आपली संरक्षण दले, त्यांची तयारी आणि कामगिरी

Submitted by अश्विनी के on 16 May, 2018 - 07:01

इस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.

सद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :

The Department of Defence (संरक्षण विभाग) - हा इंटिग्रेटेड डिफेंस स्टाफ (आयडीएस), तीन संरक्षण दले आणि विविध आंतर-सेवा संघटनांशी व्यवहार करतो. संरक्षण अर्थसंकल्प, स्थापत्यविषयक बाबी, संरक्षण धोरण, संसदेसंबंधीत बाबी, परदेशी देशांशी संरक्षण सहकार्य आणि सर्व संरक्षणाशी संबंधित उपक्रमांच्या समन्वय ह्या सगळ्याची जबाबदारी ह्या खात्यावर आहे.
The Department of Defence Production (संरक्षण साहित्याची निर्मिती) - संरक्षण साहित्य उत्पादन विभागाचा एक सचीव असतो आणि संरक्षण उत्पादन, आयात सामग्रीचे स्वदेशीकरण असेम्ब्ली, उपकरण आणि सुटे पार्ट्स, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स (डीपीएसयू) च्या प्रॉडक्शन युनिट्सचे नियोजन आणि नियंत्रण ह्या खात्याच्या अखत्यारीत येते.
The Department of Defence Research and Development Organisation (DRDO) (संरक्षण संशोधन व विकास संस्था) - ह्या विभागाचाही एक सचीव असतो. ह्या विभागाचे कार्य म्हणजे मिलिटरी इक्विपमेंट्स आणि लॉजिस्टिकच्या वैज्ञानिक बाबींवर आणि संरक्षण दलांना आवश्यक उपकरणांसाठी संशोधन, डिझाईन आणि विकास योजना तयार करणे.
The Department of Ex-Servicemen Welfare ह्या विभागाचाही एक सचीव असतो. सेवानिवृत्त सैनिकांचे पुनर्वसन, कल्याण आणि निवृत्तीवेतनविषयक बाबी हाताळणे हे कार्य असते.

आपल्या तिनही संरक्षण दलांनी आतापर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण, युद्धे, युद्धजन्य परिस्थिती, देशांतर्गत युद्धजन्य परिस्थिती, तसेच नैसर्गीक व मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती उत्तमरित्या हाताळल्या आहेत. जग जसे प्रगत होत गेले तसे युद्धाचे प्रकार बदलत गेले व अतीप्रगत टेक्नॉलॉजी ह्या कुठल्याही देशाच्या संरक्षण दलाच्या अविभाज्य अंग बनल्या. जगासमोर जश्यास तसे उभे ठाकायचे असेल तर आपली संरक्षण दले सशक्त बनवणे गरजेचे ठरले.

आज हा धागा काढायची उर्मी आपल्या DRDO ने केलेल्या एका कामगिरीमुळे अभिमान दाटून आल्यामुळे आली. कामगिरी प्रतिसादात लिहीत आहे. ह्या अश्याच गोष्टी किंवा तीनही संरक्षण दलांबद्दलचे काही ठळक वृत्त वगैरेंसाठी हा धागा. सतत काही घडत असतं असं नव्हे, पण आपल्या घराच्या दरवाज्यातून इतरत्र टकामका बघताना मनात कुठेतरी आपले घर किती सुरक्षित आहे किंवा आपली तयारी किती आहे ह्याचा अंदाज आपल्याही नकळत घेतो आणि हा बाबा! आपण आपल्या घराभोवती नीट कुंपण घातले आहे, घराचे छप्पर सहज चोर उतरण्याजोगे नाही, भिंती सहज भेदण्याजोग्या नाहीत, घरातील मौल्यवान वस्तू / व्यक्तींच्या सुरक्षिततेची नीट व्यवस्था केली आहे... असे आजमावले की कसे बरे वाटते.... त्यातलाच प्रकार Happy

https://mod.gov.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/defence/defence-bu...

गेली 5 वर्षे दर वेळी कमी कमी बजेट मिळून सुद्धा DRDO ने ही नेत्रदीपक कामगिरी पार पडली आहे, त्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन.

फंड्स च्या कमतरतेमुळे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स त्यांना लांबणीवर टाकायला लागले आहेत, नवीन येणारे सरकार DRDO आणि एकूण संशोधनाला भरपूर पैसे उपलब्ध करून देवो, आणि अशी अभिनंदन करायची वेळ सारखी येवो, ही सदिच्छा

खाण्याच्या पैश्याची तरतूद करण्याची गरज नाही सध्यच्या सरकारच्या कारकिर्दीत, फक्त कामासाठी लागणाऱ्या पैशाचं budgeting करावं लागतं असेल त्यामुळे कमी पैसे असूनही सरकारी इच्छाशक्ती, पाठिंबा आणि स्वच्छ कारभारामुळे यश मिळाले आहे.

त्यामुळे कमी पैसे असूनही सरकारी इच्छाशक्ती, पाठिंबा आणि स्वच्छ कारभारामुळे यश मिळाले आहे. >> मोदीसाहेंबांपेक्षा इथे जास्त फेकाफेकी सुरु झाली आहे. असो. धागा योग्य वळणावर आहे, तो वळचणिला जाऊ नये यासाठी मी तरी इथे फिरकणार नाही.

राजसींना ट्रिगर मिळाला. >>> तो दिसला आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणखी कुणाला ट्रिगर मिळू नये म्हणून वेळीच आवरायला सांगितलं Lol

अजून एक अवांतर ...

न्युक्लिअर रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये ठेवायला न्युट्रॉन ॲब्झॉर्बर रॉड्स व पाणी आवश्यक असतात. नाहीतर ट्रिगर मिळाल्यावर युरेनियम / प्लुटोनियमचे धाडधाड fission होवून न्युक्लिअर रिॲक्टर मेल्ट डाऊन होवू शकतो....

अवांतर समाप्त

अरेवा....
भाजपच्या विरोधात लिहिले की त्याच्यावर वस्सक्न ओरडायचे
आणि
सपोर्टमध्ये लिहिणार्‍याला बाबापुता करायचे....
अच्छा है. रिपब्लिक टिव्हि झालाय ह्या धाग्याचा.

भाजपच्या विरोधात लिहिले की त्याच्यावर वस्सक्न ओरडायचे
आणि
सपोर्टमध्ये लिहिणार्‍याला बाबापुता करायचे....
अच्छा है. रिपब्लिक टिव्हि झालाय ह्या धाग्याचा. >>>> बास की आता! राजसींना सिम्बाच्या प्रतिसादामुळे ट्रिगर मिळालाय पण मी सिम्बा
ला काहीच म्हटलं नाहिये कारण त्याने मोघमात लिहिलं आहे आणि पुढचं सरकार कुणाचं असेल हे ही आत्ताच कसं कळणार? ते कुणाचंही असलं तरी तो म्हणतोय ते बरोबरच आहे.

ह्यापुढे प्लिज सर्वांनी विषयाला धरून लिहा.

अतिशय माहितीपूर्ण धागा व पहिले काही प्रतिसाद! अभिनंदन व धन्यवाद! बरीच माहिती मिळाली.

=====

'मी काढलेल्या धाग्यावर मारामाऱ्या होऊ नयेत' या अर्थाचे विधान करणे हे मुळातच मला आक्षेपार्ह वाटते. म्हणजे या धाग्यात काहीतरी फारच बहुमूल्य माहिती असून त्यावर फक्त प्रासादिक आणि भरीव चर्चाच व्हायला हवी ही अपेक्षाच 'आपण या सगळ्या भोवतालापासून भिन्न आहोत' या धारणेचा दृश्य परिणाम असावा. या संकेतस्थळावर गेली अनेक वर्षे खुल्लमखुल्ला चर्चा, वादावादी, स्कोअर सेटलींग, पर्सनल होणे, एखाद्याची मानसिक प्रकृती बिघडेल इतका ऑनलाईन छळ करणे हे सगळे अव्याहत सुरू आहे. इतरांच्या धाग्यावर चाललेले हे प्रकार दुरून बघून entertain होत राहायचे (किंवा अबोलपणे फार क्लेष वगैरे वाटून घ्यायचे?) आणि आपल्या धाग्यावर असे काही करू नये ही अपेक्षा व्यक्त करत राहायचे हे मजेशीर आहे. सध्याच्या काळात एखाद्याने दुसऱ्याचा पतंग छाटला तरी मोदी आणि काँग्रेस असे वाद होतात तेथे हा धागा तर दोन्ही बाजूंची ठसठसती जखम असलेला धागा आहे. ही विधाने मी अश्विनी के यांच्या पर्सनल विरोधासाठी मुळीच करत नसून मायबोलीवर आपले धागे सन्मान्य राहावेत या 'भारतातील सद्य अवस्थेत अकाली व अस्थानी वाटणाऱ्या' अपेक्षेच्या विरोधात करत आहे.

असो! आजच वाचले की ही 'शक्ती' आपल्याकडे असल्याचे सिद्ध होणे म्हणजे आपण बालवाडीत आणि चीन पदव्युत्तर यत्तेत असल्याचे सिद्ध होणे आहे

तेव्हा, मोदींनी या बातमीचेही मार्केटिंग करणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभणारे असले तरी अजून आपण बच्चे आहोत हे नक्की!

तरीही, आपला स्वतःचा बेंचमार्क आपण उंचावला व त्याबाबत पंतप्रधान स्वतः बोलले यात राजकारण आणणारे हतबल झालेले असणार हे नक्की!

वर मी जे संकेतस्थळाबाबत लिहिले आहे ती टीका तर अजिबातच नाही, उलट सर्वांना शक्य तितका अभय मिळावा या भूमिकेचे यथाशक्ती केलेले appreciation आहे

कृपया गैरसमज नसावा ही विनंती

म्हणजे या धाग्यात काहीतरी फारच बहुमूल्य माहिती असून त्यावर फक्त प्रासादिक आणि भरीव चर्चाच व्हायला हवी ही अपेक्षाच 'आपण या सगळ्या भोवतालापासून भिन्न आहोत' या धारणेचा दृश्य परिणाम असावा. >>> धाग्यावर जी बाहेरच्या जगात उपलब्ध आहे तीच माहिती आहे. कुठलेही स्वत:चे संशोधन नाही. धाग्यावर बहुमूल्य किंवा क्षुल्लक माहिती असणे / भिन्न वा कॉमन माहिती असणे ह्यातलं काहिही असलं तरी ह्या धाग्यावर फक्त धाग्याच्या हेतूपुरतचं लिहिलं जावं ही रास्त अपेक्षा आहे. कुठलीही भरीव वा फुटकळ चर्चा नाही झाली तरी चालेल. शून्य TRP असला तरी चालेल. धन्यवाद.

उदय, अश्विनी म्हणाली तोच हेतु होता. धागे कापरासारखे पेटतात इथले. दोन्ही बाजुवाल्यांनी या धाग्याला सोडा व संरक्षण दलांची कामगिरीच इथे येऊद्या.
अश्विनी, छान प्रतिसाद लिहिले आहेस.

अस कोणत शस्त्र , अस्त्र , टेक्नॉलॉजी आहे ती फक्त भारताकडे आहे आणी क्षत्रु rashtrakade नाही .
युध्द शस्त्र वर जिंकली जातात हे पूर्ण सत्य नाही

देशासाठी.

अश्विनी, चांगला धागा.

पण तुझा वेळ वाया जातोय धागा सुखरूप ठेवण्यात Happy Happy

का

https://www.ndtv.com/india-news/emisat-launch-after-mission-shakti-isro-...

ISRO शिरपेचात अजून एक मानाचा तुरा. भारताचा electronic intelligence satellite EMISAT व अजून विविध राष्ट्रांचे इतर सॅटेलाईट्स कक्षेत यशस्वीरित्या स्थीर करण्यात आले. मिशन शक्ती ह्या Low Earth Orbit मधील सॅटेलाईट्स पाडू शकणार्‍या तंत्रज्ञानापाठोपाठ हा Low Earth Orbit मध्येच असणारा ४३६ किलो वजनाचा उपग्रह शत्रूच्या रडार साईट्स वर लक्ष ठेवेल व रडारचे ठिकाणही शोधून काढेल. आतापर्यंत भारत ह्या कामासाठी विमानं वापरत असे. पण ह्या उपग्रहामुळे शत्रूच्या रडारचा सुगावा ह्या अंतरिक्षातल्या प्रणालीद्वारे घेतला जाईल.

Well done ISRO.

https://economictimes.indiatimes.com/news/defence/us-approves-sale-of-24...

भारतीय नौदलाला अमेरिकेकडून रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर्स पुरवली जाणार आहेत. २४ हेलिकॉप्टर्सचा हा व्यवहार २.६ अब्ज डॉलर्सचा असेल.
सी हॉक हेलिकॉप्टर्स पाणबुडीविरोधी युद्धात प्रभावी असतात (anti-submarine warfare anti-surface weapon system).

तसेच 'Communications Compatibility and Security Agreement' (कॉमकासा) करार झाल्यामुळे दोन्ही नौदलांमध्ये संपर्कव्यवस्था कार्यन्वित झाली आहे. भारतीय नौदलाचे मुख्यालय व अमेरिकेच्या सेन्ट्रल व पॅसिफिक कमांड सेंटरमध्ये संपर्क व समन्वय तयार होवून भारताला महत्वाची व गोपनीय माहिती मिळू शकते vise a versa.

हिंदी महासागरात चीनचा वाढलेला aggressiveness पाहता ही आपली गरज आहे.

Navy Eyes Rs 50,000 Crore Lethal Submarine Project

https://www.ndtv.com/india-news/navy-kicks-off-rs-50-000-crore-lethal-su...

भारतीय नौदल Project 75-India अंतर्गत ६ पारंपारिक प्रकारच्या पाणबुड्या बांधायच्या विचारात आहे. माझगाव डॉकमध्ये बांधणी चालू असलेल्या Scorpene class पाणबुड्यांच्या दीडपट मोठ्या असणाऱ्या ह्या पाणबुड्यांमध्ये डिझेल व विजेचा वापर इंधन म्हणून असेल.

मेरिटाईम फोर्सला (designated for Naval as well as amphibious warfare) कमीतकमी १२ जमिनीवर हल्ला करणारी मिसाईल तसेच युद्धनौकांवर हल्ला करू शकणारी मिसाईल, १८ हेवी वेट टॉर्पेडो वाहून नेवू शकणाऱ्या व डागू शकणाऱ्या पाणबुड्यांची गरज आहे.

इंडोनेशिया व मलेशिया जवळील मलाक्का सामुद्रधुनी ते हिंदी महासागर ह्या भागात मुख्यत्वाने चीनला भारताच्या वाटेवर रोखण्यासाठी भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात पारंपारिक व आण्विक अश्या दोन्ही प्रकारच्या पाणबुड्यांची गरज आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/indian-army-gets-first-b...

आपल्या आर्मीमध्ये आज देशांतर्गत निर्माण केल्या गेलेल्या मध्यम पल्ल्याच्या 'धनुष' तोफांचा (देशी बोफोर्स) ताफा दाखल झाला. Ordnance Factory ११४ तोफा बनवायची मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ६ तोफा आर्मीकडे सुपुर्द करण्यात आल्या. 'मेक इन इंडिया' अंतर्गत निर्माण केलेल्या ह्या तोफांमध्ये ८१% स्वदेशी मटेरियल वापरले आहे. २०१९ पर्यंत ही टक्केवारी ९१ पर्यंत येईल.

Indian Air Force Recommending Abhinandan Varthaman For Vir Chakra Award

https://www.ndtv.com/india-news/indian-air-force-recommending-abhinandan...

पाकिस्तानचे F-16 विमान पाडणारे भारतीय फायटर पायलट अभिनंदन वर्थमान ह्यांना 'वीर चक्र' आणि बालाकोटमध्ये बॉंब टाकणाऱ्या १२ मिराज विमानांच्या पायलटना 'वायू सेना मेडल' प्रदान करण्याची शिफारस भारतीय वायू सेना करत आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/army-to-induct-460-russian-ori...

आर्मीच्या सर्व शस्त्रास्त्रं व मशिनरीचे आधुनिकीकरण व पुनर्रचना करणे ह्याचा एक भाग म्हणून T-90 हे रशियन ओरिजिनचे परंतु भारतात अपग्रेड केलेले 'भीष्म' रणगाडे आपल्या ताफ्यात सामिल करून घ्यायचे योजत आहे.

Pages