तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

फेर फटका प्ल स वन. व्हेज बिर्याणी किंवा पनीर बिर्याणी एकदम कहावत है. भ्रम है. एक स्पेशल बॅक अप ला ठेवा हे ही बरोबर. मला आपली फुल बार मॅनेज करायची सवय आहे. म्हणून लिहिले.

बेसिक बार. व्हिस्की, रम जिन व्होड्का. बीअर दोन सिक्क्ष पॅक कमीत कमी बकार्डी ब्रीझर किंवा शॉट साठीचे साहित्य.
पाणी, सोडा टॉनिक वाटर, कोक सेव्हन अप लिंबू.
बर्फ चिप्स चीज उकडलेली अंडी, चीझलिण्ग खारे शेंगादाणे
हे सर्व बेसिक.

हाताशी एक मेड सर्वंट किंवा पोर्‍या ठेवा तुम्ही होस्टेस गिरी करताना किंवा गप्पा मारताना हे ते आणून द्यायला हाताशी उपयोग होतो.

चांगले दोन ओपनर्स.

मी ह्यातले काहीच पीत नाही पण रवी साठी पार्टी प्लॅन व ऑर्गनाइज करत असे. प्लस फुल जेवण. हार्दिक शुभेच्छा.

काही खास सेलिब्रेशन असल्यास शांपेन लपवून ठेवा. फ्रिझ मध्ये.

१४-१५ अ‍ॅव्हरेज ड्रिंकर्स असतील, तर ताशी दीड बाटली लागेल व्हिस्की. इथले पार्टी प्लानर्स तासाला ७ - ८ अ‍ॅपेटायझर्स एका माणसासाठी असा हिशेब धरतात. यात साधारणपणे १-२ श्रिंप, एक तुकडा ब्रेड + टॉपिंग, एक डपलिंग असे अ‍ॅपेटायझर्स असतात.

व्हिस्कीबरोबर फार मसालेदार अ‍ॅपेटायझर्स ठेवू नयेत असे माझे मत. खारवलेले काजू , बदाम, चीझ क्यूब्स, ब्री चीझ, स्मोकड सामन, हे बेस्ट. मंडळी परत घरी जाणार असली तर उबर / ओला ची सोय करा नक्की. पार्टीच्या तिथेच मुक्काम असेल तर दुसर्‍या दिवशीच्या नाश्त्याचा पण विचार करुन ठेवा .

ज्यावेळेला आपण १.० किलो बिर्याणी म्हणतो त्यावेळी १.० किलो तांदूळ आणि १.५० किलो मटण असा चांगल्या बिर्याणी वाल्यांचा दंडक असतो.
रेट काँपिटिशनमधे मग काही बिर्याणीवाले दीड किलो ऐवजी सव्वा किलो आणि काहीजण तर फक्त एक किलो एवढेच मटण देतात.
तेव्हा तुमच्या बिर्याणी वाल्याला त्याचं तांदूळ आणि मटणाचं प्रमाण विचारून घ्या.
दुसरा एक थंब रूल असा की प्रत्येक मोठी व्यक्ती साधारणतः 200 ग्रॅम मटण किंवा चिकन खाते. तेव्हा तेरा जणांना साधारणतः अडीच किलो मटणाची मटण बिर्याणी लागेल पण स्टार्टर्सचं प्रमाण लक्षात घेता ती दोन किंवा पावणेदोन किलो मटणाची घेणे योग्य ठरेल.
दिड किलो अगदी कट टू कट पुरू शकेल. (मात्र खाणारे खवैये हवेत..)

ता.क. : दिड किलो राईस आणि सव्वा दोन किलो मटण/ चिकन असेल तर नक्की पुरेल..

There is no such thing as "veg biryani'. Wink फार तर पुलाव म्हणता येईल
>>>

मी देखील ह्याच समजात होतो, बट, फरक हा कुकिंग मेथड मध्ये असतो. स्लो कुकिंग असेल तर बिर्याणी किंवा फास्ट कुकिंग असेल तर पुलाव, मसालेभात, खिचडी/खिचडा.

बिर्याणी म्हणजे स्लो कुकड राईस. पुलाव हा नॉर्मल कुक असतो.

त्यामुळेच येस, व्हेज बिर्याणी असते, अन तो पुलाव नसतो.

रम किंवा व्हिस्की असेल तर कोटेड तिखट/मसाला शेंगदाणे किंवा मसाला काजू फार सुरेख जातात सोबत.
>>>

बिंगो, पण पर्सनॅली मला रम सोबत मसालेदार जास्त जमत, अन व्हिस्कीसोबत कमी मसालेदार.

ड्रिंक्स सोबत काय खावं ह्याच शास्त्र आहे म्हणे, मी अजून नाही वाचलं.

मॅकिंटॉश अमृत सिंगल माल्टवाल्यांचं आयेमएफल प्रॉडक्ट आहे बहुतेक. 1200 की 1400 च्या आसपास असावी.

टेस्टी अन कडक.

"फरक हा कुकिंग मेथड मध्ये असतो." -तुम्ही सिरैस्ली घ्यून रैले भौ! सांगायचा उद्देश इतकाच की बिर्याणी मधे मीट हवं - उदा. मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी व. जसं चिकन बर्गर ही अंधश्रद्धा आहे (चिकन सँडविच अस्तंय) , तितकच व्हेज बिर्याणी सुद्धा. Light 1

च्रप्स, रॉनी, फेरफटका, अमा, मेघा, निरु, अजिंक्यराव, उपाशी बोका, योकु
सगळ्यांचेच उपयुक्त सूचनांसाठी आभार _/\_

टेस्टी आणि कडक मॅकिन्टोश २०० मिलि पेक्षा जास्त कोणी घेणार नाही. परत १४ पैकी ५ मुली आहेत (त्यातल्या २ तर ६० च्या वर जाणार नाहीत याची बऱ्यापैकी खात्री आहे). त्यामुळे एक लिटरच्या ३ बाटल्या पुरतील आणि चौथी बॅकअप होईल, पाचवीची गरज नाही असे मला वाटते. पण तरी सहज कुतूहल म्हणून इथे प्रतिसाद देणार्यांची टॅंक कपॅसिटी किती असेल बरं असा प्रश्न पडलाच Wink Lol

मसाला शेंगादेखील आणते.
मोनॅको+ चीज
उकडलेली अंडी (प्रत्येकी २)

आता ५ चिकन टिक्का आणि ३ पनीर टिक्का यातच निरुनी सांगितलेलं माणशी २०० ग्राम मांस संपून जाईल असे मला वाटतेय (चूक असेल तर सुधारा)

अजिंक्यराव, परवाच कोकणे चौकातील Aroma's Hyderabad House मधली बिर्याणी खाल्ली ना तुम्ही? कोणता प्रकार? तांदूळ - चिकन रेशो किती होता असे वाटते?
मी तिथून चिकन दम बिर्याणी लार्ज आणि चिकन टिक्का बिर्याणी लार्ज मागवलेल्या. मला वाटतं तांदूळ आणि मांस रेशो १:१ होता. ते तेवढं ४ जणांनी भरपेट खाल्लं आणि तेव्हा फक्त बिर्याणी होती, दारू-चकणा-स्टार्टर्स काहीकाही नाही. १ किलो बिर्याणी म्हणजे लार्जच्या चौपट असते. म्हणजे आम्ही मागवलेल्याच्या दुप्पट झाली. फक्त बिर्याणी असेल तर ८ लोक भरपेट खातील.

विचार करतेय.

परत एकदा सगळ्यांचे आभार.

Aroma's ₹ rambo चिकन बिर्याणी: 2 मोठे लेग पीस येतात. जेवणाआधीचे 4 पेग त्या 2 लेग पीस सोबत आरामात जातील.
चिकन फ्राय बिर्याणी: १:१ रेशो आहे. लार्ज दोघांना पुरते.

हम्म. आम्ही मागवलेल्या चिकन दम बिर्याणी (विथ बोन) मधे ३ मोठे (२ लेगपीस आणि १ ब्रेस्टपीस) होते. आणि चिकन टिक्का बिर्याणीमधे ५ की ६ टिक्के होते (४ सेमीचा चौरस).

दीड किलो "ची" बिर्याणी पुरे.
दारू पिऊन झाल्यानंतर बहुतेकांचं जेवण कमी होतं. आधीचे खाणे जास्त खपते.

***

दारू पर हेड एक क्वार्टर असा हिशोब. म्हणजे ६० मिलि चे ३ लार्ज पेग प्रत्येकी. यात काही पिणारे थोडे जास्त अन कमी पिणारे थोडे कमी करून हिसाब बराबर होतो.

एक खंबा = ७५० मिली. अर्थात ४ क्वार्टर + १ छोटा पेग. एका खंब्यात मॅक्स ४ लोक पितील.

१४ पिणारे = साडे तीन खंबे लागतात. १ लिटरची बाटली असेल तर अडीच लिटर दारू लागते. मात्र लिटरच्या बाटल्या आयएमएफएल मधे नसतात, त्यामुळे स्कॉच स्मूथ असली तर जास्त खपते.

***

दारूमधे थोडी व्हरायटी असली पाहिजे असे मलाही वाटते. नुसत्या व्हिस्कीचा प्रोग्राम असेल तर जेवणानंतर तकीलाचे २-२ शॉट्स असतात. किंवा मग ब्रँडी.

***

चखना प्रमाण ओके ओके आहे. प्रत्येकाची चखना खाण्याची कपॅसिटी वेगळी असते. पुरवठ्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे काकडी/गाजर/टमाटा असं सॅलड.

मी हा धागा किती तरी वेळा वाचतो.. आणि दरवेळी सगळ्यांचे अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवतो. बसावंसं वाटतं पण सोबत नसेल तर वाचून पण चढते!

थँक्यू Happy
<<
ऑल्वेज यल्कम!

थोडा ता.क. :

बिर्याणीसोबत दही-कांद्याची कोशिंबीर व मिर्ची का सालन जर रेस्टॉरंटवाले देत नसतील, तर किमान कांदा (पातळ लांब काप) + फेटलेले पातळ दही + बारिक चिरलेली थोडी मिरची + चिरलेली कोथिंबीर + चवीपुरते मीठ + चिमूटभर साखर अशी कोशिंबीर घरीच करून ठेवा. नुसती बिर्याणी मजा नाही. या दोन्ही साईड डिश हव्यातच.

तळलेला उडदाचा पापड वगैरेही चांगला जातो सोबत तोंडी लावायला.

अरे हो. अजून ता.ता.क.

पेग भरताना अगदी ६० मिलिचा भरू नये. साधारणतः स्टँडर्ड व्हिस्की ग्लासला बेसजवळ १ बोट लावायचं आडवं, अन तितकी दारू ओतली की सुमारे ३०-३५ मिली होते. २ बोटे म्हणजे मोठा पेग. ६०-७० मिली. रफली ४० मिली चा पेग मस्त चालतो. पेग मेझर असेल तर ग्लासमधे पाणी ओतून अंदाज घेऊन ठेवता येतो. (घटा-घटाचे रूप आगळे असल्याने प्रत्येकाचे पेग वेगळे असतात. तेव्हा मोजून मापून प्यावी हे उत्तम. नाही तर दैव एकच होते : पार्टीचा पचका)

१४ लोकांना मॅचिंग ग्लासेस असलेत तर(च) मजा येईल. आजकाल डिस्पोजेबल ग्लासेसही मिळत नाहीत..

अनुभवी माणसाला बार सांभाळायला सांगा. कुणीतरी साकी बनावे लागते.

पण या पेग भरणार्‍या प्राण्यांची बहुतेकदा गडबड अशी असते, की लय आग्रह करू करू पाजतात. कुणालाही दारूचा आग्रह करायचा नाही, हा नियम पाळलेला बरा.

बसावंसं वाटतं पण सोबत नसेल तर वाचून पण चढते!
>>> सोबत नसेल तर पिण्यात मजा नाहीच. एकटे पीत नाही या निर्णयाबद्धल अभिनंदन.

तुम्ही सगळ्यांनी एवढे चांगले सल्ले दिले होते पण शेवटी मीच कच खाल्ली आणि सगळ्यांना हॉटेलात घेऊन गेले Proud
ओळख निघाल्याने त्यांनी बाहेरून बाटली आणण्याची परवानगी दिली. जॉनी वॉकर ब्लॅक लेबल 1लिटर २.५ हजारला मिळाली, ती तेवढीच पुरली. सगळ्यांनी हुक्का पिला. आणि पहाटे साडेतीनपर्यंत ड्यान्स केला. २ प्रकारचे स्टार्टर आणि फ्रेंच फ्राईज आणि केक एवढंच खाल्लं.
परिणाम - अर्थातच हँगोव्हर Lol Lol

एनिवे परत एकदा सर्वांचे आभार _/\_

शेवटी मीच कच खाल्ली आणि सगळ्यांना हॉटेलात घेऊन गेले
>> हे बेस्ट!! आवरा आवरीचा त्रास नाही राहात!

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल 1लिटर २.५ हजारला मिळाली, ती तेवढीच पुरली.
>> हे कसकाय जमवलं अडीच हजारात?

हायला chivas! मजाय राव ॲमी तुमची.. बाकी एकदाच घेतलीय, मला वाटतं स्कॉचचेच सोपस्कार करावे तुम्ही... थोडी strong आहे चवीला, तर चव खुलण्यासाठी चीज आणि grilled चिकन (lebano की काहीतरी छोटं कॅफे आहे दत्त मंदिर रोडवर, तिथे भेटायला पाहिजे चांगलं.)

Something Fatty is must! साजूक सुकं मटण, चीज पनीर स्टार्टर्स, स्मोक केलेली किंवा शॅलो फ्राय फिश ...

बरच काही. अन हो, व्हीस्की स्टोन्स किंवा आईस सोबतच.

सोबत मंद इन्स्ट्रु अथवा जिवाभावाची मित्रमंडळी!! होऊ द्या चांगभलं!

हॅप्पी दिवाळी.

Pages