मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात कालचे वैशालीचे गाणे, लग जा गले.. इतकं भयानक वाटले एकायला. तिचे ते “शायद” वगैरे उच्चार आणि किरट्या आवाजात्ले “ मुलाकात“ तार स्वरात उच्चारणे बेकार होते.>>>>
+११११११११

शिव आवडतो म्हणता म्हणता आज लागली वाट त्याची , नेहापुढे पेशन्स ठेवणे नाही जमलं त्याला आणि त्याचं लेक्चर तर त्याहून बथ्थड !
मला आज नेहा जाम म्हणजे जामच आवडली , ‘काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले‘ , काय मस्तं ट्रिगर दाबला शिव सरांचा Biggrin रुपालीच्या लेक्चरलाही वर्गाबाहेर काढलेली नापास नेहाच फुटेज खात होती, मजा आली.
शिक्षक सगळेच अति डंब आणि स्टुडन्ट्स मात्रं एकसे एक महावस्ताद शालजोडीतले हणणारे होते , त्यात माधव-केळ्या दोघांनी फार छान सोंग घेतले होते आणि बाप्पा, बिचुकले लय धमाल आणत होते , बाई वाड्यावर या Rofl
शिवानी चक्क आज सायलेन्ट मोडमधे, मनावर घेतलेलं दिसतय ताईंनी म.मां च लेक्चर , आताविक्र्न्डचा आरोपी म्हणून बोलणी खाणे शिवानीवरून शिवकडे (अजुन जास्तं) शिफ्ट होणार.
शिवने विचार केला असेल तसेही बोलणी खायचीच मग ती डंबनेसवरून खाण्यापेक्षा बॅडबॉय बनून खावी Proud
उद्याच्या प्रोमोमधे शिव आणि वीणा प्रेमरंगी रंगतायेत, थोडक्यात पराग आवडेनासा झाला तसा शिवही आवडेनासा होणार जर अजुन एक फेक प्रेमकथा बघायला लावली तर , तेही त्या वीणाअंटी बरोबर !

ह्या बिबॉ कडे नवीन टास्क नाहीत का,तेच तेच काय आणत आहेत.बोअर झाल काल,अजिबात आवडला नाही कालचा भाग.
माधवला तर आपण सरस्वती मधलेच आहोत अस वाटत होत.
शिवानी तर एकदम गप्पच.सगळ सेटिंग कळत आहे,अचानक दिगंबर दिसला,काल बिचुकले पण अति करत होते.
त्यामुळे कालचा भाग टीव्हीवर न बघता वूटवरच पाहिला.
तिकडे झीम वर तुपारेची टीम आली होती,मजा आली खूप दिवसांनी पाहत असल्याने.
एकंदरीत बिबॉ मधला इंटरेस्ट कमी होत आहे,आतातर विकएंड मध्ये काय होणार हे ही माहित आहे,आधी ममांकडून शिवानीच कौतुक,मग शिववर बरसणार.तेच तेच.
जर टीआरपी कमी झाला,तर मालिका जशी गुंडाळतात,तस हे ही गुंडाळतात का की तसच 100दिवस खेचतात?

बाप्पाला काय सिक्रेट मिशन दिलय? माझं मिस झालं, त्याला बिग बॉस ने बोलावुन काहितरी सांगितलं ना?

त्यात कालचे वैशालीचे गाणे, लग जा गले.. इतकं भयानक वाटले एकायला. तिचे ते “शायद” वगैरे उच्चार आणि किरट्या आवाजात्ले “ मुलाकात“ तार स्वरात उच्चारणे बेकार होते.>>>> +++1
actuly mala avadto ticha aavaaj pan BB madhe ti kashitarich gaatey.

नेहा त्याला ते नियम मोडण्याचा त्यांचा वाद झाला आतमध्ये तेव्हापासुनच ट्राप करण्याचा प्रयत्न करत होती आणी तो शेवटी फसला. मांजरेकरांना बकरा मिळाला अर्धा तासासाठी>>>> अगदी अगदी...

आणि नंतर अचानक बिबॉ नी म्हटले अजून दोन नॉमिनेट करा तर अचानक माधव आणि बिचुकले ही नावं बळं च पुढे आली आणि मान्य पण झाली सर्वांना? हेही नवलच.>>>>>>> नियम तोडण्यावरुन मला वाट्लं होतं कि शिवानी आणि विणाचं नाव घेतील लोक, त्याचं नाव कोणि का नाही घेतलं?

शिव ला *ळ* बोलता येत नाही,यावरून त्याला चिडवले ते पटले नाही,
तो त्याच्या वाणीदोष असेल तर त्यावरून कोणीही त्याला बोलणे म्हणजे व्यंगची खिल्ली उडवल्यासारखे वाटले

त्यात कालचे वैशालीचे गाणे, लग जा गले.. इतकं भयानक वाटले एकायला. तिचे ते “शायद” वगैरे उच्चार आणि किरट्या आवाजात्ले “ मुलाकात“ तार स्वरात उच्चारणे बेकार होते.>>>> +++1मला वाटत होतं मलाच असं वाटतंय कि काय !
बाप्पाला काय सिक्रेट मिशन दिलय? >> एक कागद दिलाय आणि त्यावर कोण नियम मोडतंय त्यांची नाव कोणाला कळू न देता लिहायची . या आठवड्यात कोणी कॅप्टन नाहीये म्हणून लक्ष ठेवायला सांगितलंय ..
काल त्या दोघांची नावं का सांगितली वगैरे विषय चालू होता तेव्हा केळकर शिव च्या विरुद्ध बोलत होता ..विरुद्ध असं नाही पण दिगंबर ला म्हणाला हे सगळं काळ का नाही बोललात आज बोलून काय उपयोग वगैरे .. आणि जसा शिव त्या रूम मध्ये आला मग लगेच ..अमुक काम ही कॅप्टन ची जबाबदारी नाहीये त्याची काही चूक नाही वगैरे चालू केलं .. शाळा सुरु व्हायच्या आधी पण शिव ला बोलला मला नापास करू नको ..

केळकर शिव च्या विरुद्ध बोलत होता ..विरुद्ध असं नाही पण दिगंबर ला म्हणाला हे सगळं काळ का नाही बोललात आज बोलून काय उपयोग वगैरे .. आणि जसा शिव त्या रूम मध्ये आला मग लगेच ..अमुक काम ही कॅप्टन ची जबाबदारी नाहीये त्याची काही चूक नाही वगैरे चालू केलं .>>>>>> हो हो बघितलं , अजिबात डेअरिंग नाही त्याच्यात तोंडावर बोलायचि.

बाप्पाला काय सिक्रेट मिशन दिलय? >> एक कागद दिलाय आणि त्यावर कोण नियम मोडतंय त्यांची नाव कोणाला कळू न देता लिहायची . या आठवड्यात कोणी कॅप्टन नाहीये म्हणून लक्ष ठेवायला सांगितलंय ..>>>>>>> थॅक्यु अंजली

शिव ला *ळ* बोलता येत नाही,यावरून त्याला चिडवले ते पटले नाही,>>हो ना .. .नेहा ला शिव ला फक्त उचकवायचं होतं ..बाकी काही पॉइंट सापडले नाही मग हाच एक .
माझ्या माहितीत असे बरेच जण आहेत जे 'ळ' ला 'ड' म्हणतात .. अमरावती /मालेगाव /जळगाव /गोंदिया साईड ला बहुतेक हिंदी मिश्रित भाषा बोलतात त्यात 'ळ' नसतोच बहुतेक.

बाप्पाला काय सिक्रेट मिशन दिलय? >> एक कागद दिलाय आणि त्यावर कोण नियम मोडतंय त्यांची नाव कोणाला कळू न देता लिहायची . या आठवड्यात कोणी कॅप्टन नाहीये म्हणून लक्ष ठेवायला सांगितलंय ..>>>>>>बाप्पा अनबायस्ड राहुन करेल का हे टास्क ? बघायला पाहिजे. आणि किती दिवस त्याने असं लिहायचं काय माहित?

शिव अजिबात आवडत नाहि .. माफी मागण्याची किती नाटकं त्याची.. नेहाला अजिबात बघुन घेत नाहि.. अन चुगलखोर..
काल हेडमास्तरीण बाईंच्या तासालाच मजा आली... एरव्ही नेहाने मजा आणली. Happy

नेहा आजिबातच आवडत नाही. तिचं काहीच नैसर्गिक वाटत नाही. जुने सिझन्स बघून स्ट्रॅटजी आखून केलेले प्लान्स वाटतात. मेघाला कॉपी करण्याचा प्रयत्न दिसतो. तिच्यापेक्षा शिव खुप नॅचरल वाटतो.
सध्या आवडते प्लेयर्स: शिव, सुरेखाबाई, पराग, रूपाली

मला तर बिचुकलेची आणि नेहाची strategy छान वाटली. खेळात रंगात आणली त्यांनी. हे मान्य की नेहानी शिव ला उच्चारावरून चिडवायला नको होतं. पण त्याची चूक खूपच मोठी होती. घरच्यांना ह्यामध्ये drag करायची काहीच गरज नव्हती. ह्या चुकीसाठी त्याला 'तो बालिश आहे' म्हणून माफी मिळू शकत नाही.

अभिजित केळकरनी नेहाविरुद्ध रचलेलं कारस्थान नाही आवडलं. दिवसेंदिवस तो खालच्या लेवल वर जाऊन खेळायला लागलाय! एक माणूस म्हणून respect निघून जावा असं वागतोय घरात!

परागचं shining अशक्य irritating होत चाललं आहे. किशोरी आणि इतर बालिका चमू स्वतःची डोकी गहाण ठेवून खेळात आहेत असं वाटतं.

overall कालचा दिवस तसा bore होता.

नेहा स्मार्ट गेम खेळतेय. ती शिवानीसारखी आततायी नाहीये पण सतत काहीतरी करून फोकस मधे रहातेय. शिव ची कशी चूक होती हे उगीच दळण होतं. तिच्या लक्षात आलं शिव उचकतोय तर तिने खूप वेळ खेचलं ते.
केळ्या आणि मॅडी चांगले खेळतायत खर तर पण बहुतेक फार सेफ खेळतात त्यामुळे तिथे त्या लाउड बायकांच्या गर्दीत त्यांना हवे तितके अटेन्शन आणि अप्रिसिएशन नाही मिळत आहे. मेन मधे जास्त अटेन्शन पराग आणि बिचुकलेला मिळतंय.
पराग च्या आयडिया पुस्तकी वाटतात मला. अफेअर करणे असो वा ग्रुप बनवून खोटी दोस्ती दाखवणे, नाहीतर ते ग्रुप ने युनिटी, रिस्पेक्ट, लव असले बालिश घोषणा देणे. स्पॉन्टॅनियस नाही वाटत ते. मेघा, सई पुष्कर लोकप्रिय झाले होते कारण त्यांचं बाँडिंग खरं वाटायचं. हे लोक भंपक वाटतात.
काल एक नोटिस केलं का? बिचुकले शिवानीच्या शेजारी बसायला जात होते सारखे आणि शिवानी ला ते आवडत नव्हतं. ती सारखी टाळत होती, जास्त तमाशा न करता. माधव ला बोलावले तिने शेवटी शेजारी बसायला. तरी बिचुकलेंचे तेच. शिवानी खूपच अ‍ॅलर्ट आणि अनकंफर्टेबल वाटली त्या गोष्टीबद्दल. बिचुकले तिच्या जरा जास्त मागे मागे करत असावेत बहुधा.

मला शिव आवडतोय अजूनही. परागबद्दल साशंक आहे मात्र मी, smart player आहे पण कधी कधी अतिशहाणा होतोय. वकीली केली वीणाची तेव्हा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं वाटलं होतं.

शिवानी खूपच अ‍ॅलर्ट आणि अनकंफर्टेबल वाटली त्या गोष्टीबद्दल. बिचुकले तिच्या जरा जास्त मागे मागे करत असावेत बहुधा. >>>हो, ते पहिल्या दिवसापासून तिच्या मागे आहेत. पण ही गेमसाठी आणि बाहेर ते फेमस आहेत म्हणून त्यांना सहन करतेय.

शिव लंबी रेसका घोडा आहे खरंतर पण म मां, channel त्याचा बळी देतील की काय ह्या बाकीच्यांसाठी असं वाटतं.

टास्क छान झाला. माधव आणि बिचुकलेने मजा आणली. बिचुकलेचा कोम्बडा भारी होता. Lol

शिव टास्क खेळायच सोडून नेहाला उचकवत होता. शिव आणि नेहा दोघान्च चुकल.

शिवानी आज शान्त होती.

नेहाने स्मिताची स्ट्रेटॅजी वापरली स्विमिन्ग करण्याची.

इथे काही आयडिना बाई वाड्यावर या याची मौज वाटली आहे.
बहुधा अर्थ माहिती नसावा >>>>>>>> पण रुपालीने सुद्दा तोडीस तोड उत्तर दिल त्याला, ' शनिवारी येईन मी वाडयात.'

किशोरीने बिग बॉस शाळेच नाव इन्ग्रजीमध्ये लिहिल.

ते ' वाढदिवसाच्या शुभेच्छा' गाण मात्र जाम विनोदी होत. Lol

अजुन एक फेक प्रेमकथा बघायला लावली तर , तेही त्या वीणाअंटी बरोबर ! >>>>>> विणाआन्टी? मला तरी ती आण्टी वाटत नाही दिसण्यात. हा वागण्यात असू शकते. शिव आणि वीणाच्या लव एन्गलविषयी पहिल्यापासूनच डाउट येत होता. दोघ हिण्टस देत होते कधीपासून. तसे दोघे एकमेकान्ना शोभतात.

शिव आता ओपन होतोय, त्याने टारगेट हि मस्त पकडलंय - नेहा. तिचे ऑलरेडी शत्रु बरेच असल्याने तिचा पत्ता कट करण्यात तो यशस्वी होउ शकतो. रुपाली बेस्ट टिचर सो फार. गृहपाठ करुन आली होती, हायजीनचा विषय निवडला म्हणजे... Happy

मला तर बाबा वैशालीचं गाणं आवडलं. बिबॉ मध्ये हे गाणं यापुर्वि हि इंप्राम्प्ट्यु गायलं गेलंय आणि वैशाली तर गायिकाच आहे, तिच्या गाण्याला तोड नाहि. तिने "जिवलगा..." पण छान गायलं. लताबाई/आशाताईंची हि गाणी सोप्पी नाहित...

काल एक नोटिस केलं का? बिचुकले शिवानीच्या शेजारी बसायला जात होते सारखे आणि शिवानी ला ते आवडत नव्हतं. ती सारखी टाळत होती, जास्त तमाशा न करता. >> हो . शिवानी "शी वास येतो त्यांच्या घामाचा" असं काहीतरी बोलली . एकंदरच बिचुकले खूप अस्वच्छ आहेत . काल पण नेहा त्यांना बोलली ती बेसिन मध्ये भांडी घासत होती . तर त्यांनी येऊन तिथेच चूळ टाकली म्हणून ती त्यांना बोलत होती . वीणा पण मागच्या आठवड्यात पॅण्ट सारखी घसरते म्हणून तक्रार करत होतीच . आता सगळे जण त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला लागलेच किंवा टाळत आहेत कारण त्यांच्या वर ओरडून या बायकाच व्हिलन ठरल्या आहेत .मला पण वीणा आंटी नाही वाटत Happy

नेहा आजिबातच आवडत नाही. तिचं काहीच नैसर्गिक वाटत नाही. जुने सिझन्स बघून स्ट्रॅटजी आखून केलेले प्लान्स वाटतात. मेघाला कॉपी करण्याचा प्रयत्न दिसतो. तिच्यापेक्षा शिव खुप नॅचरल वाटतो.>>>+1111
मला पण नेहा अजिबात आवडत नाही...ती खरच मेघा ला coppy करायला बघते पण मेघा, मेघा होती यार.. ती मेघा मनाने खूप चांगली होती... ती जे काही भांडायची ते टास्क पुरतं असायचं.. अन्‌ she was a brilliant player... नेहा किती नाटकं करते.. विनाकारण भांडते काय, रडते काय... Fake वाटतं सगळंच... Main म्हणजे मेघाने स्वतःचे हक्काचे माणसं कमावली होती... In fact तिनेच सगळ्यांना एकत्र आणले होते... नेहा मात्र तिच्या वागणुकीमुळे एका आठवड्यातच सगळ्यांची नावडती बनली.. या सगळ्या कारणांमुळे नेहा टास्क कितीही चांगला खेळत असली तरी व्यक्ति म्हणून मला ती नाही आवडत..
शिवचे scenes आवडतात.. तो कमी बोलतो पण जे बोलतो ते एक तर to the point असतं किंवा कॉमेडी असतं.... त्याचंआणि वीणाच bonding पण आवडलं कारण ते नॅचरल वाटतं.. रूपाली आणि पराग सारखं fake वाटत नाही..

नेहाने स्मिताची स्ट्रेटॅजी वापरली स्विमिन्ग करण्याची.>>+१
यावरुन एक आठवलं, ती पोहत असताना आत वीणा कुणाशीतरी 'बिडूक' वगैरे काहीतरी नेहाला उद्देशून म्हणत होती...नीटसं ऐकू आलं नाही, पण नाही आवडलं. बाकी वेळेस, वीणा आवडते. काल स्वरुपने स्विमींग पूलला दिलेली हौदाची उपमाही अगदीच पटली.
>>पराग च्या आयडिया पुस्तकी वाटतात मला. अफेअर करणे असो वा ग्रुप बनवून खोटी दोस्ती दाखवणे, नाहीतर ते ग्रुप ने युनिटी, रिस्पेक्ट, लव असले बालिश घोषणा देणे. स्पॉन्टॅनियस नाही वाटत ते. मेघा, सई पुष्कर लोकप्रिय झाले होते कारण त्यांचं बाँडिंग खरं वाटायचं. हे लोक भंपक वाटतात.>>+१

हो, बिचुकले शिवानीला टास्कच्या सुरवातीपासूनच फार अन्कम्फर्टेबल करत होते, मला ही मैत्रीण आवडते करत मागेमागे करून !
शिवानी शान्त आहे पण वादळापूर्वीची शान्तता असु शकते, जेंव्हा तिची सटकेल, बिचुकलेंचं काही खरं नाही.
बिचुकले फॅन्स यावर उगीचच स्ट्राँग्ली रिअ‍ॅक्ट झालेत, म्हणे बिचुकलेंना अस्पृश्य असल्यासारखी ट्रिटमेन्ट दिली तिने .
असो, तर मला वीणा काही केल तरी काकुबाईच वाटते, शिव बरोबर अजिबात शोभत नाही Proud
शिव आवडतोच पण काल नाही आवडला अजिबात, नेहा लगेचच यशस्वी झाली त्याला इरिटेट करण्यात, इतक्या लगेच टेंपर लुझ केला त्यानी.
सल्लुभाईने मेघाला जे समजावलं होतं लास्ट सिझन , जेंव्हा दीपक तिला अत्यंत पराकोटीचं इरिटेट करायचा, “वो तो इन्टिगेट करेंगेही, आप क्युं अपनी सेल्फ रिस्पेक्ट खो रही है, आपको तो गेम पता है’, तेच शिवला सांगावासं वाटलं, पण शिवचं डोकं तापल, शिवाय तो परागच्या डोक्याने खेळतोय हे त्याच्या इंडीव्हिज्युअल गेमसाठी नॉट गुड , तो गृप प्रेक्षकांना आवडत वगैरे अजिबात नाही उगीच मांजरेकरांनी समज करू दिलाय तसा, कारण ऑपोझिट गृपच्या शिवानी-नेहा लाउड माउथ आहेत .
वीणा, किशोरी, रुपाली बिनडोक आहेत , परागला अशीच पपेट्स हवी होती कंट्रोल करायला , पण शिव स्ट्राँग प्लेयर आहे, त्याने स्वतःच्या डोक्यानी खेळावं.

बिचुकलेने गाढवपणा करून भलत्या डिरेक्शन ला जाऊ नये. ती शिवानी तिथे व्हिलन असली तरी असं एखाद्या मुलीशी तिला अनकंफर्टेबल वाटेल अशी सलगी करणे असले प्रकार केले तर फॅन्स गमावेलच आणि शिवानी ने त्याचा इशू केला तर तडक एलिमिनेट पण होऊ शकेल तो.
होपफुली लाइन क्रॉस करू नये त्याने. सुरुवातीपासून एकटाच राहून जसा वेडेविद्रे एंटरटेन करत होता तसे च चालू ठेवावे , तेच हिताचे आहे त्याच्या साठी.

शिवाय बिचुकले मागच्या भागात असही म्हंटले ‘मी सुध्दा खूप स्वच्छता पाळतो इतका कि मी एकटाच एका फ्लॅटमधे रहातो, मला बायको सुध्द्दा सहन होत नाही‘

शिवानी "शी वास येतो त्यांच्या घामाचा" असं काहीतरी बोलली . एकंदरच बिचुकले खूप अस्वच्छ आहेत .>> हो ती असच काहिसं बोलली की वास येतो.. एक नोटीस केल का कोणी..कालच्या स्गिव दिगंबर च्या भांडणाच्या वेळी बेडरूम चा लॉन्ग शॉट होता.. त्यात पुरुषांच्या बेडरूम मध्ये सगळ्यांचा बेड नीट लावलेला होता..एकटा बिचुकले बाबा बेद वर लोळत होता आणि बेड च्या ड्रॉवर मधून सगळे कपडे बाहेर डोकावत होते..ते एटलीस्ट ड्रॉवर मध्ये कोम्बून दार तरी नीट लावायच..
रुपाली पण तिच्या तासाला म्हणाली की नख वाढली आहेत...शनिवारी अचानक एक दातच काय पडला त्यांचा..(दातांची स्वछते बाबत आळस)

Bollywood spy मध्ये आस्ताद ने काही मतं व्यक्त केली आहेत BBM 2 बद्दल.. ती ऐकून अस वाटतंय की ममां ऐवजी astad होस्ट असायला हवा होता... मस्त बोलतोय तो....

आज शिवानीची काहीतरी रडारड चालू आहे. तिचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. ती सांगत होती की बिग बॉस टीम तिला कोकीळाबेन मध्ये घेऊन गेले होते. जी ट्रिटमेंट दोन दिवसाच्या आतच करायची होती ती केली आहे. (अशी कोणती गोष्ट असू शकते?) .

आता त्या गोष्टीचा तिला मानसिक त्रास होत आहे बहूतेक आणि ती बाहेर जाण्याच्या गोष्टी करतेय. काय सांगायचा प्रयत्न करतेय कोणास ठावूक...

Pages