मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवानीची बातमी कालच मध्यरात्री पसरली ट्विटरवर.
(माझं गट फिलिंग बरोबर होतं, हे अ‍ॅक्टींग नव्हतं , खरोखर प्रॉबेल्म आहे दिसत होतं)
बाकी सगळ्यांना अनुमोदन दिग्याच्या क्लासबद्दल, किती मस्तं क्लास आणि ‘माधवराव तुम्ही चुकलात‘ ला दिलेली किशोरीची नाट्यमय आणि वैशालीची संगीतमय साथ :टाळ्या:
अशी टास्क आली कि जे खरे कलाकार आहेत ते बरोबर क्लास अपार्ट दिसतात. गेम जमो किंवा न जमो दिग्या, किशोरी, वैशाली, बाप्पा, सुरेखाई, माधव यांनी आपली छाप पाडलीच !
मला सुरेखाताईंच्या अ‍ॅक्सेन्ट मधला ग्रामीण ठसका फार आवडतो. त्यांना सेन्स ऑफ ह्युमर -प्रेझेन्स ऑफ माइंडही आहे.
एरवी शिव्या देत नाहीत त्या स्वतःहून पण बिचुकलेला गप्प करण्यासाठी योग्य त्या वेळेला बरोबर आवाज चढवू हसडली त्याला !
त्या आधी बिचुकलेच्या क्लासला मजा पण आणली, जेंव्हा त्यांचा अ‍ॅड्रेस रिपिट करायला सांगत होते बिचुकले तेंव्हा अचानक म्हणे शनिवारवाडा Biggrin

हो सुपु मजेशीर आहेत! शनिवारवाडा Lol
शिवानी बद्दलची बातमी रिलायबल आहे का पण? की सिक्रेट रूम मधे गेली आहे ? कारण ममांची ती क्लिप पाहिली पॅक युअर बॅग्स वाली. हे असे काही जर प्रोमो मधे दाखवले तर नॉर्मली प्रत्यक्षात तसे नसते हा रुल आहे Happy
एविक्ट झाली असेल तर टू बॅड फॉर हर. जेव्हा कन्ट्रोल मधे होती तेव्हा सॉलिड टिआरपी देत होती ती. पुढे फायनल ला जायचे नक्की पोटेन्शियल होते.

शिवानी बाहेर गेली असेल तर तिच्यासाठी चांगले आहे. तिला खरोखर मनोचिकित्सकाच्या सल्ल्याची गरज आहे. मानसिक आजाराकडे हेटाळणीने पाहिले जाते त्यामुळे समस्या बळावू शकतात. आजच्या एपिसोडमुळे पराग काय फालतु माणूस आहे हे सिद्ध झाले. सध्या मला सुरेखाबाई आणि बाप्पा सोडले तर कुणीच आवडत नाहीये.

किशोरींचा अभिनय अत्त्युत्तम. बिचारीला चांगले अभिनयाला वाव असणारे सिनेमे मिळायला हवेत. एक येडा सोडला तर तिला स्कोप असणारं तिचं काम आठवत नाहीये.

शिवानी ला बिबॉ ने अतिशय अपमान करून बाहेर काढलं. कोणाला तिला भेटू सुद्धा दिलं नाही. बापरे..खरच काहीतरी भयानक घडलंय असं दिसतंय पडद्यामागे ..
की तिला आता सिक्रेट रूम मध्ये तर नाही ना नेणार...

शिवानी खूप विचित्र रित्या बाहेर काढली. मात्र तिचाही attitude भयानक होता.
आजचा सिजन मात्र एक चित्रपटाला शोभेसा होता, दुसरी शिवानी सुर्वे आणा म्हणत होती, तिच्यासमोरच उभी केली, घरात आणलं, आणि हिला बाहेर घालवली.

तिला आता सिक्रेट रूम मध्ये तर नाही ना नेणार...
>>>>>> मलाही तसंच वाटतंय... कारण तिची नेम प्लेट ती घेऊन नाही गेली..
नेहा कडे होती... evicted contestant घेऊन जातो स्वतः...

तिला आता सिक्रेट रूम मध्ये तर नाही ना नेणार..>>> नाही, जर सिक्रेट रूम मध्ये ठेवायचे असते तर इतके अपमानित करून नसते बाहेर काढले

She deserved it...overpampered वैगेरे सगळं ते तिच्या घरी...

मुलगी कितीही सुंदर असू द्या ...कितीही ती कतृत्ववान असू द्या पण असा अटीट्यूड असेल तर कुणीही सोबत राहणार नाही ..कु...णी...ही...रादर जे प्रेम करणारे असतील तेसुद्धा द्वेष करायला लागतील....

जर सिक्रेट रूम मध्ये ठेवायचे असते तर इतके अपमानित करून नसते बाहेर काढले >> राजेश शृंगारपुरे ला पण काय काय बोलून बाहेर केला होता आणि मग सिक्रेट रूम मधून परत आला.

बाकी शिवानी चा इतके दिवस इतका राग येत होता पण आज दया आली तिची. सीरिअल मध्ये अपमान होणं वेगळं आणि या अशा रिअलिस्टिक शो मध्ये अपमान होणं वेगळं. कितीही scripted आहे असं म्हणलं तरी या शो ला खरं मानणारा खूप मोठा वर्ग पण असतो.खूप प्रयत्न करून आपले अश्रू थांबवायचा आटापिटा करत होती ती.असो.

No secret room , Colors Marathi official handle already posted about Facebook live session with eliminated contestant on Monday at 12pm.

शिवानी शेवटी बाहेर गेली . एकंदर लक्षात येतंय नुसताच माज करून आणि टीआरपी साठी कन्टेन्ट देऊन तुम्हाला पुढंपर्यंत जात येत नाही . टास्क पण करावे लागतात . निदान मिनिमम काँट्रीब्युशन आणि पब्लिक चा सपोर्ट या तीन गोष्टी जमून आल्या तर तो खिलाडी . नुसताच टीआरपीसाठी कन्टेन्ट दिला . सगळं घर पराग चा ग्रुप सोडून स्वतःभोवती फिरत ठेवल . रीतसर मेंन डोअर मधून बाहेर गेली . नो सिक्रेट रूम . राजेशला सिक्रेट रूम दिली होती तेव्हा चा सिन .आठवा . तस काहीच नव्हतं . बिचुकले उगीचच ओरडले मला तिला भेटायचं म्हणून . हजार वेळा मला बाहेर जायचंय - मला घरात राहायचंय करत बसली . तिला खरंच मनोचिकित्सकाच्या सल्ल्याची गरज आहे. बाहेर पडताना सुद्धा मांजरेकरांकडे खुन्नस ने बघून गेली . एवढा माज येतो कुठून ? जे झालं ते चांगलच झालं

ख.खो माहित नाही पण आता ट्विटरवर असही ऐकु येतय दिगंबर सुध्दा एव्हिक्टेड, काय माहित मग खरच् सिक्रेटरुम वगैरे आहे का Uhoh

शिवानीने शेवटपर्यंत attitude सोडला नाही पण तिला खरंच काही मानसिक त्रास असेल असंही वाटतं, खरं म्हणजे दुसरा सिझन आहे तर कसं असतं हे आत्ता येणाऱ्याना माहितेय. तर येताना विचार करायला हवा. तिच्या आजारपणाबद्दल पूर्ण सहानुभूती आहे आणि वाईटही वाटतंय, तिला बरं वाटूदे लवकर पण तिच्या attitude चा कंटाळा आला. पहिल्यापासून अति anger, शिव्या. ऑडियन्सची शिक्षा न ऐकणे. हे सर्व अति होतं. फार कटकट वाटायची.

एनीवे तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा.

काल दिगंबर चा क्लास मला खुपच आवडला.. त्याने थोडक्यात सादर केलेला दशावतार, विच्छा माझी पुरी कराचे डायलॉग .. मजा आली.. छान इतर माहितीहि दिली.. >>> अनुमोदन.

बिचुकले मला पहिल्यापासुनच नाहि आवडलाय.. अगोदर झोपुन राहिला मग धावतोय आंघोळीला.. अन काय ती कविता.. फालतु. अन त्याच रसग्रहण.. >>> अगदी अगदी.

हा व्हिडिओ आता दिसत नाहीये copy right मुळे काढून टाकण्यात आला असं येतय >>> ओहह मला बघायला मिळाला होता, मस्त धमाल शैलीत सांगत होता.

अजूनतरी काही केस वगैरे होणार नसल्याच कळतंय... >>> नाही झाली तर बरं होईल. एकतर मानसिक त्रास आहे काहीतरी आणि त्यात हे सर्व. खूप जड जाईल तिला.

मी पूर्ण एपिसोड नाही पहिला कालचा. पण ती शिवानी कशी बघत होती म. मा कडे. Cunning लूक्स देत होती फारच. खरंच गेली असेल तर बर होईल.

वाईट झाले शिवानी बरोबर.>>>> हो ना, मुद्दाम अशी वागणूक देऊन काढले तिला, तर वाटतेय की कदाचित काही दिवसात केस करतील तिच्यावर

दिगंबर सुध्दा एव्हिक्टेड, >>> हो, गेला असेल कारण शिवानीची रिप्लेसमेंट तर आली, मग एव्हीकॅशन तर होणार

बाकी शिवानी इतकेच मला मांजरेकरांसाठी वाईट वाटले, बिचारे किती बाजू घेत होते तिची अन तिलाच ओरडून बाहेर काढावे लागले.

इथे कुणाला वीणा आत जाऊन जाड व्हायला लागली असे वाटले का? की मलाच वाटले

बीग बॉस ने काडिचीही किमत दिली नाही यामागे आणखी कूणी स्पर्धकाने शिवानी सारख वागु नये असाही उद्देश असेल कुणाला तिला साध गुड बाय सुधा म्हणू दिल नाही.
मला वाटत लिगल धमक्या, वकिल, नोटिस हे जरा अतिच झाले, शिवानी बकवास खेळून सुद्धा ममा नी तिला भरपुर सन्धी दिली पण तीच काहितरी जामच बिनसल होत अस दिसतय.

शिवानी सिक्रेट रुममध्ये वगैरे नाही,बिबॉने तिला तिच्याच शब्दात उत्तर दिले,तिने सांगितल होत ना की दुसरी शिवानी सुर्वे उभी करा,केली त्यांनी.
बाकी तिच आजारपण वगैरे एकीकडे पण तिचा जो माज आहे. त्याचा राग यायचा.पण जिथे बिबॉवर केस करण्याच बोलली,तिथेच तिचा निकाल लागला.कंटेंट देण वगैरे जे तिच पहिल्या दोन आठवड्यात चालल होत ते एकवेळ ठीक पण लिगल कारवाईची भाषा,नियम न पिळण यामुळे ती प्रेक्षकांच्या मनातूनही उतरली.
पण मला नाही वाटत की बाहेर हे फार काळ चालेल.एक दोन महिने जाऊ देत ,हीच शिवानी कलर्स हिंदी किंवा मराठीवरच्या कुठल्या मालिकेत दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.
जस राजेशला बोलून,सिक्रेट रुम मध्ये ठेवून,बाहेर काढून नंतर कलर्सच्याच झांशी की रानी मध्ये त्याने कामही केल.
शेवटी काय बिबॉ पुरता शिवानी चँप्टर क्लोज झाला इतकच.
राहिलेल्या लोकांमध्ये आज दिगंबर बाहेर पडल्याची चर्चा आहे.
पराग आणि किशोरी रिहतील शेवटपर्यंत अस वाटत आहे
वीणाच घरातल स्थान हे ती चांंगल खेळो वा ना खेळो, कलर्सवरच अवलंबून आहे,अस अजूनही वाटत आहे,बाप्पा,सुरेखा लवकर जातील.
बाकीच्यांंच माहित नाही.
पण एक कळत नाही आहे ते वीणा आणि शिव दोघही अजिबात एकमेकांना कुठलेही सिग्नल देत आहेत अस दिसत नाही,तरी कशाला उगाच आणखी एक नको असलेली पेअर माथी हाणत आहेत.

आज कोणीतरी ट्विटरवर लिहिलय त्याप्रमाणे मांजरेकरचा मॅड किंग झाला होता , फुल टु ग्रिलिंग ऑफ शिवानी , सोशल मिडीयावरच्या पब्लिकच्या अत्ता पर्यन्तच्या सगळ्या आउट्रेजचा पूर्ण अभ्यास करून आला होता यावेळी आणि सगळं सुनावलं गेलं Happy
गेली एकदाची, इतके दिवस चाललेल्या ड्राम्यावर अखेर पडदा पडला पण तरी आज शिवानीसाठी वाईट वाटलच.
अगदीच मान्य आहे तिने जे काय राडे केले, ते अ‍ॅक्चुअल एपिसोड पेक्षाही जास्तं असतील, चॅनलशी पंगे घेतले,अटेन्शन सिकिंगसाठी उध्दाटपणा, व्हॉयलेन्सही केला, हजारवेळा शब्दं फिरवले , पण नेहा म्हंटली तसं एक माणुस म्हणून एखाद्या व्यक्तीचा इतका इन्सल्ट ऑन एअर करोडो लोक बघत असताना झालेला पाहून खरच वाईट वाटलं, कदाचित ती एक लुजर म्हणून गेली, मानसिक प्रॉब्लेम्/डिप्रेशनमधून जातेय म्हणून जास्तं.
तिच्यासमोरच चॅनलनी म्हंटल्या प्रमाणे तिच्या नाकावर टिच्चून तिच्या एग्झिटच्याच वेळी दुसरी पोरगी आणली, एकीकडे तिचे बॅग भरणे , आवरा आवर आणि दुसरीकडे त्या हिना पांचालचा स्वागत समारंभ, तिला गुडबायही करु दिलं नाही, चॅनलनी पुरेपुर बदला घेतला, अगदीच कचरा केला, ब्रुटल एग्झिट !
काँटेस्टन्ट्सना या निमित्ताने चॅनलने धमकीवजा एक धाक घातला खेळ सिरीयसली घेण्याचा !
काही म्हणा मान्यं केलं पाहिजे, लडकीमे जबरदस्त अ‍ॅटीट्युड है, अ‍ॅब्सोल्युट्ली झीरो पर्सेन्ट रिग्रेट्स, जाताना काय लुक दिला मांजरेकरला/कॅमेर्याला , मांजरेकरलाच चार शिव्या हसडून/फटकारून नाही गेली नशीब Happy
असो, शिवानीला जे हवं होतं ते वाईटप्रकारे का होईना मिळालय, थिंग्ज आर नॉट गोइंग टु बी इझी फॉर हर हिअर अफ्टर, पण जे काही डिप्रेशन्/जो काही प्रॉब्लेम आहे त्यातून बाहेर येऊन अ‍ॅटीट्युड सुधारवा पोरीने आणि परत कामं मिळवावीत !
आय होप नवी आयटेम गर्ल हिना उर्फ गरीबांची मलायका आरोरा मिळालेला गोल्डन चान्स वाया घालवणार नाही आणि माधव सारखे पोटेन्शिअल असलेले प्लेयर्स आता सिरीयसली गेमवर कॉन्स्न्ट्रेट करतील !
त्या बिचुकलेलाही आता थोडा लगाम घालायची गरज आहे नाहीतर लवकरच काहीतरी एंबॅरॅसिंग करून कालकोठरीत टाकायची वेळ येईल !

खेळाडू पेक्षा खेळ अधिक महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केलं. शिवानी ला अशाप्रकारे बाहेर काढून इतर खेळांडूना दाखवून दिलं की बिग बॉस एकच आहे.
चूकीला माफी नाही.

माज करण्याला माफी नाही. जमिनीवर दोन बोटे असल्यागत वागाल तर जमिनी खाली सहा फूट नाही पण पाव फूट तरी गाडू हे जोरदार दाखवून दिल्या बद्द्ल चॅनलचे अभिनंदन.
धाक दाखवणे आणि त्यासाठी वाईट अपमान करून हाकलणे तिने गरजेचे बनवून टाकलेले, ते बिनदिक्कत पणे केले ते उत्तम झाले. अन्यथा म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो गत झाली असती.
आता बाहेर पडून ती सॉर्ट आउट आणि जे काय गरजेचं आहे ते करेल आणि यातून बाहेर पडेल ही तिला सदिच्छा.
मांजरेकर लोकांना कारण नसताना ओरडत होते पण... गरिबांच्या मलाईकेत फार स्पार्क दिसला नाही पहिल्या अपिअरन्स मध्ये.. बघू आता.

मांजरेकर वॉज ग्रीलिंग हार्ड, विथ एक्स्ट्रा सॉल्ट अँड पेपर ऑन माधव, बाप्पा अँड नेहा, आणि तेसुद्धा नजाकतीने. बहुतेक मायबोली फार वाचत असावेत!
Wink
बिचुकलेला सरळ 'नाही, शंभर दिवसांनी भेटा.' अमी नंतर कंदी पेढा भरवून परागला सेफ केलं, तोही मास्टर प्लॅन होता.
ती जात असतानाच आयटम नंबर लावलं, नवीन कंटेस्टंटला आणलं. घरच्यांना तिला चियर अप करावं, की हिच्या जाण्याचं दुःख दाखवावं असा प्रश्न पडला. पण पंधरा दिवसाच्या मैत्रीसाठी कुणीही आपल्या गेमवर पाणी फिरवत नाही, हेच दिसलं. ब्रूटल पण रियालिटी!
असो, आपल्या सुंदरतेचा थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून वापर करावा आणि यशस्वी व्हावं हीच सदिच्छा!!

कुठल्या मालिकेत दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.
जस राजेशला बोलून,सिक्रेट रुम मध्ये ठेवून,बाहेर काढून नंतर कलर्सच्याच झांशी की रानी मध्ये त्याने कामही केल.>> मला वाटत राजेशची आणि हिची तुलनाच होत नाही . तो बिग बॉस ने सांगितल्या प्रमाणे प्रेमप्रकरण करत होता . त्याचे त्याला काही एक्स्ट्रा पैसे मिळालेही असतील . पण मराठी प्रेक्षकांना ते प्रेमप्रकरण अजिबातच न आवडल्याने आणि त्याच्या विरुद्ध भरपूर चर्चा झाल्याने बिग बॉस ला नाईलाजाने त्याला काढावे लागले . ती बिग बॉस ची चूक होती . राजेशची नाही. त्यामुळे त्याला काम मिळत गेली अगदी कलर्स ने सुद्धा दिली . हिच्या बाबतीत कठीण वाटतंय

Pages