क्षमा

Submitted by आतिवास on 28 August, 2014 - 04:37

“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.

तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.

“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.

लाडक्या लेकीची क्षमा मागताना कोसळलेले आई-बाप पुन्हा दोन स्वतंत्र माणसं झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

टचिंग! +२ .
सुरवातीला वाटलं एकमेकांची माफी मागत आहेत आईवडिल पण ....शेवटी.... खरच का वागतात असं लोकं .

Sad

वाह

Pages