अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नवीन Submitted by Nmate on 22 May, 2019 - 23:26 >>>
एक्झिट पोल पाहून पायाखालची जमीन सरकली आणि कपाळावर दोन टेंगळे आली, त्यामुळे लंडनचं तिकीट रद्द करून टाकलं साहेबाने.

मला सांगा - एक्सिट पोल चा निकाल आल्यावरच का EVM चा प्रॉब्लेम घेऊन विरोधक आक्रमक झाले? एक्सिट पोल आणि EVM चा काय संबंध? जर EVM बद्दल एवढेच प्रॉब्लेम होते तर निवडणूक व्हायच्या आधी का नाही सगळे क्लिअर करून घेतले?
जेंव्हा ३ राज्यात भाजप निवडणूक हरले तेंव्हाही त्यांनी असे काही केले होते का? कि खिलाडूवृत्तीने पराभव मान्य केलेला? तसेच ३ राज्यात निवडणूक जिंकल्यावर अत्ताएवढ्याच आक्रमकतेने का नाही EVM चा मुद्दा मांडला विरोधकांनी?
उगाच निकाला आधी EVM चे राळ उठवून जगात भारताची प्रतिमा मलीन करायला यांना काहीच कसे वाटत नाही?

भारताची प्रतिमा मलीन करायला यांना काहीच कसे वाटत नाही? >>>

त्या लोकांना भारताच्या प्रतिमेशी कसलेही देणेघेणे नाही.
पराभवाच्या दुःखाच्या भरात हे लोक मतदारांचाही अपमान करतात. एक्झिट पोल नंतर काँग्रेसच्या एका महाभागाने तर "लोक अशिक्षित आहेत आणि भाजपच्या प्रचाराला भुलले" असे जनरल स्टेटमेंट करून टाकलेय. असे लोक निवडणुकांदरम्यान उगवायला हवेत, मग काँग्रेस बुडवायला रागा ला आणखी मदत होईल.

कसबा मतदारसंघात गिरीश बापट यांचे खासदार म्हणून फ्लेक्स कालच लागलेले आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते मतदारसंघात आणण्यात आले होते. बहुधा हा मानाचा मतदारसंघ असल्याने त्याचा निकाल एक दिवस आधी देत असावेत... बाकी कल्पना नाही.

कोहंसोहं, तुमचा जन्म एक्झिट पोलच्या वेळीच झाला म्हणून आधीचं काही माहीत नसलं पा हि जे असं काही आहे का? फार मागे नका जाऊ, गेल्या तीन चार महिन्यांतल्याच बातम्या पहा. व्ही व्ही पी एटी स्लिप्स च्या मोजणीसाठी विरोधी पक्षांनी निव ड णूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावली आहेत.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात इलेक्टोरल रिफॉर्म्स - निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबद्दल काय म्हटलंय ते पहा.

आणि देशाच्या प्रतिमेचं म्हणाल तर २०१० मध्ये भाजपच्या जीव्हीएल नरसिंह राव यांनी लोकशाही धोक्यात . मतदा न यंत्र विश्वासार्ह आहेत का? अशा नावाचं पुस्तक लिहिलं https://www.amazon.com/Democracy-Trust-Electronic-Voting-Machines/dp/819...
तेव्हा देशाची प्रतिमा अगदी उजळून निघाली असेल नाही?

हॅकींगचा आणि मतपेट्या स्ट्राँग रूम मधे न सापडता असुरक्षित अवस्थेत सापडण्याचा संबंध चोराच्या मनात चांदणे या न्यायाने लावण्यात आलेला आहे. बातम्या आहेत तशा इथे दिलेल्या आहेत. तरीही तुम्हाला असे म्हणायचे आहे का अशा प्रकारचा जुलमाचा रामराम करून घेण्यात आला. निवनूल्क आयोग सर्वोच्च आणि निर्भेळ संस्था असल्याप्रमाणे त्यांचे दाखले देण्यात आले त्यामुळे ज्या पक्षाचे हे पाठीराखे आहेत त्यांचेच काय म्हणणे आहे हे मी नंतर दिले होते. त्यात सर्वोच्च न्यायालयातला खटलाही सामील आहे. त्याआधी नऊ राज्यातल्या उच्च न्यायालयात संबंधित यंत्रे हॅक होतात म्हणून दाद मागायला गेले होते.

जर हे विधान भाजप वाल्यांचे आणि त्यांना पाठिंबा देणा-याचे असेल तर त्या त्या वेळी त्या प्रतिसादांची दखल न घेता नंतर तुम्हीच असे म्हटला होता अशी दरडवण्याची भाषा करणारे स्क्रीनशॉट मागितल्यानंतर थयथयाट करून गेले.

ज्यांनी यंत्रे हॅक होतात त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागायचे की ज्याने ही माहीती दिली त्याच्याकडे ? विधाने करणारे आपलेच मालक असल्याने असे झाले असेल का ?

एक जुनी आठवण.
(अजून तीनशे प्रतिसादानंतर तुम्हाला असे म्हणायचे आहे का अशा थाटात प्रश्न विचारण्याऐवजी आताच या सद्गृहस्थांना त्याचा जाब विचारणे लॉजिकल होईल. हे विधान माझे नाही )

61012279_1225906507570083_5279972991130664960_n_0.jpg

राजू पेंटर ज्या पक्षाकडून बोलतो तो पक्ष हारतो(मागे एकदा मोर वाचवा बोलला होता तर अचानक चार पाच मोर दगावले), हारतो म्हणजे पानिपत होतं पार, त्यामुळे मोदीच बोलले असतील जा त्यांच्याबाजूने बोल, शिवाजी महाराजांनी कसं संभाजी राजांना दिलेरखानाच्या गोटात पाठवलं होत तीच चाल मोदी खेळले आणि आज यशस्वी होणार आहेत, आज संध्याकाळी बघा मोदीजी आणि पेंटर एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतील टीव्हीवर.

आज संध्याकाळी बघा मोदीजी आणि पेंटर एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतील टीव्हीवर>>>>बोकलत, पण मग गेटवे ऑफ इंडिया च्या नागीण डान्सचं काय होणार ?

विरोधी पक्ष निवडणूक जिंकले तर evm च काय करायचे >>> गडकरींना, अडवाणींना आणि सुब्रमण्यम स्वामींना विचारा. त्यांचे म्हणणे आहे ते. आम्हाला नका विचारू. काही संबंधच नाही.

ओ चिल्ल!
नका देत बसू स्पष्टीकरणे..... no one is interested
निकाल बघा आता.... तुमच्या या काढीव कारणांवर नंतर बोलू निवांत सवडीने
आता जरा निवडणुकीच्या निकालांचा आस्वाद घ्या Happy

बोकलत, पण मग गेटवे ऑफ इंडिया च्या नागीण डान्सचं काय होणार ?>>> मोदी हारले तर तो डान्स होणार, पेंटरने विन विन situation ठेवले, अजून किती पराभव पचवणार तो बिचारा.

लबाड्या?
त्या तुमच्या उघड होतायत..... कोलांट्याउड्या मारताय
मी हेच म्हण्टलो आणि मला हेच म्हणायचे होते आणि मी असे कुठे म्हंटलो आणि ब्ला ब्ला ब्ला!

म्हणून म्हंटले जरा चिल्ल!

खोटं बोललं की असंच वारंवार येऊन धागा पहावा लागतो. कुणी जबरदस्ती नव्हती केलेली. तुमचं तुम्ही ठरवा ना निकाल बघायचे की इथे यायचे ते.. चो-या केल्या की धाकधूक ही होणारच..

कसबा मतदारसंघात गिरीश बापट यांचे खासदार म्हणून फ्लेक्स कालच लागलेले आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते मतदारसंघात आणण्यात आले होते. बहुधा हा मानाचा मतदारसंघ असल्याने त्याचा निकाल एक दिवस आधी देत असावेत... बाकी कल्पना नाही.,>>>>>>>

औरंगाबादेत मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एम आई एम च्या समर्थकांनी रॅली काढून, फटाके फोडून, ढोल ताशे बडवून विजय साजरा केला या बातमीकडे तुमचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले की तुम्ही फक्त भाजपा विजयाच्या बातम्याच वाचता याचीही कल्पना नाही.

निकाल बघतोच आहे.... तुम्ही डोळे मिटून घेतलेले दिसतायत!

निकालाकडून काही आशा अपेक्षा न उरल्यामुळे इथे येउन थयथयाट हा एककलमी अजेंडा दिसतोय

पण संतुलितपणाचा आव आणून अभ्यासू वगैरे लिहणाऱ्यांचा बुरखा फाटलेला जाणवतोय

भाषा कालपासून घसरलेलीच आहे.... आता "चोऱ्या" वगैरे वर आलात तेंव्हा तोल पुरता ढळलाय याची खात्रीच पटतीय

असो.... तुमचा त्रागा बघायला येत जाईन मधून अधून इकडे
तुमचे चालू ठेवा.... मज्जा येतीय!

भरत, किरण, काही वर्षांपूर्वीच्या बातम्या आत्ता देऊन काहीच उपयोग नाही. त्यावेळी जी टेक्नॉलॉजी होती त्यानुसार ते possibie असेलही. आत्ता परिस्थीती वेगळी आहे. टेक्नॉलॉजी सुधारली आहे. इ- सुरक्षा यंत्रणा खूप पुढे गेल्या आहेत. निवडणूक आयोगाने खुले आव्हानही दिले होते हॅक करण्यासाठी...परंतु कोणीही ते स्वीकारले नाही. त्यानंतर मात्र हॅकिंग बद्दल फारसा कोणी बोललं नाही. मोर्चा EVM बदलण्यावर नेला. तरीही त्यांच्या समाधानासाठी ९००० कोटी खर्चून VVPAT देखील आणले. आता यतावरही त्यांचा विश्वास नाही. म्हणे ५०% match करा. गेल्या २ दिवसात जो गोंधळ घातला त्याच तीव्रतेने EVM चा issue ३ राज्य जिंकल्यानंतर का नाही आणला? या सगळ्यावरून नियत समजून येते.

असो. राहुल गांधी मागे पडला आहे स्मृती इराणी बरोबरीच्या लढतीत. त्याला कदाचित हा अंदाज आला होताच म्हणूनच वायनाड ला पळाला.

जनता आता मूर्ख नाही. निकालावरून स्पष्टच आहे की लोकांनी विकास आणि राष्ट्रवाद याला मत दिले आहे. नुसती आदळआपट करून विरोधी पक्ष त्यांचेच नुकसान करत आहेत. त्यापेक्षा काम करून दाखवा आणि मत मिळवा असा सिम्पल गणित आहे सध्या...निदान लोकसभेला तरी.
अबकी बार नक्की जाणार ३०० के पार!!!

जनता आता मूर्ख नाही>>खरोखर सामान्य जनतेमध्ये खूप awareness आला आहे... आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचा result

राहुलच्या अंदाजाचे कौतुक आहे>>>

मलाही खूप कौतुक वाटले. इतका हुशार निघेल वाटले नव्हते. 2024 मध्ये आजोळी इटलीला जाणार असे दिसतेय.

यावेळी 2014 पेक्षा ही जबरदस्त मोदी वेव्ह आहे असे दिसते. एकटा भाजपा 290 पेक्षा जास्त जागांवर लिड करत.

मतमोजणी चालू झाली आहे आता जाहीर रित्या विरोधी पक्षांचा evm ला शिव्या शाप देण्याचा कार्यक्रम चालू होईल .निवडणूक आयोग कसा बिनकामाचा आणि bjp चा हस्तक आहे ह्या वर स्वयम् घोषित विचार वंत जनतेचे मनोरंजन करतील
दुपार नंतर bjp la mat देणारी जनता कशी मूर्ख आहे ह्या वर सामूहिक गायनाचा कार्य क्रम होईल .
आणि रात्री घसा बसल्या मुळे सामुहिक श्रम परीहार करण्याचा कार्यक्रम ठरला होता पण त्यात पण गोची झाली आहे .
आज dry day आहे तेव्हा श्रमपरिहार करण्याचा कार्यक्रम उद्या घेण्याचे ठरले आहे ह्याची नोंद घ्यावी.
Note- ha कार्यक्रम स्वखर्चाने पार पाडायचा आहे

WhatsApp वर viral होणारा आणि आवडलेला msg उठा उठा दिवाळी आली कमळ फुलण्याची वेळ झाली.
शरद कमळ बघ.
छगन कमळ बघ.
राजू कमळ बघ.
रावल्या कमळ बघ.
बघा बघा इ वी एम बघा.
इ वी एम ला नावे ठेऊ नका.
अरेरे तुमची तोंडे काळी का?
नरेंद्र ये .
राहूल चे काळे तोंड बघ.
अमित ये.
ममताचे काळे तोंड बघ.
बघा बघा ममता चा ताल बघा.
ममता चा थयथयाट बघा.
चमच्यांचा ठणठणाट बघा.
भक्तांची भरभराट बघा.
आतंक्या ची काटछाट बघा.
भ्रष्टां चा नायनाट बघा.

आली आली दिवाळी आली.
कमळ फुलण्याची वेळ झाली.

Pages