Submitted by आतिवास on 28 August, 2014 - 04:37
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.
“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.
तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.
“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.
लाडक्या लेकीची क्षमा मागताना कोसळलेले आई-बाप पुन्हा दोन स्वतंत्र माणसं झाली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
speechless.........
speechless.........
आईग्ग....शब्दच नाहीत.. का लोक
आईग्ग....शब्दच नाहीत..
का लोक असं वागतात...
टचिंग!
टचिंग!
speechless.........>>> +१००००
speechless.........>>> +१००००
sundar....atee sundar..
sundar....atee sundar..
सुंदर
सुंदर
first class.
first class.
_/\_
_/\_
वावावा!!!!! सुंदर!!!
वावावा!!!!! सुंदर!!!
सुंदर...
सुंदर...
टचिंग + १
टचिंग + १
थोडक्या शब्दात नेमक्या भावना
थोडक्या शब्दात नेमक्या भावना पकडल्या आहेत.
सर्व वाचकांचे आणि
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
स्पीचलेस..
स्पीचलेस..
वाह
वाह
टचिंग! +२ . सुरवातीला वाटलं
टचिंग! +२ .
सुरवातीला वाटलं एकमेकांची माफी मागत आहेत आईवडिल पण ....शेवटी.... खरच का वागतात असं लोकं .
टचिंग
टचिंग
(No subject)
थोडक्यात साऱ्या भावना पोचल्या
थोडक्यात साऱ्या भावना पोचल्या ..
जबर!
जबर!
Kadak ! Itkya kmi shbdat itka
Kadak !
Itkya kmi shbdat itka bhedak likhan !! Great !!
इतक्या कमी शब्दात काय अफलातून
इतक्या कमी शब्दात काय अफलातून लिहिलं आहेत!
तुमच्या ब्लॉगवरच्या काबुलच्या हकीकती वाचायला छानच आहेत.
बापरे ।।।
बापरे ।।।
वाह
वाह
Speechless... As nko vyayla
Speechless... As nko vyayla kunasobatch
अप्रतिम लेखनशैली! मोजके शब्द
अप्रतिम लेखनशैली! मोजके शब्द आणि ह्रद्यस्पर्शी.
... शब्दच नाहित..
... शब्दच नाहित..
छान!
छान!
ओह्ह
ओह्ह
माफी मागणे आणि क्षमा मागणे
माफी मागणे आणि क्षमा मागणे यात काय फरक आहे?
शशक लिहलीय चांगली पण आशय पटला नाही.
Pages