वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Practice माझी all time favourite series आहे ... अगदी खरंखुरं वाटावं असं कायद्याचं जग उभं केलंय त्यात

सेक्रेड गेम्स ने दुसरा सीझन आणण्यात बराच वेळ घालवल्यामुळे माझा तरी विरस झालाय. झाकण उघडून बरेच दिवस पडून राहिलेल्या सोड्यासारखी अवस्था झालीय.

अगदी खरंखुरं वाटावं असं कायद्याचं जग उभं केलंय त्यात >>>

हो, मला पण आवडायची ती सीरीज. काही वर्षांपूर्वी कुठल्यातरी चॅनलवर (बहुतेक एएक्सएन) सलग सगळे सीझन्स पाहिले होते. त्यातल्या काही वकिली टर्म्स तेव्हा तोंडात बसल्या होत्या. जनरल बोलतानाही घरात वापरल्या जायच्या. आता विसरले.

अरे नेट फ्लिक्स वर द फॅमिली म्हणून सीरीज आहे . लिमिडेड भाग आहेत पाच. पण लैच भारी. काहीही कन्क्लुजन निघत नाही शेवटच्या भागापरेन्त. पण जनरल अमेरिकेत रिपब्लिकन काय डेमोक्राट काय धोरणात काहीही फरक पडत नाही. ट्रंपला सपोर्ट का? वगैरे ची एका मार्गे उत्तरे शोधायचा प्रयत्न आहे. घटनेत चर्च व स्टेट वेगळे असे लिहीलेले आहे पन प्रत्यक्षात काय प्रकरण आहे ते कळते.

टॉक्सिक मॅस्क्युलानिटी ला इतके १००% सपोर्ट देणारे गृप असतात ते बघोन शिसारी येते. वर बोलणे कसे दिखाउ. अगदी अमेरिकन स्टाइल
डेन ब्राउण पुस्तकाचा रिसर्च मटॅ रिअल असावे तसे आहे.

The Practice नाही पाहीली पण कोर्ट रूम ड्रामा Good Wife त्याचीच sequel good fight आणि Suits मधे पण मस्त आहे.

हॉटस्टार वर, नॅट जिओ च्या बर्‍याचश्या उत्तम डोक्युमेंटरीज आहेत. फ्री टू वॉच मध्ये आहेत. भारतीय आर्मी, एअरफोर्स, बिएसएफ . इ. वर आहेत. प्रत्येक भाग साधारणपणे पाऊण तासात संपतो. अ मस्ट वॉच.

सॅक्रेड गेम्स तर आहेच लिस्ट वर. पण मला पुन्हा पहिले सगळे भाग पाहावे लागतात असं बर्‍याच काळानी पुढला सिजन आला की. अजून कुणाचं हे असं आहे का?

प्राईमवर Good omens बघितली. हलकीफुलकी छान मस्त वाटली.
द बॉईस तर एक नंबर आहे, पण शेवट जरा बॉलीवूड टाईप वाटला.
Inside Edge तर खूपच मस्त वाटली.
Mirzapur एक नंबर बकवास! पंकज त्रिपाठी मात्र बेस्ट!
Macmafia बघण्याचा विचार करतोय.

प्राईमवर डॉमनिक कूपरची "प्रिचर" नावाची भन्नाट सिरीज आहे. तीन सीजन पूर्ण होऊन शेवटचा सीजन सुरु झालाय. फुल्ल्टू ऍक्शन धमाका आणि अचाट कथा आहे.

The Practice >>> ऑल्मोस्ट बघता बघता सोडून दिली होती Happy आता इथल्या रेको नंतर पाहतो. बॉस्टन लीगल बहुधा यातूनच स्पिन ऑफ केलेली आहे. ती मस्त आहे.

द गुड वाइफ पाहिली आहे ५-६ सीझन्स. गुड फाइट अजून पाहिली नाही. सूट्स तर मस्तच आहे.

Macmafia बघण्याचा विचार करतोय. >>>

सध्या (भारतात) झी-कॅफेवर सुरू आहे.

क्राईम ड्रामा सिरीज आहे. ७-८ एपिसोड्स आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, त्यासाठी मनी लाँडरिंग, मोठाल्या फायनान्स फर्म्स, पात्रांची रशिया बॅकग्राऊंड, एकमेकांवरची कुरघोडी, शह-काटशह, इत्यादी मसाला आहे. कथानकाला वेग आहे. जेम्स नॉर्टन मला आवडतो. त्यामुळे बघते आहे.

`द प्रॅक्टिस'नंतर मी 'बॉस्टन लीगल' बघायला सुरू केली होती; पण ती मला जरा बोअर झाली Proud ती आधी पाहिली असती तर कदाचित द प्रॅक्टिस बोअर झाली असती.

गेल्या वर्षी झी कॅफेवरच बीबीसीची 'द कलेक्शन' नावाची मालिका पाहिली होती. मस्त आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यानचा ड्रामा आहे; पॅरिसच्या फॅशन वर्ल्डची कथा म्हणू शकतो. ते वातावरण खूप छान निर्माण केलेलं होतं. जरा वेगळा विषय म्हणून नक्की बघा.

आज रातच्याला बारा वाजता सेक्रेड गेम्सचा दुसरा सीजन बघायला सुरवात कोण करणार आहे?

फा, नक्की बघ. सगळेजण पक्के लॉयर्स वाटतात. मला शेवटच्या सिझनला त्यांनी बॉस्टन लिगलचं पब्लिक घुसवलं ते आवडलं नाही. पण बॉबी डॉनल आणि बाकी मेंबर्स बाहेर निघाल्यावर एकूणच मजा कमी झाली. शेवटचा सिझन बोअर आहे.
Law & Order SVU (Special Victims Unit) हा ड्रामाही माझा ऑल टाईम फेव आहे. कधीही बघू शकते.

HBO वर Killing Eve पाहीली...सीझन १ मस्त आहे...सीझन २ थोडा बोर होतो आणि शेवट नाही आवडला.

अल्ट बालाजी वर 'केहने को हमसफर है' सिझन 1 व 2 छान आहे.ओळखीचे चेहरे आहे.मोना सिंग,रोनित राॅय,गूरदिप कोहली(संजीवनी फेम) आहेत.

कोटा फॅक्टरी छान आहे
पॉयझन कॅची आहे पण सगळे चेहरे आवडूनही थिमला पुरेसा न्याय दिला नाही असे वाटत राहिले.

प्राइम वर
1.इन साइड एज
2.ब्रेथ
3.मॅक मफिया
4.द बाॅइज
5.जॅक राएन
6. फोर मोर शाॅट

Inside Edge चांगली आहे का?>>>>>> हो.. थ्रिलर आहे आयपीएल मध्ये सट्टा कसा खेळला जातो ह्यावर बेतली आहे

भाच्याच्या शिफारसीवरून नेटफ्लिक्सवर stranger things पहिला सिझन पाहीला. उत्कंठा वर्धक आणि वेगवान कथानक यामुळे छान वाटली. पण एक कुतुहल जागृत झाले. मालिका PG१६+ आहे. पण ती १२-१३ वयाच्या मुलांभोवती घडते. त्यातली एक तर केंद्रीय पात्र आहे. जर मालिका १६ वर्षावरील मुलांसाठी असेल तर ह्या १२-१३ वर्षाच्या मुलांना त्यांचे पात्र आणि कथा कशा प्रकारे समजावत असतील?
हा प्रश्न बऱ्याच आधी बऱ्याच चित्रपट मालिकांच्या संदर्भात पडू शकला असता, परंतु नाही पडला. कदाचित ह्या कथेत त्या मुलांची गुंतवण जास्त असल्याने असेल...

viu च्या वेबसीरिज तशा बर्‍या असतात. अश्लील वाटाव्या इतक्या ओपन तर असतात (पण सेक्रेड गेम्स पेक्षा जरा कमी) पण त्यांना जरा सकारात्मक शेवट असतो.

Pages