पापण्यांतला पाऊस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.

पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...

पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.

तू येशील... भेटशील...

शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

प्रकार: 

वाह! भारी.
मी वाचलीच नव्हती ही कविता. धन्स प्राचीन.
दोनदा चाहता होता येतं का माबोवर?

Pages