Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धनुडी मला नाही माहिती वोटिंग
धनुडी मला नाही माहिती वोटिंग लाईन चालू आहेत की नाही .
वरच्या पोस्ट मध्ये चुकून मी ' का? 'असे लिहायचे वीसरले
Sorry
मला व्होट करायचय काय करू?
मला व्होट करायचय
काय करू?
>>शिवानी ला उगीच ढकलले पुढे.<
>>शिवानी ला उगीच ढकलले पुढे.<<
तीला परत एकदा सेरेमोनियस्ली घराबाहेर काढायचा विचार असेल...
धनुडी वोटिंग नसेल यावेळी.
धनुडी वोटिंग नसेल यावेळी.
व्होटिंग लाइध्स सध्या बंद ,
व्होटिंग लाइन्स सध्या बंद ,
असा मेसेज मध्येच दिसला.
शिव अजूनपण वीणाभोवती फिरतोय याचा शिवानी आणि आरोहला खू प त्रास होतोय.
त्यांच्या नॉर्मल गप्पांत आरोहला टोमणे ऐकू येताहेत. आपल्याला कोणीच निवडलं नाही याचं वाईटही वाटतंय.
शिवानीने बिचुकलेला बाहेर कुठे जाऊन, तोंड काळं केलं, इ.इ. काढलं. सगळ्या जनतेला माहीत आहे म्हणे. यावर बिचुकलेने कॉलर टाइट करून दाखवली.
धनुडी मला नाही माहिती वोटिंग
धनुडी मला नाही माहिती वोटिंग लाईन चालू आहेत की नाही .
अगं तोपर्यंत बघ माझं काय झालं 
वरच्या पोस्ट मध्ये चुकून मी ' का? 'असे लिहायचे वीसरले Proud
Sorry>>>>>>
अग सॉरी माझ्या पोस्ट मुळे
अग सॉरी माझ्या पोस्ट मुळे तुला इतके सारे फोटो वगैरे टाकायला लागले.
मी नंतर नीट वाचले 
हीना ने आज नेहा चे नाव घेतले. हे जर त्यावेळी घेतले असते आरोह एवजी . तर आज ती असती आणी आरोह बाहेर असता.
शिव अजूनपण वीणाभोवती फिरतोय
शिव अजूनपण वीणाभोवती फिरतोय याचा शिवानी आणि आरोहला खू प त्रास होतोय.
त्यांच्या नॉर्मल गप्पांत आरोहला टोमणे ऐकू येताहेत. आपल्याला कोणीच निवडलं नाही याचं वाईटही वाटतंय.>>>>>>आरोह रड्याच आहे. शिव किशोरीताई आणि विणा ह्यांचा वेगळाच टाईमपास चालू होता, मस्त. त्यात काहीही टोमणे नव्हते. आरोह ला बरोबर नाव पडलय "आ रो" आत येउन चालत्या गाडीत चढला आणि नाहीतो समज करून रडत बाहेर गेला
यावेळी बिग बॉस मध्ये टास्क
यावेळी बिग बॉस मध्ये टास्क कमी आणी टाईमपास जास्त आहे. यावेळी वाइल्ड कार्ड पण 2च आले. यवेळी ना nominations साठी कोणते चांगले टास्क झाले ना सप्ताहीक टास्क चांगले झाले.
Voting lines सध्या बंद आहेत
Voting lines सध्या बंद आहेत असा msg शो संपल्यावर दिसला होता परत.
पब्लिक वैतागले आहे त्यामुळे सुरू करतील की नाही माहिती नाही.
शिव आणि विणाने कोणी instigate केलं तरी शांत रहावं, उगाच lines बंद असतील तर स्वकर्म आड येऊ नये. केळकर छान सल्ला देऊन गेला, रुपाली रागात होती वीणावर.
वीणा स्विमिंग पुलजवळ बसून सुरुवातीला जे सांगत होती शिवला, ते फार करेक्ट होतं.
आज शिवानीने बिचुकलेचं सत्य बाहेर काढलं असतं जवळजवळ.
धनुडी बरोबर, तिथेही आरोहची उगाच वीणावर आगपाखड, विषय मूळ ताई आणि शिवमध्ये सुरू होता, वीणा नंतर आली तरी तिलाच दोष देत होता आणि शिवानी नेहा आगीत तेल ओतत होत्या.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=hhvbPur1-sM
लोकहो, वरचा व्हिडीओ बघा. ममां शिवानीबाबत किती किती पझेसिव्ह आणि पार्शल आहेत ! तसंच मला इथे फारशी पावर नाहीये असही ते कधी कधी म्हणतात. ते सुद्धा बोलाचीच कढी आहे. मांजरेकर बोले तैसाच बि बॉ चाले हे १००% खरे आहे.
पण काहीही असो बिचुकले शिवानी
पण काहीही असो बिचुकले शिवानी भांडणात, बिचुकले स्वत:ला गरीब गाय दाखवण्यात यशस्वी होतो आणि शिवानी मारकी म्हैस नाही तर चक्क सायको दिसते. बाहेर आपल्याला सत्य माहिती आहे ती वेगळी गोष्ट.
आज तो ताई आणि वीणा बसलेले तर तो काहीही बोलुदेना दुर्लक्ष करायचं पण शिवानी गेली मधेच बोलायला. चला bb ला trp मिळाला.
व्होटिंग लाइन्स बंद
व्होटिंग लाइन्स बंद
अरे आता काही कमेंट्स वाचून
अरे आता काही कमेंट्स वाचून आले, फेसबुकवर फक्त. मी twitter आणि insta वर नाहीये. आरोह नेहा आणि शिवानी टीका करतायेत, सतत शिव वीणाला target करतायेत म्हणून, त्यातल्यात्यात वीणाला जास्त करतायेत हे सर्वजण, त्यामुळे सहानुभुति मिळतेय तिला. मी पण लिहून आलेले संध्याकाळी पण बरेच जण विरोध करत असतील वरच्या तिकडीला असं वाटलं नव्हतं.
वीणा शिवला स्विमिंग पूल शी
वीणा शिवला स्विमिंग पूल शी खूप चांगलं समजावत होती . घरात शिरल्या शिरल्या सगळे जण आपापला कम्फर्ट झोन शोधत असतात. . सगळे जण ज्याच्याशी जमत त्याच्याशीच जास्त बोलतात . एकमेकांबरोबर रहातात . एखादा कोणी रागावला तर दुसऱ्याला मनवायला जातात . पण आपलच का इतकं हायलाईट होत तर आपण वेगळ्या जेण्डरचे आहोत आणि अनमॅरिड आहोत . इथे कुणाचीही कुणाशी मैत्री जमू शकते त्यात आपण इतकं काही मनाला लावून घ्यायचं नाही इत्यादी इत्यादी आणि बरोबरच होत ते . तिथे जोड्या आहेतच कि किव्वा होत्या कि शिवानी आणि नेहा , पराग आणि रुपाली , केळकर आणि वैशाली. या जोड्या नाहीयेत ? पण हे दोघे अनमॅरिड म्हणून त्याला वेगळ्या अँगलने इतर घरातले सदस्य बघायला लागले . त्यातून शिव जवळजवळ वीणाच्या पाठीचा पडला होता पण वीणा काही त्याला इतकी भाव देत नव्हती . पण त्यांची तशी पहिल्यापासून मैत्रीची जोडी जमली आहेच कि
बर आता तर ते काही प्रेमाची नाटक पण करत नाहीयेत आणि दूर दूर पण राहताहेत तरी सगळे येऊन तेच तेच सांगून जातात . काय तर गेम वर फोकस करा आणि हे आणि ते . अरे किती जण आणि किती वेळा ?
ते तिघंही सिक प्रवृत्तींचे
ते तिघंही ( आरो नेहा शिवानी) सिक प्रवृत्तींचे लोक आहेत खरंतर. त्यातलं कुणीही विनर होऊ नयेत मग अगदी किशोरी ताई पण चालेल. पराग प्रकरणात नेहा पण तितकीच दोषी होती हे कसे विसरले सगळे. बिबॉ ने सगळ्या एक्स housmates ना पढवून पाठवलंय हे तर सिद्ध च झालंय. मला personally वीणा आवडते क्लिअर थॉट्स आणि डेरिंग आहे तिच्यात. उद्धट आहे पण fake नाही. पण शिवानी महाराणी वर खूपच मर्जी आहे बिबॉ ची पण का का का?
मला personally वीणा आवडते
मला personally वीणा आवडते क्लिअर थॉट्स आणि डेरिंग आहे तिच्यात. उद्धट आहे पण fake नाही. >> मला पण वीणाच आवडते. व्यवस्थित तिला तिचे विचार मांडता येतात. .
वीणाला जिंकवतील असं वाटत नाही
वीणाला जिंकवतील असं वाटत नाही मात्र. जिंकली तर स्व: कर्तृत्वावर जिंकेल पण सगळे म्हणतील शिवचा वापर केला, कलर्समुळे जिंकली. तिच्यात स्पार्क नक्कीच आहे. पण समहाऊ तिचे दोष जास्त अधोरेखित होतील गुणांपेक्षा हे बघितलं जातं. दोष आहेत नक्कीच पण सगळ्यांच्यात आहेत.
तिचे वर्णन शिवने दुसरा नं देताना केलेलं ते अगदी योग्य होतं. ठाम मते आणि task खेळण्याची पद्धत आणि task नंतर वागण्याची पद्धत. ती जिंकली तरी मला आनंद होईल पण तसं होईल असं वाटत नाही कारण हेटर्स खूप आहेत तिचे.
तिथे जोड्या आहेतच कि किव्वा
तिथे जोड्या आहेतच कि किव्वा होत्या कि शिवानी आणि नेहा , पराग आणि रुपाली , केळकर आणि वैशाली. या जोड्या नाहीयेत ? पण हे दोघे अनमॅरिड म्हणून त्याला वेगळ्या अँगलने इतर घरातले सदस्य बघायला लागले >>> काय?!! असे म्हणाली वीणा? ही आजची नवी स्ट्रटेजी आहे वाटते. जे आहे ते अॅक्सेप्ट करत तर होते कालपर्यन्त. माजी रानी, ड्रीम बॉय, लग्नाची पत्रिका न काय काय.
आता आहेत ते सगळे फायनलला गेले
आता आहेत ते सगळे फायनलला गेले तर माझे पहिले चार अजूनही शिव, नेहा, वीणा, किशोरीताई असतील.
आता bb ना शिवानीला करायचं असेल तर काय करू शकतो आपण.
नेहाने केलेलं instigation परागच्या वेळी आणि शिवचं चावणे हे bb ना हायलाईट करायचं आहे असं वाटत नाही. ते तसे केलं तर वीणाचा नं पहिला लागू शकतो जर तिने काही मोठी चूक केली नाही तर. किशोरीताईही जिंकू शकतात असं झालं तर. पण अजूनही पहिले दोन शिव नेहापैकीच असतील असं वाटतंय आणि तसं झालं तर शिव यावा ही इच्छा.
या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद
या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद आहेत तर काय सगळेच जण फयनलिस्ट की काय?

खरं तर शिव, नेहा व विणा हे फायनल ३ असतील व तेच असावेत असं सध्या तरी वाटतंय. यातील वीणा सोडून कोणीही जिंकलं तरी आवडेल. वीणा जिंकल्यास हा सिझनच फालतू होता यावरील माझा विश्वास ठाम होईल.
https://www.youtube.com/watch
अजब, शिवानी जिंकली तर हा अगदी बेकार सिझन असा विश्वास दृढ होईल माझा
.
https://www.youtube.com/watch?v=gqH5c_Kl7uM
वीणाचे नाईटसूट आणि कानातले फेमस आहेत म्हणे युथ मध्ये. ख खो माहिती नाही पण आता तिला कानातले sponcerers देतात असं इथे समजलं. कधी कधी आवडतात मला तिचे कानातले पण कधी कधी नाही.
बिगबॉस बघणं बंद केल .
बिगबॉस बघणं बंद केल . प्रेक्षकांना इतकं जास्त नाराज नव्हतं करायला पाहिजे बिगबॉस ने . शिवानी अजिबात चांगली खेळत नाही. सगळे जन तिला घाबरतात असा दिसतंय . बिगबॉस पण तिला नेहमी झुकतं माप देतात . प्रेक्षकांना नाराज करून एखाद्याचे किती लाड पुरवायचे । अवघड आहे.
नेहाने केलेलं instigation
नेहाने केलेलं instigation परागच्या वेळी >>> तेव्हा तिनी एकटीनी काहीही केलं नाही. तिनी घरातल्या सगळ्यांना विचारुन सर्वांनी एकमतानी पराग नको असं सांगितलेलं.
ते नाही, task मध्ये केलं ते
ते नाही, task मध्ये केलं ते मी म्हणतेय. तिने हिनाने आणि वैशालीने केलं ते.
नंतर उलट नेहा परागशी नीट मुद्देसूद बोलली, त्याने जे केलं तरीही. त्याबद्दल मी तिचे कौतुकही केलं.
मी परागने जे केलं त्याचा निषेधचं केलाय.
जेव्हा तुल्यबळ स्पर्धा आणि voting होतं तेव्हा कदाचित हे मुद्दे bb विचारात घेत असतील असं मनात आलं माझ्या. शिव आणि नेहाला समजा सेम मार्क्स पडले किंवा मागेपुढे तर मग नक्कीच दोघांच्या positive negative बाजूंचा विचार होईल. खूप तफावत असेल तर नाही होणार.
वीणाला votes खूप मिळतील असं वाटत नाहीये पण समजा झालं चांगलं voting तिला आणि या दोघांपेक्षा थोडीच कमी मतं असली तर कलर्सवालेही वरच्या दोघांच्या चुकांवर बोट ठेऊ शकतात, हेही होऊ शकते. किशोरीताईसाठीही सेम, तिच्या बाजूने समजा मेकर्सपैकी कोणी असेल आणि votes जास्त असतील तर.
कुठेतरी असंही वाटतं की channelचा थोडा का होईना पाठींबा नेहा, शिवानी, वीणाला असेल कारण त्यांनी त्या channelवर काम केलंय पण शिवला फक्त प्रेक्षकांचा.
शिवानीलाच जर जिंकवायचं असेल तर कशाचाच विचार होणार नाही हे नक्की, bb करे सो कायदा
Btw डीजे म्हणाली तसं सर्वांनाच फिनाले विकला पाठवलं, मागच्यावर्षीसारखं. आता उद्या रात्री एका दिवसासाठी voting lines open केल्या तर माहिती नाही. यावेळी सध्या शब्द वापरलाय त्यामुळे उद्या रात्री म्हणजे खरंतर आज रात्री लिहायला हवं, lines open करू शकतात. एरवी यावेळी voting lines बंद आहेत असं म्हणतात, so may be a twist.
तिथे जोड्या आहेतच कि किव्वा
तिथे जोड्या आहेतच कि किव्वा होत्या कि शिवानी आणि नेहा , पराग आणि रुपाली , केळकर आणि वैशाली. या जोड्या नाहीयेत ? पण हे दोघे अनमॅरिड म्हणून त्याला वेगळ्या अँगलने इतर घरातले सदस्य बघायला लागले >>> काय?!! असे म्हणाली वीणा? >> हे विणा नाही म्हणाली हे मी म्हणतेय . वीणाचे शब्द वेगळे होते पण मतितार्थ हाच होता
ही आजची नवी स्ट्रटेजी आहे वाटते.>> स्टॅटेजी काय त्यात . ?
जे आहे ते अॅक्सेप्ट करत तर होते कालपर्यन्त. माजी रानी, ड्रीम बॉय, लग्नाची पत्रिका न काय काय.>> सारखी सारखी लोक तेच तेच बोलायला लागले तर वैतागून पण बोलू शकतात ना . हो आहे आमच. काय म्हणण आहे तुमच ? करतो आहोत आम्ही लग्न. देऊ तुम्हाला पत्रिका . बास झालं समाधान ? असही विचारू शकतातच कि . वीणाचा टोन तर तसाच होता . ती कायम बोलतेय माझं मला माहितीये आमच्यात काय आहे ते . शिव कडून तो वीणाच्या पाठी पडला आहेच हे सरळ सरळ दिसत आहे पण तीच तस नाहीये . तीच बाकीच्या लोकांपेक्षा शिव शी जमत म्हणून ती त्याच्याशी जुळवून घेतेय आणि त्याच्या बोलण्याला साथ देतेय .
त्या दोघांनी आम्ही प्रेमात
त्या दोघांनी आम्ही प्रेमात आहोत, लग्न करणार म्हटलं तरी लोकांना प्रॉब्लेम. फक्त मैत्री आहे , बिग बॉससाठी त यार केलेला कम्फर्ट झोन आहे म्हटलं तरी प्रॉब्लेम.
लग्न होतंय की नाही हे दो न्ही कुटुंबांकडून ठरेल, असं त्या दोघांनी म्हटलंय. अदालतवाल्या टास्कमध्ये तर सुस्पष्टपणे म्हटलंय.
हाउसमेट्स पासून ते मांजरेकर आणि बिग बॉसपर्यंत सगळ्यांनीच त्यांना एकमेकांकडे ढकललंय. आलेल्या गेस्टच्या कानात कुजबुजून त्यांना डान्स करायला सांगा, असं कोण म्हणायचं? वधुवर टास्क कशासाठी ठेवलं?
कालचं दोघांचं बोलणं ऐकलं तर ते आता बिग बॉस शोबद्दलच विचार करताहेत. श्तर ते रडकंचिडकंकुढकं त्रिकुट या दोघांबद्दलच बोलतंय.
रड्या आरोह शिवानीच्या साथीने वीणाला टारगेट करतोय. शिवानी ललिता पवार टाइप सासू. आरोह माहेरी राहणारी नणंद. ती कामं नीट करत नाही. वेळच्या वेळी करत नाही. बेसिन साफ नाहीए तर मी करतो, तुम्ही आता त्याबद्दल बोलू नका असं जिशोरीला म्हणून तिची पाठ वळताच त्याबद्दलच बोलत राहिला.
वीणाच्या आपण साधे कपडे घातल्याने गरीब दिसलो या वाक्याने शिवानीच्या अंगात मार्क्स संचारला. टीव्हीवर बिग बॉस पाहणार्या साधे कपडे घालणार्या सगळ्या गरिबांचा अपमान तिला त्यात दिसला.
बिचुकलेवर तिच्या चिडण्याचं कारण ते तिला सोडून वीणा - किशोरीशी बोलत होते, हे असावं
नेहाने काल पंचिंग बॅग प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर तिच्या वागण्यात फरक पडला.
व्यसनमुक्तीचे प्रयत्न करणार्या लोकांना त्यांचे शरीर आणि मन जसं त्रास देतात, तसा सुरुवातीला तिला त्रास झाला. त्यामुळेच माधव आणि मग शिवानी समोर तिची रडारड झाली (हे ती नाही, मी म्हणतोय). आता ती या दोघांना उगाच लहानसहान गोष्टींचा इश्यु करू नका हे सांगतेय. हा बदल जेन्युइन असेल तर स्वागतार्ह आहे.
जेव्हा तुल्यबळ स्पर्धा आणि
जेव्हा तुल्यबळ स्पर्धा आणि voting होतं तेव्हा कदाचित हे मुद्दे bb विचारात घेत असतील असं मनात आलं माझ्या. शिव आणि नेहाला समजा सेम मार्क्स पडले किंवा मागेपुढे तर मग नक्कीच दोघांच्या positive negative बाजूंचा विचार होईल. खूप तफावत असेल तर नाही होणार.>>>>>अन्जू जेवढा विचार आपण करतोय तेवढा बिबॉ ची टिम आणि बिबॉ करत असेल का असं वाटतय. ह्या लोकांची काय स्ट्रॅटेजी आहे कळत नाही, कि नुसता सबसे बड़ा रुपय्या , सगळं फिक्स्ड आहे.
मलापण विणाचं शिवला समजावणं खुपच आवडलं. सद्ध्या ह्या शिवानीनेहारो तिकडीला दुसरा विषयच नाही. त्यामुळे ते ह्या दोघांच्या कुठल्याही कृतीवर बोलणार
पण काही असलं तरी माझे फेवरेट शिव विणाच .
भरत मस्त पोस्ट
भरत मस्त पोस्ट
भरत लय म्हणजे लय भारीच कंमेंट
भरत लय म्हणजे लय भारीच कंमेंट, शेवटचा पॅरा आणि अजून एक दोन गोष्टी वगळता हसून हसून पुरेवाट, काय एकेक नावं ठेवली आहेत तिकडीला जबरदस्त
पूर्ण कमेंट पटली अगदी.
नेहा खरंच मनापासून सांगताना दिसते कधी कधी दोघांना, ताणू नका, सोडून द्या. पण तीही वीणाला नावं ठेवताना दिसते, पण नक्की सुधारणा आहे तिच्यात. तिची आणि विणाची चांगली मैत्रीही आहे एकीकडे.
यावेळी शिवानी मुद्दे काढतेय शनिवारसाठी, एककलमी कार्यक्रम विणाची तक्रार.
Pages