सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:
Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७
> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.
रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७
> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७
> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)
आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५
मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?
खपु, आलाच ना पुन्हा? एक नवीन
खपु, आलाच ना पुन्हा? एक नवीन प्रतिसाद दिसला की धस्स होतंय का? नाही म्हणजे निकालाचा आनंद घ्यायचा सोडून इथे च लक्ष केंद्रित केलेले दिसते. पुन्हा सांगतो, तुम्ही निकाल पहा. कुणीही रोखत नाही तुम्हाला
खोटारडेपणा उघड होतच असतो. नाईलाज आहे.
One at a time साधना तै.
मित्रान्नो जिन्कल्याचा उन्माद
मित्रान्नो जिन्कल्याचा उन्माद आत्ता कामाचा नाही. त्यापेक्षा थोडी वाट पाहुया. ४ वाजेपर्यन्त चित्र आणखी स्पष्ट होईल.
>>खपु, आलाच ना पुन्हा? <<
>>खपु, आलाच ना पुन्हा? <<
येणार तर.... परत परत येत रहाणार.... सांगूनच गेलो होतो की अधुनमधुन चक्कर टाकेन म्हणून
मज्जा येते राव भंजाळलेले लोक आणि त्यांची घसरलेली भाषा बघायला..... अजुन येउ द्या!
तिकडे कमर्शिअल ब्रेक झाला की इकडे येत राहीन.... तुम्ही निराश करणार नाही अशी आशा
सत्ता स्थापन करण्यात काँग्रेस
सत्ता स्थापन करण्यात हात झाला फेल
आणि पप्पू आहे शेठचा स्लीपर सेल
मोदी समर्थकांना एक विनंती:
मोदी समर्थकांना एक विनंती:
आज ईथे काहीच लिहू नका. विरोधकांना थोडी तरी जागा मिळू देत. त्यांच्याकडे लिहायला अजून काय शिल्लक आहे याची उत्सुकता.
मोदी विरोधकांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा!
YSRC चं मात्र खूप कौतूक. future leader of opposition?
@भागवत सर, तुमच्या निवड्णुक
@भागवत सर, तुमच्या निवड्णुक भाकिताच्या पद्धतीत थोडी फाइन ट्युनिन्ग करुन तुम्ही आता ते काम प्रोफेशनली करावे ही सुचना करावीशी वाटते. तुम्ही सन्गितल्याप्रमाणेच मोदी लाट अजुनही आहे.
भारतातील बहुसंख्य मतदारांनी
भारतातील बहुसंख्य मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असावे म्हणून मतदान केले हे स्पष्ट झाले आहे. जरी भारतीय जनता पार्टी एकटी ३०० पार पोहचली नाही तरी ३०० च्या आकड्याजवळ पोहचेली. २०१४ प्रमाणे यंदा कुठेही नरेंद्र मोदींची लाट आहे असे दिसून आले नाही तरी सुध्दा भाजपाला अभूतपुर्व यश लाभले आहे. भाजपाच्या विरोधकांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. संपुर्ण निवडणुकी दरम्यान एकट्या मोदींना हरवण्यासाठी विरोधकांनी आकाशपाताळ एक केले पण मोदी सर्वांना पुरून उरले.
नवीन Submitted by जिंदादिल.
नवीन Submitted by जिंदादिल. on 23 May, 2019 - 15:33 >>>
निदान आघाडी घेण्यात भाजपने ३०२ ला टच केल...
शाम भागवत यांचे विश्लेषण आणि
शाम भागवत यांचे विश्लेषण आणि अंदाज खरे ठरले. अभिनंदन!
सध्या तरी महाराष्ट्रात
सध्या तरी महाराष्ट्रात कोन्ग्रेस्चा सुपडा साफ होताना दिसतोय.
अमित शहा पंतप्रधान करा,
अमित शहा पंतप्रधान करा, म्हणजे पुढच्या वेळी मोदी पंतप्रधान असा अजेंडा ठेऊन परत वोट घेता येतील.
जरी भारतीय जनता पार्टी एकटी
जरी भारतीय जनता पार्टी एकटी ३०० पार पोहचली नाही तरी ३०० च्या आकड्याजवळ पोहचेली. >> बिजेपीने एकट्याने ३०३ गाठलेत, आहात कुठे
निकालानंतर २०१४ ची मोदी लाट
निकालानंतर २०१४ ची मोदी लाट परतली. तोपर्यंत भक्त ही गायब होते. ना उत्साह होता ना सेलिब्रेशन. आत्ताही २०१४ पेक्षा मोठा विजय होऊनही निम्म्यानेही सेलिब्रेशन दिसत नाही. कदाचित यांनाच अनपेक्षित असावं हे सारं.
हवं तर आमच्याकडून खर्च घ्या. पण आकडे आणि सेलिब्रेशन यांचं प्रमाण योग्य ठेवा.
आत्ताही २०१४ पेक्षा मोठा विजय
आत्ताही २०१४ पेक्षा मोठा विजय होऊनही निम्म्यानेही सेलिब्रेशन दिसत नाही.
किरणुद्दीन,
तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात खरं आहे.
२००४ मधे अटलजी सारख्या माणसाला लोक व्होट आउट करतील असं बहुतेक भाजप समर्थकांना अज्जिबात वाटलं नव्हतं. पण ते झालं.
जावेद मियाँदादने लास्ट चेंडूवर सिक्स मारावी तशी अवस्था झाली होती. जसा त्या षटकारातून सावरायला भारतीय क्रिकेट प्रेमींना काही वर्ष लागली तसं भाजप समर्थकांना झालं होतं. नंतर कितीही वेळा भारताने पाकिस्तानला हरवलं तरी एक पिढी तो सिक्सर विसरू शकली नाही. त्याचप्रमाणे २००४ ला गाफील राहिलो, विजय गृहीत धरला, आणि हरलो त्यामुळे २०१९ ला कितीही ओपिनियन पोल्स काहीही दाखवत असले तरी विजय गृहीत धरायचा नाही,जनतेला गृहीत धरायचं नाही. आणि पुन्हा जिंकलो तरी उन्माद करायचा नाही, हा धडा मिळालेला आहे.
दुसरीकडे, ९५ टक्के मार्क मिळाल्यावर उरलेले ५ टक्के कुठे गेले आणि आता पुढची परीक्षा कधी आहे हा विचार करण्याची भाजप मानसिकता बनली आहे.
काल काही भाजपवाल्यानी केरळ बद्दल चर्चा सुरूही केल्या की तिकडे काँग्रेसला क्लीन स्वीप आहे, आपण तिथे कुठवर पोचलोय वगैरे. मग केरळमध्ये जाऊन आलेल्या संघीने आपला अहवाल फेसबुकवर टाकला. उरलेले लोक औरंगाबादबद्दल बोलतायत. औरंगाबाद शिरूर मधले युतीचे पराभव त्यांना अपसेट करत आहेत आणि एकूणात महाराष्ट्र विधानसभेबद्दल सीट लेव्हल चर्चा सुरूही झाल्या आहेत.
सनव
सनव
या विषयावर नरेंद्र मोदींचे अभिनंदन या धाग्यावर मी प्रतिसाद दिलेला आहे. वाचा.
आत्ताही २०१४ पेक्षा मोठा विजय
आत्ताही २०१४ पेक्षा मोठा विजय होऊनही निम्म्यानेही सेलिब्रेशन दिसत नाही. >>>
तुम्हाला सेलिब्रेशन म्हणून काय अपेक्षित आहे?
ह्या विजयामुळे पाय जमिनीवर
ह्या विजयामुळे पाय जमिनीवर आलेत भाजपाचे , आता 60 वर्षे वगैरे बहाणे चालणार नाहीत
पि-या. घरात आनंद झाला तेव्हा
पि-या. घरात आनंद झाला तेव्हा कुणाला विचारले होते?
हं, जमा केलेल्या कात्रणांत
हं, जमा केलेल्या कात्रणांत याच उत्तर नसावं कदाचित.
उद्या पर्वा नवीन सरकारचा
उद्या पर्वा नवीन सरकारचा शपथविधीही होईल.
पण इथले अजूनही 23 मे मध्येच अडकलेत.
दुसरीकडे, ९५ टक्के मार्क
दुसरीकडे, ९५ टक्के मार्क मिळाल्यावर उरलेले ५ टक्के कुठे गेले आणि आता पुढची परीक्षा कधी आहे हा विचार करण्याची भाजप मानसिकता बनली आहे.
काल काही भाजपवाल्यानी केरळ बद्दल चर्चा सुरूही केल्या की तिकडे काँग्रेसला क्लीन स्वीप आहे, आपण तिथे कुठवर पोचलोय वगैरे. मग केरळमध्ये जाऊन आलेल्या संघीने आपला अहवाल फेसबुकवर टाकला. उरलेले लोक औरंगाबादबद्दल बोलतायत. औरंगाबाद शिरूर मधले युतीचे पराभव त्यांना अपसेट करत आहेत आणि एकूणात महाराष्ट्र विधानसभेबद्दल सीट लेव्हल चर्चा सुरूही झाल्या आहेत.>>>>
हे मीही वाचले. खरेच असेल तर भाजप बद्दलचा अभिमान अजून वाढला. लोक निवडणुका संपल्यावर थायलंड की कुठेशी जातात म्हणे, खूप श्रम झाले म्हणून. त्या पार्श्वभूमीवर विजयाचा आनंद न करता जिथे पराजय झाला त्याचे विश्लेषण हाती घेणे हे पाय जमिनीवर असल्याचेच लक्षण आहे.
Long live BJP!!!
नवीन Submitted by साधना on 24
नवीन Submitted by साधना on 24 May, 2019 - 09:33 >>>
ते खरं आहे. शत प्रतिशत भाजपा हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे ते अशाच प्रकारे विचार करतात.
२०१४ ला सेलिब्रेट करताना किती
२०१४ ला सेलिब्रेट करताना किती टक्के गुण मिळाले होते?
केला पार .
केला पार .
BJP-Modi =0
BJP-Modi =0
Congress-Rahul=∞
Congress-Gandhi=∞
शिवसेनेचं भवितव्य ह्या
शिवसेनेचं भवितव्य ह्या निकालांनी खडतर होवू शकते.
एक अंदाज
Congress-Gandhi=∞ >>+१
Congress-Gandhi=∞ >>+१
लोकसभेची २०२४ ची लोकसभा
लोकसभेची २०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसला आघाडीत न घेता लढविण्याचा इतर विरोधकांचा प्रयत्न दिसतोय .
नितीश कुमार नी दिल्लीत येवून राहुल आणि खरगे ची भेट घेतली त्याच बरोबर ममता बरोबर वेगळी खलबते चालू केली असता खरगे नी नितीश कुमार कडे विरोधी पक्षांची जबाबदारी सोपवलेली नाही असा टोला हाणला !
भाजप बरोबर ऐक्याने लढण्यासाठी काँग्रेसला २२० जागा इतर सहकारी पक्षांची भूमिका असल्याचे कळले असता ३७० पेक्षा कमी जागा वर काँग्रेस लढणार नाही असे पक्षाच्या वती ने सांगण्यात आले .
थोडक्यात विरोधी पक्षांच्या एकी बाबत बातम्या कमी आणि फुटी बद्दल च्या जास्त यायला लागल्या आहेत ....
३७० पेक्षा कमी जागा वर
३७० पेक्षा कमी जागा वर काँग्रेस लढणार नाही असे पक्षाच्या वती ने सांगण्यात आले>>>
इतक्या जागांवर लढण्यासाठी इतके उमेदवार अजुन शिल्लक आहेत त्यांच्याकडे???
Pages