बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिवृष्टीमुळे सायरन वगैरे वाजवून उगीच गंभीर प्रसंग ओढवल्यासारखं दाखवतात प्रोमो मध्ये. किती तो चाईल्डीशपणा.! कोणाला खरं वाटणार आहे हे? हे म्हणजे काहीही हं श्री आहे

तो ओंम शिंदे कलर्स च्या लक्ष्मी सदैव मंगलम मध्ये आहे. त्याचा पुढच्या वर्षी नम्बर लागेल >>>> तो नाही म्हणतोय (मित्र आहे ) पण ती केतकी चितळे येईल बहुतेक

अरे वा! मी दोन दिवस गायब काय झाली, दुसरा धागा आला पण! कटप्पाने बाजी मारली Lol

संचालिके ला दोन्ही साइड हून एकायला लागते . बोलले तर स्पर्धकांचे आणी नाही बोलले तर मांजरेकर सरांचे . पण बिग्ग बॉस ला कसेही वागलेले चालते आणी नियम मोडलेले चालतात म्हणून संचलीके चे काही एकून घेत नाहित >>>>>>>>> +++++++११११११११११११

सुपु बिबॉला काही सान्गताना कॅमेर्यात डोकावून बोलतात.

सध्यातरी शिव बेस्ट आहे. >>>>>>>> अगदी अगदी

वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून प्राची पिसाट ( देवयानी आणि राधा प्रेम मध्ये होती), ऋतुजा आणि मिलिन्द शिन्दे यान्ची नावे चर्चेत आहेत.

नॉमिनेशनमध्ये नेहाच नाव कुणीच घेतल नाही>>>>> जे ऐक्टिव नाहित गेम कळलेला नाही अशीच नावे घ्यायची होती. >>>>>>> अय्या, ते तर मी विसरुनच गेले होते. धन्स अमुपुरी Happy

गेम कळलेला नाहि हि अट न्हवती. अट होती कि कोण अपात्र आहे घरांत रहाण्याकरता हि. या नियमाने नेहा सुद्धा त्या लिस्ट मधे असायला हवी होती. घरांतलं वातावरण दूषित, टॉक्झिक रिलेशन्सिप्स डेवलप करण्यात तिचा हात कोणिहि धरु शकत नाहि...

वेलकम सुलू Happy तुमचा धागा काढायचा चान्स गेला Lol कटपां नी खुप
लवकर धागा काढला.

अपात्र असलेले सदस्य निवडायचे होते पण त्याचे 5निकष दिले होते.
1.आतापर्यंतची घरातील आणी कार्यातिल निराशाजनक कामगिरी.
2. खेळ पुर्णपणे समजण्याईतपत बौधिक चातुर्य नसणे
3कार्यात भुमिका नीट न बजावणे कार्यतीलनिष्क्रीयता
4स्वता चे ठाम मत नसणे .
5.खेळा त पुढे जाण्यासाठी डावपेच आखत न येणे.
Inshort गेम मध्ये ऐक्टिव नसलेले.गेम न कळलेले.
म्हणजे सुरेखा किशोरी रुपाली .
घरांतलं वातावरण दूषित, टॉक्झिक रिलेशन्सिप्स डेवलप करण्यात तिचा हात कोणिहि धरु शकत नाहि... बिग्ग बॉस वाल्यांसाठी हे पॉजिटिव पॉईंट्स आहेत Lol

ओके, गेम "कळणे" आणि तुम्ही वर दिलेले निकष याचा काहिहि संबंध नाहि. वरच्या निकषात बसणारे, सोकॉल्ड गेम कळलेले सदस्य ऑलरेडि घराबाहेर गेलेले किंवा घालवलेले आहेत. याउलट माधवचं उदाहरण घ्या. कालपर्यंत अत्यंत निष्क्रिय होता, गरज लागेल तेंव्हाच तोंड उघडत होता. त्याला गेम व्यवस्थित "कळलेला" आहे. नेहा-वैशाली इतरांवर कुरघोडी करण्यात, केळ्या-रुपाली-किशोरी कॅप्टनशिप्चा ध्यास लावण्यात, आणि वीण-शिव प्रेमप्रकरणांत मग्न असताना हा सुमडित पुढे निघुन गेला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाहि...

मला तरी वरिल 5निकष म्हणजे गेम न कळणे असे वाटले . म मी काहितरी चुकीचे समजत असेन. गेम कळलेले दोन सदस्य स्वतच्या चुकीमुळे बाहेर गेलेतशिवानी,पराग.
बाप्पा आणी मैथिली गेम जास्त खेळत नव्हते.
माधवचं उदाहरण घ्या. कालपर्यंत अत्यंत निष्क्रिय होता, गरज लागेल तेंव्हाच तोंड उघडत होता. त्याला गेम व्यवस्थित "कळलेला" आहे. नेहा-वैशाली इतरांवर कुरघोडी करण्यात, केळ्या-रुपाली-किशोरी कॅप्टनशिप्चा ध्यास लावण्यात, आणि वीण-शिव प्रेमप्रकरणांत मग्न असताना हा सुमडित पुढे निघुन गेला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाहि
>>> मागच्या सीज़न मध्ये भूषण कडू कहीच न करता खुप पुढे गेला होता. सो इथे काहीही होऊशकते.

काल च्या एपिसोड मध्ये असेल. मी तर हे कलर्स च्या fb पेज वर छोटे वेडीओ येतात त्या मध्ये पहिले. एपिसोड नाही पहिला मी.

माधव मध्ये निगेटिव्हिटी नाहीये एवढी, बाकी तिघांत खूप आहे, म मां म्हणाले ना तो कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, याचा अर्थ काय, बाकीचे बोलतात ना, त्याला पुढे न्यायचं आहे. चान्सेस आहेत.

आता मी काल चा एपिसोड पहिला वूट वर जे निकष मी वरती सांगितले ते त्यात दाखवलेच नाही आहेत nomination च्या प्रक्रिये मध्ये.
पण मी जो वेडीओ कलर्स च्या पेज वर पहिला त्यात स्वत: बिग्ग बॉस ने हे निकष सांगितलेत म एपिसोड मद्ये कट का केल? एपिसोड मध्ये फक्त घरातील 2सदस्याना नोमीनेट करायचे आहे जे घरी राहण्यास अपात्र आहेत इतकेच बोलतना दाखवलेत बिग्ग बॉस बाकी सगळे कट.
म्हणून च ज्यानी फक्त एपिसोड पहिलाय आणी तो वेडीओ नाही पहिला
त्याना त्या बद्दल माहितीच नाही. Proud

स्पष्टवक्तेपणात वीणाला १० पैकी २० द्यायला हवेत. तिने सुरुवातीपासून परागच्या बाबतीत , तो ग्रुपवाला असूनही स्पष्टवक्तेपणा दाखवलाय.

हा सिझन बघायचा सोडला. ऋतुजा आली तर बघता येईल.

मागच्या वेळेसचे सर्वच लोक भारी होते ह्या मुर्खांपेक्षा.
पराग येवढा मास्टरमाईंड वगैरे म्हणायचे पण कधीच तसा वाटला नाही. वीणा हुषार आहे पण जिंकण्यास योग्य नाही. जेवढं पाहिलं त्यावरून सर्वात योग्य माणूस म्हणजे शिव.

मला नाही वाटत ऋतुजा काही फार अ‍ॅड करेल सिझनमधे , ती एक उत्तम खेळाडु होती पण एन्ट्रटेन्मेन्ट्/कन्टेन्ट देण्यात नसायची पुढे.

मला नाही वाटत ऋतुजा काही फार अ‍ॅड करेल सिझनमधे , ती एक उत्तम खेळाडु होती पण एन्ट्रटेन्मेन्ट्/कन्टेन्ट देण्यात नसायची पुढे...>>> हो लास्ट सीज़न मध्ये पण ती सुरुवातीला इंटरेस्टेड नव्ह्ती.जरा आळशी पणा करायची.

मला नाही वाटत ऋतुजा काही फार अ‍ॅड करेल सिझनमधे >> +१११ तिने शहाणी असेल तर येऊ नये. उगीच आपलं ठरल्यासारखी ती रुपाली, किशोरीच्या ग्रुप मधे जाणार, तरीही पुन्हा मायनॉरिटी, टास्क्स हरणार ते हरणारच. त्यांच्यात कोणी पाठवायचेच असेल तर लीडरशिप क्वालिटी असलेले पाठवा, मग या मेंढरांना बरे पडेल त्यांना फॉलो करायला.

पुंबा खूप दिवसांनी दिसलात. शिवबाबत आपलं बोलणं झालेलं बघा पहिल्या भागात 11 व्या पानावर, तेव्हापासून तो मला आवडतो तो अजूनही, आता जास्तच. त्यामुळे शिव जिंकायला हवा आणि तोच जास्त योग्य असंच वाटतं.

आजचा एपिसोड बोअर, जरा उशीर पण झाला लावायला.

हिनाला शिव परफेक्ट बोलला, कित्ती इरिटेट करते. तिची बडबड, कटकट सुरूच. शिवने परफेकट कारण दिलं तरी परत कटकट करत होती त्याला task मध्ये पण.

बाकी गुण देण्याच्या task मध्ये kvr and s काहीही देत होते, गेम आहे, गुणांची खिरापत वाटत होते, समोरच्यानी पार कचरा केला. शिवने शेवटी मारलेला डायलॉग मात्र भारी होता. अर्थात ह्यात नंतरचा grp जिंकणार होता म्हणा. ह्यावरून सध्या तरी bb ना नेहा grp लाच जिंकवायचे आहे असं सिद्ध होतं.

नेहा dominating आहे, स्वतः चंच चालवायला बघते ते grp मधेच पटत नाहीये कोणाला, मग सगळे बोलल्यावर खुन्नस देऊन बघत होती.

तिकडे k v r चं काय चाललेलं ते मला कळलंच नाही, नंतर solved झालं बहुतेक.

उद्या स, पु , श रा आणि स्मिता येणार आहेत. मेघा आणि आस्ताद का नाही काय माहिती. असेल दुसरा grp त्यांचा. परवा येणार असतील.

भूमिकेची अदलाबदल, वीणा राधा म्हणून आलेली मागच्यावर्षी सचित बरोबर गेस्ट म्हणून.

Pages