जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

आजच्या episode मध्ये शिवाने कोणत्या तरी मुलीच नाव घेतल..
ती कोण??
त्याची Ex का??
कारण सिरीयल नुकतीच बघायला सुरुवात केली त्यामुळे समजत नाही.

शिवा च्या ex चे नाव सायली आहे.
चांगली आहे सिरीयल. सगळ्याच पात्रांनी चांगला अभीनय केला आहे.

शिवाच्या आधीच्या मैत्रिणीचे नाव सायली जंगम. तिचा मृत्यु कसा झाला ते अजून दाखवलेले नाही.

सिद्धी चे ज्या मुलाशी लग्न ठरलेले असते तो गौरव आणि सिद्दी यांचे प्रेम जमलेले असते ते पुण्यात शिकत असता!

शिवा आत्याबाई ( चिन्मयी सुमीत) साठी काम करतोय. तिच्याविषयी इमान असल्यामुळे तो तिच्या मुलाचे "सरकार" चे गैर्वर्तन चालवून घेतोय.

आत्याबाई शिवाला नुसती वापरून घेत असते सत्तेत रहाण्यासाठी. गौरव चा खून केलाय " नरपत" ने जो आत्याबाईचा राजकारणातला प्रतिस्पर्धी आहे.

सगळे अभिनय मस्त करतात. हल्ली बघते कधीतरी रात्री ११ ला.

शिवा आवडतो मला. त्याच्या मम्मीला आणि काकाला काही उद्योगधंदे नाहीत पण मजा आणतात आणि ती जुळी मुलंही. तो काका जुगार खेळतो की काय. काकू बिचारी राब राब राबत असते. सिद्धी, मम्मी, शिवाची बहिण कोणीच तिला मदत करत नाहीत. फक्त आजारी होती तेव्हा सिद्धीने आणि शिवाने स्वयंपाक केला.

शिवाची बहिण फार गोड आहे. सिद्धी अभिनय छान करते पण शिवा लय भारी. चिन्मयी rocking.

कोणीतरी सांगा रे मला, ह्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग काय आहे, सगळे चकाट्या पिटतात, कोणी घरात तर कोणी बाहेर . बाबा हल्ली दिसत नाहीत. शेती वाडी भरपूर आहे का. तो शिवा तर आत्याबाईसाठी काम करतो. तिथे कमाई होतेय की फुकट राबतोय.

पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग >>> अगदी अगदी. शर्वरी जोग काय नाव तिचे, माहिती नव्हतं. ग्रामीण भाषेत छान बोलते.

शीर्षक गीत इतकं इतकं लाऊड आहे की मी लगेच ही मालिका स्कीप करतो. अधुन मधून दृश्य डोळ्यासमोर येतात पण मी ही मालिका पहात नाही. फक्त शिवाची बहिण मला आवडली. वहिनीला समजून घेणारी, भावावर प्रेम करणारी छान काम करते.
आत्याबाई आत्याबाई घोषणा डोक्यात जातात अगदी.

मी पण बघतेय ही सध्या, जरा काहीतरी घडतं पटापट ह्या सिरियल मधे. आणि काम करणारे आवडताएत.
अंजू ++१११ फक्त कधीकधी सिद्धी जरा जास्तच डोळे मोठे ( वटारूनच म्हणा ना ) बघते बिचार्‍या शिवा कडे.

मस्त अभिनय करतात सगळे. शिवाची बहिण ऊत्तम..अभिनय व ते characterही.
आत्याबाई कााय मधेच चिरकल्या सारख्या हसतात..तेंव्हा फार हसू येतं.
नरपत का काँटेक्ट करत असतो सारखा सिध््दीला? तिला माहित नाही का त्यानेच गौरवचा खुन केलाय?
मो.जो. बरेच एपि गायबच असतात.

हे कोणत्या शहरात घडताना दाखवलं आहे?
सिद्धीची आई स्लीवलेस ड्रेसला एवढी का रीअॅक्ट झाली

नरपत का काँटेक्ट करत असतो सारखा सिध््दीला? तिला माहित नाही का त्यानेच गौरवचा खुन केलाय?>> हो तिला माहित नाही. तिला वाटते कि शिवानेच तसे केले आहे. शिवावरचा राग म्हणून ती नरपतला एकदा मदतही करते.

ह्या सिरीयलच्या टायटल track चं शूटिंग तरी सांगलीत झालंय, बाकी माहिती नाही.

सांगलीत झालंय ते वाचलेलं आणि कालच news मध्ये दाखवलं की त्या भागात खूप पूर आलाय Sad .

ते देऊळाचे आवार ,नदी छान आहे. ह्या सिरीयल मध्ये गावा चे नाव रुद्राई आहे. ते कुठे आहे हे सांगितले नाहीये मला वाटत पुणे कोल्हापुर मध्ये असेल ते गाव कारण सिद्धी च्या पुण्याच्या कॉलेज ला अर्ध्या दिवसात पोहचले होते.

ते देऊळाचे आवार ,नदी छान आहे. ह्या सिरीयल मध्ये गावा चे नाव रुद्राई आहे. ते कुठे आहे हे सांगितले नाहीये मला वाटत पुणे कोल्हापुर मध्ये असेल ते गाव कारण सिद्धी च्या पुण्याच्या कॉलेज ला अर्ध्या दिवसात पोहचले होते.>>>>अमुपरी गावाचं नाव बहुतेक रुद्रायत वाटतय, ते सारखं रुद्रायत ची आई आत्याबाई आत्याबाई अशा घोषणा आठवताएत

या सीरिअलचा विषय लोकांना आवडेल, नायिका नायिका चांगले आहेत, हिट होणार, आरामात अजून एक वर्ष नक्की चालेल..

माझीही आवडती मालीका. खास करुन आत्याबाई म्हणजे चिन्मयी, आणि मोजो साठी बघायला सुरूवात केली आणि हळु हळू सगळेच आवडू लागले. कथाही नेहमीपेक्षा थोडी वेगळी असल्याने बघायला मजा येते. मालीकेतील भाषा देखिल छान वाटते. शिवाची आई म्हणजे लागिरं झाल जी मधिल मामी आहे बहुदा.
फक्त मोजोला बरेच दिवस का दाखवत नाही माहित नाही. जेव्हा दाखवतात फार थोडा वेळ असतात ते. पण त्यातही अभिनयाची छाप पाडतात. एक समजुतदार वडिल, सासरा बघताना छान वाटते.
नरपतची भुमिका करणारा डेट विथ सई या वेबसिरिज मधे होता.

मलाही आवडते ही सीरियल. टाय्टल सॉंग सुद्धा शिवासारखं राकट आणि खरखरीत आहे ते कथेच्या आणि नायकाच्या पार्श्वभूमिकेळा अगदी फिट्ट आहे. सोनी, मोजो, शिवा, चिन्मयी हे सगळे आवडतात आणि तो शिवाचा मित्रही.
पुरामुळे पुढच्या भागाचे शूटिंग होऊ शकले नाही म्हणून आज जुनाच भाग दाखवला.

होय, अत्ता रिपीट टेलीकास्ट च्या आधी दाखवलं कि महाराष्ट्रातल्या पूर परिस्थिती मुळे शुटींग होउ शकले नाही, म्हणून आधीच्या एपिसोड दाखवत आहेत, शुटींग त्याच भागात चाललय.

गैरसमज - आत्याबाईचा मुलगा 'सरकार' भर रस्त्यात एका मुलीचा विनयभंग करायचा प्रयत्न करतो. शिवा आत्याबाईंवर बट्टा येइल म्हणून वेळीच त्याला आवरतो आणि जेव्हा तो त्या मुली ला तिची ओढणी परत देत असतो तेव्हा सिद्धी त्याला पाहाते आणि अशी (गैर) समजूत करून घेते की शिवानेच त्या मुलीचा विनयभंग केलाय.
पुढे नरपत, जो आत्याबाई चा राजकारणातला प्रतिस्पर्धी असतो तो त्याच्या हस्तक इन्स्पेक्टर मार्फत सिद्धी ला चिथवून शिवाला अटक करवतो.
शिवाला तुरुंगवास सिद्धी ने दिलेल्या "खोट्या" साक्षीमुळे झालाय हे समजते आणि एखाद्याच्या चुकीमुळे दुसर्याच्या आयुष्याची वाट कशी लागते याचा धडा सिद्धी ला शिकवण्यासाठी तो सिद्धी ला तिच्या लग्नाच्या दिवशीच पळवून नेतो आणि एका खोलीत डांबून ठेवतो.
सहाजिकच सिद्धी चे लग्न मोडते. तिच्या प्रियकराला तिच्यात आणि शिवात आधीपासूनच काहीतरी आहे असा संशय येतो आणि तो देखील तिच्याशी संबंध तोडतो.
शिवा आणि सिद्धी मधे इथून शत्रुत्व सुरु होते.
राजकारणामुळे पुढे त्यांचे लग्न ठरवले जाते वगरे डिटेल्स परत कधीतरी!

मला एकूण कथा आवडली. गावातलं राजकारण बरोब्बर दाखवलंय. नरपत, सिद्धी चे आई वडिल आणि भाऊ यांचाही अभिनय छान!

Pages