वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्स वरचं स्पार्टाकस पळवत पळवत पाहून झालं. मला नाही वाटत इथे कुणी पाहू शकेल.
( जर कुणी खरंचच यातला रक्तपात पाहू शकले तर म्हणाल तिथे पार्टी )>> ३ वर्श आधी बघीतली आहे द्या पार्टी

दोन वेगळ्या सिरीज आहेत, दोघांचं कथानक सारखंच असलं तरी मांडणी खूप वेगळी आहे.-> धन्यवाद. वेगळ्या सिरीज आहेत हे माहित आहे Happy

त्या वेगळ्या सिरीज आहेत हे माहिती होत. एक tvf ची आणि एक PRIME वरची. कोटा FACTORY च trailor बघून शंका आली म्हणून कथानक एकाच आहे का ते विचारलं.

मिडसॉमर मर्डर्स विषयी इथे कुणी लिहीलय का? जुनी ब्रिटीश टीव्ही सिरियल आहे - मर्डर मिस्टरी - एकदम संपूर्ण ब्रिटीश. नेटफ्लिक्स वर आहे. सद्ध्या बघतोय. छान आहे.

हॉटस्टारवर "बॅरी" आणि "व्हाट वि डू इन शॅडोस" या दोन सिरीज चांगल्या आहेत .
दोन्ही मधे deadpan/dry humor हाताळलाय पण बॅरी काहीसा black comedy कडे झुकतो.

https://www.hotstar.com/tv/barry/s-1444

https://www.hotstar.com/tv/what-we-do-in-the-shadows/s-2076

अंबरेला अकॅडमी बघितली. नेटफ्लिक्स वर

टिपिकल सुपरहिरो सिरीजच कथानक आहे, पण वेगळ्या मांडणीसाठी वन टाईम वॉच.
आणि बरीच जुनी गाणीसुद्धा कळलीत.
Dont stop me now
Istanbul
रन बॉय रन
आणि अनेक...

अंबरेला अकॅडमी बघायला घेतली होती पण पकड नाही घेतली म्हणून सोडून दिली. fargo season १ आणि season २ बघितली. मस्त आहे. ७० च्या दशकातली अमेरिका मस्त दाखवली आहे. twists पण मस्त आहेत.

Criminal justice पाहिली.
शेवटपर्यंत उत्कंठा होती की खरा खूनी कोण असेल आणि खून कसा केला असेल. पण शेवट इतका काही पटला नाही. खून कसा केला ते तर दाखवलंच नाही.
बरेच लूपहोल्स आहेत. सीसीटीव्ही, फोन लोकेशन्स, बेसिक इंन्वेस्टिगेशन..
बाकी अभिनय सगळ्यांचाच छान झालाय. आदित्य,अवनी, माधव, मंदिरा , निखत, आदित्य चे आई वडील.. अगदी मुस्तफा आणि लायक सुध्दा..
जेल मधले सीन तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहेत. प्रसंगी किळसही येते.
असे सर्व प्रकार चालतात जेल मध्ये.!!!

मला आवडली नाही फार क्रिमीनल जस्टिस. त्या माधवचं कॅरेक्टर मस्त आहे. फक्त त्याचं ते खुजली प्रकरण आवरतं घ्यायला हवं होतं. शेवटी शेवटी आदित्यच्या जेल टाईमवरच खूप फोकस ठेवला आहे.

Kim's convenience पहा.
इतकी छान विनोदी मालिका मिळणार नाही. Netflix

Netflix वर हल्लीच दोन webseries बघितल्या.
You : Psychological crime thriller कॅटेगरीतली मालिका. Joe Goldberg हा एका बुकस्टोअरचा मॅनेजर एका aspiring लेखिकेच्या प्रेमात पडतो आणि social media & technology चा वापर करुन तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, इथून कथानक सुरु होते. खिळवून ठेवणारी सीरिज. जाम आवडली. दोन्ही lead actors च्या भुमिका छान झाल्या आहेत. Highly recommended.
Safe : Crime thriller. ही सीरिज Michael C. Hall (from Dexter) साठी बघितली. ब्रिटनमधल्या एका सर्जनच्या दोन मुलींपैकी एक अचानक गायब होते. तिचा शोध घेता घेता बरीच रहस्ये त्याच्या समोर येतात, असे कथानक आहे. Suspense बर्‍यापैकी टिकवून ठेवला आहे.

Prime वर मॉम पाहतं का कोणी इथे? मी लेटेस्ट सिझनपासून सुरू केली बघायला. मस्त वाटली हलकी फुलकी विनोदी. पुर्वाश्रमी व्यसनी व गुन्हेगार असलेल्या आणि आता निर्व्यसनी होऊन नॉर्मल आयुष्य जगणार्‍या मॉम बॉनी आणि लेक ख्रिस्टी , त्यांच्या सपोर्ट ग्रुपच्या मैत्रिणी, त्यांना येणारे प्रॉब्लेम्स असा फॉर्मॅट आहे.
फक्त सगळ्याजणी खातांनाच दिसतात सारख्या . त्यामुळे मी जेवण झाल्यावरच बघते Wink

यू टर्न नावाची नवीन मालिका आली आहे तू नळीवर. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव मुख्य भूमिकेत आहेत. बरा वाटला पहिला भाग.

नेटफ्लिक्स वरची नवी सीरीज - "टाइपरायटर".
भुताची स्टोरी असली तरी टिपिकल नाही. एकूण एंगेजिंग स्टोरी लाइन आहे. अ‍ॅक्टर्स पण चांगले आहेत सगळे. थोडे क्लीशे टाळले असते तर बरे झाले असते.
उगीच भुताचे हिडिस ओंगळ चेहरे वगैरे नाहीत. खरी वाटणारी, सामान्य दिसणारी कॅरेक्टर्स, साधे नॉर्मल वाटणारे सामान्य लोकांत दडलेले (तरीही भितीदायक) व्हिलन्स हे सगळे फार ओळखीचे वाटत होते, मग कळले की "कहानी" च्या सुजय घोष ची आहे ही सीरीज. त्यात पण असाच एक क्रीपी कॉन्ट्रॅक्ट किलर दाखवलाय तो आठवतो का? किती साधा, चष्मा वगैरे लावलेला कारकुनी चेहर्‍याचा दिसतो! यात पण असेच साधे ह्युमन वाटणारे व्हिलन्स आणि पोलिसही आहेत. हा जानरा झेपत असेल तर जरुर बघा. ( थोड्या पण भितीची सवय नसल्यास नाइटमेअर येण्याचे पोटेन्शियल नक्की आहे Happy ) . ५ च भाग आहेत पण शेवटाला दुसर्‍या सीझनसाठी सोय केलेली आहे.

वूट वर 'आणि काय हवयं' पाहायला सुरवात केली.
२-३ च भाग पाहिले आणि खूप बोर झालं. Happy
प्रिया बापट ..नुसती ओवर अँक्टेंग..!

आता फक्त सेक्रेड गेम्स सेकंड सीझन. वाट इज द बघिंग. बलिदान देना होगा नक्की काय. सिर्फ तिवारी कैसे बचे गा.

अमा +१
कुठलीही वेब सीरीज बघितली नाही. घोल / घूल बघायला सुरुवात केलेली पण ते काय झेपलं नाही.
अप्पुनको सिर्फ गायतोंडे देखनेका.

हो ग्रेट हॅक थोडी पाहिली. सो कॉल्ड फ्री सोशल मिडिया, त्यातल्या डेटाचा खरा उपयोग इ.बद्दल कठोर रिएलिटी चेक देणारी माहिती.
नेटफ्लिक्स वर एक रेजिमेन्ट डायरीज म्हणून एक हिंदी सीरीज आली आहे. भारतीय सैन्यातल्या वेगवेगळ्या रेजिमेन्ट्स आणि त्यांच्या कामाची, प्रशिक्षणाची माहिती, शौर्यकथा आणि गौरवशाली परंपरा याबद्दल आहे. एकेक एपिसोड एकेका रेजिमेन्ट ला दिला आहे. छान वाटली बघायला.

मी अ‍ॅमेझॉन प्राईमवर ‘द प्रॅक्टिस‘ बघते आहे. १९९७ च्या आसपास सुरु झालेला हा कोर्टरुम ड्रामा/सिरीज २००४ च्या आसपास संपली. सुरुवातीचे ७ सिझन्स मस्त आहेत. सातव्या सिझनच्या मध्यावर गाडी जरा ट्रॅक सोडते आहे अस़ वाटायला लागतं आणि आठव्या सिझनपासून मेन कास्ट्स बर्‍याचशा दिसतच नाहीत शो मध्ये. त्यामुळे माझ्या मते क्वालिटीच घसरली. पण वर्थ वॉचिंग.

Pages