इस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.
सद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :
The Department of Defence (संरक्षण विभाग) - हा इंटिग्रेटेड डिफेंस स्टाफ (आयडीएस), तीन संरक्षण दले आणि विविध आंतर-सेवा संघटनांशी व्यवहार करतो. संरक्षण अर्थसंकल्प, स्थापत्यविषयक बाबी, संरक्षण धोरण, संसदेसंबंधीत बाबी, परदेशी देशांशी संरक्षण सहकार्य आणि सर्व संरक्षणाशी संबंधित उपक्रमांच्या समन्वय ह्या सगळ्याची जबाबदारी ह्या खात्यावर आहे.
The Department of Defence Production (संरक्षण साहित्याची निर्मिती) - संरक्षण साहित्य उत्पादन विभागाचा एक सचीव असतो आणि संरक्षण उत्पादन, आयात सामग्रीचे स्वदेशीकरण असेम्ब्ली, उपकरण आणि सुटे पार्ट्स, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स (डीपीएसयू) च्या प्रॉडक्शन युनिट्सचे नियोजन आणि नियंत्रण ह्या खात्याच्या अखत्यारीत येते.
The Department of Defence Research and Development Organisation (DRDO) (संरक्षण संशोधन व विकास संस्था) - ह्या विभागाचाही एक सचीव असतो. ह्या विभागाचे कार्य म्हणजे मिलिटरी इक्विपमेंट्स आणि लॉजिस्टिकच्या वैज्ञानिक बाबींवर आणि संरक्षण दलांना आवश्यक उपकरणांसाठी संशोधन, डिझाईन आणि विकास योजना तयार करणे.
The Department of Ex-Servicemen Welfare ह्या विभागाचाही एक सचीव असतो. सेवानिवृत्त सैनिकांचे पुनर्वसन, कल्याण आणि निवृत्तीवेतनविषयक बाबी हाताळणे हे कार्य असते.
आपल्या तिनही संरक्षण दलांनी आतापर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण, युद्धे, युद्धजन्य परिस्थिती, देशांतर्गत युद्धजन्य परिस्थिती, तसेच नैसर्गीक व मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती उत्तमरित्या हाताळल्या आहेत. जग जसे प्रगत होत गेले तसे युद्धाचे प्रकार बदलत गेले व अतीप्रगत टेक्नॉलॉजी ह्या कुठल्याही देशाच्या संरक्षण दलाच्या अविभाज्य अंग बनल्या. जगासमोर जश्यास तसे उभे ठाकायचे असेल तर आपली संरक्षण दले सशक्त बनवणे गरजेचे ठरले.
आज हा धागा काढायची उर्मी आपल्या DRDO ने केलेल्या एका कामगिरीमुळे अभिमान दाटून आल्यामुळे आली. कामगिरी प्रतिसादात लिहीत आहे. ह्या अश्याच गोष्टी किंवा तीनही संरक्षण दलांबद्दलचे काही ठळक वृत्त वगैरेंसाठी हा धागा. सतत काही घडत असतं असं नव्हे, पण आपल्या घराच्या दरवाज्यातून इतरत्र टकामका बघताना मनात कुठेतरी आपले घर किती सुरक्षित आहे किंवा आपली तयारी किती आहे ह्याचा अंदाज आपल्याही नकळत घेतो आणि हा बाबा! आपण आपल्या घराभोवती नीट कुंपण घातले आहे, घराचे छप्पर सहज चोर उतरण्याजोगे नाही, भिंती सहज भेदण्याजोग्या नाहीत, घरातील मौल्यवान वस्तू / व्यक्तींच्या सुरक्षिततेची नीट व्यवस्था केली आहे... असे आजमावले की कसे बरे वाटते.... त्यातलाच प्रकार
Air Force Gets Its First
Air Force Gets Its First Apache Attack Helicopter At Boeing Plant In US
https://www.ndtv.com/india-news/air-force-gets-its-first-apache-guardian...
आज भारतीय वायूसेनेला पहिले अपाची हेलिकॉप्टर मिळाले. २०१५ साली २२ अपाची हेलिकॉप्टर्ससाठी contract दिले गेले. US आर्मीच्या फॅसिलिटीवर भारतीय वायूसेनेच्या क्रू व ग्राऊंड स्टाफला ट्रेनिंग दिले गेले आहे.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/army-raises-alarm-over-rising-...
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डला लिहिलेल्या पत्रात सैन्यदलाला त्रुटीपूर्ण शस्त्रास्त्रं पुरवली जात असून त्यामुळे सैन्यदलाचे मोठे नुकसान होत आहे, अपघातांमध्ये वाढ होते असा आरोप भारतीय सेनेने केला आहे. हे खरंच सिरियस आहे. देशात साधारण ४१ सरकारी शस्त्रास्त्र कारखाने आहेत आणि त्यावर १९००० कोटी रुपये खर्च होतात आणि साधारण १२ लाख जवानांना शस्त्रास्त्र पुरविली जातात.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने हे आरोप नाकारले आणि शस्त्रात्रांची साठवण व वापर योग्य प्रकारे होत नसल्याने अपघात घडत आहेत असं म्हटलं आहे.
जे काही असेल ते ...... ह्या त्रुटी दुरुस्त व्हायलाच हव्यात. नुसतं ह्यांनी त्यांच्यावर व त्यांनी ह्यांच्यावर ठपका ठेवून उपयोग नाही. सैन्य दलं अद्ययावत करण्यासाठी एवढे प्रयास व खर्च होतो आहे पण जर अश्या चुका होत असतील तर काय उपयोग? एखादी छोटी चूकही महागात पडू शकतेच आणि पडतच असतील.
खराब शस्त्र किंवा वाहनामुळे
खराब शस्त्र किंवा वाहनामुळे सैनिकाचा जीव जाणे यापेक्षा महाग दुसरे काहीच नाही.
त्यामुळे पासिंग द बक करत बसण्यात अर्थ नाही.
Months After Balakot Air
Months After Balakot Air Strike, India To Launch Cloud-Proof Spy Satellite Tomorrow
https://www.ndtv.com/india-news/months-after-balakot-air-strike-india-to...
उद्या ISRO भारतीय संरक्षण दलांसाठी radar enabled 'cloud proof' हेरगिरी करणारा उपग्रह अवकाशात सोडत आहे. बालाकोट air strikes च्या वेळेला प्रूफ मागितले गेले होते. आपल्या आधीच्या उपग्रहांकडून ढगाळ वातावरणामुळे नीट images मिळू शकल्या नव्हत्या. ह्या उपग्रहामुळे ढगाळ वातावरणामुळे उपग्रह blind होणार नाही असे ह्या बातमीत म्हटले आहे. आपणही ती आशा करूया.
हे मिशन उत्तमरित्या पार पडल्यास त्या उपग्रहाचे दोन क्लोन अवकाशात सोडले जातील कारण उद्या सोडण्यात येणाऱ्या उपग्रहाचा जीवनकाळ ५ वर्षांचा आहे.
https://www.hindustantimes
https://www.hindustantimes.com/india-news/senior-officer-moved-over-laps...
भरत, आधीच्या पोस्ट नंतर हेच
भरत, आधीच्या पोस्ट नंतर हेच शेअर करायला आले होते. तेवढ्यात तुम्ही टाकलीत लिंक. एक विनंती आहे. जमल्यास लिंक सोबत दोन चार वाक्यात त्याबद्दल लिहिलंत तर बरं होईल. तुम्ही आधी लिंक दिली आहेत तर मी आता काही न लिहिता फक्त जी लिंक द्यायला आले होते ती देते.
Exclusive: 12 Seconds After Launch, IAF Missile Destroyed Its Own Chopper
https://www.ndtv.com/india-news/exclusive-12-seconds-after-launch-iaf-mi...
ठीक आहे. ध्यानात ठेवीन.
ठीक आहे. ध्यानात ठेवीन.
वर दारूगोळ्याशी संबंधित बातमी
वर दारूगोळ्याशी संबंधित बातमी वाचली, त्या बद्दल पुढे
For the 41 ordinance factories total sanctioned posts are 1.45 lakh and almost 56% of them are lying vacant.
The Directorate General of Quality Assurance (DGQA), which is responsible for checking quality of products at ordnance factories, has about 60% vacancies.
https://m.economictimes.com/news/defence/nearly-80000-vacancies-at-ordna...
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/pslv-c46/risat-2b-mission-a-su...
प्रक्षेपण यशस्वी.
The Directorate General of
The Directorate General of Quality Assurance (DGQA), which is responsible for checking quality of products at ordnance factories, has about 60% vacancies. >>> पुरेसं मनुष्यबळ नसेल तर क्वालिटी चेकिंग पुरेसे अचूक होणे कठिण आहे.
प्रक्षेपण यशस्वी.>> अभिनंदन
प्रक्षेपण यशस्वी.>> अभिनंदन
सकाळीच पाहिली बातमी..
काल राजस्थानातील पोखरण टेस्ट
काल राजस्थानातील पोखरण टेस्ट रेंजवर 'सुखोई-३० एमकेआय' ह्या वायुसेनेच्या प्रगत विमानातून ५०० किलोच्या देशी बनावटीच्या 'गायडेड बॉंब'ची DRDO कडून चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. त्या आधी दोन दिवस सुखोई मधुनच ब्राह्मोस क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी करण्यात आली. As we know, भारत व रशियाने संयुक्तपणे develop केलेले ब्राह्मोस जगातील सर्वात प्रगत सुपरसॉनिक क्षेपणास्त्र मानले जाते. ब्राह्मोसने सुसज्ज सुखोई देशाच्या शत्रूंसाठी घातक ठरतील. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत न शिरताही ३०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणे शक्य होईल. चीननेही भारताने मिळवलेल्या क्षमतेची दखल घेतली आहे.
गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर approx 1000 kg चा बॉंब अश्याच रितीने टाकला होता. दहशतवादविरोधी कारवायांसाठी ही क्षमता प्राप्त करणे महत्वाचे आहे.
Pages