाखवणे. हा अजेन्डा दिसतोय आता. "गरीबांसारखे दिसलो" वरून वीणाला बोलणे हे त्यचे उत्तम उदाहरण. हे अर्थात कॅमेर्‍यासाठी. प्रेक्षकांना मेसेज द्यायला. उगीच दंगा करत होती. बिचुकले चा पण वापर केलाच. तो तिला दाद कुठला देतोय म्हणा. त्याचे हॅ हॅ करणे, जेल मधे गेल्याबद्दल कॉलर टाइट वगैरे करणे काहीही चालू होते.
आरोह तर उगीचच धूस फुस करत होता. फ्रस्ट्रेटेड अहे तो. वीणाने काल त्याला गिनतीत पण धरले नव्हते , त्यांचे वेगळे बोलणे सुरु होते अन हा उगीच आपले अर्थ काढत होता की मलाच टोमणा मारला म्हणून!

अन्जू ,छान दिस्तेय गं वीणा, थँक्यु लिंक दिल्याबद्दल. मला ती राधा प्रेम रंगी रंगली मधे पण आवडायची ( दिसायला) . टायट्ल ट्रॅक मधे तर खुपच सुरेख दिसलीये. ( मावैम ) >>> Happy वेलकम.

राधा मी फार नाही बघितली, कधी ती आवडली आणि कधी नाही अगदी सेम bb सारखं. काही वेळा चांगलं काम तर काही वेळा कृत्रिम वाटायचं पण सिरीयल मी तिच्यासाठी नाही सोडली तर अति व्हिलनिशपणामुळे सोडली. ती अर्चना निपाणकर व्हिलन म्हणून काम उत्तम करायची पण मला नाही झेपत सतत एवढं निगेटिव्ह बघणे. गौतम जोगळेकर आणि कविता लाड आवडायचे, सचित पण. सचितला भेटायचा योग काही वर्षांपूर्वी आलेला पण मला जमलं नाही तेव्हा. खरंतर दांडगा योग होता, अगदी वर्षभर पण नाहीच जमलं Lol

अर्चना यावेळी bb मध्ये येणार अशी चर्चा होती पण आली नाही.

शिवानी बाहेर जाऊन परत आली यात नवल नाही. याआधीही हिंदी बिग बॉस मध्ये सदस्य बाहेर जाऊन परत आले आहेत. हिंदी बिग बॉस सीझन सात मध्ये कुशल टंडनला असेच मारामारी करण्यावरून बाहेर हाकलले होते. आणि नंतर परत आत आणले होते जवळ जवळ महिन्याभराने. त्याच्याबरोबर बाहेर पडलेली गोहरखान तर विजेती होती त्यावेळची.

हरकत नाही पण शिवानीला गेस्ट म्हणून घेताना bb चं म्हणाले की आमच्या format मध्ये बसत नाही एकदा बाहेर पडलेल्यांना सदस्य करणे आणि दुसऱ्या आठवड्यात त्यांनीच आपलं म्हणणे फिरवलं. ह्यावर प्रेक्षक चिडलेत. मागच्यावर्षीपण सुशांत आणि ऋतुजाला न घ्यायचं हेच कारण सांगितलेलं.

परवा शिवानी तोंड वर करून म्हणत होती ना की मला मानाने परत बोलावलं असं आजपर्यंत bb मध्ये घडलं नव्हतं तेव्हा वीणाने हिंदी मध्ये झालंय आधीच सांगून तिचे तोंड बंद केलं. नंतर ती म्हणाली पण मराठीमध्ये पहिल्यांदाच झाल, आधी तिला सर्व bb म्हणायचं होतं. मराठीत पहिल्यांदा झालं असं म्हणायला मराठीचे किती सिझन झालेत. दुसरा तर आहे Lol .

एनीवे पण ह्या negative तिकडी मुळे, शिव वीणा आणि किशोरीताई यांच्या बाजूने positive comments यायला लागल्या आहेत. हेही नसे थोडके.

शिवानी खरच सायको आहे. चावणार्या मच्छराला मारताना 'हरामखोर' म्हणत होती. किती भयानक दिसत होत ते म्हणताना.

त्यात तो बिचुकले, ' आणि मी तुला चावलो तर म्हणाला' शी!!!! Angry त्याला थोबाडीत मारुन बाहेर पडायला हव होत तिने.

आरोहच स्वगत ऐकून हसाव की रडाव अस झाल होत. त्याला म्हणाव, 'अरे बाळा ( शिवानीच्या भाषेत), तु तर वाईल्ड कार्ड आहेस ना, मग लोक तुला कशाला सेव्ह करतील.

शिवानी आणि आरोहला दुसर्यान्च्या नॉर्मल बोलण्यात भलतच ऐकू येत. नेहा आता वाद नको म्हणाली ते बरोबर होत. ती नेहमीच शिवानीला सावध करते. पण हि ऐकेल तर शपथ्थ!

शिव, किशोरी आणि विणाच किचनमधल बोलण एन्टरटेनिन्ग होत.

ते किशोरीच ' नेहा मला का टारगेट करतेय' दाखवलच नाही. कदाचित, 'अदालत' टास्कमध्ये नेहा तिच्याविरोधात बोलली ते तिला आवडल नसेल, त्याबद्दल बोलत असेल. बिबॉने ते दाखवायच असेल पण चुकून त्यान्नी ते प्रिकॅपमध्ये दाखवल असेल.

आज स्वतःची बोली लावण्याचा टास्क आहे.

हीना काल खूप ग्रेसफुल दिसत होती, जाताना दिसली तशीच आणि ती बिचुकलेपासून थोडं अंतर ठेवायचा प्रयत्न करत होती पण तो कसा वागत होता, फार किळस वाटते त्याची अशावेळी.

शिवानी टोटल सायकोच वाटते बिचुकलेशी भांडताना. तिला नाटकं करायला आणलं असेल तर ठीक. पहिल्या तीनात नेलं किंवा जिंकवले तर पब्लिक उखडणार. आत्ताच कितीतरी उखडलेत.

कॅन्सल केला पुन्हा? काय मूर्खपणा आहे. असल्या टास्क्स मधे एकमत होणार नाही ही शक्यता आधी गृहित धरली नव्हती का त्यांनी?
एकूण काय सपशेल फेल आहे सीझन २ हे पुन्हा धोरेखित झाले!!

अजब, शिवानी जिंकली तर हा अगदी बेकार सिझन असा विश्वास दृढ होईल माझा Wink .>>> शिवानी नाही जिंकत यावर माझा ऑलरेडी ठाम विश्वास आहे...आता तो फाजील ठरु नये ही अपेक्षा Wink

या सीझनची बिसीसीसी कडे तक्रार करून बंद करता येनार नाही का........ मागे एका मालीकेला असेच केले होते. बंद पाडायची वेळ आली होती मग काहीतरी बदल केला.

Pages