मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ,त्या शिवानीला का एवढा भाव देत आहेत,जात आहे ना मग जाऊ देत.किती ते फुटेज खाणार,एवढी नाटक तर रेशमने पण केली,शिस्तीत बिबॉ च्या घरातच मस्त आराम केला होता.

शिवानीचा बाहेर जाण्याचा हट्ट स्क्रिप्टेड वाटतो . बिग बॉसच्या संमतीने. सकाळी मस्त हसत हसत परागला सांगत होती . मी कुठे जाणार नाहीये . इथेच आहे तुला छळायला Happy

खूप बोर करताहेत यावेळेस bbm सीजन 2...
कोणीच अजून मनात भरत नाहिये...
एखादा खूप छान खेळतोय आता माझा सपोर्ट या खेळाडू लाच असे वाटते ना वाटते तोच तो खेळाडू काहीतरी मोठी माती खातो आणि प्रेक्षकांना निराश करतोच करतो..
काहीच माल मसाला मिळत नाहिये तर त्या शिवानी चे रडणे दाखवले...
तिला आता सीक्रेट रूम मध्ये पाठवण्याच्या आधीचा हा scripted ड्रामा असणार हे नक्की..

शिवानी मला आवडत नाही पण तिला बरं नसेल तर खरंच वाईट वाटतंय. तिला मनातून राहायचं नसेल तर खरंच घरी पाठवावं. सिक्रेट रूममध्ये वगैरे पाठवू नये. बिग बॉस योग्यप्रकारे सर्वांची काळजी घेतात हे मात्र दिसलं तिच्या प्रश्नोत्तरात. एनीवे तिला लवकर बरं वाटूदे.

तिला एखादवेळेस हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बाहेर विरोध होतोय आपल्याला हेही समजलं असेल.

शिवानीच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत.
ती माधव कडे रडत होती तेव्हा तो तिला सरळ म्हणाला जा ना मग घरी, ते सोडतील तुला, रिप्लेसमेंट शोधायला वेळ लागणारच n all.. तेव्हा ती फिरून फिरून त्याच मुद्द्यावर येत होती.. पण मला इथे राहायचंच नाहीये i want to be with my people यावरून ती attention साठी नाटक करत्येय असं वाटलं.. काही न काही करून घर स्वतःभोवती फिरतं राहील याची जबरदस्त खबरदारी घेतल्येय तिने
बाकी बिग बॉस scripted आहे याची खात्री पटली आज.. शिवानी म्हणाली मधेच मी अजिंक्य शी बोलले ( तिचा बॉयफ्रेंड असावा बहुधा), एकूण नेहा- शिवानीच्या बोलण्यावरून तिकडे इतर माणसांचा वावर असावा असं वाटलं..

शिवानीला सिक्रेट रूममध्ये पाठवलं तर सर्व scripted ड्रामा यावर नक्कीच शिक्कामोर्तब होईल.

शिवानी म्हणाली मधेच मी अजिंक्य शी बोलले >>> तिचा bf आहे बहुतेक. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्याच्याशी बोलणं झालं असावं.

खरतर बॉयफ्रेंड भेटला आऑर फोनवर बोलला हे सांगायच नव्हत तरी ती सांगत होती.
सगळा कचरा केला हिने.आधी तो चोरपोलिस टास्क छान चालला होता तिथे माती खाल्ली,आता हा तसा बोअर चाललेला टास्क ,हिच्यामुळे आणखीन कंटाळा आला
पण तिला बाहेर नाही जाता येणार ,नाटक असो वा काहीही असो.
तस झाल तर तिलाच ते महागात पडेल,आणि बिबॉ मध्ये मग तसा ट्रेंड पडेल.

काय फालतगीरी चालू आहे शिवानी ची.. मला जाऊ दया ना घरी..
आजचा एपिसोड मध्ये टास्क बद्दल कमी आणि शिवानी tantrums जास्त दाखवले...यांच्या कडे बाकी काही नाही आहे का दाखवायला.. आधी स्वत: वकिलाला बोलावेन वगैरे म्हणायचं आणि मग बिग बॉस ने सांगितल तर लगेच माझी परिस्थिति नाही आहे..म्यूच्यूअल रिसॉल्व करु असं बोलायला लागली..एवढं सगळ्यांच डोक खाल्ल आणि बाई सकाळी टकाटक लसुण सोलतेय आणि पराग ला सांगतेय की कुठे जात नाही.. is it a mood.swing dues to pms??

अर्धा वेळ तर शिवानीमध्ये गेला. धमकी देत होती लीगल तीच. माझे वकील वगैरे आणि बिग बॉसने लीगल भाषा काढली तर माफी मागितली. कशाला चढवतात डोक्यावर तिला, मानसिक स्वास्थ्य टीक नसेल आणि त्यामुळे फिजिकली त्रास होत असेल तर घरी पाठवा तिला.

माधव छान समजावत होता तिला.

कुणीही इनसाईडर असेल तर लिहा या विषयावर, मी मला असलेली माहिती सांगतेय. या माहितीसाठी माझ्याकडे काहीही पुरावे नाहीयेत. विनाकारण कोणाला त्रास नको.
मराठी अभिनेते-अभिनेत्री कितीही उड्या मारत असले, तरीही त्यांचा जीव चॅनेलच्या हातात असतो. त्यांचे काँट्रॅक्टस कधी बाहेर येत नाहीत. कधी कुणाला मिळेल ना, तर वाचा प्लिज. इतके भयानक क्लॉज असतात ना, आपण विचारही करू शकत नाही. आणि यातील पर डे वर जगणारी माणसं, यांच्याविरोधात कोर्टात जाऊच शकत नाहीत, कितीही पुरावे असले तरी. कारण--
१. चॅनेलची वकिलांची तगडी फौज उभी असते. चॅनेलच म्हणणं एकच. जिंको न जिंको केस, कितीतरी वर्षे चालू ठेवायची. तोपर्यंत चैनल मध्ये असणारे एकही प्रोडक्शन हाऊस त्याला काम देत नाही. चॅनेलच्या बाकीच्या सिरीयल सुखेनैव चालू असतात, आम्ही बाकीचे चॅनेल या केसमुळे बहिष्कार टाकतात. ( चॅनेलवर केस टाकली म्हणजे चॅनेल हेड विरुद्ध!)
२. इंडस्ट्रीत पद्धतीशीर प्रचार करून नाव बदनाम केलं जातं.

शिवानी प्रकरण स्क्रिप्ट असेल तर ठीक आहे, किंबहुना त्याची शक्यता जास्त आहे, पण जर हे रियल असेल तर शिवानीला फार महागात पडू शकते.
मी ज्याप्रमाणे एपिसोड बघितला त्याप्रमाणे शिवानीने आधी प्रचंड उतमात केला, हॉस्पिटल काय, अजिंक्य काय, दुसरी शिवानी उभी करा काय, सगळंच विचित्र. पण सगळ्यात मोठा किस्सा केला तो लीगल मॅटरचा. रियल असेल तर तू सरळ चॅनेलच्या इगोलाच हात घातलास.
इथेच एक अभिनेता आणि चॅनेल/ प्रोडक्शन हाऊसचा फरक स्पष्ट होतो. बिग बॉसने आधी तिला कुढू दिलं, मग थोडी धार कमी झाली, सगळे जण पांगलेत, तेव्हा मध्ये बोलावलं. आधी सगळं चांगलं तिच्या तोंडून वदवून घेतलं, नेहाला साक्षीदार ठेवलं, आणि मग सरळ लीगल ऍक्शनची भाषा केली...
सगळा माज एका क्षणात उतरला. लगेच सामोपचाराची भाषा सुरू.

अर्थात हे सगळं अनलिसिस शो स्क्रिप्तेड नसेल तरच!

असे असेल तर स्क्रिप्टेड असण्याची शक्यता कमी वाटते! मिळणार्‍या फूटेज पैकी स्क्रीन वर काय दाखवायचे ते चॅनल च्या हातात असते हे खरे. पण ती का असा अपमान करून घेईल बिबॉ कडून तो ही ऑन एअर!

मला सध्या तरी पराग फार आवडतोय. शिवानीला मस्त शालजोडीत हाणत होता.

महाश्वेता जबर लिहिलंय! दंडवत घे!

स्क्रिप्टेड का कसं... असला काही ड्रामा झाला असेल तर (एका एपिसोडपुरता तरी) तो बघायला तरी मी परत बघणार. नाही तर सोडून दिलेली आणि इथे अपडेट वाचायचो.

आम्ही मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं चाललं होत माझ्या मते . सकाळी उठल्यावर मस्त हसत हसत लसूण सोलत बसलेली . रात्री बिग बॉस ने कायदेशीर मार्गाने आम्ही पण प्रश्न सोडवू म्हणून दिलेली धमकी आणि हि हसतेय सकाळी ?. कुछ तो गडबड है . मला तर स्क्रिप्टेड वाटतंय . बिग बॉस ने धमकी दिल्यावर खर तर हिची झोप उडायला पाहिजे पण सकाळी ती हसत असलेली बघून बऱ्यापैकी शंका येतेय . वरती ती कन्फेशन रूम मध्ये म्हणत पण होती मी या शो मधे घालायला ड्रेस पण उधारीवर घेऊन आलेय यावं नि त्याव . मग बिग बॉस वर केस टाकायला हिच्या कडे पैसे येणार कुठून ? बोलण्यात पण गंडलेय ती . बिग बॉस ने काय लिहून दिलेल ते आठवत नाहीये तिला नीट . स्क्रिप्टेड असेल तर प्रेक्षकांना अगदीच छू समजतात बिग बॉस . कोण बाहेर जाणार/ कोण राहणार/ कोण कस वागणार सगळंच जर त्यांच्या मनाप्रमाणे मग मत कशाला ? आणि प्रेक्षक मारे ठरवत असतात. या आठवड्यात हिला बाहेरचा रस्ता दाखवू आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवू Happy

सोमि वर चर्चा आहे की शिवानी श्रीशांतसारख करत आहे.पण तो अँक्टर नाही,अगदी अँक्टिंग करायला नाही मिळाली तरी त्याच्यासाठी स्पोर्ट फिल्ड अजूनही ओपन आहे.
जर हे सगळ स्क्रिप्टेड असेल तर मराठी प्रेक्षकांचा बिबॉ वरून विश्वासच उडेल आणि मग काहीही केल तरी मराठी प्रेक्षक या शोकडे नक्कीच पाठ फिरवेल.
पण ही बिनडोक स्टेटमेंट करताना पण चुकत होती,आधी सांगते मी केस करणार आहे,मग म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत.अग ,अँक्ट्रेस आहेस ना,मग अँक्टिंग तर नीट कर.

Bdw काल पराग आणि वैशाली चा class दाखवला का?? मी miss केला की दाखवला नाही कळत नाहिये.. एवढं ते अख्खा इंडिया वगैरे गाण दाखवलं होत प्रोमो मध्ये...त्याच काय झालं??!!

कालचा एपि अगदि बोअरींग... काय तो गोंधळ घातला शिवानीने लहान मुलासारखा.. कंटाळा आला बघताना सगळं. माधव मस्तच बाकी.. तो रहायला हवा शेवटपर्यंत..

शिवानी चं काय नाटक आहे...किती बोअर केलं काल...इतकं फुटेज दिलय याचा अर्थ तिला नक्कीच नाही काढणार.
उगीच रडारडी करुन लोकांची सिंपथी मिळवायची.. कंटाळा आला काल खरच.
काल शिवानी ने बाप्पा शी बोलताना तिच्या बॉयफ्रेंड ची आई पण काढली...."अजिंक्यच्या आईची" असं म्हणाली ती.....खरच काय पोरगी आहे...होणार्या सासु ला तरी सोडावं...
शिव आणि वीणा चं काय सुरु झालय आता मधेच....रुपाली पराग ला भाव देत नाही म्हणून आता शिव न वीणा ची स्टोरी सुरु होतेय की काय Happy

मला आज शिवानीचं रडणं, घरातल्या लोकांना तिला पाहून वाटलेली काळजी ड्रामा नाही वाटला, लुक्ड लाइक शि वओ़ इन ट्रबल, मानसिक, फिजिकल किंवा काहीतरी लिगल जे लोकांपुढे येऊ द्यायचं नाहीये !
तिला कोकिलाबेनला नेले, काहीतरी मेडिकल प्रोसोजर केली ज्या प्रोसिजरबद्दल ती कॅमेरापुढे सांगु शकत नाहीये, मला भलतीच शंका येतेय.. कारण फॅमिली ऐवजी तिच्या बॉयफ्रेंडला काँटॅक्ट केलं गेलं ! अजुन कोणाला तीच शंका येतेय का जी मला येतेय कि मी उगीचच हा विचार करतेय ?
जर ड्रामा असेल तर ती फारच उच्च लेव्हलची अ‍ॅक्ट्रेस आहे.

तिला कोकिलाबेनला नेले, काहीतरी मेडिकल प्रोसोजर केली ज्या प्रोसिजरबद्दल ती कॅमेरापुढे सांगु शकत नाहीये, मला भलतीच शंका येतेय.. कारण फॅमिली ऐवजी तिच्या बॉयफ्रेंडला काँटॅक्ट केलं गेलं ! अजुन कोणाला तीच शंका येतेय का जी मला येतेय कि मी उगीचच हा विचार करतेय ?>>>>
ohhh.. असेल.. आता हे वाचून मलाही वाटायला लागलं

तिला कोकिलाबेनला नेले, काहीतरी मेडिकल प्रोसोजर केली ज्या प्रोसिजरबद्दल ती कॅमेरापुढे सांगु शकत नाहीये, मला भलतीच शंका येतेय.. कारण फॅमिली ऐवजी तिच्या बॉयफ्रेंडला काँटॅक्ट केलं गेलं ! अजुन कोणाला तीच शंका येतेय का जी मला येतेय कि मी उगीचच हा विचार करतेय ?
मलाही तशीच शंका आली डोक्यात. तसेच ती म्हणाली पण की दोन दिवसाच्या आत ती गोष्ट करायची होती..वगैरे वगैरे.. पण हे खरे असेल तर बिग बॉस तिला ठेवणार नाहीत आणि कायदेशीर कारवाई पण करणार नाहीत. कारण इतके निर्दयी कोणीच नसेल. आणि अशा गोष्टी वरून जर बिग बॉसने तिला अडकवले तर कलरची बदनामी खूप होईल.

दुसरी गोष्ट अशीही वाटतेय की तिला काहीतरी व्यसन (ड्रग्ज वगैरे) असावे जे सोडण्याचा ती आणि तिचे जवळचे प्रयत्न करत आहेत. काल शाळेचा टास्क खेळता खेळता ती अचानक निघून गेली आणि मला त्रास होत आहे असे म्हणायला लागली. अजिंक्य, बिग बॉस यांना काहीही बोलली. जर योग्य ड्रगची मात्रा जर पोटात गेली नसेल म्हणून हायपर होत असेल. बिग बॉस मध्ये जाण्याचे हे सुद्दा एक कारण असू शकेल की ती व्यसनमुक्त व्हावी. आणि हे जर खरे असेल तर तिला मुद्दामहुन बिग बॉस भाव देत नसतील. आता काहीही करून तिला शेवटपर्यंत ठेवतील आणि नंतर ती जर खरोखर व्यसनमुक्त झाली तर शो चा टिआरपी वाढवायला या गोष्टीची प्रसिद्दी करतील. ह्या दुसर्‍या गोष्टीची शक्यता जास्त वाटत आहे.

ज्या प्रोसिजरबद्दल ती कॅमेरापुढे सांगु शकत नाहीये, मला भलतीच शंका येतेय.. कारण फॅमिली ऐवजी तिच्या बॉयफ्रेंडला काँटॅक्ट केलं गेलं ! >> सोमी वर पण खूप ठिकाणी हे वाचायला मिळालं...सरळ सरळ लिहिलं आहे तस..ती म्हणाली पण मला घरच्यांची आठवण नाही येत आहे..फक्त अजिंक्य ला भेटायचं आहे... या मुलीला झेलतो तो अजिंक्य आत्मा खरच महान आहे..

अजुन कोणाला तीच शंका येतेय का जी मला येतेय कि मी उगीचच हा विचार करतेय ?......असू शकेल.पण आता तिच्या आईवडिलांनी पाहिल असेल ना.
पण त्यासाठी जो ड्रामा तिने केला आहे त्यावरून जरी घरात राहिली तरी आता फार काही फरक पडणार नाही कारण सोमीवर पूर्णपणे उतरली आहे ती मनातून आणि काही दिवसांनी घरातले पण कंटाळतील तिला.
कारण तिच्यामुळे आता टास्क नीट होत नाहीत.

इथे इतक्या वैयक्तीक आणि अति खाजगी पोस्टे का लिहित आहेत एका स्परधकावर? ते हि काहीच खात्री नसताना?
कोणाला खात्रीने माहिती आहे का , अजिंक्य त्या स्पर्धकाचा कोण आहे ते? त्याही पुढे, तिचा नक्की प्रॉबलेम काय आहे माहित नसताना कसले संशय? आणि किती संशय?
ड्रगचे व्यसन काय? वगैरे वगैरे..
का इतर मिडियावर लोकं लिहितात म्हणून चालले आहे का?

एकंदरीत हा खेळाचा प्रकार आणि वातावरण डिप्रेसिंग असु शकते कोणालाही. इतके संशय कशाला?

Pages