अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कराच मग.... उघड आव्हान!

जनरली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसतील (किंवा द्यायची नसतील) तर लोक असा आकांडतांडव करतात Proud

व्होटिंग मशीन्स हॅकप्रूफ आणि टेंपरप्रूफ आहेत हे सांगायला निवड णूक आयोगाने आपल्या ट्विटर हँडल वरून opinida.com वरचा एक लेख शेअर केला आहे.

कुअरो नाही हो कुंजरो >>> टंकन दोष म्हणजे काही तरी महान चूक पकडली अशा थाटात प्रतिसाद देणा-याची मानसिकता उघड होतेच की. शिवाय इथे अनेक जण मराठी भाषी असतात. त्यांना संस्कृत भाषेतल्या चुका सांगणे हे पराक्रम केल्याचे ल़क्षण आहे अशी विचारसरणी ज्यांची आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या ? ज्या भाषेवर बंदीच होती, त्यात चुका झाल्या काय किंवा ती मृत झाली काय काय फरक पडणारे ?

असो तस वागता येण्यासाठी ते काय ते माहित असण्याची किंवा लिहता येण्याची काही आवश्यकता नसते. >>> हे नवीनच समजले.

तुम्हाला काय म्हणायचे ते स्पष्ट आणि न लपवता लिहित चला म्हणजे मग अशी मी हे म्हंटलोच नव्हतो.... स्क्रीनशॉट टाका वगैरे करावे लागत नाही! >>>> एकूण एक स्पष्ट आहे. तुम्हाला समजत नसेल तर माझी समस्या नाही. मुळात काय लपवले याचा स्क्रीनशॉट टाकलेलाच नाही. मी काही तरी म्हटलोच आहे असे गृहीत धरून इथे चर्चा चालू आहे. त्याचा बेसच खोट्यावर आधारीत आहे. म्हणून स्क्रीनशॉट टाका म्हणालो. तो तुम्हाला टाकता का येत नाही हे उघड आहे. म्हणूनच ही असंबद्ध बडबड चालू आहे

EVM हॅक होत नाहीत म्हणता तर मग पळवून नेलेल्या EVM चा काय दुरुपयोग करतील असा तुमचा अंदाज आहे? >> ईव्हीएम हॅक होत नाही असे मी म्हणालो का ? तुम्ही कुठे वाचले ते ? आता तर तुम्ही माझ्या बोटी वाक्येही घालू लागला आहात आणि त्यावर आधारीत प्रश्नही विचारत आहात. याला हातचलाखी नाही म्हणायचे का ?

पळवून नेलेल्या ईव्हीएमच दुरूपयोग काय करायचा याचे उत्तर हॅकींग असेल हे तुम्हीच मनाने काढले आहे. यालाच चोराच्या मनात चांदणे म्हणतात. त्याचा दुरूपयोग काय होतो हे कदाचित तुम्हालाच ठाऊक असेल आणि संबंधितांना. शिवाय मशीन्स पळवून आणली आहेत असेही म्हटलेले नाही. सोबत व्हिडीओ दिसतो आहे. त्यात ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत गंभीर रश्न उभे राहत आहेत. हा कळीचा प्रश्न आहे. ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या बाहेर कही हा प्रश्न समजण्यासाठी एबीपी माझाची चर्चा सुद्धा दिलेली आहे. हे सर्व संगतवार समजून घेतले की कसलाही संशय, भ्रम, धुके राहण्याची आवश्यकता उरत नाही. अर्थात समजून घेणे या मोड मधे असल्यास.

EVM हॅक होत नसतील तर ते कुणी उचलले/वाहवले (जो फोटो तुम्ही टाकलाय) त्याचा निकालावर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? >>> वरती उत्तर आले आहे. शिवाय काही प्रतिसादात मी सुद्धा ते दिले आहे. एबीपी माझाच्या चर्चेची लिंक वाचा आणि तुम्हाला उत्तर मिळाले नाही तरच सांगा. इथे बाकीच्यांना समजलेले आहे सर्व.

EVM हॅक करुन दाखवल्याची संधी त्या हॅकर ला तो गुन्हेगार आहे हे कारण देउन नाकारले याचा अर्थ तो हॅकर EVM हॅक करुन दाखवेल अशी भिती निवडणूक आयोगाला होती असे तुम्हाला म्हणायचे आहे का? >>> ज्या इसमाची बुद्धी किमान सामान्य माणसाच्या स्तरावर असेल तो असे प्रश्न विचारणारच नाही. अ = ब , ब = क असेल तर अ= क असे तुम्हाला म्हणायचे आहे का असे विचारणारा कुठल्या स्तरावर असेल याबाबत मी इथे काहीही बोलत नाही .

या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिल्यास तुमच्या पोस्टसभोवती निर्माण झालेला संभ्रमाचा फुगा फुटण्यास मदत होईल >>> संभ्रम फक्त तुमच्या आकलनाच्याबाबतीतच आहे. एकदा ते वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा हेतू मधे सुधारणा केली तर तुमच्याच मनोवृत्तीचा फुगा फुटण्यास आणि धुके विरून सारे काही स्वच्छ दिसण्यास मदत होणार आहे.

(आणि जाताजाता: तुम्ही जसा इतराइंकडे स्क्रीनशॉटचा आग्रह धरता तसे अस्मादिकांनी केलेल्या हातचलाखीचा स्क्रीनशॉट टाकून बोले तैसा चाले चे उदाहरण घालून द्यावे ही अपेक्षा) >>> अजूनही शंका असतील तर इथून पुढे आपल्या आकलनाबाबत न बोललेले बरे.

इथून पुढे तुम्ही पर्सनल होणार हे शंभर टक्के. कारण तुमच्याकडे उत्तरं नाहीत त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबाचे प्रयोग आता चालू होतील यात शंकाच नाही.

फाट्यावर मारण्यात येतील याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

संघी लोकांच्या या अत्यंत बालीश पद्धतीचा अनुभव २००५ पासून घेतोच आहे. अत्यंत हिडीस आणि वैताग आणणारी पद्धत आहे ही. अर्थात त्यात त्यांना स्वतःला कसलीच लाज , शरम वाटत नसते हे ओघाने आलेच. आपल्यालाच या बालीश लेव्हलला येताना शरम वाटत असते.

https://twitter.com/SpokespersonECI/status/1130854112524873729

निवडणुक आयोगाच्या प्रवक्त्याने आणि प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने म्ह्टलंय की Polled EVMs आयोगाच्या ताब्यात सुरक्षित आहेत.

निवडणूक आयोगाच्या मॅन्युअल मध्ये म्हटलंय की सर्व प्रकारची इव्ही एम्स - वापरलेली, न वापरलेली, बिघडलेली कायम सुरक्षा यंत्रणाच्या देखरेखी खाली असायला हवीत. आणि ती सगळी मतदान संपल्यावर एकाच वेळी परत केली जावीत.
आता निवडाणूक आयोग फक्त मतदानासाठी वापरलेल्या मशीन्स बद्दल बोलतोय.

http://pib.nic.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1572311
रस्त्यावर सापडणा री मशीन्स रिझर्व वाली आहेत, असंही यात म्हटलंय.

मॅनुअल https://www.eci.gov.in/files/file/9230-manual-on-electronic-voting-machi...

पान ५८ वर १०.१२- क आणि ड

म्हणजे या मशीन्ससाठी मॅन्युअल काटेकोरपणे पाळलं गेलं नाही?

त्रागा पोहचला.... निवांत वेळ काढून उत्तर देण्यात येईल!

बाकी कोण पर्सनल होतय, आकलन, गतिमंद वगैरे शब्द वापरतय आणि हिडीसपणा करतय ते सगळ्यांना दिसतच आहे.... असो!

म्हणजे या मशीन्ससाठी मॅन्युअल काटेकोरपणे पाळलं गेलं नाही?

नवीन Submitted by भरत. on 22 May, 2019 - 19:18 >>

This is the right approach

काही EVMs अधिकाऱ्यांकडे सापडली, काही इतरत्र (त्या इतरत्र सापडलेल्या EVMs च्या व्हिडीओ व फोटोंची तारीख कधीची आहे याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत) यावरून सगळी निवडणूकच गंडलेली आहे, सरकार निकाल बदलू पाहात आहे, लोकशाही धोक्यात आहे वगैरे मुक्ताफळे टीव्ही वाहिन्या व मोदीविरोधकांच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्या बातमीदारांकडून उधळली जात आहेत.

EVM हॅक होऊ शकत नाहीत हे निवडणूक आयोगाने वारंवार सांगितले आहे. तंत्रज्ञान सोडा , देशातील एकूण EVM ची संख्या पाहता ती हॅक करणे केवळ अशक्य आहे. त्यांना रिप्लेस करणेही अशक्य आहे. कारण स्ट्रॉंग रूम च्या बाहेर सर्व पक्षांचे कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले आहेत.

अशा वेळी केवळ अराजकता व संभ्रम निर्माण करण्यासाठी फेक न्युज च्या पुड्या विरोधकांकडून सोडल्या जात आहेत. राज्यातील संपूर्ण प्रशासन ज्यांच्या कब्जात आहे , त्या बंगालच्या मुख्यमंत्री ममतादिंदिही EVM बद्धल रडत आहेत हा तर सर्वात मोठा विनोद आहे.

के अश्विनी याबद्दल अधिक सांगू शकतील.

अशी इव्हीएम यापूर्वी रस्त्यावर सापडायची का? लोक प्रश्न विचारताहेत किं वा नुस्तंच शूट करताहेत तिथे कोणी सक्षम अधिकारी दिसत नाहीए. सुरक्षा यंत्रणाही नाही. अशाने लोकांच्या मनात संशय निर्माण झाला तर दोष कोणाचा?

आणि आयोगाला ओप इंडियाच्या कुबड्यांची गरज का पडली? हे संशयावर शिक्कामोर्तब करण्यासारखंच आहे

>>अशा वेळी केवळ अराजकता व संभ्रम निर्माण करण्यासाठी फेक न्युज च्या पुड्या विरोधकांकडून सोडल्या जात आहेत.<<

पराभव पचवणे आणि त्यातून योग्य तो बोध घेउन सुधारणा करणे हा गुण ना विरोधकांकडे आहे ना त्यांच्या समर्थकांकडे.... मग अश्या पळवाटा शोधल्या जातात.... पर्सनल होतात लोक..... गोंधळलेत झालं!

BJP expected to win big according to exit polls but in the last 24 hours:

A) Anil Ambani withdraws defamation suit against Congress, NHerald.
B) Pranab Mukerjee does a u-turn on EC
C) CBI gives a clean chit to UP Yadavs
D) Largest exit poll mysteriously withdraws their exit poll
F) CBI withdraws application from Delhi court to further probe Bofors scam.

Something unexpected to happen?
Points worth thinking.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निवडणूक आयोगाच्या निकालापेक्षा सर्वोच्च असू शकत नाही असे वाटू लागलेय या धाग्यावर सहभाग नोंदवून...

दिनांक ८ ऑक्टोबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्याचे पूर्ण निकालपत्र खालील लिंकवर आहे. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात कुणी दाद मागितली होती आणि कोंणत्या मुद्द्यावर हे देखील स्पष्ट होईलच. विशेष म्हणजे खटलाच निवडणूक आयोगाच्या विरोधात होता. म्हणजे हे भयंकर कृत्य करणारे देशप्रेमी असू शकतील का ?

https://www.eff.org/files/2013/10/08/sci_judgment-2013-10-08.pdf

वरील आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चाचरत चाचरत केलेली विनंती खालीलप्रमाणे

https://www.thehindu.com/news/national/why-no-evms-with-vvpat-supreme-co...

अशी इव्हीएम यापूर्वी रस्त्यावर सापडायची का? >>>

नक्कीच असतील, परन्तु लोक / कार्यकर्ते त्यावेळी आताएव्हढे जाग्रुत नसतील.

लोक प्रश्न विचारताहेत किं वा नुस्तंच शूट करताहेत तिथे कोणी सक्षम अधिकारी दिसत नाहीए. सुरक्षा यंत्रणाही नाही. >> फोटो किन्वा व्हिडिओ काढताना किति भाग शुट केला जातोय हाच वादाचा मुद्दा आहे. ते व्हिडिओ नक्की कधी शुट केले , त्या डब्यान्मध्ये ईएव्हीएम आहे का इथपासुन तपासाची सुरुवात व्हायला हवी. निवड्णुक आयोग ते करत असेलच.

आता ही भागवती मेहनत उद्या फळास आली म्हणजे गंगेत घोडे नहाले असे म्हणता येईल.. अन्यथा संन्यास घेऊन हिमालयात जाणे उचीत ठरेल..! >>
Proud

चल संन्यासी होटल मे
तेरा डोसा मेरी इडली
दोनों साथ मिलाएंगे
साथ साथ ही खाएंगे

लोक म्हणताहेत निवडणूक आयोगाचं ट्वीट हँडल अमित मालवीय चालवताहेत Wink

PIB मे वापरलेल्या मशीन्सबाबत मॅन्युअल पाळलं गेलं नाही अ शी कबुली दिल्यात जमा आहे.
मॅन्युअल आण खी कुठे कुठे पाळलं गेलं नाही, तेही समोर येईलच.
फरिदाबादमध्ये भाजप एजंटने काही महिलांसाठी मतदानयंत्रावरचं बटण दाब ल्या चा व्हिडियो समोर आल्यावर आयोगाने (स्थानिक अधिकार्‍याने) मतदानात फरक पडला नाही असं म्हटलं होतं. पण त्या महिला म्हणाल्या की आमची मतं चोरली. तेव्हा तिथे फेरमतदान घेतलं गेलं..

प.बंगालपेक्षा इवल्याशा त्रिपुरात फेरमतदान झालेल्या मतदानकेंद्रांची संख्या जास्त आहे. का बरं?

सुळे आणि पवार दोघेही पडणार असे तज्ञांचे भाकीत आहे.. खरे खोटे काय ते ईव्हीएमलाच ठाऊक!
खेरीज रागा पडण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे..
ममता ईव्हिएम बद्दल बोंब मारताहेत म्हणजे बहुतेक बंगाल मध्ये 'सफाया' होणार याचा अंदाज असावा.

कितीही आदळ आपट केली तरी आयेगा तो मोदीही...! Proud

आपली आवडती टीम जिंकली नाही की काही काही लोकांना कसे लगेच मॅच फिक्सिंग आठवते तसेच आहे हे!

सोडा पुड्या आणि वाढवा संभ्रम!>>>+१११
हे एक्झिट पोल पाहून साप साप म्हणून जमीन बडवायचा प्रकार चालू झालाय. बघा बुवा उद्या काँग्रेस जिंकलीच तर तोंडघशी पडायची वेळ यायची Wink

एमएसईबी कडून उद्या राज्यात वीजपुरवठा होणार नाही. तसेच भारताला इंटरनेट पुअरवणा-या केबलचा मेंटेनन्स उद्याच असल्याने नेट १८ तास बंद राहणार आहे.

Pages