लव्ह इन ट्रबल भाग - १२

Submitted by स्वरांगी on 16 June, 2019 - 06:20

लव्ह इन ट्रबल भाग – १२
“ मला वाटलं नव्हतं,तू एवढी घाबरशील ते!! खूप दुखतंय का??” गरम पाण्याची पिशवी अनुकडे देत अभिजितने विचारलं..त्याला खरंच वाईट वाटलं होतं..अनुने पिशवी घेऊन पाय शेकवायला सुरवात केली..तिच्या पायाला थोडी सूज आली होती..सकाळी अभिजीतच्या बेडरूममधून बाहेर पडताना तिचा डावा पाय उंबरठ्यावर आपटून ती खाली पडली होती..दिवसभर कामात असल्याने तिचं पायाच्या दुखण्याकडे लक्ष नव्हतं गेलं..आणि अत्ता अभिजीतने घाबरवलं तेव्हा तिचा डावा पायच मुरगळला…त्यामुळेच तो सुजून लाल झालेला..अनु पायाखाली उशी घेऊन,पाय टीपॉयवर ठेऊन, वाकून पाय शेकवत होती..अभिजित तिच्यासमोरच सोफ्यावर बसला…
“नाही!! फार नाही दुखंत आहे!!” अनु म्हणाली..
“मला वाटतं आपण डॉक्टरांकडे जायला हवं..” अभिजित न राहवून म्हणाला…
“ नको सर!! मी ठीक आहे..डॉक्टरांकडे जाण्याऐवढं काही झालं नाहीये!!उद्यापर्यंत पाय बरा होईल..” अनु त्याला समजावत म्हणाली ..
“ दे इकडे..मी करतो..” असं म्हणून अभिजितने अनुच्या हातातली पिशवी काढून घेतली आणि स्वतः तिचा पाय हळुवारपणे शेकवू लागला…
“सर!!” अनु आश्चर्याने एवढंच म्हणाली…तिला वाटलंच नव्हतं अभिजित असं काही करेल असं…
“ बरं वाटतंय का आता थोडं??” अभिजितने काळजीने विचारलं..
“ हो….” अनु गालातल्या गालात हसत म्हणाली…अभिजित अगदी मनापासून आणि काळजीपूर्वक तिचा पाय शेकवत होता..
किती वेळ झाला कुणास ठाऊक पण थोड्या वेळाने अभिजित दिवसभराच्या थकव्याने तिथेच बसून पेंगु लागला…हातात पिशवी तशीच होती.. अनु त्याच्याकडे एकटक पाहत होती…
“ कधी कधी तुला पाहून असं वाटत नाही,की तुला insomnia आहे…” अनु त्याच्याकडे पहात हसून स्वतःशीच म्हणाली…
“ वेक अप अनु!! तू त्याला विसरायचं ठरवलंयस!! परत प्रेमात नाही पडायचंय!!”गंभीर होण्याचा आव आणत अनु म्हणाली.. पण तोच तिचं लक्ष पुन्हा अभिजीतकडे गेलं आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं…अभिजित जागा होणार नाही याची काळजी घेत तिने अलगद त्याच्या हातातून पिशवी काढून बाजूला ठेवली…आपला पाय सांभाळत तिथून उठली... अभिजीतच्या खांद्याला धरून तिने त्याला,सोफ्यावर मागे टेकवून झोपवलं…अभिजीतवर पातळ शाल पांघरली…त्याला असं शांतपणे झोपलेलं पाहून अनु समाधानाने हसून आपल्या खोलीत झोपायला निघून गेली…

दुसऱ्या दिवशीपर्यंत अनुचा पाय बरा झाला नव्हता त्यामुळे ऑफिसमधून निघाल्यानंतर तिने डॉक्टरांकडे जायचं ठरवलं…अनु आणि अभिजित दोघं एकत्रच बाहेर पडले…बाहेर पडतानाच अनुचा मोबाइल वाजला….शुभमच्या मित्राचा फोन होता..जॉबसाठी अनुने कुठे कुठे विचारून ठेवलं होतं..त्याच संदर्भात त्याने अनुला रात्री डिनर साठी Hari’s मध्ये बोलवलं होतं…
“ एक बडी पार्टी आहे!! त्यांना जर तुझा interview आवडला ना तर तुझी चांदीच झाली असं समज!!!” तो म्हणाला…
“ Hari’s मध्ये??ओके…किती वाजता?....ओके…thank you so much!! मी पोचते रात्री 8 वाजता…ओके बाय!! Thank you once again!!!” एवढं बोलून अनुने फोन कट केला…तिच्या चेहऱ्यावर आनंद होता…

इकडे संध्याकाळी बर्व्यांच्या वाढदिवसानिमित्त, ऑफिसमध्ये स्टाफ मेंबर्सचं प्लॅंनिंग चाललं होतं… डिनरला बाहेर जायचं..आधी बर्वे स्वतःच येणार होते पार्टी द्यायला पण त्यांना त्यांच्या बायकोसोबत जायचं असल्याने त्यांनी सगळं स्टाफवर सोडलं होतं....अभिजितला यात अजिबात interest नव्हता…एवढ्यात पुष्करने सुचवलं, “ आपण Hari’s ला जाऊया आज..फूड टेस्टी असतं तिथलं एकदम!!” हे ऐकून अभिजीतने कान टवकारले…आज सकाळीच त्याने अनुचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं ना!!! थोड्या वेळाने काही विचार करून अभिजितने तो येणार असल्याचं सांगून टाकलं…

रात्री अभिजीतचा ग्रुप Hari’s मध्ये enter झाला तेव्हा अनु आधीपासूनच त्या लोकांबरोबर तिथे बसली होती… अभिजीतचा ग्रुप अनुपासून काही अंतरावर बसला होता आणि आता वेटर त्यांना serve करत होता..अभिजित अनु दिसेल अशी जागा पकडून बसला आणि त्याच्याच शेजारी पुष्करही बसला…अभिजितने पाहिलं, अनुसोबत तिचा फ्रेंड आणि त्यांच्या समोर दोघेजण बसले होते..ते दोघ तर दारू पिऊन आलेलेच दिसत होते..अनु कशीबशी त्यांच्यासमोर बसून होती..आणि खोटं खोटं हसून काहीतरी बोलत होती..ते काय बोलतायत हे अभिजीतला ऐकू येत नव्हतं…अभिजित नक्की कुठे पाहतोय हे बघण्यासाठी पुष्करने त्या दिशेला पाहिलं..आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं..
“ अरे!! ती तर अनघा भावे आहे ना??” त्याने मुद्दामच अभिजीतला विचारलं..
“ हम्म..” नाईलाजाने अभिजित उत्तरला..
“ मी tv वर पाहिलं होतं तुम्हाला!! पण त्यापेक्षा तुम्ही रिअल मध्ये जास्त छान दिसता!! खरं तर तुम्हाला पाहून असं वाटत नाही की तुम्ही कुणाचा खून कराल…” समोरचा एकजण अनुला म्हणाला.. अनु यावर फक्त खोटं खोटं हसली आणि म्हणाली, “ तुम्ही माझा interview घेणार आहात तर त्यासाठी सगळ्यात आधी मी स्वतःला introduce करते..”
“ नो!! नो!! तू ऑलरेडी इतकी फेमस आहेस की introduction ची गरज नाही..चिल मार…” दुसरा म्हणाला.. अनु त्यांच्याकडे पहातच राहिली..

“ Is she trying to get job there??” पुष्करने अभिजीतला विचारलं..
“ How would I know??” अभिजितने उलट प्रश्न विचारला..
“ तुला खरंच नाही माहीत??” पुष्करने विचारलं..
“ नाही.. आणि मला माहिती करून घ्यायचं पण नाहीये..” अभिजित जेवत म्हणाला..
“ मी त्यांच्या law firm बद्दल थोडं ऐकलंय.. गेल्या वर्षी त्यांच्या फर्म मध्ये..” पुष्कर बोलू लागला तसं अभिजित थोडं पुष्करच्या बाजूला सरकला आणि कान देऊन ऐकू लागला..पुष्करने हे पाहिलं..आणि म्हणाला,
“मला वाटलं तुला यात इंटरेस्ट नाहीये!!” हे ऐकल्यावर अभिजित लगेच बाजूला सरकला..
“ सांगू का मी तुला??” पुष्करने अभिजितची फिरकी घेत विचारलं..
“ नको..काही गरज नाही..” अभिजित त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला..
“ खरं सांगू?? मलाही काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल!!! हाहाहाहा!!!” असं म्हणून पुष्कर जोरात हसला…अभिजितने त्याच्याकडे एक लुक टाकला..
“च्…” आणि कंटाळून अभिजित फक्त एवढंच म्हणाला…
थोड्या वेळाने डिनर आटपल्यावर अनु हात धुवून बाहेर पॅसेजमध्ये आली तोच तिथे उभ्या असलेल्या अभिजितने तिला हाक मारली..
“ तू त्यांच्याच्याबरोबर इथे डिनरला का आलीयस??” अभिजितने मुद्यालाच हात घातला..
“ मी इथे interview द्यायला आलेय. “ अनु म्हणाली..
“ Does that make any sense ?? हॉटेलमध्ये कुणी interview घेतं का??” अभिजितने न राहवून विचारलं..
“ मला कळतंय..पण मला आत्ता या जॉबची गरज आहे..” अनु म्हणाली..
“ हो!! माहितेय मला..पण अख्या जगात हाच एक जॉब पडलेला नाहीये!! तू अजून थोडे प्रयत्न केलेस तर तुला चांगला जॉब मिळू शकतो!! थोडा वेळ दे अजून स्वतःला..” अभिजित तिला समजावत म्हणाला..
“ पण आता माझ्याकडे तेवढाही वेळ नाहीये..Look at me!! मी किती आनंदात आहे, असं चेहऱ्यावर दाखवायचा कसोशीने प्रयत्न करतेय मी.. तुम्हाला तुमच्या घरी राहून त्रास देतेय मी..कायमच असं निर्लज्जपणे नाही वागू शकत मी..” अनुच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि एवढं बोलून ती निघून गेली..आणि पुन्हा टेबलवर जाऊन बसली.
“ आम्ही आमचा decision घेतलाय!! मिस अनु,यु आर सिलेक्टेड!!” समोरचा एकजण म्हणाला..
“ खरंच?!!” अनु आनंदली.. “ thank you so much sir!! Thank you!!”
“ तू येणाऱ्या visitors ना अगदी मस्त पटवशील!! फक्त तुला तुझ्यात काही चेंजेस करावे लागतील..मस्त मेकअप, शॉर्ट स्कर्ट , स्लीवलेस टॉप आणि गोड बोलणं..बास!!” त्यांच्यातला एकजण हसत म्हणाला..
“ म्हणजे?? मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते..” अनुने गोंधळून विचारलं..
“ अरे!! तू हिला सांगितलं नाहीस का कशा प्रकारचा जॉब आहे ते??” एकाने अनुच्या फ्रेंडला विचारलं..
“ अग म्हणजे तुला असं पाहून त्यांचे claint खुश होतील ना!!” तो तिला समजावत म्हणाला..
“ हो..आमचे claint खूप खास असतात हा!! तुला फक्त त्यांची विशेष काळजी घ्यायचीय!!” समोरचा निर्लज्जपणे म्हणाला.. अनुला हे ऐकून धक्काच बसला..थोडा वेळ तिला काय बोलावं हेच सुचेना.. अभिजित तिथूनच थोडं लांब उभं राहून सगळं ऐकत होता..हे सगळं ऐकून तो त्यांच्या दिशेने निघाला..
“ हा जॉब आणलास तू माझ्यासाठी??अनुने शुभमच्या फ्रेंडला जाब विचारला.. तिच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या..
“ शॉर्ट स्कर्ट!!! स्लीवलेस टॉप!!! तुम्ही समजता काय सगळ्या मुलींना?!!” दात ओठ खात बोलता बोलता अनुने टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि त्यातलं पाणी त्या दोघांच्या तोंडावर फेकून मारणार एवढ्यात अभिजितने तिथे येऊन तिचा हात धरला..सगळ्यांच लक्ष एकदमच त्याच्याकडे गेलं..
“ एवढं पाणी या नालायक माणसांच्या तोंडावर उडवून वाया घालवू नकोस!!!महाराष्ट्रात खूप ठिकाणी दुष्काळ पडतो…पाणी वाचवायलाच हवं.. दे इकडे!! मी पिऊन टाकतो ते पाणी..” असं म्हणून अभिजितने घटाघट पाणी पिऊन टाकलं..
“ निघायचं?? मिस भावे?? अभिजीतने विचारलं..
“ निघुया!! मिस्टर कुलकर्णी…” असं म्हणत अनघा उठली आणि दोघही तिथून बाहेर पडले..त्यांना जाताना पाहून पुष्कर स्वतःशीच हसला..तोच त्याचं लक्ष गेलं की ते तिघेही निघाले होते.. ते तिघं एकत्र चालत पुष्करच्या टेबलपाशी आले..त्यांना येताना पाहून पुष्करने हळूच त्याचा पाय मध्ये आडवा घातला..त्यांचं लक्ष नसल्यामुळे एकापाठोपाठ एक तिघेही खाली पडले…
“ सॉरी!! माझा पाय आडवा आला वाटतं!!” पुष्कर बत्तीशी काढून म्हणाला..ते तिघही वैतागुन पहात होते त्याच्याकडे..

इकडे अनु तणतणत हॉटेलमधून बाहेर पडली आणि तिच्या पाठोपाठ अभिजित…त्याला मागून येताना पाहून म्हणाली,
“ आत्ता काहीही बोलू नका तुम्ही..आजपर्यंत इतकं humiliate कुणी केलं नाही मला…” तोच अभिजितने धावत येऊन तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं.. अभिजितने थोडी मान झुकवून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तोच तिने तोंड फिरवलं..अभिजीतने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
“ तु माझ्या घरी राहिलीयस याचा त्रास नाही होत ए मला!!” अभिजीत तिला समजावत म्हणाला.. अनुने त्याच्याकडे हळूच मान वळवून पाहिलं..ती अजूनही घुश्यातच होती..
“ माझ्याकडे परत येशील??” अभिजितने विचारलं..अनुने मान वर करून आश्चर्याने अभिजीतकडे पाहिलं..
“ Come and work with me..” अभिजित म्हणाला..

अनु आणि अभिजित डॉक्टरांकडे जाऊन आले..अनु आतून बाहेर आली तीच पायाला पट्टी गुंडाळून..मेडिकलमधून औषधं घेऊन दोघही घरी निघाले..अनु अजूनही गप्पच होती..अभिजितही त्याच्याच विचारात होता..
“ काय म्हणाले डॉक्टर??” घराचं दार उघडत अभिजितने विचारलं..
“ काही नाही!! फक्त पायावर जोर देऊ नका..आराम करा आठवडाभर असं म्हणाले..होईल लगेच बरं..” अनुने थाप मारली..दोन दिवसात गोळ्या घेऊन लगेच बरा होणार होता तिचा पाय..
“ खरंच सॉरी!! माझ्यामुळे झालं हे..”
“ नाही!! तुमच्यामुळे ना..” अनुने अभिजीतकडे पाहिलं..त्याच तोंड एवढंस झालेलं..ते पाहून तिला हसू आलं..पण लगेच गंभीर होण्याचं नाटक करत म्हणाली,
“ तुमच्यामुळे झालं हे..पण तुम्ही सॉरी म्हणालात तेवढं पुरेसं आहे!!” अनुने मोठ्या मनाने माफ केल्याचा आव आणला.. आणि ती रूमकडे जायला निघाली तोच अभिजितने तिला अडवलं..
“ एक मिनिट!!! Excuse me..” असं म्हणून त्याने अनुचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि खाली वाकून तिला उचलू लागला.. अविश्वासाने अनुचे दोन्ही हात तोंडावर आले..ती खूप खुश झाली..तोच,
“ आई ग!! आई ग!!” करत अभिजित उभा राहिला आणि लगेच खाली पाय मुडपून बसला..अनुचा चेहरा बघण्यासारखा झालेला..
“ बस मी तुला कांदेबटाटे घेतो..” अभिजित मान वळवून अनुकडे पहात म्हणाला…
“ नक्की जमणारे का तुम्हाला??” अनुने विचारलं..अभिजीतने confidently मान हलवली.. अनुने अभिजीतच्या गळ्यात हात टाकले आणि अभिजित तिला पाठीवर बसवून तिच्या रूममध्ये घेऊन गेला..आत येऊन त्याने तिला बेडवर बसवलं.. आणि त्यानंतर अनुने त्याच्याकडून सगळी सेवा करून घेतली.. अनु जे मागेल ते अभिजितने तिच्या हातात आणून दिलं..अनु जाम खुश होती ….
“ Come and work with me..” रात्री झोपताना अनुला अभिजितचं हे वाक्य आठवलं..आणि त्याचाच विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलंच नाही..
इकडे अभिजित अजूनही जागा होता..त्याला आज सकाळचा ऑफिसमधला प्रसंग आठवला..बर्व्यांचा वाढदिवस होता त्यामुळे सगळेजण त्यांच्या केबिनमध्ये गिफ्ट्स घेऊन जमले होते..सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा आणि गिफ्ट्स दिली आणि सगळे आपआपल्या कामाला निघून गेले..अभिजित आणि पुष्कर तेवढे आत राहिले..
“ हॅपी बर्थडे सर!!!” wish करत पुष्करने बर्व्यांना मस्त स्पोर्ट्स watch गिफ्ट केलं..बर्व्यांनी त्याचे आभार मानले आणि अभिजितकडे पाहून म्हणाले,
“ तुझं काय?? तू काहीच नाही आणलं का माझ्यासाठी??” बर्व्यांनी किंचित दरडावून विचारलं..
“ नाही!! आणलंय ना!!” असं म्हणून अभिजतने गिफ्ट आणि त्यासोबत एक envelop पुढे केलं ..
“ अरे वा!!! अभिजित!? तू मला पत्र सुद्धा लिहिलंयस!! हे माझ्यासाठी मोठं surprise आहे..” बर्वे आनंदाने म्हणाले..
“ बघू काय लिहिलंयस ते!! आजकाल मला चष्म्याशिवाय दिसत नाही…” असं म्हणत त्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली..त्यांनी पाहिलं..
“ Resignation letter??? Resignation letter देतोयस तू मला आज??” बर्वे अभिजितवर ओरडले…पुष्करलाही आश्चर्य वाटलं.. बर्व्यांनी रागारागात ते लेटर फाडून डस्टबिनमध्ये टाकून दिलं…हे असं होणार हे अभिजितला अपेक्षितच होतं..दोघही काही न बोलता तिथून बाहेर पडले..
“ तू खरंच resign करतोयस??” पुष्करने बाहेर येताच विचारलं..
“ मला तुला प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट सांगणं गरजेचं वाटत नाही..” एवढं बोलून अभिजित निघून गेला..पुष्कर मात्र शांतपणे तिथेच उभा राहिला..
“ हम्म..तुला स्वतःची फर्म सुरू करायचीय तर!!” बर्व्यांनी शांतपणे अभिजीतला विचारलं..अभिजित खाली मान घालून त्यांच्यासमोर उभा होता..जेव्हा बर्व्यांचा राग ओसरला तेव्हा त्यांनीच त्याला केबिनमध्ये बोलवून घेतलं होतं..
“ हो..” अभिजित एवढंच म्हणाला..
“ ठीक आहे..मी इन्व्हेस्ट करतो तुझ्या फर्ममधे..” थोडा विचार करून बर्व्यांनी सांगून टाकलं..
“ सॉरी..पण मी ब्लॅक मनी नाही घेत..” अभिजित शांतपणे म्हणाला..तो बर्व्यांची खेचत होता..
“ तुझ्या आता… च्..बाहेर कुणी ऐकलं तर त्यांना काय वाटेल!! मी काय चोर, दरोडेखोर किंवा माफिया वाटलो का तुला?” बर्व्यांनी खेकसून विचारलं..त्यांना पाहून अभिजीतला हसू आलं..आत्ता हेच अभिजीतला आठवलं आणि तो हसून झोपी गेला..

दुसऱ्या दिवशी अनु ऑफिस मध्ये बसून मोबाईल चेक करत होती तोच तिला काल रात्री फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून मिस्ड कॉल आलेला दिसला. तिने कॉल बॅक केला..
“ काही कळलं का??” अनुने उत्सुकतेने विचारलं..
“ सॉरी मॅडम..पण मला महत्वाचं असं काहीच मिळालं नाही..” हातातला रक्ताने माखलेला चाकू फरशीवर आपटत त्याने उत्तर दिलं.. त्याच्या अंगात तोच फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा शर्ट आणि डोक्यावर हॅट होती..हातात हॅन्डग्लोवस होते..त्याच्या समोरच एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मरून पडली होती…अजून एकाला यात जीव गमवावा लागला होता…
“ मला इन डिटेल सांगाल का जरा??” अनु म्हणाली..
“ सांगतो ना मॅडम!! तुम्हाला भेटुनच सांगतो…” तो समोरच्या प्रेताकडे पहात छद्मी हसून म्हणाला…
“ ठीक आहे..मी लॅबमध्ये येऊन भेटते तुम्हाला..”
“ त्यापेक्षा मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो, तिथे या मला भेटायला.. बोलू सविस्तर!!” तो चलाखीने म्हणाला..
“ ओके.. तुम्ही ऍड्रेस पाठवा..मी पोचते तिथे..” असं म्हणून अनुने फोन कट केला..
“ अजून एकजण बाकी आहे..त्याचं काम तमाम केलं,की मी शांतपणे जगायला मोकळा!!!” तो क्रूरपणे म्हणाला..

इकडे अभिजित झेंडेना भेटायला आला होता.. खरं तरअभिजितचं ऑफिस बंद झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जॉब करायला सुरुवात केली होती..पण तरीही ते त्याला वेळ काढून हवी ती मदत करत होते...तो ओढतंच त्यांना एका कोपऱ्यात घेऊन गेला..
“ मी बर्व्यांना resignation देऊन आलोय..आणि मी आता स्वतःची फर्म सुरू करणार आहे..” कुणी ऐकत नाहीये याची खात्री करत आजूबाजूला पाहत अभिजित म्हणाला..
“ मला ऑफिस मॅनेजर अँपॉइंट करायचाय आणि मला तुमच्यासारख्याच माणसाची गरज आहे झेंडे!!” अभिजित म्हणाला..झेंडे हसले..
“ म्हणजे तुम्ही मला जॉब ऑफर करताय?? मी हा जॉब सोडू??” त्यांनी हसून विचारलं..
“ मी असं नाही म्हणालो की तुम्ही हा जॉब सोडा..पण मी तुमच्यासारख्या माणसाच्या शोधात आहे जो माझं ऑफिस नीट सांभाळेल..” अभिजितने indirectly झेंडेना सुचवलं..आणि तो मी नव्हेच म्हणून हात वर केले..
“ कुणालाही बोलू नका याबद्दल!! Keep it confidential!!” अभिजितने तोंडावर बोट ठेवलं..आणि कुणी बघत नाही हे पाहून तिथून सटकला..
“ म्हणजे नक्की काय म्हणायचं होतं याला?? मी काय करायला हवं??” झेंडे पूर्ण गोंधळले..

अनु ऑफिसमध्ये सगळं सामान पॅक करत होती..तिला ती जागा उद्या सोडावी लागणार होती..उदास मनाने संध्याकाळी अनु ऑफिसमधलं सगळं आवरून बाहेर पडली आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट कलेक्ट करायला त्याला भेटायला निघाली..दोघ कॅफेमध्ये बसले होते..ती समोर येताच त्याने आपल्याकडचे रिपोर्ट्स तिच्या हातात दिले.. अनुने घाईघाईने ते रिपोर्ट्स पाहिले..आणि ती निराश झाली..काहीच माहिती हाती लागली नव्हती.. तोच tv वर ब्रेकिंग न्युज लागली होती…
फेमस शेफ… जितेंद्र शहा!! उर्फ जितू यांचा त्यांच्याच राहत्या घरी अत्यंत निर्दयपणे खून झालाय.. त्यावेळी ते एकटेच घरी होते.. संध्याकाळी जेव्हा त्यांची पत्नी घरी आली तेव्हा त्यांनी पाहिलं की मिस्टर शहा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. त्यांनी लगेचच पोलिसांना कळवलं..पोलिसांनी चौकशीला सुरवात केलेली आहे..पोस्टमार्टेमसाठी डेड बॉडी ताब्यात घेतली असून फॉरेन्सिक डिपार्टमेंट अधिक तपास करत आहेत..त्यांच्या पत्नीवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
ही न्युज पाहून अनु चुकचुकली..आणि त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू पसरलं..
“ काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही महत्वाची अशी...आता तुम्ही कसं शोधणार त्याला??” तो तिचा अंदाज घेत माहिती काढुन घ्यायच्या उद्देशाने म्हणाला..
“ माहीत नाही…पण शोधायला तर हवंच..” अनु विचार करत म्हणाली..
“ तुम्हाला भीती नाही वाटत?? त्याला शोधून काढलं तर तो तुमचं काही बरंवाईट करेल याची??”
“ खरं तर माझं बरंवाईट होईल या भीतीपेक्षा मी त्याला पकडू शकणार नाही याची भीती जास्त वाटतेय मला..” अनु हताशपणे म्हणाली..
“ पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही..मला खात्री आहे..तो पुन्हा माझ्यासमोर नक्की येणार…कारण जोपर्यंत मी गप्प बसत नाही..तोही गप्प बसू शकणार नाही..” अनु ठामपणे म्हणाली..आता मात्र तो तिच्याकडे रोखून पहात होता…
“ ही एवढ्या सहजासहजी ऐकणार नाही..काहीतरी करायलाच हवं..” तो मनात म्हणाला..
“ ओके बाय!! थँक्स फॉर युअर हेल्प..” असं म्हणून अनु तिथून निघाली तोच कुणीतरी तिचा हात पकडला...अनुने दचकून मागे वळून पाहिलं…तो अभिजित होता..
“ सर तुम्ही!! तुम्ही इथे कसे??” अनु आश्चर्याने म्हणाली..अभिजीतला पाहून तो सावध झाला…आणि पुढे काय होतंय हे पाहू लागला..
“ मला झेंडे म्हणाले, तू इकडे येणारेस म्हणून..” अनुने निघताना झेंडेना thank you चा मेसेज करून त्यांना रिपोर्ट्स घ्यायला जाणारे अस सांगितलं होतं..
“ तू एकटी का आलीस रिपोर्ट्स घ्यायला?? आपण एकत्र पकडणार आहोत ना खुनीला!!” अभिजितने विचारलं..त्यावर अनु काहीच बोलली नाही..
“ हॅलो.. मला असं कळलं की तुम्हाला फिंगरप्रिंट किंवा DNA काहीच मिळालं नाही..” अभिजितने त्याला विचारलं..
“ Unfortunately, yes!!” तो म्हणाला..
“ याचा अर्थ हाच होतो की गुन्हेगार खूप चलाख आहे..आणि त्याला फॉरेन्सिक सायन्स बद्दल खूप चांगली माहिती आहे..त्याशिवाय एवढ्या सफाईने तो हे करूच शकत नाही..” अभिजितने त्याच्याशी चर्चा करायला सुरुवात केली.. अनु अभिजीतकडेच पहात होती..
“ सर नसते, तर काय केलं असतं मी!!मला जेव्हा जेव्हा गरज भासलीय, तेव्हा तेव्हा ते माझ्या मदतीसाठी हजर राहिलेत.. तेही एका शब्दानेही तक्रार न करता” ती मनातल्या मनातच म्हणाली..तिला अभिजीतचा खूप आधार वाटला.. त्या दोघांचं बोलून झालं आणि अनु, अभिजित एकत्रच घरी निघाले…अनु अभिजीतला यातून काही कळलं नसलं तरी तो मात्र आता सावध झाला होता…

दुसऱ्या दिवशी अनुने जागा खाली केली..निघताना तिने दारावरची नेम प्लेट काढून घेतली..एकदा मागे वळून तिने ऑफिस पाहून घेतलं..तिला गहिवरून आलं आणि जड अंतःकरणानेच ती तिथून बाहेर पडली…तिच्या आयुष्यातलं एक पर्व संपलं होतं..आणि दुसरं सुरू होणार होतं..
अभिजीतने officially त्याची फर्म सुरू करण्याबद्दलची नोटीस सबमिट केली आणि तो कामाला लागला..घराच्या खालच्याच भागात त्याने फर्म सुरू करायचं ठरवलं..त्याने हॉलमधलं सगळं furniture शिफ्ट करून हॉल रिकामा करून घेतला..आणि घराची साफसफाई झाल्यानंतर त्याने आणि अनुने मिळून,मागवलेली टेबल्स, कपाटं arrange करून घेतली..मधूनच बर्वे काम कसं चाललंय ते पाहून गेले..
“ तुम्ही खरंच तुमच्या फर्मची जबाबदारी कुणा दुसऱ्याला देणार आहात??” पुष्करने बर्व्यांना विचारलं..
“ हो!! तुला काय वाटलं??अभिजीत सगळं एकटा सांभाळू शकेल??” बर्व्यांनी विचारलं..
“ हम्म..तसही सगळ्या स्टाफला तुम्ही खूप पिडता..त्यामुळे ते सेलिब्रेटच करतील तुमचा हा decision ऐकून!!” पुष्कर त्यांची मस्करी करत म्हणाला..
बर्व्यांनी एक ठेऊन देईन अशी action केली आणि पुष्करला हसू आलं..
“ मीपण येऊ तुमच्यासोबत??” पुष्करने उत्सुकतेने विचारलं..
“ तुला यायचंय??” बर्व्यांनी उत्साहाने विचारलं..
“ हम्म..पण अभिजित घेईल मला??” पुष्करने शंका व्यक्त केली..
“ का नाही घेणार?? मी सांगेन त्याला तसं!! फर्मला प्रॉफिट करून देणारा तुझ्यासारखा एकतरी lawyer हवाच तिथे.. अभिजित तर म्हणाला त्याने एकाला recruit ही केलंय..” बर्वे म्हणाले..

सगळं furniture सेट केल्यानंतर अभिजीतने सगळीकडे नजर फिरवली आणि तो स्वतःची नेम प्लेट असलेल्या आपल्या टेबलवर, बॉसच्या खुर्चीत जाऊन बसला..आणि तो खुप खुश झाला.. दुसऱ्या दिवशी अभिजित आणि अनघा गणपतीच्या देवळात जाऊन आले तोच घराबाहेर बर्वे, झेंडे आणि पुष्कर सगळे एकत्र जमलेले..
“ तुम्ही सगळे इथे काय करताय??” अभिजितने आश्चर्याने विचारलं..त्याच्या पाठोपाठ सगळेच घरात घुसले..
“ अरे!! झेंडे तुम्ही ?? Advocate काळे तुम्हीसुद्धा इथेच येणार आहात??” अनु आनंदाने म्हणाली..
“ ही कोण आहे रे?? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय!!” बर्व्यांनी अभिजीतला विचारलं..
“ अनघा हे तुझं टेबल आहे..” अभिजित म्हणाला..
“ आणि तुम्ही सगळे इथे माझ्या परवानगीशिवाय कसे आलात??” अभिजितने वैतागुन विचारलं… तिघांनी त्याच्याकडे कानाडोळा केला.
“ मी माझी ओळख करून देते तुम्हाला.. मी..” अनु बोलणार एवढ्यात बर्वे म्हणाले,
“ आत्ता ओळखलं!! तूच ना अप्पासाहेबांच्या मुलाची खुनी..पुरावे मिळाले नाही म्हणून सुटलीस!! मिस. Lack of evidance!!” बर्व्यांनी अनुला चिडवायला सुरवात केली..
“ हेपण असणारेत का आपल्यासोबत??” अनुने वैतागुन अभिजीतला विचारलं..
“ तू इथे आलीस म्हणजे आम्ही तर गेलोच!!” बर्वे आणखी बोलले.
“ मला सरांनी recruit केलंय इथे!!” अनु ठसक्यात म्हणाली.. त्यांचा चाललेला गोंधळ पाहून अभिजित चिडला..
“ कुणी नकोय मला इथे!! सगळे चालते व्हा!!” अभिजित सगळ्यांवर खेकसला..
“ तुम्ही मला जायला सांगताय सर??” झेंडे एवढंस तोंड करून म्हणाले..
“ नको.. तुम्ही थांबा..” अभिजित शांत होत म्हणाला..
“ मीपण थांबणारे..” बर्व्यांनी सांगून टाकलं..
“ कशाला त्रास देताय सगळे त्याला!! Don’t worry अभिजित.. मी आहे तुझ्या मदतीला!!” पुष्कर अभिजीतच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला.. आता अभिजितचं डोकं ठणकू लागलं..आता हे सगळे जण मिळून एकत्र काम करणार होते… आणि अभिजीतच्या घरात आता चैतन्य आलं होतं..

दुपारी सगळेजण कॉफी घेत न्युज चॅनल बघत होते.. तोच Tv वर न्युज आली… सुप्रसिद्ध शेफ, जितेंद्र शहा यांच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी एका संशयिताला अटक केलीय.. आरोपीचं नाव ‘मंदार जाधव’ असं असून पोलीस त्याच्याकडून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
“ काय सांगावं!! कदाचित याच्यावरही माझ्यासारखे चुकीचे आरोप झाले असतील..” अनु स्वतःशीच म्हणाली.. पण कसं कोण जाणे अभिजीतला ते कळलं.. काही विचार करून तो म्हणाला,
“ हीच असेल आपली पहिली केस… आणि हा आपला पहिला client!!!”

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

वाह ! कथा बऱ्यापैकी पुढे सरकली आज. फक्त ते फोडणीत मुक्त हस्ते कडीपत्ता घातल्यासारखे इंग्लिश शब्द वापरणे सोडून पर्यायी मराठीच शब्द वापरले तर बरे होईल.

हो..कथा खूपच मोठी होणारे..पण तुम्हीही अनघाच असल्यामुळे सगळी कथा नक्की वाचाल असं वाटतंय.. Happy
Prakrut, VB, मनस्विता प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!

कथा मस्त चालु आहे.
अगदी एखादा सिनेमा बघितल्यासरखे प्रसंग डोळ्यासमोर येतात.
अनघाबरोबर मलाही अभिजीत आवडु लागलाय Happy

मस्त चालु आहे.
अगदी एखादा सिनेमा बघितल्यासरखे प्रसंग डोळ्यासमोर येतात.
अनघाबरोबर मलाही अभिजीत आवडु लागलाय>>>> धन्यवाद सस्मित Happy

लव्ह इन ट्रबल भाग- १२
https://www.maayboli.com/node/70297
लव्ह इन ट्रबल भाग- ११
https://www.maayboli.com/node/70284
लव्ह इन ट्रबल भाग- १०
https://www.maayboli.com/node/70266
लव्ह इन ट्रबल भाग- ९
https://www.maayboli.com/node/70153
लव्ह इन ट्रबल भाग- 8
https://www.maayboli.com/node/70118
लव्ह इन ट्रबल भाग- ७
https://www.maayboli.com/node/70025
लव्ह इन ट्रबल भाग- ६
https://www.maayboli.com/node/69994
लव्ह इन ट्रबल भाग- ५
https://www.maayboli.com/node/69974
लव्ह इन ट्रबल भाग- ४
https://www.maayboli.com/node/69957
लव्ह इन ट्रबल भाग- ३
https://www.maayboli.com/node/69948
लव्ह इन ट्रबल भाग- २
https://www.maayboli.com/node/69937
लव्ह इन ट्रबल भाग- १
https://www.maayboli.com/node/69925

धन्यवाद निलिमा!!! Lol पण मला सांगा तरी, इथे आधीच्या भागाच्या लिंक्स कशा द्याव्यात!! तुमचाही त्रास वाचेल आणि माझ्या ज्ञानात भर पडेल. Happy
बाकी तुम्ही अशाच प्रकारे पुढेही मदत केलेली आवडेलच मला! Happy

@स्वरांगी ताई, रोज सकाळी माबो वर चक्कर टाकते.... तुझा अभिजीत किंवा किल्ली ताई चा आदित्य आलाय का म्हणून... पु. ले. शु. (लवकर लिहिण्यासाठी पण शुभेच्छा)
Happy

@स्वरांगी
तुम्ही तुमच्या युझर प्रोफाइल मध्ये लेखन टॅब वर गेल्यास तेथे सर्व लिन्क्स असतात. मी तिथुनच कॉपी केल्या फार काही नाही. Happy