Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक शंका आहे. इथेच विचारते.
एक शंका आहे. इथेच विचारते. मधाच्या कुठल्याही जाहिरातीत मधासाठी एक रवीसारखा लाकडी पण पुढे गोलाकार खाचा असलेला डाव
वापरतात तो कशासाठी
रावी,
रावी,
इथे पहा
https://moo.review/honey-dippers-and-spoons/
धन्यवाद सीमा. छान माहिती
धन्यवाद सीमा. छान माहिती मिळाली.
मला हा easy pull smart
मला हा easy pull smart chopper भेट मिळाला.
कांदा बारीक चिरायला चांगला उपयोग होतो. गाजराचे तुकडेसुद्धा हवे तितके मोठे/बारीक कापता आले.
कांदा बारीक चिरायला फुड प्रोसेसरचा उपयोग होत नाही. त्याला पाणी सुटतं. हा चॉपर ते काम करतो.
(व्हिडियो मी अपलोड केलेला नाही)
Submitted by भरत. on 14 March, 2019 - 18:00>>>> भरत, तुम्ही हा घेतलाय का??? हो, तर रिव्ह्यू कसा आहे.
मला फक्त व्हेजिटेबल कटिंग साठी एखादा चांगला चॉप्पर सुचवाल का? जमल्यास लिंक द्या☺️
भेट मिळालाय. मला आवडला. कांदे
भेट मिळालाय. मला आवडला. कांदे बारीक चिरायला मस्त आहे. वेळ वाचतो.
सिमला मिरच्या कापल्यात.
फूडप्रोसेसर असूनही ज्या भाज्या हाताने चिराव्या लागतात, त्यांच्यासाठी बेस्ट.
... शिवाय प्रचंड हाताचा
... शिवाय प्रचंड हाताचा व्यायाम होतो
हाताचा प्रचंड व्यायाम. हो.
हाताचा प्रचंड व्यायाम. हो. यात दोरीने ओढायचंय.
मुंबई मध्ये कुठल्या कंपनीची
मुंबई मध्ये कुठल्या कंपनीची घरघंटी घ्यावी? दुकानात घ्यावी की online?. काय features बघावे? कृपया आपले अनुभव सांगा.
मला इन्स्टंट पाॅट बद्द्ल कोणी
मला इन्स्टंट पाॅट बद्द्ल कोणी माहीती देईल का? मुलगी युनी ला जाणार आहे. तिला ह्याचा फायदा होईल का? ईथे रेसिपी / चर्चेचा धागा असेल तर तोही सांगा. धन्यवाद.
छोटा घेतला तर होईल.
छोटा घेतला तर होईल.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/60967 इंस्टंट पॉट बद्दल इथे आहे थोडी चर्चा. कॉलेजला जायच्या आधी मागवून तुमच्या देखरेखीखाली काही प्रकार करायला लावा. म्हणजे हाताळायची सवय होईल.
आभा , फेसबुकवर भरपुर ग्रुप्स
आभा , फेसबुकवर भरपुर ग्रुप्स आहेत इन्सन्ट पॉट रेसिपीचे त्यावर रोजच्या वरणभातापासुन ते करी,छोले ,चिकन भाज्या अशा सगळ्या रेसिपि आहेत
सुनिधी, मेधा, प्राजक्ता,
सुनिधी, मेधा, प्राजक्ता, धन्यवाद. हा धागा मिळतच नव्हता मला.सुनिधी।, ह्यात साईझ पण असतात का? नेटवर शोधाशोध करते.
बहुतेक ६ क्वार्ट व ३ क्वार्ट
बहुतेक ६ क्वार्ट व ३ क्वार्ट असे २ असतात.
https://www.amazon.com/Instant-Pot-Duo-Mini-Programmable/dp/B06Y1YD5W7
सेलवर आहे. फार कमीवेळा सेलवर येतो.
माझ्या कडे लोखंडी कढई आहे.पण
माझ्या कडे लोखंडी कढई आहे.पण वापरात नसल्याने तिला आतून बुडबुडे सारखे आले आहे.तर ती स्वच्छ कशी करावी?
माझ्या नव्या कढई तून अजून
माझ्या नव्या कढई तून अजून kala रंग येतोय. वापरायला तयार कशी करू? Dos/ donts पण सांगा, कधी लोखंडी कढई वापरली नाही.
कढई लोखंडी आहे का बिडाची हे
कढई लोखंडी आहे का बिडाची हे पाहा आधी.
लोखंडी कढई सरळ पितांबरी + स्टील वूल ने स्वच्छ घासून कोरडी करून तेलाचा हात लावून ठेवली की जंग चढत नाही. लगेच वापरायची असेल तर तापत घाल्यावर फोडणीकरता तेल/तूप घातल्या जाईलच.
बिडाची असेल तर मात्र पद्धत निराळी आहे.
मी लोखंड म्हणूनच घेतली. तेल
मी लोखंड म्हणूनच घेतली. तेल लावणे, एकदा घासणे सगळे केलं, कढई ओली असताना हातात घेतली तर बोटं काळी झाली. अजून काही स्वयंपाकाच करून बघायचा धीर झालेला नाही.
कढईचा फोटो टाकता येइल का?
कढईचा फोटो टाकता येइल का?
सर्वसाधारण पणे बिडाची भांडी तुलनेनी जाड असतात. लोखंडी त्यामानानी जरा पातळ असतात.
लोखंडी कढई मी दर वेळी
लोखंडी कढई मी दर वेळी वापरायच्या जस्ट आधी स्वच्छ घासून घेते.
मी लोखंडी कढई वापरुन झाल्यावर
मी लोखंडी कढई वापरुन झाल्यावर स्वच्छ घासून लगेच पुसून कोरडी करुन ठेवते. लाल काळी काहीच होत नाही. पावसाळ्यात मात्र घासून पुसून झाल्यावर सुध्दा अगदी १ मिनीट गॅसवर गरम करुन ठेवते. अजिबात खराब होत नाही
वापरू का मग कढई? परत एकदा
वापरू का मग कढई? परत एकदा घासून?
नव्या कढईला आतून काळं वंगण
नव्या कढईला आतून काळं वंगण सारखं काहितरी लावलेलं असतं.
ते काढायला चिंच, जुनं आंबट दही असं काही लावून बराच वेळ ठेवायचं. स्टीलच्या घासणीने घासणे.
ही प्रोसेस बर्याचदा करावी लागते.
तो काळा रंग गेल्याशिवाय काही खाण्यायोग्य करू नका.
बटाटे, कांदे इ. च्या सालींची आंबट दही घालून भाजी करता येईल. करताना वंगणाचा वास येतो.
Thank you chioo. एकदम perfect
Thank you chioo. एकदम perfect उत्तर दिलेत. दोनवेळा घासून-धुवून पण बोटांना तेलकट काळा रंग लागत होता त्यामुळे काही करायचा धीर होत नव्हता. आता तुम्ही सांगितले ते उपाय करते, काळा रंग यायचे थांबेपर्यंत.
कढई वापरायला लागले की कळवते
2 महिन्यापूर्वी मायक्रो फाइन
2 महिन्यापूर्वी मायक्रो फाइन घर घंटी घेतली, चांगली आहे, ऑटो क्लीन म्हणतात पण बरेच हाताने क्लीन करावे लागते, नाहीतर झुरळे आत जाऊ शकतात म्हणून स्वच्छ करावी लागते, जाळ्या 1 आणी 5 नंबर जास्ती वापरल्या जातात
१. ही लोखंडाची कढई आहे की
१. ही लोखंडाची कढई आहे की बिडाची?
२. काठापाशी आणि तळाला दिसतोय तो काळा रंग कसला आहे?
३. मधला भाग गंजलेला दिसतोय तो साफ कसा करायचा आणि पुन्हा गंजू नये म्हणून काय करायचे?
घासून झाल्यावर तेलाचा थर देऊन
घासून झाल्यावर तेलाचा थर देऊन गॅसवर तापवायची. त्यामुळे पाणी निघून जातं आणि फक्त तेलाची फिल्म राहते. मग गंजाचे डाग पडत नाहीत
घासून झाल्यावर तेलाचा थर देऊन
घासून झाल्यावर तेलाचा थर देऊन गॅसवर तापवायची. त्यामुळे पाणी निघून जातं आणि फक्त तेलाची फिल्म राहते. मग गंजाचे डाग पडत नाहीत
अॅमी, मला ही लोखंडाची कढई
अॅमी, मला ही लोखंडाची कढई वाटतेय. स्मूथ सरफेस आणि कमी जाडी.
आधी विम जेल आणि मग सिफ क्रीम ने स्वच्छ करून पहा. माझ्याकडच्या खूप जुन्या कढईचा गंजही घालवता आला.
मी लोखंडाची म्हणूनच विकत
मी लोखंडाची म्हणूनच विकत घेतलेली. पण योकुने कुठल्यातरी धाग्यावर पांढरीशुभ्र कढई दाखवलेली लोखंडाची म्हणून. तेव्हापासून मनात जरा शंका होती.
ओके. विमने साफ करूनन, तेलाचा थर देऊन, मगगरम करते.
धन्यवाद सई आणि भरत:-)
Pages