Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणीही नाही.
कोणीही नाही.
घरच्यांनी नियम पाळले नाहीत बरेचसे म्हणून कॅप्टन कोणीच नाही, रद्द केला task.
परागच मत काही बाबतीत पटत आहे
परागच मत काही बाबतीत पटत आहे की मोठ्या ग्रुपमध्ये भांडण होणार.>>main त्या ग्रुप मध्येच unity नाही आहे.. त्या 4 लोकांचा ग्रुप झाला म्हणुन उरलेले सगळे एकत्र आले.. सगळेच काही एकमेकां ना आवडत.नाही आहेत..पण जमेल तितके दिवस majority चा फायदा घ्यायचा हेच सूत्र आहे.जे परवा थंड पाण्याच्या टास्क च्या वेळी दिसलं
वीणा आणी किशोरी फारच
वीणा आणी किशोरी फारच खोटारड्या निघाल्या पण . वीणा तर क्षणा क्षणाला खोटे बोलते. पुर्ण आठवडा मी बुक्की मारली नाहि असे ती म्हणत होती पण महेशच्या इपिसोड मध्ये मान्य केले. मागच्या सिझनला जुइ गडकरी तशीच वागली होती.
दुसरा ग्रुप तसा ग्रुप नाहिच
दुसरा ग्रुप तसा ग्रुप नाहिच आहे आणी तसेच खेळले पाहिजे. हे चौघे म्हणजे एकाने ठरवले की दुसरा स्वतःचे डोके वापरतच नाहि.
बिचुकलेंची टारगेट ठरलेली आहेत आणी कोणीहि त्यांना इन्फ्ल्युएन्स केले तरी ते स्वतःला हवे तेच करतील हे कालच्या नोमिनेशन वरुन क्लिअर झाले.
अंजुताई
अंजुताई
मैथिली जावकरने या मुलाखतीत
मैथिली जावकरने या मुलाखतीत बराच प्रकाश टाकलाय. नेहा शितोळेबद्दल मोठा खुलासा केलाय. मैथिली सरळ वाटली जरा त्यांच्यात पण त्यामुळेच बाहेर गेली असेल कदाचित
https://www.youtube.com/watch?v=aS1Gse5iRrk
शिवानीला नॉमिनेट नव्हतेच
पराग म्हणाला तिची इमेज तशीही बाहेर खराबच झालीये..ती आपल्याला जितका त्रास देइल तितके आपण positive दिसू..तिला राहू दे अजून.. जेव्हा सुपो अणि तिच भांडण होईल तेव्हा 2 groups पडतील तिकडे.. मार्क माय words म्हणे.. फक्त अती तिथे माती नको व्ह्यायला..
<<<<
शिवानीला नॉमिनेट नव्हतेच करणार पराग अँड गँग , मेघाची स्ट्रॅटेजी आठवा, आउंना कायम एक्स्प्लेन करायची मेघा कि समोरच्या टिम मधले आधी कमजोर स्पर्धक नॉमिनेट करा जेंव्हा आपण त्यांच्याबरोबर नॉमिनेटेड असतो !
कबुल करणार नाही पराग कॅमेराज पुढे पण शिवानी स्ट्राँग आहे ती काही जाणार नाही हे माहित आहे त्याला, उलट तो/ त्याच्या गृपचे लोक जाऊ शकतात शिवानीसमोर नॉमिनेट असतील तर.
त्यांना टिकायचं असेल तर त्यांच्या बरोबर दिग्या- नेहा नॉमिनेट होणे जास्तं बरोबर आहे म्हणून त्यांना केलं नॉमिनेट.
वैशालीला नाही केल नॉमिनेट आश्चर्य वाटलं मला.
Btw उद्याच्या बॅक टु स्कुल टास्क मधे माधव जबरी वाटतोय, मजा येईल
कबुल करणार नाही पराग कॅमेराज
कबुल करणार नाही पराग कॅमेराज पुढे पण शिवानी स्ट्राँग आहे ती काही जाणार नाही हे माहित आहे त्याला, उलट तो/ त्याच्या गृपचे लोक जाऊ शकतात शिवानीसमोर नॉमिनेट असतील तर. >>> काल शिवानी तेच म्हणत होती की मी त्याच्यासमोर nominate झाले तर त्याला कठीण, म्हणून करत नाहीत.
कबुल करणार नाही पराग कॅमेराज
कबुल करणार नाही पराग कॅमेराज पुढे पण शिवानी स्ट्राँग आहे ती काही जाणार नाही हे माहित आहे त्याला, उलट तो/ त्याच्या गृपचे लोक जाऊ शकतात शिवानीसमोर नॉमिनेट असतील तर. >>> बरोबर .
गेल्या दोन तीन दिवसात सगळा
गेल्या दोन तीन दिवसात सगळा बॅकलॉग भरुन काढला.... एपिसोडसचा आणि या धाग्याचाही!
>>Submitted by स्वरुप on 29 May, 2019 - 13:41
अवघ्या दोन दिवसानंतर नोंदवलेल्या बऱ्याचश्या मतांवर आज दोन आठवड्यानंतरही ठाम आहे.... फारसा फरक पडलेला नाही
वीणा जरा जास्तच आवडायला लागली आहे.... तिच्यात एक एलिगन्स आहे, एक क्लास आहे.... ती जे काही करतेय ते आवडतय (अगदी sure/not sure च्या पुसटश्या सीमारेषेवर ती जे काही खोटे बोलली त्यात पण फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही)..... गेम कितपत खेळेल आणि कशी खेळेल माहित नाही पण एक पर्सनॅलिटी म्हणून तिने चांगलेच इंप्रेस केलेय!
नेहा जबरदस्त प्लेयर आहे.... किचन सांभाळतीय, झोकून देउन टास्क करते, लूपहोल्स शोधतीय, स्टॅंड घेतीय, समोरच्याच्या ग्लॅमरने दबून न जाता (जिथे पाहिजे तिथे योग्य आदर ठेउन) ठाम विरोध करतीय, गरज असेल तिथे फारसा इगो मध्ये न आणता चटकन सॉरी म्हणून टाकतीय, शिवानीच्या रुपाने तिने आता एक मैत्रीण (सपोर्ट सिस्टीम) ही मिळवलीय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या गेमचा आणि होस्टचा आदर करतीय, नॉमीनेशनला घाबरतीय (म्हणजेच प्रेक्षकांना गृहीत धरत नाहीये)..... थोडक्यात मागच्या वेळी मेघा ज्या ज्या गुणांमुळे जिंकली होती ते ते सर्व गुण नेहामध्ये (सध्यातरी) दिसतायत..... त्यामुळे ती आपली फेव्हरेट आहेच!
शिवानी अरोगंट असली तरी आवडतीय.... She has a strong parsonality..... तिच्याशिवाय शो अगदीच मिळमिळीत होईल.... परवा मांजरेकरांनी सुद्धा मान्य केले की शिवानी दिवसभर गप्प बसली तर शो चालणार कसा?
रुपालीने मात्र फारशी काही चमक दाखवलेली नाही.... त्या बिचुकलेंवर ओरडण्याच्या एपिसोडनंतर ती जरा हरवल्यासारखी वाटतीय
पराग एक प्लेअर म्हणून त्यातल्या त्यात बरा असला तरी माणूस म्हणून तो आवडेनासा झालाय.... तो आहे त्याच्यापेक्षा भारी प्रोजेक्ट करतोय स्वताला पण त्या चोरीच्या टास्कमध्येही आणि वकीलीच्या टास्कमध्येही तो सपशेल गंडला होता.... तो ज्या पद्धतीने इतरांना कमी लेखतोय ते नाही आवडत.... त्या तिघी त्याला आवडत नाहीत असे म्हणतोय पण अजुन एखादा ड्यूड कॅटेगरीवाला घरात आला तर परागची गम्मत बघायला मजा येईल!
वैशाली आणि अभिजीत केळकर माझ्या अपेक्षेपेक्षा चांगले खेळतायत पण किशोरी शहाणेंकडून अपेक्षाभंग झाला.... म्हणजे तश्या त्या चांगल्या आहेत पण नेहा आणि शिवानीबरोबरच्या भांडणात मला त्यांची बाजू पटली नाही
नेहा परवा एकदम कडक बोलली की या घरात रिसपेक्ट डिमांड करायचा नसतो तर कमांड करायचा असतो
परवा पण सुरेखा पुणेकरांच्या फीटनेसबद्द्लची चुगली त्यांनी मान्य करायलाच हवी होती
बाप्पा जोशी जे बोलतो ते अगदी नेमके बोलतो.... त्याचा ॲनालिसीस पण बहुतांशी पटणारा असतो.... He is going good!
मैथिली बाहेर पडली ती पडणारच होती.... माधव, दिगंबर, पुणेकर वगैरे मंडळी नॉमीनेशन मध्ये येतायत तोपर्यंत बाकीच्यांनी ताण घ्यायची फारशी गरज नाही
बिचुकले काय खेळतायत ते त्यांचे त्यांना माहित पण अजुन तरी एंटरटेन करतायत!
हे झाले गेम शो बद्दल पण अनसीन अनदेखा बघतय का कुणी?
त्यात ही सगळी माणसे एकदम वेगळीच वाटतात..... आपल्यातुपल्यासारखी नॉर्मल वाटतात (ते एक बिचकुले सोडले तर... ते दोन्हीकडेही सारखेच एंटरटेनींग/इरिटेटींग आहेत)..... नेहा, शिवानी आणि पराग मधला घोड्यांबद्दलचा संवाद, शिवानीच्या वडीलांबद्दलच्या बाप्पा जोशीबरोबर गप्पा किंवा पराग, वीणा आणि रुपालीचे गोवा प्लॅन्स आणि परागच्या स्वीडीश गर्लफ्रेंडसंबंधीच्या गप्पा ह्या सगळ्याच क्लीप्स खुप छान आहेत बघायला आणि जर ही माणसे इतर वेळा जर इतकी मिळून मिसळून रहात असतील तर आपण एपिसोडमध्ये बघतो ते खरोखर स्क्रीप्टेड वाटायला लागते!
पण मग मागच्या सीझनच्या स्पर्धकान्मधली अजुन टिकून असलेली खुन्नस बघून सगळेच काही स्क्रीप्टेड नसेल/नसावे असे म्हणून आपली समजूत काढून घेतो
पण या निमित्ताने मागच्या सीझनमध्ये या धाग्यावर भेटलेले सगळे आयडी बघून बरे वाटले
डीजे मागच्या वेळसारखीच एकदम फॉर्मात आहे
मोक्षू, स्मिता श्रीपाद, पुंबा, अंजू वगैरेना बघून मागच्या सीझनच्या धाग्यावर केलेली मज्जा आठवली
योग ला बघूनही बरे वाटले.... मागच्या सीझनला त्याच्यामुळे खुप रंगत आलेली!
मामींना मिस करतोय या धाग्यावर
या आठवड्यात दिगंबर चा नंबर
या आठवड्यात दिगंबर चा नंबर लागेल बाहेर जायला असं दिसतय.
पराग आणी टीम ने शिवानी ला न नॉमिनेट करुन शहाणपणा केलाय. सगळे एक राहिले तर पुढे जातील.
वीणा, शिव आणि पराग आवडतात मला. किशोरी न रुपाली ठीकठाक. रुपाली सगळ्यांच्या गुड्बुक्स मधे रहायचा प्रयत्न करतेय बहुतेक.
वीणा स्वतः चे मुद्दे नीट नाही मांडु शकत हे कोर्ट रुम टास्क मद्धे कळलं. "शिवानी ने, मी पळुन गेले असताना सुद्धा मला ओढलं" हा चुकीचा मुद्दा तिने उचलला. शिवानिने "बेसावध" असताना मला ओढलं आणि म्हणून मी डिफेंड करताना मारलं असेल. असं सहज पटवुन देउ शकली असती ती. तसही मला आठवत नाहिये मी कधी मारलं ते असं ती सारख म्हणतच होती. त्यामुळे तिने जर वेगळ्या पद्धतीने स्वतः चा मुद्दा मांडला असता तर तीचं आठवत नाही म्हणणं पण जस्टीफाय झालं असतं असो. वीणा ने मुद्देसुत बोलणं शिकलं तर खुप पुढे जाईल.
शिवानी काल शांत होती. आज बघु काय राडे करतेय. ममां नी तिला खुप हिंट दिल्यात आणि त्या सावंत मुळे पण तिला बाहेर काय चालु आहे कळलं असेलच. त्यामुळे शांत राहुन खेळली तर शिवानी धोकादायक आहे. पण तिचा माज...नाहीच आवडत ती काही केलं तरी. :-)..एकदा मनातुन उतरली ते उतरलीच..पुढे बघु माझं मत बदलतय का
शिव, काल त्याने माधव न केळ्या ला समोरासमोर घेउन मस्त झापलं. गुड गोईंग शिव.
किशोरी, बोर झालं आता पण पराग न वीणा ला सपोर्ट करायसाठी राहुदेत काही आठवडे.
नेहा, मला ही कधी आवडते कधी नाही...शिवानी ला सोडलं तिने तर बर होईल पण. पुढे जायचे चान्सेस वाढतील.
काल गंमत वाटली. पहिल्या
काल गंमत वाटली. पहिल्या आठवड्यात बिचुकले च्या जिवावर उठलेले लोक काल एकमेकाला नॉमिनेट करत होते, कुणीच बिचुकले ला नॉमिनेट केले नव्हते!
आणि नंतर अचानक बिबॉ नी म्हटले अजून दोन नॉमिनेट करा तर अचानक माधव आणि बिचुकले ही नावं बळं च पुढे आली आणि मान्य पण झाली सर्वांना? हेही नवलच.
पुर्या तळायचा टास्क अजून इंटरेस्टिंग होऊ शकला असता. शिवानी च्या ग्रुप ला प्रत्येकाची दोन मतं काऊंट करून ठरवून व्यवस्थित मॅनिप्युलेट करता आली असती नॉमिनेशन्स. पण कोणी डोकं वापरलं नाही.
पराग च्या ग्रुप चा गैरसमज झाला आहे की त्यांचा ग्रुप प्रेक्षकांमधे फारच आवडत आहे. जसा मागच्या वेळी मेघाचा ग्रुप आवडत होत तसाच. पण तसं नसावे मोस्टली. यावेळी प्रेक्षकांनी अशी क्लियर पसंती कुणालाच दिलेली आहे असे वाटत नाही सोमि रिअॅक्शन्स वरून.
आज आता शाळा? फार बोर टास्क आहे. जिंकणे हरणे कसे ठरवतात त्यात ?!
स्वरूप धन्यवाद.
स्वरूप धन्यवाद.
बिचुकले काय खेळतायत ते त्यांचे त्यांना माहित पण अजुन तरी एंटरटेन करतायत! >>>
पराग च्या ग्रुप चा गैरसमज झाला आहे की त्यांचा ग्रुप प्रेक्षकांमधे फारच आवडत आहे. >>> यावेळी त्यांच्या grp वर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला बोलाऊन त्यांचा माज उतरवतील.
वीणा स्वतः चे मुद्दे नीट नाही मांडु शकत हे कोर्ट रुम टास्क मद्धे कळलं. "शिवानी ने, मी पळुन गेले असताना सुद्धा मला ओढलं" हा चुकीचा मुद्दा तिने उचलला. शिवानिने "बेसावध" असताना मला ओढलं आणि म्हणून मी डिफेंड करताना मारलं असेल. असं सहज पटवुन देउ शकली असती ती. तसही मला आठवत नाहिये मी कधी मारलं ते असं ती सारख म्हणतच होती. त्यामुळे तिने जर वेगळ्या पद्धतीने स्वतः चा मुद्दा मांडला असता तर तीचं आठवत नाही म्हणणं पण जस्टीफाय झालं असतं असो. वीणा ने मुद्देसुत बोलणं शिकलं तर खुप पुढे जाईल. >>> अगदी अगदी. परागने पण नीट युक्तिवाद केला नाही, एरवी स्वतःला अतिशहाणा समजतो.
शिव, काल त्याने माधव न केळ्या ला समोरासमोर घेउन मस्त झापलं. गुड गोईंग शिव. >>> सध्या हाच आवडतोय.
स्वरूप तुमचं पोस्टची वाटच
स्वरूप तुमच्या पोस्टची वाटच पाहत होती या धाग्यावर.... मागच्या सीझनला तुम्ही आणि दीपांजली ने लिहिलेले पोस्ट वाचताना असं व्हायचं, अरे हो मलापण तर हेच लिहायचं होतं... पण गंमत म्हणजे यावेळी आपले जरा वेगळे विचार आहेत...actually वीणा मला पहिल्यापासूनच आवडायची.. दिसायला, तिचा घरातला एकंदर वावर आणि बोलणं, सगळंच आवडायचं.. पण मागच्या आठवड्यात तिने जी काही भांडण केले ते मुद्दाम केले असं वाटलं.. शिवाय unseen undekha मध्ये देखील वीणा प्रचंड बॅकबिचींग करताना दाखविली आहे, ते नाही आवडलं.. अर्थात या वीकेण्डच्या वारनंतर तिला बऱ्याच गोष्टी कळल्या असतील कारण ती एक स्मार्ट प्लेयर आहे सोबतच एक छान रिप्रेझेंटेटिव्ह पण आहे स्वतःला मस्त रिप्रेझेंट करत आहे आणि शिवानी सारखे मूर्ख नसल्यामुळे ती नक्की काहीतरी बोध घेईल असे वाटते..
पराग प्रचंड हुशार आहे... काल त्याच्या सांगण्यावरून नेहा आणि दिगंबरला सगळ्या ग्रुपने नॉमिनेट केलं.. Unity दिसली त्यांची... शिवाय दिगंबर थोडा weak आहे so हे त्यांच्या फायद्याचे आहे... नंतर किशोरीला वाटत होते की शिवानीला nominate करायला हवे होते पण पराग आपल्या मतावर ठाम होता त्यावरून बाहेर काय चालू आहे याचा त्याला अंदाज आहे... आणि शिवानी ला असलेला support बघून तिला nominate करणे उपयोगाचे नाही हे त्याला कळलंय...
नेहा पहिल्या वीकमध्ये आवडली होती पण घरातल्यांचे तिच्याबद्दल असलेले मत ऐकून आणि काल बीचुकले सोबत एका बिस्किट साठी ती आणि रूपाली जशी वागली ते अज्जिबातच आवडलं नाही.. मैथिलीने सुद्धा बाहेर आल्यावर नेहा बद्दल भाजीसाठी असंच सांगितलं त्यामुळे एक माणूस म्हणून ती नाही आवडत.. अगदी पहिल्या दुसऱ्याच आठवड्यात ती स्वार्थीपणे वागतेय असं वाटतंय...
दिगम्बर बोलतोय की “वीणा ला
दिगम्बर बोलतोय की “वीणा ला दाखवूँन देंईंन मी काय चीज़ आहे, आणि आपण तिला बाहेर काढूया.”>> अरे,तु आधी दिस तरी गेम मध्ये.ती खेळतेय तीचा गेम तु काय करतोयस? ना एंटर्टेन ना गेम.रूपाली लॉस्ट वाटतेय.किशोरी गॉसिप केल्यावर कशाला एक्स्प्लनेशन द्यायला जातात,केला गॉसिप तर केलं.
शिव चा काही फ़ैन फ़ोलोईंग नाहीये आणि ब्ला ब्ला...असा विचार करूँन हे चौघे त्याला घाबरवतायत.पण चांगला गेम खेळून तो लोकांचा फ़ेवरेट झालाय.
शिवानी पण चांगला खेळतेय. केळ्या, पुणेकर जातील पटापट.
ज्या तर्हेने पराग ला सगळेजण
ज्या तर्हेने पराग ला सगळेजण टार्गेट करतायत, त्यावरून तोच बिबॉ२ चा विनर ठरण्याचे चान्सेस जास्त दिसतायत. आणि त्यासाठी (विनर होण्यासाठी) माझ्यामते तोच लायक आहे.
मला पहिल्या तीनात पराग, शिव आणि नेहाला पाहायला आवडेल.
अॅक्चुअली बिगबॉसचा बेसिक रुल
अॅक्चुअली बिगबॉसचा बेसिक रुल आहे नॉमिनेशन्स ओपन्ली प्लॅन करून डीस्कस न करायचा, मराठी बिबॉने हा नियमच धाब्यावर बसवलाय, मागच्या वर्षीही करायचे डिस्कस, कदाचित मराठीत काढून टाकला असेल नियम किंवा दुर्लक्ष!
काल त्यामुळेच परागचं डोकं आणि बाकीचे त्याचे उरलेले बिनडोक डंब लोकं बनले त्याचे फॉलोअर्स ! जर किशोरीला, वीणाला किंवा रुपालीला स्वतःचं डोकं चालवायला लागलं असतं तर घोळ केले असते, शिवानी झाली असती मग नॉमिनेट.
हिन्दीमधे असे ओपन डिस्कशन कोण करेल त्यांना डायरेक्ट नॉमिनेट करतात बिगबॉस, किंवा त्याही पेक्षावरची शिक्षा नॉमिनेशन कोडवर्ड्स मधे डिस्कस केलं तरी !
सगळया युट्युब रिव्ह्युअर्सनी , ट्विटरवर पण आश्चर्यं व्यक्तं केलय कालच्या एपिसोडनंतर पब्लिकने या बद्दल.
हिन्दी बिबॉला शिव्या घातल्या तरी तिथे बिबॉ अॅक्शन घ्यायचे लग्गेच बर्यापैकी, वीणा- शिवानी सारखा राडा पहिल्याच आठवड्यात सृष्टी रोडे आणि सबा खान मधे झाला, त्यावर त्यांना अख्खा सिझन कधीही कॅप्टन न बनण्याची शिक्षा मिळाली होती.
मराठी बिबॉ वामकुक्षी घेत असतात अरामात, मधेच जाग आल्यासारखे गडब्डून उठतात नियम मोडले करत
सगळ्या मराठी आणी हिंदि सीझन
सगळ्या मराठी आणी हिंदि सीझन मध्ये पराग आणी शिव एवढे बोअर आतापर्यत कोणी केले नसेल . फारच पकवत आहेत ते दोघे.
किशोरी अगदी खरीखुरी शिक्षिका
किशोरी अगदी खरीखुरी शिक्षिका वाटत होती..... अगदी मुलांच्या आवडत्या बाई!
शिव ने फारच बोअर तास घेतला.... फारच पर्सनली घेतले त्याने नेहाला.... पण नेहा हुशार तिने बरोबर त्याला उचकावले आणि मग सॉरी म्हणायला लावले!
बिचुकलेंचे "बाई वाड्यावर चला" अगदीच अनपेक्षित!..... अशक्य हसलो
त्या स्विमिन्ग पूलच्या नावाखाली कसला हौद बांधून ठेवलाय यंदा!
अॅक्चुअली बिगबॉसचा बेसिक रुल
अॅक्चुअली बिगबॉसचा बेसिक रुल आहे नॉमिनेशन्स ओपन्ली प्लॅन करून डीस्कस न करायचा, मराठी बिबॉने हा नियमच धाब्यावर बसवलाय, मागच्या वर्षीही करायचे डिस्कस, कदाचित मराठीत काढून टाकला असेल नियम किंवा दुर्लक्ष!>>> एक्झॅक्टली, हिंदी बिबॉ गेले २/३ सिझन न पाहिल्यामुळे अजूनही हा रुल हिंदीत आहे की नाही माहित नाही पण हा रुल होता हे मात्र नक्की. त्यामुळे ओपनली ग्रूपीजमला थोडा तरी आळा बसायचा. मराठीत पण असायला हवा होता हा नियम.
बाकी पराग चांगला प्लेअर आहे पण फाजील आत्मविश्वास जास्त आहे. सेम विथ शिवानी. या आठअवड्यात दिगंबर जाणार बहुदा.
करमणुकीसाठी बिचुकले अजूनही
करमणुकीसाठी बिचुकले अजूनही बेस्ट आहेत. काल पराग ला नॉमिनेट करताना तेवढ्यातल्या तेवढ्यात फनी गाणं गायलं
शिवानी त्यांना पढवत होती पण त्यांना नेहाला नॉमिनेट करायचंच होतं ते केलंच त्यांच्या मनाप्रमाणे. त्या आधी चुळा भरण्यावरून की हात धुण्यावरून नेहाला जाम उचकवत होते.
>>बाकी पराग चांगला प्लेअर आहे
>>बाकी पराग चांगला प्लेअर आहे पण फाजील आत्मविश्वास जास्त आहे.
अगदी अगदी!
करमणुकीसाठी बिचुकले अजूनही
करमणुकीसाठी बिचुकले अजूनही बेस्ट आहेत.>>>+१
काल पराग जेव्हा म्हणाला त्यांना की आमची नावं ठरलीत तेव्हा हळूच 'मी नाही ना त्यात?' विचारुन घेतलं त्यांनी. राजकारणी असल्यामुळे कुठल्या क्षणी कुणाशी गोड बोलायला पाहिजे नीट कळतं त्यांना. तरीही अजून जास्त काळ टिकायचं असल्यास शिवानीच्या हो ला हो करणं सोडलं पाहिजे त्यांनी.
हो ला हो केल्यासारखं दाखवतात
हो ला हो केल्यासारखं दाखवतात ते फक्त. मी, माझा, माझं, मला असं प्रकरण आहे ते. असा नमुना आणल्याबद्दल बिग बॉसचे आभार.
मराठी बिबॉ वामकुक्षी घेत
मराठी बिबॉ वामकुक्षी घेत असतात अरामात, मधेच जाग आल्यासारखे गडब्डून उठतात नियम मोडले करत >>>
शिवचं चुकलं, संस्कार वगैरे का काढले. समोरच्या व्यक्तीला बोला डायरेक्ट, त्यांच्या parents वर जाऊ नका. यावेळी परत शिव्या खाणार तो म मां च्या आणि ते योग्य असणार.
करमणुकीसाठी बिचुकले अजूनही बेस्ट आहेत. >>> खरं आहे.
बाकी पराग चांगला प्लेअर आहे पण फाजील आत्मविश्वास जास्त आहे. >>> अगदी अगदी.
सॉलिड आहे शिव, किती गोड
सॉलिड आहे शिव, किती गोड बोलतो. त्याचा प्रवास दाखवला होता का bb त. मी तरी नाही बघितला. आत्ता हा व्हिडीओ बघितला.
https://www.youtube.com/watch?v=L8RaXPdPRg8
मी कधीच बीबॉ सलग बघु शकत नाही
मी कधीच बीबॉ सलग बघु शकत नाही आणि बघितलेच नाही.
हिंदी तर एकदाही पाहिले नाही. नको तितकी भांडणं आणि सतत निगेटिवीटी बघणे नकोसे होते. मराठीचा भाग १ बीबॉ पाहिले नाही पण आता माझीच एक जवळची मैत्रीण माझ्याकडे ह्या आठवड्यात आली म्हणून ह्या आठवड्यात पाहिले अधुन मधुन.
त्यात कालचे वैशालीचे गाणे, लग जा गले.. इतकं भयानक वाटले एकायला. तिचे ते “शायद” वगैरे उच्चार आणि किरट्या आवाजात्ले “ मुलाकात“ तार स्वरात उच्चारणे बेकार होते.
तिला, आवाजात गोडवा नाही हेच माझे मत परत सिद्ध झाले. दोन्ही स्पर्धेत, सारेगमात ती विजयी झाली पण जराशी रस्टिक किंवा गावठी टच गाणीच शोभतात.
बाकी, अतिशय धुर्त पणे करतेय असे वाटतं.
बाकी बघण्यात काही मजा न्हवती म्हणून रूमच्या बाहेर गेले मैत्रीणीलाच बघु दे सांगून.
शिव चा माफीनामा
शिव चा माफीनामा
नेहाचे आई बाबा मला तुम्हाला दुखवायच नव्हते... मला फक्त एवढच सांगायच होत कि तुमची मुलगी बेअक्कल आहे... मला तुम्हाला दुखवायच नव्हत ... sorry..


आयला याने माफी मागितली कि अजून इज्जत काढली तेच कळल नाय
(copy)
ठाकरे आहे तो शेवटी!
शिवचं चुकलं, संस्कार वगैरे का
शिवचं चुकलं, संस्कार वगैरे का काढले. समोरच्या व्यक्तीला बोला डायरेक्ट, त्यांच्या parents वर जाऊ नका. यावेळी परत शिव्या खाणार तो म मां च्या आणि ते योग्य असणार. >>>> नेहा त्याला ते नियम मोडण्याचा त्यांचा वाद झाला आतमध्ये तेव्हापासुनच ट्राप करण्याचा प्रयत्न करत होती आणी तो शेवटी फसला. मांजरेकरांना बकरा मिळाला अर्धा तासासाठी. त्यात पटकन माफि मागीतली असती तरी सुटला असता पण त्यातहि त्याने चुक केली.
Pages