वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया बापट ची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज कालपासून हॉटस्टारवर आली आहे.
सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी असे सर्व मराठी कलाकार आहेत. पण मालिका हिंदी.
दिग्दर्शक - नागेश कुक्कनूर

श्रेयनामावली आणि पहिला प्रसंग पाहिला आहे फक्त . चांगली वाटतेय. राजकीय सूडचक्र असावं असं वाटतंय.

सिटी ऑफ ड्रिम्स बघायला सुरुवात केली आहे. पहिले ५ एपिसोड्स बघून झाले. सो फार चांगली वाटतेय.

मी ही पहायला सुरवात केली, कथा नेहमीचीच अनेक वेळा पाहिलेली आहे. पण स्टार कास्ट नावाजलेली आहे. आतापर्यंत मी एकच भाग पाहिला आणि आवडला. दिगदर्शन आणि अभिनय सुंदर.

सायो, तू 5 भाग कसे पाहिलेस? 3 मे ला चालू झाली ना? 5 भाग झाले असतील तर मी बरीच मागे आहे.

प्रिया बापटने २ तारखेलाच सांगितलं होतं सर्वच्या सर्व म्हणजे आठही भाग ३ तारखेला उपलब्ध होतील. तोपर्यंत कल्पनाच नव्हती या मालिकेची.
पहिला भाग पाहिला आता पैसे भरावे लागणार आहेत.

Prime वरची fore more shots please ही सीरिज पाहिलीये का कोणी? मी पहिली आवडली.

ऍमेझॉन प्राईम बहुतेकांकडे असेल इथे . "द मॅन इन द हाय कॅसल " या सिरीज चा अनुल्लेख पाहून आश्चर्य वाटतंय. प्राईमवरील सर्वांत चांगल्या सिरीजमधे हिला अग्रक्रम देईल मी.
https://www.imdb.com/title/tt1740299/

अ‍ॅक्चुअली टिव्हीसमोर कहीतरी इंटरेस्टींग बघायला बसावं तर काहीही चांगलं दिसत नाही आणि हा बीबीही आयत्यावेळी सापडत नाही. नोटपॅडमध्ये ही नावं लिहून ठेवायला हवीत.

सिटी ऑफ ड्रिम्स काही भाग पाहिले, म्हणावी तशी पकड घेत नाही पटकन ही सिरीज, नागेश कुकुनर सारखा दिग्दर्शक असून आणि इतके चांगले कलाकर असून.
अतुल कुलकर्णीला पहिल्याच भागात कोमात टाकलय, कधी उठणार आणि अ‍ॅक्टींग करताना दिसणार काय माहित Happy
स्ट्राँग स्त्रिया म्हणजे स्मोक केलच पाहिजे ही देसी वेब सिरीजचं इक्वेशनच बनलं आहे , सगळ्याच देसी सिरीजमधे इतक्यात बघितलेल्या .
असो, तर स्टोरी साधारण चौथ्या भागानंतर थोडी पकड घ्यायला सुरवात करते, सहा भाग झाले बघून.
सिध्दार्थ चान्देकर, प्रिया बापट , उदय टिकेकर, संदिप कुलकर्णी आवडले .
स्टोरी रिअल लाइफ बेस्ड आहे कि काल्पनिक ? मला उगीच वाटलं कि प्रमोद महाजन , पूनम महाजन, राहुल महाजन वर आहे का ? थोडं साम्य दिसलं पण बहुदा नसावी.
काही मराठी ऑडीयन्सनी सोशल मिडीया ट्रोलिंग सुरु केलय प्रिया बापटच्या इन्स्टा वर, तुला असे सेक्शुअल कन्टेन्ट सीन्स, ते ही लेस्बियन लव्ह मेकिंग वगैरे द्यायला लाज कशी वाटली नाही, मराठी लोकांना बदनाम करत आहेस वगैरे एकदम टिपिकल.

सिद्धार्थ चांदेकरचं हिंदी गिरिश कुलकर्णी सारखं आहे. प्रिया बापट वरणभात वाटली होपफुली ह्यापुढे जास्त प्रॉमिसिंग वाटेल. बाकी स्मोकींग दाखवणं वगैरे अगदी टिपीकल.

आय थिंक मुद्दामच स्ट्राँग मराठी अ‍ॅक्सेन्ट हिन्दी वाले कलाकार घेतलेत, नाहीतर चॉइसेस भरपूर मिळाले असते त्यांना.

मराठी लोकांना बदनाम करत आहेस वगैरे >>> एक वेळ ते परवडले. किमान प्रामाणिक असतात. पण ती ट्रोल झाली म्हणून लगेचच , @ प्रिया मी तुझ्या पाठीशी आहे, होमोसेक्शुअलॅटी हा आपल्या संस्कृतीचा नेहमीच भाग राहीलेला आहे @ वगैरे ज्ञान पाजळत त्या सीनची लिंक फेसबुकवर देणारे आंबटशौकीन नाहीत परवडत. ट्रोल्सना विरोध करतोय असा बहाणा करत आंबट शौक पुरवत पुरोगामी आव आणणारी एक जमात आहे.. ते भयाण असतात.

Prime वरची fore more shots please ही सीरिज पाहिलीये का कोणी? मी पहिली आवडली.>>>> हो पाहिलीये मी पण. छान आहे.

सिटी ऑफ ड्रिम्सचे १० भाग दिसले हॉटस्टारवर. सगळे बघून झाले. मस्त आहे सिरीज. आवडली.>>>>>>>>>>सायो, हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन कितीला मिळालं?

प्रिया बापट वरणभात वाटली >>> ती तशीच वाटते मला पण .. त्यामुळेच इतक्या बोल्ड रोल मधे कशी काय याचं आश्चर्य वाटलं. टीपिकल ठरलेलं उत्तर असतंच म्हणा 'कथानकाची गरज' Wink

>>हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन कितीला मिळालं?>> कल्पना नाही, विचारुन सांगते. आमच्याकडे क्रिकेटकरता घेतलेलं होतंच आधीपासून.

झी५ वर "पॉईजन " येतेय .
अरबाझ खान - गोव्याचा ड्रग माफिया , फ्रेडी दारूवाला - एसीपी आणि तरूण विरवानी -- सणकी ईन्स्पेक्टर .

तरूण विरवानी त्याच्या पहिल्या चित्रपटात फार आवडलेला , एकदम गश्मीर महाजानी टाईप्स आहे .
झी५ नाही आहे , दूसरीकडे कुठे बघायला मिळाली तर बघेन .

बाब्बौ, कुठे कुठे घ्यायचे सबस्क्रीप्शन ?
नंतर याच मालिका एम एक्स प्लेअर, जिओ सिनेमा वर फ्री येतात. स्मोक आता सगळीकडे उपलब्ध आहे.

ओके, थोडं अ‍ॅप्स सब्स्क्रिब्शन बद्दल.
प्राईम ९९९ ला वर्षभर आहे (हे बहुतेकांकडे आहे)
झी ५ आणि बाकी सगळे ५००/- ला वर्षभर आहेत (बहुतेक)

यामध्ये जर तुमच्यकडे (भारतातलं) व्होडाफोन (आणि बहुतेक एअरटेलही) पोस्टपेड असेल (३९९/- प्रतीमहीना रेंटल) तर प्राईम आणि झी ५ फ्री आहेत. अ‍ॅक्टिव्हेट करून घ्यायला लागतं (नो चार्जेस).

बहुतेक वेबसीरीज जिओ च्या थू ही पाहाता येतात. (जिओ मूव्हीज). किंवा जिओ लोङिन वापरूनही पाहाता येतील, बहुतेक.

नेटफ्लिक्स कडे अफाट क्वालिटी कंटेंट आहे आणि म्हणूनच किंमतही घेतात ते. रु. ८००/- चा मॅक्स प्लॅन घेतला तरच ४के स्ट्रीमींग मिळतं.
तर यावर एक उपाय आहे कुणी एकानी पैसे भरायचे आणि ४ लोकांनी वापरायचं. २००/- काम होतं जे की फारच रिझनेबल होईल.
हे पैसे शेअर करून पाहाणे हे बाकी अ‍ॅप्स करताही वापरता येइल.

इथे ऑफिसात बरेच लोक्स करतात असं. पर्याय वाईट नक्कीच नाही.

मी स्मोक पैसे भरून पाहिली आणि आता फ्री फ्री फ्री आहे एम एक्स प्लेअर आणि जिओवर. किती जीव जळाला असेल..
आता सिटी ऑफ ड्रीम्स येऊ दे फ्री. मग पाहीन.
आत्ता पाहिली तर कुणी पद्मविभूषण देईल असेही वाटत नाही.

नेटफ्लिक्स share करून कसं बघता येईल?
>>
४ लोक्स.
१.
२.
३.
४.

पहिल्यानी पैसे भरून चालू करायचं. बाकी ३ लोकांना ज्या ईमेल वरून नेफ्ली अकाउंट चालू केलंय तो आयडी + पासवर्ड शेअर करायचा.
बाकी लोकांनी पहिल्याला २००/- पे करायचे.
प्रत्येकानं आपापलं प्रोफाईल नंतर तयार करायचं नेफ्ली अ‍ॅप मध्ये. सगळी हिस्टरी त्या त्या अप्रोफाईल मधेय राहाते. कुणी कुणाच्या अधे मधे येत नाही.
समजा कुणी ५ वी स्क्रीन अ‍ॅड केली तरीही चालते . अ‍ॅट अ टाईम ४ वर तर पाहाता येतंच, त्याचवेळेला जर कुणी ५ वी चालू करायचा ट्राय केला तर नेफ्ली नोटीफाय करतं की यू आर वॉचिंग ऑन मोर दॅन ४ स्क्रीन्स, सो त्यावेळस कुणालातरी पाहाणं बंद करावं लागतं.

नेटफ्लिक्सला पैसे एकाकडूनच मिळतील (एकाच कार्डवरून). यांना कार्ड च द्यायला लागतं रजिस्ट्रेशन करतांनाही. पहिला महिना कार्ड चार्ज होत नाही. चार्ज करायच्या तीन दिवस आधी ते नोटीफाय करतात.

अजून एक जरी घरी ४के टिव्ही असेल आणि ४के नेफ्ली असेल तरीही आपापले इंटरनेट कनेक्षन्स तेव्हढे तगडे आहेत ना हे पाहून घ्या. डेटा वाईज आणि स्पीडवाईजही तगडे हवेत. ४के कंटेंट साधारणपणे १६ एमबीपीएस स्पीड खातं. डेटा बहुतेक १०/१२ जीबी प्रतीतास जात असावा.
१६ एमबीपीएस हे फक्त नेफ्ली, बाकु तुमचा फोन, पिसी इ. पण त्याच नेटवर्क वर असतात सो स्पीड सिलेक्ट करताना २४ एमबीपीएस वगैरे तरी हवा.

धन्यवाद, मला हिस्टरी कशी maintain होईल असं वाटत होतं, करण नेफ्लि साठी तो एकच कस्टमर पकडला जाईल असं वाटायचं. पण तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे हे नेफ्लि ला sharing मान्य असावं

नेटफ्लिक्स वरचं स्पार्टाकस पळवत पळवत पाहून झालं. मला नाही वाटत इथे कुणी पाहू शकेल.
( जर कुणी खरंचच यातला रक्तपात पाहू शकले तर म्हणाल तिथे पार्टी )

Pages