वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या Zoom studios ची Mom and Co. आणि Girliyapa ची Girls Hostel बघते आहे..मस्तं आहे दोन्हीही web series!

मूव्हिंग आऊटचा तिसरा भाग बघितला. झोपून टाकेन असं म्हणतात का, खाऊन टाकेन ऐकलंय पण झोपून टाकेन Uhoh कोण लिहितं असे संवाद.

मूव्हिंग आऊटचा दुसरा सीजन गंडलेला वाटतोय. पहिल्या सीजनमध्ये दोघे मॅच्युअर आणि sorted वाटत होते.
फारच बलिशपणा दाखवतायत आत्ता

Riverb katta ची " घरकुल " ही सिरीज खुप सुंदर आहे. मानसी मागीकर पुर्वीची " गोट्या"सिरीज मधली गोट्याची आई. तीची ही संकल्पना. बा.भ. बोरकर., ग. दि. मा, माधव आचवल. आनंद यादव अशा साहित्त्यीकांची" घरावरच्या लिखाणाची ओळख होते. युट्युब वर नक्कि पहा.
Gharkool Web Series Ep 01 | Reverb Katta

Zoya Akhtar - Reema Kagti's brand new web series ' Made in heaven' on Amazon prime is superb !
Great direction , plot, cast and super luxury South Delhi weddings Happy

Mx player वर punchbeat चे काही भाग पाहिले.. Student of the year ची कॉपी आहे.. एवढी काही खास नाही वाटली..
अजूनही काही वेबसिरीज आहेत ह्या अँपवर..

गली बाॅय बघायला गेले होतेे तेव्हा मेड ईन हेवनचा ट्रेलर लागला होता. तेव्हाच वाटलं होतं की चांगली असेल पण वूमन्स डेला रिलीज होणार हे विसरून गेले नंतर. झोयाचा लेख आला आहे आज लोकसत्तामध्ये, स्त्रिवादी दिग्दर्शिका म्हणून.

मेड ईन हेवनचे दोन भाग बघितले, चांगले वाटले. खूप पात्रे असल्यामुळे नविन गोष्ट कधी सुरू होते आणि कोण कुणाचे काय लागते हे पटकन कळत नाही. दिल्लीच्या रिची रिच लग्नांबद्दल मैत्रिणीकडून ऐकले आहे. श्रीमंत लोक करतात तशीच धुमधडाक्यात लग्न गरीबही करतात, तशी पद्धतच पडली आहे. हुंड्याचं नाव निघत नाही पण मुलीला लग्नात टीव्ही, फ्रिज वगैरे सगळं दिलं जातं. मुलीकडचे देणार आणि मुलाकडचे, त्यांची मर्जी म्हणून घेणार हा प्रघातच आहे, त्याला हुंडा म्हणत नाहीत. रोक्यामध्येच मिठाईवर दहा पंधरा हजार आरामात खर्च होतात. असो. दोन्ही लीड आवडले, तारा जास्त आवडली. दोघांचेही प्रॅक्टीकल फंडे कधीकधी योग्यच वाटतात. तो गरम डोक्याचा सरदार, फुकरेमधला सरदार आहे का.

एरॉस नाऊ वर मेट्रोपार्क नावाची सिरीज बघितली... मस्स्त आहे... रणवीर शौरीने फार भारी टीपीकल गुज्जु सादर केलाय... सॉलिड पंचेस मारतो.. पूर्वी जोशी पण खल्लास. नक्की बघा.. न्यू जर्सी / एडिसन वासियांना बरीच ठिकाणं ओळखीची सापडतील Wink

पंचबीट पाहिली. टिपीकल कॉलेज रायव्हलरीची कथा वाटते आधी पण मग जे दुसरं कथानक मिसळलंय त्याने नाट्य टिकून राहते. SOTY पेक्षा कैकपटीने चांगली आहे. पण या म्हणण्यात काही अर्थ नाही कारण प्लेग्रुपच्या मुलांचं नाटुकलं पण SOTY पेक्षा चांगलं असतं.

मालिका बालाजीची असल्यामुळे बटबटीत आहेच पण तरी एकदा पहायला चांगली आहे.

झी५ वर अर्जुन रामपाल आणि साक्षी तन्वर ची भूमिका असलेली final call आहे. पण फक्त ४च भाग आहेत. पुढचे भाग कधी येणार याची काहिच कल्पना नाही.

माझेही सात बघून झाले, सगळे बघावेसे वाटतात एकावेळी पण वेळ मिळत नाही, मोठे आहेत भाग (ते बरंच आहे). अप्रतिम सिरीज आहे. हे सगळं असं असतं हे आपल्याला माहित असतंं, प्रत्यक्षात किंवा पडद्यावर बघितलेलं असतं पण प्रत्येकवेळी तेवढंच अचंबित व्हायला होतं. सगळेेच एकदम भारी अभिनय करतात, ईतकं की हे सगळं खोटं आहे यावर विश्वास बसत नाही. ताराचंं घर मस्त आहे आणि ताराचे कपडे एकदम क्लासी. करणला जेलमध्ये मारतात तेव्हा रडूच आलं, किती चांगला आहे तो. ह्या विकांतापर्यंत बघून संपवणार.

गंदी बात , आणि गंदी बात 2 , पॉर्न एक्सेस नसेल त्यांना खुश करायला बनवली आहे, काहिचया काही कथा, नुसते सेक्स सीन्स.

अपहरण बघितली.
छान आहे. फक्त शेवट काही पटला नाही.
ट्विस्ट मात्र छान आहेत..खिळवून ठेवते..

इथल्या खूप सारे प्रतिसाद वाचून made in heaven बघायला सुरु केली आणि खूपच आवडली. सुरुवातीला जरा confusion होतं कारण वेगवान मांडणी आणि एका मागे एक unrelated प्रसंग आहेत पण नंतर तेच आवडायला लागलं.

मेड ईन हेवनमध्ये मधेच फ्लॅशबॅक सुरू होतो तेव्हा थोडावेळ लागतो समजायला. लग्नाआधीची तारा नाकात चमकी घालते आणि करण तर शाळेतला दाखवलाय फ्लॅशबॅकमध्ये, फैजा मनोविकारतज्ञाकडे जाते. कबीर गूढ वाटतो आणि जॅझ खूप क्यूट आहे. शिबानी खूप छान वाटते आणि सिंगल पेरेंट म्हणून तिची धडपड छान दाखवली आहे.
बॅंग बाजा बारात थोडावेळ बघितली पण काही पटली नाही, पात्र आणि त्यांचं वागणं काही अपिल झालं नाही. पहिला भाग अर्धाही बघू शकले नाही फक्त रजत कपूरला वेगळ्या रोलमध्ये बघून छान वाटले, बाकी निरर्थक धांगडधिंगा.

मेड इन हेवन दोन दिवसांत बघितली. छान आहे. मला दिल्ली सोसायटी आजिबत आवड त नाही. पण त्याचे चित्रिकरण बरोबर केले आहे. थोड्या चुका आहेत असे पेपरात वाचले. जाझ द्वारका मध्ये राहते तर डीडीए फ्लॅट दाखवायला हवा होता. ती भलतीकडेच कुठे तरी उतरताना दाखवली आहे घरी जाताना. सर्व कपडेपट एकदम अप्रतीम. शेवटच्या एपिसोड मधील ताराची लाल/ मॅजेंटा साडी मला घ्यायची आहे कुठे मिळेल. सांगा हं मला. तो ज्वेलरी पीस पण जबरी आहे बट नॉट इन माय बजेट. तसा बघून घरीच बनवेन. तारा चे काम केलेली मुलगी तेनालीची तेलुगु अम्माई आहे हे बघून फार मस्त वाटले. तिचे सौंदर्य वेगळ्याच लेव्हलचे आहे. म्हणजे भारतीय पण आंतर राष्ट्रीय पात ळीवर च्या प्रेक्षकांना रुचेल असे आहे.

तिचे मन तिला खात असते ते चांगले दाखवले आहे. प्रत्येकाचीच शारिरिक व मानसिक कुचंबणा होत आहे. करनच्या घरमालकाचा सीन बघताना तर किळसवाणे व अरेरे असे दोन्ही वाट्ते. मजबूरी अस्ते एखाद्याची. तो सर्व प्रकार बघायला जरा जड गेला पण चालते. असे होत असते.
करनचे काम पण चांगले झाले आहे. कल्कीची फैझा पण एकदम स्पॉट ऑन. असतात अश्या बायका. असे डिपेंडंट असणे किती भयानक नाही का.

प्रत्येक लग्नाची स्टोरी व बॅक स्टोरी मजेशीर आहे. दीप्ति नवलचे लग्न खासच आवडले. कहां मिलते है ऐसे पति आजकल. जरा मुझे भी बता दो असे एक क्षण वाटून गेले. जाझ ने कंपनी कार्ड वर घेतलेला स्कर्ट व टॉप पण मोह पडेल असाच आहे.

बाटलीला नळी लावून केलेला घरगु ती पद्धतीचा बाँग कसा बनवला असेल नक्की असे वाटले. वरी नॉट मी स्मोकिन्ग वगिअरे करत नाही जस्ट उत्सुकता.

एकूण लग्नावर इतका अनावश्यक खर्च करणे जस्टिफाइड नाही. काळ्या पैशावर फोफावलेली ही इंडस्ट्री आहे वेडिंग प्लॅनिन्ग ची असेच मत होते ते पक्के झाले. आपल्या पद्धतीचे सकाळी साडेनवाचा मुहुर्त, लगेच दहाला पहिली पंगत ऑफिस वाल्यांची व तीन वाजता कार्यालय रिकामे करून आपापल्या घरी असे लग्न किती सोपे सुट सुटीत. अशी लग्ने होत नाहीत वाटते दिल्लीत असे वाटले.

एरवी मी द्वितीय महायुद्धाशी संबंधित काही तरी माहिती पूर्ण बघत असते वीकांताला पण यावेळी लग्न घरीच गेलयवाणी वाट ले.

Pages