पापण्यांतला पाऊस
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
71
पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.
पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...
पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.
तू येशील... भेटशील...
शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.
काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...
येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
फार फार तरल,मनातलं लिहिलं
फार फार तरल,मनातलं लिहिलं आहेस दक्षिणा ! शुभेच्छा.
आहाहा!! खूप तरल आणि मनातलं
आहाहा!! खूप तरल आणि मनातलं लिहीलं आहेस. आवडली कविता.
वा, आवडली, पोचली थेट मनात.
वा, आवडली, पोचली थेट मनात.
कविता आवडली! शुभेच्छा!!
कविता आवडली! शुभेच्छा!!
मस्तच....
मस्तच....
दक्षिणा, कसलं मस्त लिहितेस ग
दक्षिणा, कसलं मस्त लिहितेस ग तू !!! मी शक्यतो कविता वैगरे वाचत नाही. पण तुझे नाव पाहून लिन्क उघडली आणि खूप आवडली कविता. खूप छान. मनापासून शुभेच्छा!
खूपच सुरेख आणि अवीट… ही कविता
खूपच सुरेख आणि अवीट… ही कविता "माझी असती" तर कित्ती बरं झालं असतं असं वाटायला लावणाऱ्या फार मोजक्या कविता माझ्याकडच्या यादीत आहेत …. तुझी ही कविता आज त्या यादीत जाउन बसली एवढं नक्की…>>>> + १
दक्षे, तोडलस!! काल पाऊस
दक्षे, तोडलस!!
काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...
येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.
एकदम सही.. खल्लास !!
आपण भेटलो की पाऊस येणार हे
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.
मस्त!
बाकी ह्या आकृतीबंधात लिहिणार्या 'प्रतिथयश' कवींनी सावध व्हावे कारण आता मुस्काटफोड कवी मैदानात उतरले आहेत

विदिपा ज ब र द स्त
विदिपा
ज ब र द स्त !!!!!!!!!!
खूपच छान कविता दक्षिणा.एकदम
खूपच छान कविता दक्षिणा.एकदम तरल. आवडली.
तुमची कविता वाचून सुधीर मोघ्यांच्या कवितेतल्या या ओळींची आठवण आली.
'पाऊस किती दिवसात फिरकलाच नाही ,
पाऊस कधी कुणाला कळलाच नाही ,
पाऊस ऋतूचं निमित्त करून येतो ,
पाऊस पापणीत कधीचा दडलेला असतो'
विदिपा अरे प्रेक्षक नकोत का
विदिपा
अरे प्रेक्षक नकोत का कविता वाचायला?
बाकि ज्यांनी ज्यांनी कवितेचं कौतुक केलं त्यांना धन्यवाद.
दक्षु... ये कब हुआ...
दक्षु... ये कब हुआ... म्हण्जे तू कविता पहिल्यांदाच लिहिलीस??? ती पण एकदम आहाहा!!!! वॉव, हा गुण म्हाईत नव्हता तुझा... टू गुड!!!!
विदिपा..
व्वा ! सहज साध्या शब्दांतील
व्वा ! सहज साध्या शब्दांतील अभिव्यक्ती.... वाचकापर्यंत सहजतेने भाव पोहोचविणारी....
शेवटच्या खंडातले आर्जवदेखील सहज, संयत शब्दात...... छानच.
वर्षु पहिली कुठे, चांगली
वर्षु पहिली कुठे, चांगली दुसरी आहे.
दक्षिणा, कवितेतला संयतभाव
दक्षिणा, कवितेतला संयतभाव चटका लावून जातोय.
परत परत वाचतेय तितकीच आवडतेय.
जियो !!
हायला दक्षी कविता करते
हायला दक्षी कविता करते ??
व्वा मस्त लिहिलीयसं , अगदी आतनं लिहिल्यासारखं वाटलं
पुर्वी आपण भेटलो की पाऊस
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.
वाह दक्षुतै!
पुन्हा पुन्हा वाचली.
मस्तच जमलीये!
मीही पुन्हा पुन्हा वाचतेय,
मीही पुन्हा पुन्हा वाचतेय, खुप आवडली.
कविता खुपच सहज, अगदी विनासायास उतरलीये. पण तुझ्या नेहमीच्या आविर्भावाचा त्यात पूर्ण अभाव असल्यामुळे ती आणखी जास्त भावतेय असंही लक्षात आलं. तुझं असं आर्जवी आणि जरासं अंतर्मुख होऊन व्यक्त होणं खुप लोभसवाणं आहे. कवितेत उमटलेला हा संयत भाव प्रतिक्रियांमधूनही पुन्हा पुन्हा अधोरेखित झालाच आहे.
लिहित आणि व्यक्त होत रहा अशीच.
खुप छान दक्षे. आवडलीच.
खुप छान दक्षे. आवडलीच.
खूप छान लिहिलीय कविता. मनात
खूप छान लिहिलीय कविता. मनात अगदी उतरत जाते.
सुंदर.....
सुंदर.....
अरे वा दक्षे काविता छान छान
अरे वा दक्षे काविता छान छान
आवडली आणि अभिनदन
सईशी सहमत ! पण तरीही असं
सईशी सहमत !

पण तरीही असं वाटतय की बर्याच दिवसांनी मला माहीत असलेली दक्षी बघायला मिळाली. बेफी म्हणतात तसे आता लेखन थांबवू नकोस. पुलेशु
Kharach ahaha kavita! Samee,
Kharach ahaha kavita!
Samee, +१००!!
व्वा! दक्षे, सुंदर कविता.
व्वा! दक्षे, सुंदर कविता. आणखी लिही पुलेशु.

तुला हे पण जमत हे माहित नव्हत.
दक्षिणा, क्या बात क्या बात
दक्षिणा, क्या बात क्या बात क्या बात!!
मनापासून आवडली ! शुभेच्छा!
मनापासून आवडली !
शुभेच्छा!
दक्स भारीच आहे की गं कविता..
दक्स भारीच आहे की गं कविता.. मस्त!
Pages