Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या सिझन मध्ये पण मेघा आणि
गेल्या सिझन मध्ये पण मेघा आणि सईने अतिशहाणपणा करून त्या नंदकिशोर च्या डोक्यावर भरपूर कणिक टाकली होती आणि वाया घालवली होती . दोघी अतिशहाण्या . वरती मेघा मांजरेकरांना सांगते "हो मी शेतकऱ्याची मुलगी आहे मला अन्नाचं महत्व कळत". इत्यादी इत्यादी . मग त्यावेळी तिच्या कृतीतून पण ते दिसल नाही ते . अन्नाचं महत्व समजते म्हणे .
यावेळी मांजरेकर पराग ला काय ओरडतात बघूया . खर तर परागने विरुद्ध टीमच पाणी कमी होईल म्हणून काहीतरी आयडिया तरी केली . भले ती फ्लॉप गेली . बाकीच्या टीम मेम्बर्स नि कुठलीच आयडिया लढवली नाही नुसतेच गप्पा मारत बसले होते
हा सगळा टास्क रिन ची अॅड
हा सगळा टास्क रिन ची अॅड करायला होता त्यामुळे रिन स्पॉन्सर होता
तेच तेच टास्क आणी सेम तमाशे , यावेळेला एकाही स्पर्धकाशी रिलेट होता येत नाहीये,सगळा बाजार उठल्यासारखा कलकलाट असतो, एपिसोड बघतानाही बोअर होत फार,शिवानी सुर्वेने तर वैताग आणलाय, पराग आवडत होता पण त्याचा अॅरोगन्स सतत प्लॅनस खोटे आणी बोअर वाटतायत ,आस्ताद आठवतोय पण आस्तादमधे प्लॅनिग वैगरे काहिच नव्हत नुसताच माज!
नेहा थोडिफार रिअल वाटते बाकि सगळे महाफेक.( आज सुरेखा ताइना शाळेत जाउ दिल नाही वैगरे एकुन तिच्या डोळ्यात लगेच पाणि आल होत ते खर वाटत होत)
मागच्या वेळेस सगळे निदान खरे तरी वाटत होते, आपआपल्या खर्या-खोट्या भुमिकेशी प्रामाणीक होते,
अजुन २-३ आठवडयाने सगळ सेट होइल तेव्हा बघाव झाल!
काय पण टास्क देतात बीबॉ.
काय पण टास्क देतात बीबॉ. मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा. अन्नावर पण त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळु नयेच. पिठात तोंड खुपसणे/तोंडाला पीठ लावणे , डोक्यावर अंडी फोडणे हे असले खेळ हेच बीबॉ खेळतात ना, उगाच आपलं लोक सांगे ब्रह्मज्ञान प्रकार आहे.
>>मागच्या शनिवारी वीणा
>>मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा.
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा. अन्नावर पण त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळु नयेच. पिठात तोंड खुपसणे/तोंडाला पीठ लावणे , डोक्यावर अंडी फोडणे हे असले खेळ हेच बीबॉ खेळतात ना, उगाच आपलं लोक सांगे ब्रह्मज्ञान प्रकार आहे. >> अगदीच
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा. >>> point है. मी actually हे विसरले होते.
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर
मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा. >> अरे खरचं की.. येण्टम बिग बॉस
एकंदरीत हा सिझन अजून पकड घेत
एकंदरीत हा सिझन अजून पकड घेत नाही.टास्कमध्ये तर काही नाविन्यच नाही.ते ग्रुप तर इतके खोटे आहेत.काही बॉंडिंग नाही,काही नाही.शिवानीने खरच खूप वैताग आणला आहे.काल तर तिने टास्क पण केला नाही,चक्क कमी दिसली,आणि शाळेचा टास्क काय खेळली,अग गणिताचा तास होता ना,मग निदान पाढे म्हणायला लावायचे ना,सुरेखा पुणेकरची कहाणी ऐकून वाईट वाटल पण त्याची तिथे गरज नव्हती ,
पराग,याने काल काय आणि का केल हे त्याच त्ययाला तरी कळल का,बाकी सगळ घर त्याच्या विरोधात आहे,या तिघी त्यातल्या त्यात तुझ्याबरोबर तरी होत्या ,पण आता वीणा राहिल त्या ग्रुपमध्ये अस विटत नाही.
त्या शिवानीच्या ग्रुपमध्ये एक नेहा सोडली तर बाकी सगळे शिवानीचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत.
खरी मजा तेव्हा येईल जेव्हा,यापैकी किमान एक तरी शिवानीच्यि विरोधात स्टँड घेईल,अस झाल तर मात्र सगळ चित्र बदलू शकत.
पण आता शिवानी जे काही करत आहे,त्यातून तिला सहानुभूती तर नाहीच उलट आणखी क्रिटिसाईझ केल जात आहे,हा कंटेट जर आहे तर आता तो लोकांनाच आवडत नाही आहे.
आज दोन तासाचा भाग आहे,त्याच
आज दोन तासाचा भाग आहे,त्याच कारण उद्याची भारत पाक मँच तर नाही ना,पण तिथेहा पावसाने कहर मांडलाच आहे.
कँप्टन साठीचा टास्क त्याच काय झाल? मधूनच पाणी वाचवा टास्क काय?
काल पण जवळजवळ 11.30पर्यंत चालू होत,आज दोन तास.काय चालल आहे तेच कळत नाही.
यक्स , अतिशय किळसवाणा एपिसोड,
यक्स , अतिशय किळसवाणा एपिसोड, बिगबॉसचा रहिवासी संघाचा हगवणदारसंघ झाला.

गेल्या वर्षीसारखं एकमेकांचं पाणी चोरणे, हातपाय मोडणे प्रकार केले नाहीत हे खरं पण म्हणून आज कोणी काही टास्कच केलं नाही
परागने असेल थोडं डोकं चालवलं, पण नेहापुढे कमी पडला, नेहाचं डोकं जास्तं चलातं, ती टास्क मधे भारी आहे !
पराग येडा खरच बिबॉ २१ अपेक्षित घेऊन आलाय, मेघाची किचन सांभाळणे, छोटा गृप जमवणे आणि मग सगळ्यात जवळच्या मित्रांपासून एकटे पडणे स्ट्रॅटेजी त्यानी फारच लवकर वापरली , इन शॉर्ट पुस्तकी थिअरी फ्लॉप , हे म्हणजे दुसरे गालपे थप्पड खानेके बाद क्या करना है ये बापुने नही बताया था
गृप सगळेच फुटलेत , नेहा बहुदा शिवानी सोडून कोणालाच आवडत नाही.
सांगलीचा डान्सवाला, पिंकी ब्युटी पार्लर अँड व्हॉट नॉट !! 
माधव - शिवानी फ्रेंड्स आहेत पण माधव नेहाचं पटत नाही, शिवानी बिचुकलेचं पटतं पण बिचुकले नेहाचं पटत नाही, वैशाली -अभिजित -शिव यांची चांगली मैत्री आहे पण यातल्या दोघांना नेहा आवडत नाही, वैशाली आणि शिवानीचं पट्तं पण शिवानी आणि शिव भांडतात !
पराग तर सध्या कोणालाही आवडत नाहीये.
वैशाली, शिव सगळ्या गृप्स मधे उड्या मारून इकडच तिकडे करु शकतात.
बिचुकलेने काय शिव्या दिल्या काय माहित, सगळ्याच म्युट , आजचा त्याचा वोटींगचा प्रचार
Btw ‘पिंकी ब्युटी पार्लर’ हा कोडवर्ड असावा असा अन्दाज बांधतायेत पब्लिक ट्विटरवर, बिबी सिझन १ मधे आस्ताद अँड गँगनी मेघाला ‘पिंकी ब्युटी पार्लर‘ हे निकनेम दिलं होतं , मेघानी नुकतच एका इंट्रव्ह्युमधे सांगितलं होतं कि बिचुकले तिला सतत फोन करून सतावत होते कि मला बिबॉ मधे सपोर्ट करा ,मेघानी त्यांना शेवटी ब्लॉक केलं मग त्यांनी नवीन नवीन नंबरवरून फोन लावायला सुरवात केली म्हणे, मेघाने हेही मेन्शन केलय कि खरं तर असं जाण्या आधी सगळीकडे सांगायला परवानगी नसते .
शिवानीला फुटेज मिळालं नाही, पण तिची बर्फ लपवायची आयडीआ आज आवडली मला, परागपेक्षा चांगली होती बर्फ स्ट्रॅटेजी !
आज पुन्हा म्हंटली कंटीन्यु करायचय, उद्या पुन्हा जायचय म्हणताना दिसतोय सगळा ड्रामा, खरं खोटं जे काय आहे ते बास करा आता , केविलवाणी वाटायला लागलीये आता शिवानी.
काल दिगंबर चा क्लास मला खुपच
काल दिगंबर चा क्लास मला खुपच आवडला.. त्याने थोडक्यात सादर केलेला दशावतार, विच्छा माझी पुरी कराचे डायलॉग .. मजा आली.. छान इतर माहितीहि दिली.. पण तो घरात कुठे दिसत नाहि.. आता तो कॅप्टन व्हायला हवा.
बिचुकले मला पहिल्यापासुनच नाहि आवडलाय.. अगोदर झोपुन राहिला मग धावतोय आंघोळीला.. अन काय ती कविता.. फालतु. अन त्याच रसग्रहण..
बिचुकले माझ्यामते आता त्याचे
बिचुकले माझ्यामते आता त्याचे खरे रंग दाखवायला लागले आहेत.शिवानीच्याबाबतीत मला अजूनही अस वाटत की ती चँनेलच्यि टीआरपी ची बळी ठरत आहे,सुरुवितीला चँनेललि हवा असलेला टीआरपी तिने दिला,गरतर टास्क असा ती खेळलेलीच नाही,अगदी काल तिची बर्फाची आयडियाही फ्लॉप ठरली किरण तिच्याच टीममधल्यांनी एकतर विरोध केला आणि नेहाला हात धुवायलाही माठाच गळक पाणी वापराव लागल,ती आयडिया वापरातच आल नाही,चँनेलने त्याला फुटेजही दिल नाही,आणि तसही ते नियमाच्या विरोधात होत,पण इथे नियमांना वीणा,वैशाली तसे सगळेच धाब्यावर बसवत आहेत.
शाळेचा टास्क तिला जमलाच नाही.
शिवीगाळ करण,मारामारी करण,आवाज चढवण, याने तिने टीआरपी दिला,पण तिच्या बॉयफ्रेंडकडून जेव्हा तिची बाहेर खूप बदनामी झाली आहे ,कळल्यावर ती हादरल्याच कारण सांगितल जात आहे,कदाचित आता माझ्याकडून तरी टीआरपीची अपेक्षा ठेवू नका,अस तिने सांगितल असाव.म्हणून चँनेल आणि ती मिळून हे सगळ नाटक करत असावेत.
आज कळेलच,या नाट्याचा शेवट काय होतो ते.
"हीना पांचाळ" नामक कोणीतरी
"हीना पांचाळ" नामक कोणीतरी आयटम गर्ल वाईल्ड कार्ड एंट्री आहे म्हणे आज...
कोण आहे ही बया.. कधीच नाही हे नाव ऐकलं
... कुठून कुठून शोधतात देव (bb) जाणे..
.. ते शिवानी प्रकरण मिटवा आधी...
अग्गायायाssss ... काय बोर राडे (शब्दशः) चाललेत ना!!...
त्या पराग ची रेसीपी कल्पना बघितल्यावर कोणीतरी त्याच्या हातचे जेवायला तयार होईल का???...
सगळा वेड्यांचा बाजार भरलाय...
.. कसले फुस्के tasks असतात ना एक एक!!!
... पाठशाला टास्क तब्बल साडे चार दिवस चालला...
आणि पाण्याचा टास्क अर्ध्या दिवसात समाप्त??
... लोक वर्गणी गोळा करून केलेला उपद्व्याप वाटतोय.. सगळेच मालक.. शेराला सव्वा शेर..
मोकाट सुटलेत सर्वच...
अगोदर झोपुन राहिला मग धावतोय
अगोदर झोपुन राहिला मग धावतोय आंघोळीला.. >> दुपारचे 2 वाजले होते जेव्हा टास्क सूरू झाला..तो पर्यंत त्याने ब्रश पण नव्हता केला..यक्क..
शिवानी चा ड्रामा scripted Ch
शिवानी चा ड्रामा scripted Ch वाटतो
अचानक काय झाल अस म्हणून ही म्हणतेय I love to stay here.. ना कोणी हिला परत समजावलं ना काय झाल अस... हिचं मतपरिवर्तन झालं कसं... काल रात्री तर रडताना दाखवलं होत.. लवकरात लवकर action ghya mhnun
N confession room mdhe lgech I love to stay here...
काय पण टास्क देतात बीबॉ.
काय पण टास्क देतात बीबॉ. मागच्या शनिवारी वीणा शिवणीवर बदाबदा पाणी ओतून इतकं पाणी वाया घालवलं आणि टास्क काय तर म्हणे पाणी वाचवा. अन्नावर पण त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळु नयेच...>>>>अगदी
Submitted by दीपांजली on 15
Submitted by दीपांजली on 15 June, 2019>>>>
पूर्ण पोस्ट शी सहमत
ह्या वेळी सगळे गाळीव रत्ने ..
ह्या वेळी सगळे गाळीव रत्ने ... एक ना धड..
Shivani surve evicted -
Shivani surve evicted - source honestly insane
शिवानी सुर्वे एविक्ट झाली असं
शिवानी सुर्वे एविक्ट झाली असं येतायत न्यूज़ सोमी वर..काय माहीत खरं की खोट..
Ohhh my god
Ohhh my god
Ata ajun bore honar
Ata ajun bore honar
शिवानी सुर्वे एव्हिक्ट झाली
शिवानी सुर्वे एव्हिक्ट झाली आहे आणि हिना पांचाळ वाईल्ड कार्ड एंन्ट्रीने येणार आहे.
ममांनी भरपूर सुनावल आहे म्हणे शिवानीला.
अजून राडे करायला रहायला हवी
अजून राडे करायला रहायला हवी होती खर तर.. पण असो आपल बिपी जागेवर राहील ..होप सो
शिवानी बाहेर पडली असेल तर
शिवानी बाहेर पडली असेल तर सुटलो एकदाचे आपण.
आता जरा बाकी लोकांचा गेम चेंज होईल. नेहा एकटी पडेल आता. आता जर पराग एकटा पडला असेल तर त्याने आणि नेहा ने एकत्र यावं. दोघ मिळून चांगला गेम खेळतील अशी आशा आहे.
काय या वेळचा सिझन, गेल्या वेळी मेघा सई शी कसे पटकन कनेक्ट झालो होतो आपण सगळे. या वेळी कोणीच पटत नाहीये.
त्यातल्या त्यात पराग ..पण कधी आवडतो कधी नाही.
सॉलिड आहे शिव, किती गोड बोलतो
सॉलिड आहे शिव, किती गोड बोलतो. त्याचा प्रवास दाखवला होता का bb त. मी तरी नाही बघितला. आत्ता हा व्हिडीओ बघितला.
https://www.youtube.com/watch?v=L8RaXPdPRg8>>>>>>>>हा व्हिडिओ आता दिसत नाहीये copy right मुळे काढून टाकण्यात आला असं येतय
बघायचा होता, कुठे बघायला
बघायचा होता, कुठे बघायला मिळेल?
यक्स , अतिशय किळसवाणा एपिसोड,
यक्स , अतिशय किळसवाणा एपिसोड, बिगबॉसचा रहिवासी संघाचा हगवणदारसंघ झाला. >>>>>>>>> नैतर काय. किशोरी कशी काय तयार झाली परागच्या प्लॅनला? ह्यान्च्यापेक्षा तो अनहायजिनिक बिचुकले परवडला.
परागने असेल थोडं डोकं चालवलं, पण नेहापुढे कमी पडला, नेहाचं डोकं जास्तं चलातं, ती टास्क मधे भारी आहे ! >>>>>>>>> अगदी अगदी
आजचा त्याचा वोटींगचा प्रचार Rofl सांगलीचा डान्सवाला, पिंकी ब्युटी पार्लर अँड व्हॉट नॉट ! >>>>>>>>>
पण हे अस वोटींग करायला सान्गण बिबॉच्या नियमात बसत का?
शिवानीला फुटेज मिळालं नाही, पण तिची बर्फ लपवायची आयडीआ आज आवडली मला >>>>>>>>> ++++++++१११११११११ हि मुलगी जर डोक्याने शान्त राहून, ड्रामा न करता खेळली असती तर कुठच्याकुठे गेली असती. निदान तिने आपल्या मैत्रिणीला मेघाला तरी फॉलो करायला हव होत. एनीवेज आता काय उपयोग म्हणा, एविक्ट होतेय.
शिवीगाळ करण,मारामारी करण,आवाज चढवण, याने तिने टीआरपी दिला,पण तिच्या बॉयफ्रेंडकडून जेव्हा तिची बाहेर खूप बदनामी झाली आहे ,कळल्यावर ती हादरल्याच कारण सांगितल जात आहे >>>>>>>>> तरीच ती काल बिचकुलेला शान्त राहण्याचा सल्ला देत होती.
टास्कमध्ये शिवानीने सुपुची स्तुती केली, नन्तर तिलाच नापास केल. हे फेअर नाही. मुळात शिवानीलाच टास्क नीट करता आला नाही.
आणि शाळेचा टास्क काय खेळली,अग गणिताचा तास होता ना,मग निदान पाढे म्हणायला लावायचे ना >>>>>>>>>>>> हो ना. २३ चा पाढा म्हणायला लावायचा स्टुडन्टसना. ज्याला नाही आला पाढा त्याला नापास करायच.
आज पुन्हा म्हंटली कंटीन्यु करायचय, उद्या पुन्हा जायचय म्हणताना दिसतोय सगळा ड्रामा, खरं खोटं जे काय आहे ते बास करा आता , केविलवाणी वाटायला लागलीये आता शिवानी. >>>>>>>>> ++++++++++२२२२२२२२२२
काल दिगंबर चा क्लास मला खुपच आवडला.. त्याने थोडक्यात सादर केलेला दशावतार, विच्छा माझी पुरी कराचे डायलॉग .. मजा आली.. छान इतर माहितीहि दिली.. पण तो घरात कुठे दिसत नाहि.. आता तो कॅप्टन व्हायला हवा. >>>>>>>>> सर्वात बेस्ट टास्क हाच झाला होता काल. किशोरीचे ' माधवराव तुम्ही चुकलात' वरचे एक्सप्रेशन्स तर मस्तच!
यावेळी लोकांचा क्लिअर चॉइस, अ
हो ते "माधवराव तुम्ही चुकलात" आवडलं मला
दिगंबर पण मस्त. एकंदर आधी बोर वाटला तरी नंतर बरीच करमणूक झाली शाळा टास्क मधे.
बाकी लोकांची दातखीळ बसली की काय असे वाटले! त्यांचा बायकोला मेसेज मात्र फनी होता. कोडेड वगैरे असेल असे तेव्हा वाटले नाही, आता डीजेच्या पोस्टवरून कळली ती शक्यता.
यावेळी लोकांचा क्लिअर चॉइस, अॅब्सोल्यूट फेवरीट असा कोणी नाहीये.. पण ठीक आहे दर वर्षी एकाच पद्धतीने नाही जाणार गेम.
पाणी वाचवा टास्क फारच बोअर! लोकांनी पाणी वापरायचेच नाही म्हणून काहीही गलिच्छपणा चालवला होता. ईई ई! शिवानी आणि पराग ने डोकं चालवलं जरा. बाकी लोक सेल्फ कन्ट्रोल वर अवलंबून राहून नुस्ते बसून होते!! नो वंडर बिबॉ ने एडिट करून १५ मिनिटात दाखवला पूर्ण टास्क. पराग ची स्ट्रॅटेजी होती आपल्याच टीम ला हरवण्याची की गलिच्छपणा सहन झाला नाही ( व्हिच आय कॅन टोटली अंडरस्टँड!! )काही कळले नाही पण सगऴ्या बाया सॉलिड उचकल्यात.
बिचुकलेने अचानक शिवी गाळीवर उतरून त्याची लेवल दाखवून तमाम पपलू लोकांना टरकवले. एकट्या सुरेखाताई त्याच भाषेत त्याला खडसावत होत्या
शिवानीकडून पुन्हा वदवून घेतलं गेलं असं वाटलं, की तिचीच चूक होती वगैरे. तेव्हा म्हणाली मला रहायचंय आणि लगेच आजच्या प्रिव्ह्यू मधे मला जायचंय घरी म्हणतेय. काय चाललंय काय माहित.
>>पराग ची स्ट्रॅटेजी होती
>>पराग ची स्ट्रॅटेजी होती आपल्याच टीम ला हरवण्याची<<
नाहि. परागचा प्लॅन असा होता कि विरोधी टिमचं बाथरुम खराब करुन त्यांना ते साफ करायला भाग पाडायचं. ते होत नाहि असं दिसु लागल्यावर त्याने हायजीन/स्वच्छतेचा मुद्दा आणुन एक उदाहरण घालायच्या हेतुने स्वतः त्याच्या टिमचं बाथरुम साफ केलं. जेणेकरुन विरोधी टिम हि नाइलाजाने त्यांचं बाथरुम साफ करतील. विरोधी टिमला त्याने हिंटस हि दिल्या, पण त्यांनी ते उडवुन लावलं. दिग्या म्हणाला - हो जा बाबा तु तुमचं साफ कर. थोडक्यात त्याचा पोपट झाला...
Pages