आपली संरक्षण दले, त्यांची तयारी आणि कामगिरी

Submitted by अश्विनी के on 16 May, 2018 - 07:01

इस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.

सद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :

The Department of Defence (संरक्षण विभाग) - हा इंटिग्रेटेड डिफेंस स्टाफ (आयडीएस), तीन संरक्षण दले आणि विविध आंतर-सेवा संघटनांशी व्यवहार करतो. संरक्षण अर्थसंकल्प, स्थापत्यविषयक बाबी, संरक्षण धोरण, संसदेसंबंधीत बाबी, परदेशी देशांशी संरक्षण सहकार्य आणि सर्व संरक्षणाशी संबंधित उपक्रमांच्या समन्वय ह्या सगळ्याची जबाबदारी ह्या खात्यावर आहे.
The Department of Defence Production (संरक्षण साहित्याची निर्मिती) - संरक्षण साहित्य उत्पादन विभागाचा एक सचीव असतो आणि संरक्षण उत्पादन, आयात सामग्रीचे स्वदेशीकरण असेम्ब्ली, उपकरण आणि सुटे पार्ट्स, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स (डीपीएसयू) च्या प्रॉडक्शन युनिट्सचे नियोजन आणि नियंत्रण ह्या खात्याच्या अखत्यारीत येते.
The Department of Defence Research and Development Organisation (DRDO) (संरक्षण संशोधन व विकास संस्था) - ह्या विभागाचाही एक सचीव असतो. ह्या विभागाचे कार्य म्हणजे मिलिटरी इक्विपमेंट्स आणि लॉजिस्टिकच्या वैज्ञानिक बाबींवर आणि संरक्षण दलांना आवश्यक उपकरणांसाठी संशोधन, डिझाईन आणि विकास योजना तयार करणे.
The Department of Ex-Servicemen Welfare ह्या विभागाचाही एक सचीव असतो. सेवानिवृत्त सैनिकांचे पुनर्वसन, कल्याण आणि निवृत्तीवेतनविषयक बाबी हाताळणे हे कार्य असते.

आपल्या तिनही संरक्षण दलांनी आतापर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण, युद्धे, युद्धजन्य परिस्थिती, देशांतर्गत युद्धजन्य परिस्थिती, तसेच नैसर्गीक व मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती उत्तमरित्या हाताळल्या आहेत. जग जसे प्रगत होत गेले तसे युद्धाचे प्रकार बदलत गेले व अतीप्रगत टेक्नॉलॉजी ह्या कुठल्याही देशाच्या संरक्षण दलाच्या अविभाज्य अंग बनल्या. जगासमोर जश्यास तसे उभे ठाकायचे असेल तर आपली संरक्षण दले सशक्त बनवणे गरजेचे ठरले.

आज हा धागा काढायची उर्मी आपल्या DRDO ने केलेल्या एका कामगिरीमुळे अभिमान दाटून आल्यामुळे आली. कामगिरी प्रतिसादात लिहीत आहे. ह्या अश्याच गोष्टी किंवा तीनही संरक्षण दलांबद्दलचे काही ठळक वृत्त वगैरेंसाठी हा धागा. सतत काही घडत असतं असं नव्हे, पण आपल्या घराच्या दरवाज्यातून इतरत्र टकामका बघताना मनात कुठेतरी आपले घर किती सुरक्षित आहे किंवा आपली तयारी किती आहे ह्याचा अंदाज आपल्याही नकळत घेतो आणि हा बाबा! आपण आपल्या घराभोवती नीट कुंपण घातले आहे, घराचे छप्पर सहज चोर उतरण्याजोगे नाही, भिंती सहज भेदण्याजोग्या नाहीत, घरातील मौल्यवान वस्तू / व्यक्तींच्या सुरक्षिततेची नीट व्यवस्था केली आहे... असे आजमावले की कसे बरे वाटते.... त्यातलाच प्रकार Happy

https://mod.gov.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीआरडीओने विकसित केलेल्या बीओ-५ ह्या अणुस्फ़ोटके वाहून नेवू शकणार्याn क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि ही क्षेपणास्त्रे नौदलाच्या ताफ़्यातील २०१६ साली दाखल झालेल्या भारतीय बनावटीच्या ’अरिहंत’ ह्या आण्विक पाणबुडीवर बसवण्यात आली आहेत. पाणबुडीतून अण्वस्त्रे डागू शकणारा भारत हा जगातील पाचवा देश बनला आहे व भारताची आण्विक प्रतिहल्ला चढवण्याची क्षमताही वाढली आहे. २०१३ साली सगळ्यात पहिली चाचणी घेण्यात आली व त्यानंतर ७०० किलोमीटरची क्षमता असलेल्या ह्या मिसाईलच्या अजूनची चाचण्या घेण्यात आल्या.

सबमरिन लॉन्च बॅलेस्टिक मिसाईल (SLBM) प्रकारातली बीओ ५ मिसाईल ही के-१५ किंवा सागरिका ह्या नावाने ओळखली जातात. ’के फ़ॅमिली’ हे नाव भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे.

पाणबुडीतून डागता येणारी क्षेपणास्त्रे आजपर्यंत फ़क्त अमेरिका, रशिया, फ़्रान्स व चीनकडे आहेत.

DRDO चे सायंटिस्ट्स आता जास्त क्षमतेच्या के-४, के-५ व के-६ विकसित करत आहेत. काही चाचण्या झाल्याही आहेत. बीओ-५ ची जमिनीवरून मारा करणारं वर्जनही विकसित केले जात आहे.

http://idrw.org/bo5-is-indias-first-fully-operational-submarine-launched...

आपल्या तीनही संरक्षण दलांना Artificial Intelligence (AI) वर आधारीत साधने, Robotic शस्त्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कर, वायुसेना व नौदलामध्ये मोठा हिस्सा AI वर आधारीत रणगाडे, विमाने जहाजे, शस्त्रे ह्यांनी सुसज्ज केला जाईल. ह्यावर सरकारचे काम चालू झाले असल्याचे Defence Production Department चे सचीव श्री अजय कुमार ह्यांनी जाहीर केले आहे. ह्याच्या कृती समितीचे अध्यक्ष टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर आहेत. AI वर आधारीत शस्त्रे बनवणार्‍या प्रकल्पाच्या रचनेवर ही समिती काम करत आहे. हा प्रकल्प सरकारी व खाजगी कंपन्यांच्या सहयोगाने उभारला जाईल. भारताचा IT क्षेत्रातला पाया मजबूत आहे त्यामुळे AI वर आधारीत प्रकल्पाची भारताकडे क्षमता आहे. AI वर आधारीत साधनांचा वापर पाकिस्तान व चीन सीमेवर सुद्धा केला जाईल.

अमेरिका, इस्रायल, रशिया, फ्रान्स, ब्रिटन वगैरे देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. चीनच्या स्टेट कौन्सिलने ह्यावर जोर दिला आहे. चीनने दोन महिन्यांपुर्वीच मानवरहित रणगाड्यांची चाचणी घेतली.

आपण हे इतर देशांपुढे दुबळे पडू नये म्हणून करत आहोत. Otherwise, मानवी जाणीवांची उणीव असल्याने artificial intelligence मुळे चुकीचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घडलेल्या चुका निस्तरणे ह्या गोष्टी मानवी मेंदूच सारासार विवेकाने करू शकतो. AI कडे चुका निस्तरणे सोपवण्यासाठी त्याला मानवी जाणीवांची शिस्त लावावी लागेल. हे कसे ते हे तंत्रज्ञान विकसित करणारेच जाणोत. AI चा प्रमाणाबाहेरचा व अनिर्बंध लष्करी वापर खूप मोठा संहार घडवू शकतो.

ही चिंता जगभरातल्या अनेक उद्योजकांनी व संशोधकांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेला लिहिलेल्या खुल्या पत्रातही व्यक्त केली होती.
https://www.theguardian.com/technology/2017/aug/20/elon-musk-killer-robo...

ब्राह्मोस -
http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=179444

भारत व रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्राह्मोस ह्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राला 'लाईफ एक्स्टेन्शन' ह्या तंत्रज्ञानाची जोड देवून यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती DRDO च्या अधिकार्यांहनी दिली. ह्या तंत्रज्ञानामुळे क्षेपणास्त्राचे वयोमान वाढवणे शक्य झाले आहे. बालासोर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या ३ क्रमांकाच्या लाँचपॅडवरून मोबाईल लाँचरद्वारे हे प्रक्षेपण झाले. ह्या तंत्रज्ञानामुळे भारताचा ठराविक काळानंतर संरक्षण ताफ्यातील क्षेपणास्त्र बदलण्यासाठी येणारा खर्च चांगलाच कमी होईल.

ह्या क्षेपणास्त्रात घन व द्रव इंधनाचा दोन स्तरावर वापर करण्यात आला असून ह्या आधीच ते भारतीय लष्कर व नौसेनेत समाविष्ट करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात वेगवान भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून हे जमिन, पाणी व आकाशातूनही डागणे शक्य होणारे पहिले क्षेपणास्त्र आहे. भारतीय वायुसेनेच्या दोन स्क्वाड्रनवर (४० विमाने) ब्राह्मोस तैनात होणार आहे. वायुसेनेसाठीचे ब्राह्मोस तुलनेने वजनाला हलके आहे. लष्कराच्या ताफ्यात ब्राह्मोसच्या ३ रेजिमेंट तैनात आहेत.

ब्राह्मोसची संक्षिप्त माहिती -

१) ब्राह्मोस हे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा व रशियाच्या Moskva ह्या नद्यांच्या नावांवरून ठेवले आहे.

२) ब्राह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे (almost three times the speed of sound at Mach 2.8 ) आणि ह्याचा पल्ला २९० किलोमीटर आहे.

३) सुखोई-३० हे आपले लढाऊ विमान ब्राह्मोससह १५०० किलोमिटरपर्यंत जाऊ शकतं. The combination of Sukhoi-30 and BrahMos means the Indian Air Force can deliver a knock-out punch in minutes, quicker than a warship which may need to sail in the direction of a target at sea.

४) जगभरातल्या युद्धनौकांवरील तैनात surface to air क्षेपणास्त्रांनीही ब्राह्मोसला भेदणे कठीण आहे.

५) भारताला २०१६ मध्ये Missile Technology Control Regime (MTCR) चे संपूर्ण सदस्यत्व मिळाल्यावर ब्राह्मोसवरची काही technical restrictions दूर झाल्यामुळे पल्ला ४०० किलोमीटरपर्यंत वाढवता येवू शकतो.

६) २०२० मध्ये हा ब्राह्मोस विकसित करण्याचा प्रकल्प पूरा होणे अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्या वायुसेनेची समुद्रातले किंवा जमिनीवरचे लक्ष्य खूप दूरवरून सुरक्षित अंतरावरून भेदण्याची क्षमता अनेक पटीने वाढेल.

Indian Air Force (IAF) Balakot Strike: As Jets Flew To Balakot, Eye In The Sky 'Netra' Was Operational Brain

https://www.ndtv.com/india-news/iaf-strikes-flying-in-indian-airspace-ey...

---
News Suite bit.ly/NewsSuite

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय वायूसेनेने मिराज २००० ह्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त (की त्या पलिकडे असलेल्या?) बालाकोट, मुझफ्फराबाद इथले 'जैश ए महम्मद' ह्या दहशतवादी संघटनेचे मोठे ट्रेनिंग कॅंप उद्ध्वस्त केले हे सगळ्यांना माहितच आहे. ह्या एअर स्ट्राईकला अत्यंत सहाय्यभूत ठरलेले, DRDO ने विकसित केलेले हे 'नेत्र'.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/what-is-mission-shakti-india-a...

मिशन शक्ती :-

Low Earth Orbit मधील ३०० किलोमीटरवर असलेले उपग्रह आपल्या शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राद्वारे (A-Sat : Anti Satellite) केवळ तीन मिनिटांत पाडले. DRDO, ISRO व आपण सर्वच भारतीयांचे अभिनंदन.

जगभरात स्मार्ट शस्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे विकसीत केली जात आहेत. त्यासाठी उपग्रहांचे जाळे तयार झाले आहे. हेच उपग्रह युद्धकाळात आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकतात. शत्रूची संपर्क यंत्रणा वगैरे नष्ट करण्यासाठी हे उपग्रह निकामी करू शकणे/पाडू शकणे ह्याला आधुनिक व कृत्रीम बुद्धिमत्ता वापरून केल्या जाणार्‍या युद्धांमध्ये महत्वाचे ठरणार आहे.

ह्याच साठी भारतात 'संरक्षण संशोधन व विकास विभाग' (डीआरडीओ) आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली विकसित करण्याचे व उपग्रहांचा वेध घेवू शकणार्‍या क्षेपणास्त्रांना विकसीत करायचे काम २०१० पासून सुरू होते.

आजच्या ह्या मिशनच्या यशस्वितेबरोबर आपण हे तंत्रज्ञान विकसीत करणारा चौथा देश ठरलो आहोत. पहिले तीन अमेरिका, चीन व रशिया आहेत.

उत्तर कोरियाचं काय चालू आहे ह्या बाबतीत ते तेच जाणोत. अचानक एक दिवस काहितरी भन्नाट न्यूज देतील.

इथे फक्त गोडगोड, अभिमानास्पद वगैरे लिहायचे आहे किंवा कसे? >>> कसलीही हाणामारी अपेक्षित नाही. हा राजकीय घडामोडी किंवा वादांसाठी धागा नाही. जगातील सर्वच राष्ट्रांची संरक्षण दले प्रगती करत असतात. तसंच आपल्या संरक्षण दलांच्या प्रगती विषयी हा धागा आहे. जगातील संरक्षणविषयक प्रगत तंत्रज्ञान व त्याच्या तुलनेत आपली जी काही सश्याची किंवा कासवाची प्रगती चालू राहील त्याबद्दल हा धागा आहे.

धन्यवाद.

इथे फक्त गोडगोड, अभिमानास्पद वगैरे लिहायचे आहे किंवा कसे?>>>>>> निरपेक्ष राहुन देशाबद्दल लिहायचे असेल तर लिहा. नाहीतर या चांगल्या धाग्यातही भाजप, संघ, काँग्रेस, गांधी, मोदी, राहुल आणले जाऊन मूळ विषय बाजूला जाईल.

अश्विनी, छान धागा आहे. आजच डिआर्डीओ बद्दल पण वाचले, ऐकले.

भारतीय शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन. गायगोमूत्रमंत्रतंत्र मानणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये राहून ते जे अचिव्ह करतात ते खरेच कौतुकास्पद आहे.

<<गायगोमूत्रमंत्रतंत्र मानणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये राहून ते जे अचिव्ह करतात ते खरेच कौतुकास्पद आहे.>>
अतिशय आक्षेपार्ह वाक्य, प्रत्येक ठिकाणी हिंदू चाली रितींवर आक्षेप घेण्याची मानसिकता, जगात ल्या १०० च्या वर देशात हिंदू संस्कृती नाही आहे मग तिथे सगळे उत्तम आहे का,? चिप मेन्टॅलिटी बाकी काही नाही.

"गायगोमूत्रमंत्रतंत्र मानणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये राहून ते जे अचिव्ह करतात ते खरेच कौतुकास्पद आहे." - हेला, टोटली अनकॉल्ड फॉर.

पण भारतीय शास्त्रज्ञांचं खरच कौतुक करायचं असेल, तर भारतातल्या स्वतंत्र विचार करण्याला, प्रश्न विचारण्याला, वेगळी वाट चोखाळण्याला प्रतिकूल परिस्थितीत राहून जे यश ते मिळवतात, त्यासाठी करायला हवं.

पण भारतीय शास्त्रज्ञांचं खरच कौतुक करायचं असेल, तर भारतातल्या स्वतंत्र विचार करण्याला, प्रश्न विचारण्याला, वेगळी वाट चोखाळण्याला प्रतिकूल परिस्थितीत राहून जे यश ते मिळवतात, त्यासाठी करायला हवं.

अनुमोदन ..

<< ow Earth Orbit मधील ३०० किलोमीटरवर असलेले उपग्रह आपल्या शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राद्वारे (A-Sat : Anti Satellite) केवळ तीन मिनिटांत पाडले. DRDO, ISRO व आपण सर्वच भारतीयांचे अभिनंदन. >>
------ शास्त्रज्ञांचे अभिनंदन...

<< आजच्या ह्या मिशनच्या यशस्वितेबरोबर आपण हे तंत्रज्ञान विकसीत करणारा चौथा देश ठरलो आहोत. पहिले तीन अमेरिका, चीन व रशिया आहेत. >>
------ अरे वा चौथा छान...

संपुर्ण यश शास्त्रज्ञांचे आहे... निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झालेली असतांना अगदी निवडणूकीच्या तोंडावर अशी चाचणी घेणे आणि यशस्वी झाल्याचे पंतप्रधानांनी जाहिर करणे तितके रुचले नाही. चाचणी आजच करायची होती तर जाहिर करण्यासाठी DRDO चे अधिकारी/ प्रवक्ते आहेत ना...

DRDO आणि ISRO या क्षेत्राचा तरी पक्षिय स्वार्थासाठी वापर करु नका.

उदय, इथे ह्या धाग्यावर निवडणूक, राजकारण वगैरे आणू नये ही विनंती Happy तो ह्या धाग्याचा विषय नाही. त्यासाठी इतर धागे आहेत. ह्या धाग्याला त्या धुळवडीपासून दूर राहू द्या प्लिज.

<< हेला, लसावी… या धाग्याला तरी सोडा. >>
------ असे का ?

काही घडामोडी घडल्या नंतर त्याची चिकीत्सा होणे गरजे आहे. वेगळे विचार असतील आणि ते प्रदर्शित केल्याने या धाग्याचे पावित्र्य नक्कीच भंगणार नाही. निव्वळ सर्वांनी छान छान म्हणायचे असा अट्टाहास केला तर निव्वळ फसवेगिरी आहे.

उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी आताचीच वेळ का निवडली गेली असेल याबद्दल काही अंदाज? चीन ला धडकी भरावी म्हणुन? मग डोकलाम च्या मागे पुढे का नाही दाखवले हे कसब?

पण भारतीय शास्त्रज्ञांचं खरच कौतुक करायचं असेल, तर भारतातल्या स्वतंत्र विचार करण्याला, प्रश्न विचारण्याला, वेगळी वाट चोखाळण्याला प्रतिकूल परिस्थितीत राहून जे यश ते मिळवतात, त्यासाठी करायला हवं.
नवीन Submitted by फेरफटका on 27 March, 2019 - 21:50

Happy तुम्ही जे म्हटले आहे तेच मी म्हटले आहे. स्पष्ट बोलले कि लोकांच्या भावना दुखवतात. असो.

<< उदय, इथे ह्या धाग्यावर निवडणूक, राजकारण वगैरे आणू नये ही विनंती Happy तो ह्या धाग्याचा विषय नाही. त्यासाठी इतर धागे आहेत. ह्या धाग्याला त्या धुळवडीपासून दूर राहू द्या प्लिज. >>
------- सर्वत्र चांगली चर्चा घडावी असा माझा प्रयत्न असतो. मला या धाग्यावर निवडणूक, किंवा राजकारण आणायचे नाही आहे... आचारसंहिता जाहिर झालेली असताना चाचणी यशस्वी झाल्याचे पंतप्रधान जाहिर करु शकतात. तुम्ही येथे बातमी / लिंक शेअर करणार. या घोषणे मधे आणि त्याच्या जाहिराती मधे मला राजकारण दिसले आणि तसे ते नमुद करावे असे मला वाटले.

काही घडामोडी घडल्या नंतर त्याची चिकीत्सा होणे गरजे आहे. वेगळे विचार असतील आणि ते प्रदर्शित केल्याने या धाग्याचे पावित्र्य नक्कीच भंगणार नाही. निव्वळ सर्वांनी छान छान म्हणायचे असा अट्टाहास केला तर निव्वळ फसवेगिरी आहे. >>> त्या चिकित्सा, वेगळे विचार (धागा पेटवणारे) तुम्ही इतर धाग्यांवर हव्या तितक्या करा. इथे ते प्रयास नकोत. गलिच्छ भाषा, द्वेष हे सगळं इथे येवून खरंच ह्या धाग्याचं पावित्र्य भंगेल. तुम्हाला संरक्षण दलांच्या तयारी विषयी काही माहिती देता येत असेल तर नक्की द्या. संरक्षण दले ही भारताची आहेत आणि त्यांची प्रगती छान छानच वाटली पाहिजे. कुठे कमी पडत असू तर त्यासाठी आपले शास्त्रज्ञ प्रयास करतच असतील भारताला at par आणायचा. त्यांचे प्रयास कधी वाया जात असतील तर कधी चांगली अचीव्हमेंट मिळवून देत असतील. दोन्ही वेळेला भारताचे नागरिक म्हणून आपण त्यांच्या सोबत असतो. आपण भले त्यांच्या बुद्धीमत्तेच्या मानाने अगदी कस्पटासमान असू, पण आपली कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर हवीच. ते राजकारण्/पक्ष वगैरे सोडा हो ..... त्यांचा किंवा त्यांच्या फायद्या तोट्याचा काही संबंध नाही इथे.

तुम्ही येथे बातमी / लिंक शेअर करणार. या घोषणे मधे आणि त्याच्या जाहिराती मधे मला राजकारण दिसले आणि तसे ते नमुद करावे असे मला वाटले. >>> त्यासाठी तोच हेतू असलेले इतर भरपूर धागे आहेतच. इथे तुम्ही नमुद करण्याच्या मिषाने लिहिलेत तरी त्यामुळे इथे धुळवड उडणार नाही ह्याची तुम्ही गॅरंटी देता का? नाही देवू शकणार. आणि तोच हेतू असेल तर तो ह्या धाग्यावर योग्य नाही. हा धागा म्हणजे फक्त संरक्षण दलांच्या प्रगतीची / बदलांची सामान्य नागरिकांसाठी निदान जुजबी माहिती असावी ह्यासाठी एकत्रीकरण आहे. त्यासाठी मला आढळलेल्या बातम्या व लिंक मी नक्कीच शेअर करणार..... मग निवडणूक जवळ आलेली असो वा नसो. त्याचा काहिही संबंध नाही. हा धागा राजकीय नाही हा फरक लक्षात घ्या आणि co-operate करा.

चांगला धावा केश्विनी. प्रत्येक धाग्यावर राजकीय धुळवड खेळणार्‍या आयडींसाठी लिहिलेला प्रतिसाद सुध्दा उत्तम.

मिशन शक्तीच्या यशासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

"स्पष्ट बोलले कि लोकांच्या भावना दुखवतात. " - हेला, दुर्दैवानं आपल्याकडे स्पष्ट / परखड ह्याचा अर्थ समोरच्याला दुखावणं असाच केला जातो. नेमकं आणी नि:संदिग्ध बोलताना कुणालातरी दुखावलंच पाहिजे अशी अट नसते. असो. तुमच्या विधानानं कुणी दुखावलं गेलं असल्यास, त्यांनी त्यांची बाजू मांडावी. मला फक्त तुमच्या वाक्यातला पूर्वार्ध अस्थानी वाटला म्हणून तसं नोंदवलं.

मला आपल्याकडच्या 'बाबा वाक्यं प्रमाणम' संस्कृतीचा संबंध नेहमीच हजार वर्षाच्या गुलामगिरीशी आहे असं वाटतं. बाकी धर्म, जात वगैरे मनुष्यनिर्मीत गोष्टी जगभर आहेत. पण त्या असतानाही विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती केलेले कित्येक समाज / देश आहेत. परंतू गुलामगिरीमुळे जी CYA संस्कृती तयार होते, त्यातून मग स्वतंत्र विचार करण्यासाठी आवश्यक असलेला निर्भयपणा मरतो.

<<< काही घडामोडी घडल्या नंतर त्याची चिकीत्सा होणे गरजे आहे. वेगळे विचार असतील आणि ते प्रदर्शित केल्याने या धाग्याचे पावित्र्य नक्कीच भंगणार नाही. निव्वळ सर्वांनी छान छान म्हणायचे असा अट्टाहास केला तर निव्वळ फसवेगिरी आहे. >>>

@उदय,
<<< निवडणूकीच्या तोंडावर अशी चाचणी घेणे आणि यशस्वी झाल्याचे पंतप्रधानांनी जाहिर करणे तितके रुचले नाही. >>> यासोबत अजून एक लक्षात घेतले पाहिजे की जर चाचणी यशस्वी झाली नसती तर विरोधकांनी त्याचे पण भांडवल केलेच असते.
मुळात या धाग्यावर राजकारण आणायलाच नको, तो या धाग्याचा उद्देश नाही.

सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन _/\_

Pages