मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - मोरपिसारा

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:18

चतुरस्र व्यक्तिमत्त्व या संकल्पनेचं मराठी माणसाला सर्वाधिक प्रिय असलेलं रूप म्हणजे पु. ल. देशपांडे! लेखक, संगीतकार, पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शक, वक्ते, आकाशवाणीवरील निर्माते, हार्मोनियमवादक, शास्त्रीय संगीताचे रसिक, सामाजिक काम करणार्या संस्थांना सढळहस्ते मदत करणारे पुलं म्हणजे ’ अष्टपैलू’ या शब्दाची मूर्तिमंत व्याख्याच जणू! महाराष्ट्राच्या या लाडक्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या जन्मशताब्दीनिमित्ताने यावर्षीच्या मराठी भाषा दिवसामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत मोरपिसारा हा उपक्रम!

आपल्या ओळखीच्या माणसांमध्ये किंवा सार्वजनिक जीवनात अशी काही चतुरस्र व्यक्तिमत्त्वं आपल्यासमोर येतात, ज्यांना आपापल्या कार्यक्षेत्राबरोबरच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये रस असतो, विविध विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असतं. त्यांच्या या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाचं आपल्याला नेहमी कौतुक वाटतं. अशा तुमच्या आवडत्या एखाद्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिण्याची संधी म्हणजे आपला मोरपिसारा उपक्रम! मग ही व्यक्ती आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, सई परांजपे, अच्युत गोडबोले, यांच्यासारखी प्रसिद्ध असेल, किंवा अप्रसिद्ध, पण तुमच्या ओळखीची असेल. चला तर मग, लिहायला घ्या आपापल्या आवडत्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल!

विशेष सूचना: या उपक्रमासाठीचे व्यक्तिचित्रण काल्पनिक नसणे अपेक्षित आहे.

mor.png

या उपक्रमांतर्गत लेख लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१९' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
लेखाचे शीर्षक-मोरपिसारा

४. जर एकाच आयडीला एकापेक्षा जास्त लेख लिहायचे असतील तर विषयात
लेखाचे शीर्षक - मोरपिसारा (१)
लेखाचे शीर्षक- मोरपिसारा (२)
असे क्रमांक द्यावेत.

५. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. शब्दखुणा या बॉक्समध्ये मोरपिसारा - मराठी भाषा दिवस २०१९' हे शब्द लिहा.

७. मजकुरात आपला लेख लिहावा / कॉपी-पेस्ट करावा.

८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा.
सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लिक करा. म्हणजे तुमचा लेख सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना
दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय
वापरून मजकुरात बदल करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users