वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण खूप आवडली ही सीरिज. तारा विशेष आवडली तिचा कॉन्फिडन्स तिची ग्रेस खूप छान कॅरी केलीय तिने. करण पण आवडला. जिम सर्भ पण अवडतोच प्रत्येक रोल मध्ये. प्रत्येक जण आपापल्या खाजगी आयुष्यात झगडत असतो. दुसऱ्यांचे लग्न लावून देणाऱ्या या सगळलयांची स्वतःची रेलशनशीप मात्र उसवलेली आहे हे पाहताना जबरी विरोधाभास वाटतो. खरंच दिल्लीत फेरफटका मारून आल्यासारखं वाटतं. या हुच्चभ्रु लोकांचं खरं आयुष्य किती बेगडी आणि ओंगळवाणे असतं हे खूप छान दाखवलंय.

कालच पाहुन संपवली मेड ईन हेवन
मस्त आहे असं पण म्हणावसं वाटत नाही..बघता बघता मधे मधे मला एकदम फ्रस्ट्रेशन च आलं..किती प्रॉब्लेम्स असतात भारतीय लग्नात असं वाटुन गेलं क्षणभर...दिल्ली साईड ची लग्न दाखवली यात पण एकुणच लग्नांमधले प्रॉब्लेम्स कॉमनच आहेत..दिल्ली असो की तमिळनाडु की महाराष्ट्र..असो
सगळ्यांची कामं मस्तच झाली आहेत..प्रत्येक जण झगडतो आहे आयुष्याशी.
पण मला काही गोष्टी कळल्या नाहीत...ईथे कोणाला कळल्या असेल तर समजवा...

*************************स्पॉईलर अलर्ट*****************************

तारा आणि करण नक्की कुठे आणि कसे भेटले ? त्यांनी मेड ईन हेवन कसं सुरु केलं ? हे सगळं दाखवलाय का ? की समजुन घ्यायचं आपल्या कुवतीप्रमाणे ? की मी मिस केलं ?
शेवट अतिशय कन्फ्युजिंग वाटला मला...तारा सगळे दागिने घेउन पळुन आली आहे असं दाखवलय ना ? तिचं न करणचं नक्की काय रीलेशन आहे ते कळलच नाही मला त्यावेळी.
जॅझ चं नक्की काय होतं असं दाखवलय ? ती त्या पेपर मद्धे काय वाचत असते ?
फैजा आणि तारा बेस्ट फ्रेंड कधी झाल्या ते मला कळलच नाही नीट. फैजा आणि आदिल जुने मित्र असतात ना ?

ताराच्या बड्डे पार्टीत करन डीजे असतो, तिथे ओळख होते. हेवन कसं सुरू केलं तेे नाही दाखवलं. मित्र असतात ते जिवलग. जॅझ पेपरमध्ये स्वत:चा फोटो बघत असते. फैजा आणि आदिल फॅमिली फ्रेंड असतात. आदिलमुळेच ओळख होतेे तारा आणि फैजाची. फैजाच्या लग्नात बहुतेक. फैजा तिला अजून ग्रूम करते. फैजाचा नवरा तिला मारत असतो म्हणून तारा तिला घरी आणते.
कबीर आणि जॅझचं मला काही कळलं नाही. कॅज्युअल असतं बहुतेक.

https://www.youtube.com/channel/UC7sDT8jZ76VLV1u__krUutA

डस्ट नावाचे हे चॅनेल युट्यूबवर आहे. भारी सायफाय आहेत. काहीतरी नविन बघितल्याचे समाधान मिळते. शॉर्ट्स आहेत व जबरदस्त स्टोरी, अ‍ॅक्टींग, इफेक्ट्स, म्युझिक सगळे एकसे एक आहे. मी अजून दहा बाराच शॉर्ट्स बघितल्या यांच्या पण पैसावसूल आहेत अगदी.

फुल्ल रेकमंडेशन!

मूव्हिंग आऊटमध्ये गिरिजा आणि रिषीची एंट्री झाली आहे. गिरिजा खूपच छान दिसते. खूप ग्रेसफूल. अभिज्ञा सतत ओरडून बोलते आणि वैतागलेली असते, तिच्यापुढे शांत, संयमी गिरीजा ऊठून दिसते. एपि फार छोटे आहेत.
स्मोक आणि रहे ना हमसफर (असंच काहीतरी नाव आहे, मोना सिंग आहे) डालोड केली आहे, विकांताला एकतरी बघून संपवणार.

निर्भया हत्याकांडावर आलेली 'दिल्ली क्राईम' पाहिली नेटफ्लिक्सवर . पूर्ण पोलिसांच्या नजरेतून. किती खरं , किती खोटं माहित नाही. पण ते गुन्ह्यांचं वर्णन अंगावर काटा आणतं दरवेळेस. फार उदास दिवस गेला जेव्हा ती सिरीज बघितली.

Made in heaven पाहून संपवली. शोभिताची(तारा) फॅन झाले आहे. बाकी सिरीज खूप मस्त. झोया व टीमने जबरदस्त सिरीज बनवली आहे.
Best Indian made series I have seen so far

Submitted by टयुलिप on 28 March, 2019 - 03:38. >>>>>. मी इथे 'दिल्ली क्राईम' बद्दलच लिहायला आले होते. खूपच छान बनवली आहे. प्रत्यक्ष त्या केसबद्दलचा खरे खोटेपणा माहीत नसला तरी, एखाद्या तपासात होणारी पोलिसांची फरपट, गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी होणारी धावपळ, वैयक्तिक जीवन, त्यातल्या समस्या, राजकीय हस्तक्षेप, पोलिसांचं अंतर्गत राजकारण, भावभावना हे सगळं फार उत्कृष्ट रित्या सादर केलं आहे. पोलिसांवर नसलेली, तरीही छोटछोट्या प्रसंगातून पोलीस लाईफ खूप सुंदर सादर करणारी 7 भागांची मालिका आहे. 2-3 लीड्स सोडता,कलाकार सगळेच नवीन दिसले. पण त्या त्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट. कास्टिंग डायरेक्टरचं विषेश कौतुक. बर सगळ्यांनी काम पण फार छान केली आहेत.
मला अतिशय आवडलेली वेबसिरीज.

या सर्व वेबसिरिज यु ट्युब वर आहेत क? Uhoh
मुव्हिंग आऊट माहित आहे कारण कालच कुणितरी मला ती रेकमेंड केली आणि पाहतेय.
पण बाकी कोणते चॅनल्स वगैरे ते सांगून ठेवलंत तर बरं होईल.

दिल्ली क्राईम

१. सिरीज खरंच खूप चांगली आहे, पहिला भाग बघणं फार अवघड होतं, कारण ही घटना भयंकर होती, त्यामुळे काही दृश्य बघितल्यावर अंगावर काटा येतो, बघवत नाहीत,

२. कास्टिंग चांगलं आहे, युट्युब सिरीजमधून पुढे आलेले अक्टर्स इथे दिसतात.

३. मेलोड्रामा नाहीये, लेखन सशक्त आहे, बारकावे टिपले आहेत, सवांद परिस्थिती अनुरूप आहेत, दुसऱ्या भागातला एक सवांद खूप आवडला "हम तो इन्साफ कर रहे है, इसमे सही गलत क्या है?"

४. सिरीज बघून अधिकारी वर्ग काम कसे करतात याचा अंदाज लावता येतो. सेक्रेड गेम्स किंवा त्या सारख्या ओव्हर ड्रॅमॅटिक सिरीजपेक्षा ही सिरीज उत्तम आहे.

Made in heaven चा पहिला भाग डोक्यावरून गेला होता. फैझा आणि आदिल लीड हिरो/ हिरॉईन वाटले होते सिरीजच्या थंबनेल इमेज वरून (याला काय म्हणतात?) . त्यामुळे काय चाललं आहे काही कळत नव्हतं .
पण इथे वाचून नेटाने पाहिली. आवडली. मी पण तारा ची फॅन. ताराबद्दल जशास तसे झालं असलं तरी वाईट वाटलं. सेकंड सिझन असला तर तिने परत जोमाने उभं राहिलेलं पहायला आवडेल. करण - ताराची मैत्री खूप गोड आहे.

@ॲमी
लिंक चांगली आहे, या पोस्टच्या लेखकाचा दृष्टिकोन बरोबर आहे, रामधार सिंग या सारखं पात्र सिरीजमध्ये नाही. खरं तर असायला हवं होतं.

दिल्ली क्राईम पाहिली..भयंकर अस्वस्थ होते मी २ दिवस....एखाद्याचे किती हाल व्हावेत..किती हे दुर्दैव...लोखंडी सळी शरीरात घालु शकणारे लोक कशाचे बनलेले असतील..? खरच त्या लोकांना फाशी ही शिक्षा कमी आहे..हाल हाल करुन मारायला हवय...
आणि त्या मुलीचा मित्र या सिरीज मद्धे दाखवलय तसा खरच वागला का बस मद्धे ? तो मुद्दाम पडुन राहिला सीट खाली आणि तिला वाचवायला गेला नाही मागे असा काहीतरी दाखावलय... हे जर खर असेल तर तो पण तितकाच गुन्हेगार आहे...

त्या मुलीचा मित्र >>
त्याला अगोदरच मारहाण करुन बस मधुन फेकून दिले होते .

एरॉस नाऊ वर फ्लिप पाहिली ३-४ च वेगवेगळ्या कथा.
बुली - रणवीर शौरी, श्रुती मराठे
मसाज - जिम सर्भ
हॅपी बर्थडे - मेड इन हेवन मधे जो करण झालाय आणि मकडी मधली श्वेता प्रसाद
तिन्ही गोष्टी छान आहेत. हॅपी बर्थेडे एकदम भारी.

दिल्ली क्राईम अतिशय भावली मला.
कुठेही मेलोड्रॅमॅटिक न होता पोलीसांवरचा ताण त्यांची धडपड सगळे पोचले.
शेवटच्या एपि मध्ये लास्ट आरोपी पकडला गेला हे सांगताना भूपिंदरचे हावभाव एकदम जमून आले आहेत

हॅपी बर्थेडे एकदम भारी. >>> हा आवडली .
Made in heaven , बघायला सुरुवात केलीय.
एकूण एक लोक , त्यांच्या role मध्ये fit होतायेत.
तारा फारच आवडली.
करणची story बघून मात्र कंटाळा आला, फारच ताणलीय.
कल्की "वो" च्या roleमध्ये typecast होतेय.
खरतर, धन-ऋण करायला वेगळा धागा हवा.

लोकसत्ताने कैच्याकै वाईट लिहिलंय. मला तर काहीच दोष दिसत नाहीत, करणची स्टोरी फारच डिटेलात दाखवली आहे पण त्या लोकांना होणारा त्रास, सोशल अॅक्सेपटन्स नसणे हे सगळे खरे असावे. मुळात हे सगळे अति श्रीमंत लोकांबद्दल आहे, लोकसत्ताकाराच्या पोटात दुखायचे कारण कळले नाही किंवा त्याला बिटवीन द लाईन्स वाचता आल्या नाहीत दुर्दैवाने . उदा. करण जेव्हा पूजावर चिडतो आणि ओरडत असतो तेव्हा तो स्वत: वरच चिडलेला असतो, घरमालकाची व्यथा त्याला कळते आणि तो पीटीशन फाईल करायचा निर्णय घेतो कारण त्याला सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो. त्याला पूजालाही तेच सांगायचेे असते की तिने आवाज ऊठवला पाहिजे.

मेड इन हेवन बघून संपवली . overrated वाटली , पण बघायला आवडली.
लोकांचे एकमेकांशी नातेसंबंध ,गुन्तागुन्त. प्रत्येक कॅरेक्टर ग्रे शेड च आहे .
लोक फार प्रॅक्टीकली विचार करतात आणि वागतात . शिबानी उगाचच भावनेच्या भरात रहात नाही .
खर्या आयुश्यातही कोणी फक्त चांगलं किन्वा वाईट नसतं , माणूस परिस्थीती नुसार रिएक्ट होतो.

मजा वाटली . रोशन्सच्या एपिसोडमध्ये दुबईवाली हरसिमरन दिसते . हरसिमरच्या एपिसोडमध्ये पूजा .
शेवटचा एपिसोड मात्र गंडला आहे . नूतनच्या लग्नाचा . फार ढोबळ चूका आहेत .
दीप्ती नवलची स्टोरी फार गोड वाटली. तिचं घरही फार आवडलं , आणि ताराची बेडरूम आणि ड्रेसिन्ग रूम . वॉव.

जिम सर्भचा आदिल टोटल कातिल आहे. काही काही सीन्समध्ये फक्त त्याच्या चेहर्यावरच्या रेषा हलतात. जाम आवडला.
जूनी तारा आणि नविन तारा मध्येही फरक व्यवस्थीत कळतो.
फैजा तिला ग्रूम करते ते छोट्या छोट्या गोष्टींमधून छान दाखवलयं - ब्रेसलेट काढून टाक , पार्टी नाही कॉकटेल , नोबल ग्रेप्स .
दिलीप ताहीलचा सासरा फार गोड वाटला.

next recommendation ???

TVF चा Tripling Season 1 आणि Season 2 खुप सही आहे! प्रत्येक एपिसोड खुप छान आणि different आहे. नेहमीचाच plot नसून एकदम unexpected turns घेते ही webseries. त्यात सुमित व्यास, मानवी गगरू आणि अमोल पराशर यांची acting म्हणजे विचारायलाच नको इतकी सुंदर आहे. ही webseries TVF च्या Android App वर बघता येईल. This is one of the best web series I have ever seen.

कोणी 'Top 10 सिक्रेटस आणि मिस्टरीज'चा सिझन 2 पाहिला आहे का? मी पहिला सिझन पाहिला नव्हता, हा पाहून झाला की शोधणार आहे. कथा नसल्यामुळे न पाहिल्याने फरक पडत नाही, पण सिझन 2 ने इतकी पकड घेतली आहे की सिझन 1 पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही.

यामध्ये 13 वेगवेगळ्या रहस्यमय विषयातल्या Top 10चा आढावा घेतला आहे. जिथे कोणतेही शास्त्रीय ठोकताळे मांडता येत नाही, तर्कशास्त्र जिथे हार मानत, जिथे कोणतेही पुरावे किंवा विटनेसेस नाहीत अशा चमत्कारिक गोष्टींचा विषयानुसार आढावा घेतला आहे.

1. People without identity
2. Nature's magic
3. History's mysterious work of Art
4. Secrets and magic of alternative medicine
5. Unsolved disappearances
6. Mysteries of World War II
7. The mystery of cults of mummies
8. Big city mysteries
9. Medical mysteries
10. Top secret military intelligence operations
11. History's suppressed inventions
12. Human sacrifices
13. Forbidden knowledge

एकापेक्षा एक इंटरेस्टिंग विषय आहेत. प्रत्येक एपिसोड पाहिला की डोक्याला किडा लागतो. ते विषय डोक्यात सतत घोळत रहातात आणि खरेच शोधकामात सहभागी लोक होते त्यांची फाईल बंद करताना काय अवस्था झाली असेल हाच विचार डोक्यात रहातो.

मला सतत वाटतं आहे की यावर कोणी तरी पूर्वी लिहिलं आहे. Particularly 5वा एपिसोडमधली इंग्लंडमधल्या प्रोस्टिट्यूटसच्या सिरीयल किलिंग बद्दलची माहिती तर मी माबोवर नक्की वाचलेली आठवते.

Hotstar वर criminal justice आहे... 10 episodes aahet, worth watching. 2 दिवसांत rather रात्रीत बघून काढली. काही सीन शिसारी आणणारे आहेत पण त्यातच सिरीजच potential जाणवत. सगळ्यांची काम एकदम छान आहेत, त्यात जॅकी श्रोफ पण आहे.

माझ्याकडे prime आहे त्यावरच्या वेबसिरीज बघते पण नेटफ्लिक्स च्या सीरिज बद्दल खूप ऐकून आहे. परंतू महाग वाटलं त्याचं बेसिक पॅकेज 500/ month आहे. त्यापेक्षा prime खूप स्वस्त आहे. शिवाय प्रत्येक अँप वर सध्या चांगल्या वेबसिरीज सुरू आहेत सो किती अँप्स घ्यायचे हा पण प्रश्न पडतो.

Pages