मराठी भाषा दिवस २०१९: घोषणा

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 15:25

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

संतकवींपासून ते आधुनिक साहित्यिकांपर्यंतची प्रदीर्घ आणि अभिमानास्पद परंपरा लाभलेल्या मराठी भाषेबद्दलच्या जिव्हाळ्यातून आपण मायबोलीवर मराठी भाषा दिवस गेली अनेक वर्षे साजरा करत आहोत. या मालिकेत नवे पुष्प गुंफताना, २०१९ च्या मराठी भाषा दिवसाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

IMG-20190207-WA0010.jpg

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर, अवीट गोडीची गाणी देणारे गायक आणि संगीतकार सुधीर फडके या तीन दिग्गजांची जन्मशताब्दी आणि आपल्या भरजरी शब्दसामर्थ्याने मराठी मनाला वेड लावणारे थोर नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांची स्मृतिशताब्दी असा योग यावर्षी आला आहे. या वेळच्या मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित केलेल्या पूर्वघोषित आणि ऐनवेळेच्या कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये या योगाचे औचित्य साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय, २८ फेब्रुवारीला असणार्‍या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानेही यावर्षी एक उपक्रम आयोजित केलेला आहे.

मराठी भाषा दिवस २०१९ च्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील दुव्यांवर टिचकी मारा.

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - मोरपिसारा
https://www.maayboli.com/node/69006

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - गोजिरे बोल
https://www.maayboli.com/node/69010

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - साहित्य वाचन
https://www.maayboli.com/node/69009

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - विज्ञानभाषा मराठी
https://www.maayboli.com/node/69007

चला तर मग, सहभागी व्हा आपल्या आवडीच्या उपक्रमांमध्ये! आपल्या प्रतिसादांची आम्ही वाट पाहतोय!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
प्रत्यक्ष लेखन कधीपासून सुरू करायचे आहे ?

कुमार१,
लेख आता लगेचच लिहायला सुरुवात करू शकता. उपक्रमांच्या धाग्यांवर सूचना आहेत त्याप्रमाणे 'मराठी भाषा दिन २०१९' या ग्रुपमध्ये सामील होऊन तुम्ही नवीन धागा उघडून तिथे तुमचा लेख लिहू शकता.

धन्यवाद. काही शंका:
१. माझ्याकडे अन्यत्र पूर्वप्रकाशित अशी १० भागांची वैद्यक-संशोधन मालिका तयार आहे.
२. त्यातले ३ लेख आता लिहू का?
३. उरलेले उपक्रमानंतर पुढे चालू ठेवेन..

कुमार१,
आपल्या उपक्रमाच्या नियमांनुसार इतरत्र पूर्वप्रकाशित साहित्य योग्य ती परवानगी घेऊन इथे प्रकाशित करायला काहीच हरकत नाही.
फक्त, एकच सुचवावंसं वाटतं, की जर तुम्ही १० भागांमधला मजकूर (content) 3 भागांमध्येच मांडू शकलात, तर मराठी भाषा दिन २०१९ या एकाच ग्रुपमध्ये हे सगळं लेखन एकत्र राहील आणि वाचकांना नंतर शोधायला सोपे जाईल. १५०० शब्दांची मर्यादा ही लेखाची आखणी करायला सुलभ होण्यासाठी सुचवलेली आहे. १५०० पेक्षा थोडे जास्त शब्द झाले तरी काहीच हरकत नाही.

नाही हो, लेखमाला मोठी असल्याने ते अवघड आहे.
पहिला लेख प्रकाशित केला आहे.
दोन लेखांत किती दिवसांचे अंतर अपेक्षित आहे ?

कुमार१,
दोन लेखांत किती दिवसांचे अंतर अपेक्षित आहे ? >> वाचकांना वाचायला वेळ मिळण्याच्या दृष्टीने साधारण चार-पाच दिवसांचे अंतर ठेवून लेख प्रकाशित केलेत तर बरे होईल.

अधिकाधिक लोकांच्या नजरेस पडावे म्हणून वर काढत आहे.
मायबोलीकरांनो लवकरात लवकर मभादि २०१९ चे सदस्य व्हा.
https://www.maayboli.com/marathibhashadin/2019

आणि

अधिकाधिक उपक्रमात सहभागी व्हा.

गोजिरे बोल आणि साहित्य वाचन या उपक्रमांसाठी रेकॉर्डिंगची फाईल पाठवण्याची मुदत दि. २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढवलेली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

म भा दिनानिमित्त अनेक चांगले उपक्रम आखल्याबद्दल संयोजकांचे आभार !

या निमित्ताने मला अलीकडच्या एका वाक्प्रचाराबद्दल इथल्या लेखकांना आवाहन करायचे आहे.

सध्या आपण जालावर एखादा लेख लिहिणार असलो अथवा फोटो प्रसिद्ध करणार असलो, की ‘लेख टाका, टाकतो लवकर’, असे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात.
लेखक जेव्हा एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते !

लेख प्रकाशित केला’ असे वाक्य त्या लेखालाही एक सन्मान देते.
wa वरील सटरफटर गोष्टी आणि संस्थळावर लिहिलेला लेख किंवा प्रसिद्ध केलेले कलात्मक फोटो यात गुणात्मक फरक आहे. म्हणून सर्व लेखकांना माझी ही विनंती की आजपासून ‘टाकणे’ ला टाकून द्या ! ☺️

मराठी भाषा दिवस २०१९ उपक्रमात सामिल होणाऱ्या सर्व सभासदांना एक सूचना,
लेख प्रकाशित करण्यापूर्वी तो "सर्वांना दिसेल" अशा सेटिंग णे प्रकाशित करावा.

बरेचजण लॉग इन न होता मायबोली वाचतात, जर तुमचा लेख "ग्रुप पुरता मर्यादित " असेल तर त्यांना दिसु शकणार नाही.