मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवनीची फारच इन्सल्टिंग एक्झिट. बिबॉ ने एकदम ब्रुटल स्टँड घेतला. दाखवून दिले हू इज द बॉस!!
काल ममांचे ओरडणे ऐकून वाटले की पब्लिक ने सोमि वर फार धुतलं म्हणून ठरवून आरडाओरडा करताय्त का काय Happy माधव, बाप्पाचे फार चुकले नसताना त्यांनाही झापडले उगीच. शिवाय इतरांना बजावले, एव्हरीवन इस रीप्लेसेबल. कोणीही स्पेशल नाही. शिवानी बाहेर जातानाच तिच्यसमोरून तिच्या रीप्लेसमेन्ट ची एन्ट्री! काय ड्रॅमॅटिक!अर्थात तिला कशाचेच काही वाटत नसावे. अगेन, टू बॅड, पैशाची गरज आहे, सध्या हातात फार काम नाही असे असताना मोठी संधी दवडली तिने.
सो पराग - वीणाचे भांडण हे नाटक होतं ? ह्म्म स्मार्ट गेम, पण आता कळले ते सगळ्यांनाच! आता दुसर्‍या बाजूला संघटित ग्रुप असा नाहीच आहे. विदाउट शिवानी काय डायनामिक्स चेन्ज होतायत बघावे लागेल. काल बाकीच्यांना इतके ओरडले ममां, पण बिचुकले ना काही कानपिचक्या दिल्या नाहीत. उलट फुटेज भरपूर दिले.
ऑफ टॉपिक - यावेळी वीकेन्ड ला आणि एरव्ही पण कोणाचेच ड्रेसेस काही खास फॅन्सी दिसत नाहीत. स्पॉन्सर्स नाहीयेत का कुणाकडे! Happy किशोरी जरा चांगल्या कपड्यात असते बहुधा. कधीतरी रुपाली, वीणा. काल पण शिवानीची पैठणी वगळता बाकी सगळे अगदीच काहीतरी. केळ्याने ते काय नेसलं होतं? Uhoh साडी गुंडाळून वरून झब्बा घातलाय असं वाटत होतं!!

बिच्चारी शिवानी! अस व्हायला नको होत. हिला ' स्पिल्ट पर्सनॅलिटीचा आजार सुद्दा आहे का. काल एका क्षणाला ' मी कॅप्टन होऊन दाखवीन. परागला माझ्याविरुद्द नॉमिनेट करा. माझ ओपन चॅलेन्ज आहे त्याला वै वै बडबडत होती. तर दुसर्या क्षणी पुन्हा हिच नेहमीच ' मला घरी जायचय' सुरु.

काहीही म्हणा पण घरात शिवानी एकटीच अशी होती ती परागला टशन देऊ शकली असती , जर डोक शान्त ठेवून, अ‍ॅरोगन्स बाजूला ठेवून खेळली असती तर. तिच्यानन्तर बिचकुलेचा नम्बर लागतो परागला भिडण्यात.

आता तरी तिने स्वत:ला सुधाराव , नाहीतर किशोरीने म्हटल्याप्रमाणे तिला इण्ड्रस्टीत कामे मिळण कठिण होईल पुढे जाऊन. होप सो, तिला सिक्रेट रुममध्ये ठेवू नये. नाहीतर ती प्रेक्षकान्ची फसवणूक ठरेल.

काल रुपाली, सुरेखा, किशोरी, शिवानी छान दिसत होत्या. केळयाने लुन्गी नेसली होती का? Uhoh

हिना पांचाळ कोणत्या मूवी मध्ये होती >>>>>>> अशोक सराफच्या शेण्टिमेण्टल सिनेमात एका आयटम सॉन्गमध्ये पाहिल होत तिला. फक्त तेव्हा तिच नाव माहित नव्हत.

यावेळी वीकेन्ड ला आणि एरव्ही पण कोणाचेच ड्रेसेस काही खास फॅन्सी दिसत नाहीत. >>> हो ना... आणि मुख्यत्वे ही मंडळी fashion इंडस्ट्री शी related आहेत सो ते जास्त नजरेत येत... नेहा चा पण fashion sense अगदीच ओन्गाळ..काल पण वनपीस..त्यावर diamond चे ईयरिंग.. गळ्यात काळ्या बीड्स ची माळ.. डोक्याला पांढरा क्लच आणि ऑफ़ वाइट शूज.. कशाचा कशाशी मेळ नाही.. नेहा ती काळी बीड्स ची माळ भरपुर वेळा घालते..लकी आहे का काय माहीत..
आणि sponser नसले तरी चांगली रंग संगती आणि creativity तर नक्कीच दाखवता येऊ शकते त्याना.तेवढे तर पैसे नक्कीच असणार त्यांच्याकडे

चला शिवानीची विकेट काढली शेवटी. काढली म्हणतोय कारण शिवानीला आणि तिच्या इथल्या चाहत्यांना ती लंबी रेसचा घोडा वाटत होती. आणि ज्या रितीने फिल्डिंग लावुन काढली यावरुन घराच्या आत आणि बाहेर स्टर्न मेसेज द्यायचा बिबॉचा उद्देश दिसुन येतोय. मांजरेकरांनी पण तिचं इविक्शन बर्‍यापैकि हँडल केलं, पण सलमानच्या तोडिचं नाहि. हिंदी बिबॉ मध्ये असंच एक कनेडियन कॅरेक्टर होतं. म्हणजे मेंटली डिस्टर्ब्ड नाहि पण उद्धट, आणि बिबॉला कायद्याची धमकी देणारं. सलमानने तिची रागाने "गेट आउट ऑफ माय हाउस" बजावुन हकालपट्टी केली होती... Happy

राजेश आणि शिवानीची तुलना होऊ शकत नाही कारण राजेशने bb ला कधी धमकी दिली नाही. हिने दिली आणि तीही लीगल तिथेच ती फसली. शेवटी पण कॅमेऱ्यासमोर म्हणाली तुम्ही लिगली कारवाई करणार आहात तर करा, जे होईल ते मी भोगायला तयार आहे.

राजेशने दादागिरी अति केली आणि फालतू प्रेमप्रकरण जे आवडत नव्हतं कोणाला. पण हिने शेवटचे टोक गाठलं.

रायवल channels वर काम मिळू शकेल तिला सध्या.

वीणा आणि नेहा ज्यात त्यात भोचकपणा करतात आणि अ बि नी अपशब्द उच्चारले जे channel दाखवू शकले नाहीत तर ह्या सर्वांनाही ममांनी बोलायला हवंय.

हीना पांचाळ मला काही एवढी impressive वाटली नाही. चांगली खेळली तर बघूया.

ज्या पद्धतीने तिने ममा ला रोखून पाहिले- त्याला म्हणतात गट्स...

शिवानी राहायला पाहिजे होती, पण तिचीच इच्छा नाही मग विषयच संपला.

बिग बॉस मधली मजाच संपली आता..

बिग बॉस विल बी बोरिंग नाऊ.
वीणा जगताप जिंकेल बहुतेक.

वीणा, रूपाली फुसके बार आहेत. पराग अतीशहाणा, केळ्या बिनडोक रड्या. नेहा आगाऊ फुटेजखाऊ, वैशाली चोंबडी. इतर खिजगणीतच नाहीत कुणाच्या.
एकंदरीत हा सिझन अफाट बोअरींग आहे. शिवानीला मानसिक उपचारांची तातडीने गरज आहे. (ह्यात तिची हेटाळणी करण्याचा उद्देश नाही. तिची काळजी वाटल्याने म्हणत आहे.

अतिशय उद्धट रुड असलेल्या शिवानीला काल व्यवस्थित अपमान करून बाहेरचा रस्ता दाखवला ते आवडलं. कालचा एपिसोड या सीझनचा बेस्ट एपिसोड होता. शिवानीबद्दल अजिबात सहानुभूती वाटली नाही.
बाकी तिला काही मेंटल इश्यू असतील तर घरच्यांनी हँडल करावे. तिची ती कोण सासू आहे त्या माऊलीचे मात्र जाऊन सर्वांनी पायच धरले पाहिजेत.

शिवानीबद्दल अजिबात सहानुभूती वाटली नाही.आणि ते ज्या अपमानास्पद पद्धतीने तिला मिळालं त्याकरता ती डिझर्व करत होतीच . बाकी तिला तर घराबाहेर जायचंच होत . मग मिळालं ना तिला ते . विषयच संपला . आज दिगंबर गेला . तो जाणार होताच . पुढच्या आठवड्यात कदाचित बाप्पा . म्हणून आज बाप्पाच्या बायकोला पण बोलावून घेतलं . थत्ते यांच्या बायकोसारखच Happy

आज बऱ्यापैकी चुकलेल्या सर्वांची शाळा घेतली महेशसरांनी. शिववर नाही चिडले हे बघून बरं वाटलं मला, नाहीतर बोलणार त्याला असं वाटलं होतं. सुरेखाताई rocking हा, एकदम चमकल्या. गाजवलं त्यांनी.

दिगंबर नाईक evict झाले, थोडं वाईट वाटलं, त्यांनी शाळा task खूप छान केलेला.

वीणा, रूपाली फुसके बार आहेत. पराग अतीशहाणा, केळ्या बिनडोक रड्या. नेहा आगाऊ फुटेजखाऊ, वैशाली चोंबडी. इतर खिजगणीतच नाहीत कुणाच्या.
एकंदरीत हा सिझन अफाट बोअरींग आहे. शिवानीला मानसिक उपचारांची तातडीने गरज आहे. (ह्यात तिची हेटाळणी करण्याचा उद्देश नाही. तिची काळजी वाटल्याने म्हणत आहे. >>>

मस्त पोस्ट पुंबा.

एवढी फिल्डिंग लाऊन पण अ बि शेवटून दुसरे होते हे त्यांनी लक्षात ठेवावं. मी असा आणि मी तसा करत असतात आणि स्वतः ला मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती समजतात.

वीणा, रूपाली फुसके बार आहेत.>> हे मात्र चुकलं . वीणा लक्ष्मी बॉम्ब आहे
सगळ्यांची फुटेज खायला धांदल उडाली . नाहीतर आपलं काही खर नाही असं वाटलं आज वैशालीला आणि सुरेखा ताईंनी तर धमाल उडवून दिली Lol

आज मात्र मजा आणली ती सुरेखा ताईंनी....काय झाडलाय बिचुकलेला. तो ही हसत होता. (इतर कोण असे म्हणाले असते तर तो भडकला असता). मांजरेकर पण म्हणाले की सुरेखाताईंनी अशी शाळा रोज घेतली तर त्यांना शनिवार-रवीवारी लोकांची शाळा घ्यायची गरज पडणार नाही.

पूर्वी बिचुकले बद्दल थोडे फार वाटायचे पण हल्ली तो फारच उतरलाय. मुलाशी बोलत असताना बायको फोनवर आली तर लगेच काही बाही सेटींग करायची सांगू लागला. बिगबॉसने लगेच फोन कट केला त्याचा.

काल शिवानीला काढले ते बरे वाटले. फारच अती करत होती. जाताना मांजरेकरांना टशन मात्र मस्त देऊन गेली. ती बाहेर गेल्यावर एक सुद्धा तिच्याबद्दल बोलला असेल किंवा तिचा उल्लेख केला असेल तर ते मुद्दाम दाखवले नाही. (फक्ता नेहाला रडताना दाखवले).

मुलाशी बोलत असताना बायको फोनवर आली तर लगेच काही बाही सेटींग करायची सांगू लागला. बिगबॉसने लगेच फोन कट केला त्याचा. >>> exactlly. बायकोला पण फार ते आवडलं नाही बहुतेक. Bb च्या पण लक्षात आलं आणि फोन कट केला त्यांनी. मनातून उतरले ते एकदम. तसेही ते मला आवडत नाहीत फार पहिल्यापासूनच. सुरेखाताईनी मस्त जिरवली त्यांची.

मला पण विणा आवडते. शिव पण आवडतो. विणा परागला म्हणाली न "तुला शष्प पाणी मिळणार नाही." हा शब्द किती वर्षांनी कानावर आला.

>> हा शब्द किती वर्षांनी कानावर आला.

एक दोन एपिसोड आधीच शिवानी ने बिग बॉस बद्दल बोलताना वापरलेला तो शब्द..... ते शष्प ऐकत नाहीत वगैरे असे काहीतरी!

वैशाली फितुर शब्दावर केवढी भडकली . खरं बोललं की राग येतो. चोरीच्या टास्क च्या वेळची फितुरी दाखवायला पाहिजे तिला बिबॉ ने.
वैशाली इतकी सतत स्वतः फार मोठी स्टार समजते. पराग ला म्हणाली की मला काम नाही म्हणुन मी नाही आले इथे. पराग ला म्हणत होती की तुझं बाहेर काहीही नाहिये .एवढच काम आहे तर जा ना मग परत...कशाला आलीस.

वीणा कधी कधी इरीटेट करत असली तरी बोलताना मुद्द्याचं बोलतं बरेचदा.
सुरेखा ताई रॉक्स..कसलं भारी बोलल्या आज त्या.

बिचुकले खरच उतरलाय मनातुन. वीणा ला मोलकरणीचा दर्जा देत होता ते अज्जिबात नाही आवडलं. बिचुकले फारच वाईट राहतो असं दिसतय. स्वच्छ्ता वगैरे पाळत नसावा. लोक वैतागणारच ना॑ अशा लोकांवर..

अभिजित केळकर ची मुलं गोड बोलत होती. त्याचा फोन कॉल खुप जेन्युईन वाटला...आणि ते गाणं पण…
बिचुकले चा फोन कॉल काहीही होता Happy मुलाला काय सांगत होता तुला मोठा करणार... महाराज काय....मी याव नी त्याव..असं कोण बोलतं आपल्या ६ वर्षाच्या मुलाशी...आणि बळच गाणं गायची काय गरज..का केळकर च्या मुलांनी गायलं म्हणुन आपण पण गायचं...आपल्या बायकोला लगेच वोटींग बद्दल सांगायला लागला….त्याची बडबड सुरु झाल्यावर बाकी लोकांचे चेहेरे कसे झाले होते Happy

बाप्पा न त्याच्या पोराचा फोन पण मस्त Happy बाप्पा मस्त माणुस वाटला पण ...एकदम हॅपी गो लकी.

एक दोन एपिसोड आधीच शिवानी ने बिग बॉस बद्दल बोलताना वापरलेला तो शब्द..... ते शष्प ऐकत नाहीत वगैरे असे काहीतरी!>>>>>> अच्छा हो का? बघितलं नाही हे. धन्स स्वरुप.
स्मिता पुर्ण पोस्ट पटली.

बाप्पा खरच मस्तं माणुस वाटला, एकदम दिलखुलास, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर असलेला कलाकार !
मुलगा आणि बायकोशीही किती मस्तं बोलला , म.मांनाही व्यवस्थित उत्तरं देतो फक्तं गेममधला इंटरेस्ट गेलेलाय त्याचा.
बाप्पाला दिलेल्या सिक्रेट टास्कचं काय झालं दाखवलच नाही .
माधवचाही चेहरा पडला होता थ्रुआउट , स्कुल टास्क इतका चांगला करून नो अ‍ॅप्रिसिएशन आणि शिवानीची समजुत काढल्याबद्दल बोलणी खाल्ल्ल्यामुळे !
बिचुकले आता कंप्लिट गलपटलेत , काय वाट्टेल ते बोलत होते आणि वीणा शिव्या जरी देत नसली तरी अख्या घरातली सर्वात अनॉयिंग पर्सन आहे, जुई गडकरीपेक्षा बेकार अ‍ॅटीट्युड आणि इरिटेटींग आवाज.
पराग ओव्हरकॉन्फिडन्ट नं १ आणि वैशाली विनाकारण लाउड होतेय.
थोडक्यात सगळ्यांची खरी रुपं समोर येतायेत, मेघा म्हणते त्याप्रमाणे १०० दिवस कोणी मुखवटा घेऊन वावरु शकत नाही, इथे तर ३ आठवड्यात दिसतायेत खरे चेहरे.
सुरेखा पुणेकरांनी आजही मज्जा आणली आजही.
असो, मांजरेकरांनी हा वीकेन्ड बर्यापैकी बॅलन्स्ड ठेवला !

क्राऊन अगदि योग्य डोक्यांवर ठेवले गेले..
दिगंबरची एक्झिट कार्यक्रमातुन बरी नाहि वाटली.. काहि करायला त्याने सुरवात केली अन बाहेर पडला.. त्याची मुलगीहि छान बोलली त्याच्याशी.
आता पुढचा नंबर बिचुकलेचा असेल.. वोटिंगवरुन वाटतय.
पराग डोकं चालवतो पण सगळं फ्लॉप होतं अन मग शाब्दिक मार खातो ममां कडुन Happy
वीणा खुपच काडी टाकणारी वाटते..काहि नसताना काल उगाच नेहाची चुगली करत होती.

अनकट मधे बघितलं, शिवानीच्या तासाला किशोरी शहाणे नी साउथ इंडियन अ‍ॅक्सेंट मधे जोक भारी सांगितला.

बिचुकले नाही जाणार, आजही मला नाही वाटत तो बॉटम २ मधे होता म्हणून, सो.मि वर प्रचंड सपोर्ट आहे त्याला.
बहुदा परागनी तो कन्दी पेढे तयार ठेवा जोक मारला म्हणून उगीच दाखवलं त्याला बॉटम २ मधे.
परागलाच कोण व्होट करतो आश्चर्य वाटत आहे, खूप काही सपोर्ट दिसत नाहीये त्याला सोशल मिडीयावर, उलट हेटर्स आहेत त्याला.
पण पराग- बिचुकले दोघेही चॅनलचे लाडके दिसतायेत, एलिमिनेट नाही होणार.
शिवानी गेल्यावर आता दुसरी गँग कोण लिड करतय पहयला हवं, माधवने किंवा नेहानी घ्यायला हवा लिड !

हो माधवने लिड कराव.. पण इतके छक्के-पंजे नाहित त्याच्याकडे.. त्यासाठी नेहा बरी आहे.
हो नं काल बिचुकले इतकं ममांच्या समोर बोलत होता..पण त्याला नाहि घेतलं लाईनीत..
ममां ना वीणाहि नाहि आवडत.. असं वाटत.

बिचुकले इतक्यात जाणार नाही पण जिंकणार पण नाहीत. पराग सगळ्यांनाच आवडतोय . न्यू एंट्री हिनाने पण सांगितलं तो छान खेळतोय . माधवच्या बायकोची मुलाखत बघितली ती पण सांगतेय पराग खूप छान खेळतोय आहे म्हणून . थोडक्यात पराग चांगलं खेळतोय असं बऱ्याच जणांना वाटतंय. वीणा मला स्वतःला पर्फेकट बोलणारी वाटते. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायलाच पाहिजे . बिचुकले खूप घाणेरडे आहेत पाण्याच्या टास्क चाय वेळी दुपारी एक वाजेपर्यंत दात सुद्धा घासले नव्हते . शिवानी शाळेच्या टास्क मध्ये त्यांना जवळ बसू देत नव्हती कारण त्यांच्या घामाला वास येतो .ते अतिशय अस्वच्छ आणि गचाळ आहेत . म्हणून पहिल्यापासून लेडीज ना त्रास होतोय त्यांचा . वीणा बोलते म्हणून दिसते एवढाच काय तो फरक . परत वीणाला धमक्या देत होता, माझे फॅन्स मारतील बाहेर हिला म्हणून. आणि एका बापाची तरी अवलाद आहेस का तू .?म्हणून विचारलं . बिग बॉस तरी कस ऐकून घेतात. ? कोण समजतो कोण स्वतःला ?

स्मिता पुर्ण पोस्ट पटली.>>>>+1111111

माधवचाही चेहरा पडला होता थ्रुआउट , स्कुल टास्क इतका चांगला करून नो अ‍ॅप्रिसिएशन आणि शिवानीची समजुत काढल्याबद्दल बोलणी खाल्ल्ल्यामुळे !>>>> हो ना

चॅनलनेच बिचुकलेना लाडावून ठेवलाय . हसवतो म्हणून . इंस्टाग्राम वर एक क्लिप बघितली . किशोरी ताईंना तो धमकावतो आहे . मला तुम्ही नॉमिनेट नाही करायच . समजलं ना ? संपला विषय म्हणे . तो पर्यंत किशोरी काही बोलली नाही. मग म्हणतो " मग काही तरी काड्या नाही लावायच्या" . तेव्हा किशोरीने ने त्यांना टोकलं . बिचुकले असली भाषा माझ्या समोर नाही बोलायची . बिचुकले एकदम राष्ट्रपती च समजायला लागला का स्वतःला ? डोक्यावर पडलेला माणूस Angry

Pages