माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी कारल्याचा रस प्यायला वा पाहिला आहे का.. कारण हिरवा असेल असे वाटत नाही.. सगळ्या सीरियल मध्ये हिरवा दाखवतात Uhoh Uhoh

मला तर राधाक्काचे हे सोहळे बघुन गुरु - शन्याची दया येऊ लाग्लीये. >>>>> अगदी खरंच. आमच्याकडे एका आजींची वार्षिक भेट असते. दर वर्षी 8-12 दिवस राहायला येतात आणि मला सगळ्या 'झी'च्या सिरियल्स पाहून नंतर चर्चाही करावी लागते. पण आजी एकदम मॉडर्न आणि लॉजिकल आहेत. मला आवडतं त्यांच्याशी कथांवर बोलायला.
तर आजी सुद्धा हेच म्हणाल्या की राधिका जाणूनबुजून इतका त्रास देते आहे की आता राधिकाचा राग आणि शनायाची दया येते आहे. हिला जर नवऱ्याला सोडायचं आहे तर त्याच्या बायकोला सुगृहिणी बनवण्याचा आटापिटा का? का नाही आताच divorce देत? मग शनायाने त्याच्यासाठी रोज स्वैपाक करू देत किंवा हॉटेल मधून आणू देत किंवा नुसते प्रेमाने पोट भरू देत? राधिकाचा संबंध काय? की शनाया वाईट आणि मी किती सर्वगुणसंपन्न शाबीत करून गुरू परत मिळवायचा आहे?
मला जेव्हा केव्हा सिरीयल पाहिली तेव्हा गुरू शनाया खरंच प्रेमात आहेत असं वाटतं. शनाया स्वार्थी आहे, पण तरीही इतका त्रास सहन करून जर गुरुकडे रहात असेल तर ते ती त्याच्या प्रेमात आहे म्हणूनच ना? आता तर तो रिच नाही आणि पोझिशन पण नाही, मग ती का बरं त्याला धरून राहिली असेल? नुसती राधिका नाही, तर आख्खी सोसायटी, मेड्स, दूधवाला, राधिकाच्या ऑफिसमधील स्टाफ आणि शेजारीपाजारी सुद्धा येनकेन मार्गाने छळ करताहेत. Pl leave them alone

ती त्याच्या प्रेमात आहे म्हणूनच ना? आता तर तो रिच नाही आणि पोझिशन पण नाही, मग ती का बरं त्याला धरून राहिली असेल? >>>
तो लेखकच गोंधळला आहे. नक्की सुरुवात काय केली आणि कुठे येऊन पोहोचलो त्या मुळे शनयाला आठवत नाही एक तर तीला मुळातच बदलले त्यामुळे आधीचे तिला माहितच नाही.. आता गुरु बदला म्हणाव म्हणजे काही प्रोब्लेम नाही. राधिका एकटी काम करेल मसाले वाटायचे लेखकाचे.

आणि लोक चवीने राधिका मसाल्याचा स्वाद घेत बसतील पेड चॅनेल मधील सगळ्यात महागड्या चॅनेलपैकी असलेल्या एका चॅनेलवर!

तो लेखकच गोंधळला आहे. >>>>> मंद आहे तो अभिजित गुरू. दोन्ही सिरियल्स किती महान फालतू लिहिल्या आहेत.

नक्की सुरुवात काय केली आणि कुठे येऊन पोहोचलो त्या मुळे शनयाला आठवत नाही >>>>> हो ना, पूर्वी तिचं प्रेम नव्हतं, फक्त त्याच्या पैशांमुळे ती त्याच्या मागे होती. मग आता दुसरा रीची रिच न शोधता त्या दांडग्या रधिकाचे छळ का सहन करत तिथेच रहाते आहे? शनयाने राधिकाच्या जुलुमाना बाय करून आईकडे गेलं तर काय होईल? तिने डीवोर्स दिला नाही तरी गुरू शनायाचाच मागे ती जाईल तिथे येणार. फार तर लीगल मॅरेज होणार नाही एवढंच फक्त.

खरच तिआर्पी खूपाय म्हनून लेखक कहिपन खपव्तोय अप्लयाला आनि अपन पहतोय.
पन मल चिन्ध्य करयल अवदते म्हनून बघ्ते अनि अस लिहिते. कोन वेल खर्च कर्नर अपला शुद्ध लिहून
शुद्ध शब्द फ्क्त मी शुद्द लिहिल. Proud

श्रेखन्दाचा एपिसोद ब्बक्वस होता गुरू इतका मत्थ्थ आहे का? कुनितरि अप्ल्यल इतके खयला घल्तेय अनि यल कलत नहि? अनि इत्के करून रधिकने शन्याल दिलेच जेवन त्या दोघन्ना धदा शिक्वायला अख्ख्य रधिक् म्स्लाले ला खौ घलयची कय ग्र्ज होती? Uhoh
दुस्री गोश्त म्हन्जे एवध्या मोथ्या पोझिश्न वर काम कर्नार मानूस तक्सी चालवतो त्यपेक्श इतर क्म्पनीत नहि का जोब शोध्त? अद्मिन चा शोध म्हनाव, एचार चा शोध, दायरेक्त तक्सी काय?

दक्षिणा, तुझ्या सगळ्या पोस्टचं उत्तर म्हणजे लेखकाची कुवत तेवढीच आहे. त्याला कॉर्पोरेट मध्ये काय संधी उपलब्ध असतात हे तर माहीत हवं ना? तुपारे मधलं ऑफिस पण पाहतो की आपण. आणि इथे सुद्धा 300 करोडच्या कंपनीच्या मालकीण कस्टमर मिटिंग मध्ये आपल्या GM की VP त्याला आनंद भावजी आनंद भावजी करत असते

पन मल चिन्ध्य करयल अवदते म्हनून बघ्ते अनि अस लिहिते.>>

दक्षिणा, चिंध्या करण्यासाठी हे अशुद्ध लिहायला जास्त कष्ट पडत असतील तुला! Wink

काय आहे कात्रीच्या सहाय्याने कापणे सोपे असते. चिंध्या करायच्या म्हणल्या की हाताने फाडावे लागते वाकडे तिकडे किंवा दगडाने ठेचावे लागते दोन्हीना कष्ट जास्त! Happy

नुसती राधिका नाही, तर आख्खी सोसायटी, मेड्स, दूधवाला, राधिकाच्या ऑफिसमधील स्टाफ आणि शेजारीपाजारी सुद्धा येनकेन मार्गाने छळ करताहेत.>>>. अगदी आणि हे जास्त जस्त जास्त वाईट वाटतं मला तरी. हु द हेल दे आर? ती बक्स पण काय वाट्टेल ते बोलते. आणि ऑफिस स्टाफ? आणि तो ख्या ख्या सैमित्र Angry

रोहीणी निनावेला पण असा टर्न पसंत नव्हता बहुतेक, म्हणून सोडली सिरीयल. आधीच सोडायला हवी होती, आधीपण काहीही सुरु होतं.

काय पब्लिक पण नं वन टी आर पी देतं. सिरीयलवाले आदर न करता अपमान करतात पण प्रेक्षकांना कळत नाही.

बघणारे सोडा पण या सिरियल मध्ये काम करणारे लोक त्या सिरियल बद्दल काय विचार करत असतील?
पैश्यांसाठी काहिहि करायचं? Uhoh

गुरु शनायाला फसवून दुसर लफड करत असावा>>>>>> Proud नाही, तो घरातुन बाहेर पडतो ऑफिसर म्हणून आणी बाहेर ड्रायव्हरचे काम करत असल्याने साबा मध्ये ( सार्वजनिक बाथरुम बहुधा ) जाऊन कपडे बदलतो, नेमके रघु ( त्याच्या पूर्वीच्या कंपनीचा नोकर ) त्याला तिथे बघतो. रघुला संशेव येतो, आता यात पाणी वाढवण्यासाठी रघु हे सारे राधिकाला सांगेल, मग राधिका रघुलाच गुप्तहेर बनवुन गुरुबाळाच्या मागे लावेल. मग सत्य उघडकीला आल्यावर परत एक मोठा सोहळा हॉउन, राधिका हातवारे करीत गुरुची आरती करेल.Happy Times

काल मॉल मध्ये शन्याला घरचे सामान आणण्याची जबाबदारी मिळते, तर तिच्या जुन्या मैत्रिणी तिला तिथे भेटुन ५ हजाराची पर्स जबरदस्तीने घ्यायला लावतात. अरे काय हा दळभद्रीपणा ! त्या केड्याच्या दाढीत गोचीड आणी डोक्यावर असलेल्या केसात उवा सोडाव्याश्या वाटतायत.Crying Bee

या सिरियल मध्ये काम करणारे लोक त्या सिरियल बद्दल काय विचार करत असतील?>>

ते काय सांगितल्या कामाचे दिल्या शिदोरीचे. शिदोरी कमी पडली की जातील सोडून...

त्यांना काय करायचे सिरेल च्या माध्यमातून काय संदेश द्यायचा वैगेरे...
पाहणारे प्रेक्षक खूपच गुरफटतात त्या विषयात मग त्यांचा भ्रमनिरास झाला की वैतागतात..
त्यापेक्षा न पाहिलेले बरे. सध्या टीव्हीवर पहण्यासारखे काहीच नसते.. तेंव्हा जे दिसेल ते पाहून दुसर्‍या क्षणी सोडून द्यायचे किंवा आपला रिमोटशी चाळा करीत चॅनेल बदलत बसायचे... सगळ्या सिरेली सारख्या, बातम्या सारख्या, बातम्याच्या चॅनेलवरील नेत्यांची वचावचा चाललेली बाचाबाची सारखी. अगदी जाहिराती सुद्धा त्याच सगळीकडे..
आपण आपले जादाचे पैसे भरून चॅनेल कसे दिसतील कुठे दिसतील झी ५ वर दिसेल का वूट वर दिसेल करीत डोक्याचा भुगा करून घेतो झाले...
करमणूकी पेक्षा वैताग जास्त झालाय टीव्ही म्हणजे..

रश्मी मस्त स्मायल्या आहेत.
मिडल क्लास ना शिव्या देणार्‍या मैत्रिणी स्वतः किराणा मालाच्या स्टोअर मध्ये काय करत होत्या? साडी का वेअर केली आहेस? असा प्रश्न विचारला मैत्रिणींनी Uhoh

इतके प्रतिसाद पाहून हा धागा पाहिला. अरे आता ट्राइने आयती संधी दिली आहे, न आवडणारी चॅनेल्स न पाहायची. तिचा फायदा घ्या की. मी इथे लिहिलेलं त्या प्रमाणे झी माझ्या पॅकेजमधून वगळलं. परवा तेरवा कळलं की सगळी चॅनेल्स दिसताहेत टीव्हीवर तरीही झी मराठीच काय, एकही मराठी करमणूक चॅनेल लावलं नाही.
नक्की काय कंपल्शन असतं न आवडणार्‍या मालिका पाहायचं?

नक्की काय कंपल्शन असतं न आवडणार्‍या मालिका पाहायचं. >>>>>. अमेरिकन स्टाईल ओपन किचन आहे. लिविंग आणि किचन एकच ह्युज एरिया आहे. मी कुकिंगच्या ओट्यावर काम करताना ऐकू येतंच. आणि आयर्लंड प्लॅटफॉर्मवर आलं की TV दिसतो. बरं, चॅनल लावताच का या प्रश्नाचं उत्तर, घरी आजी रहायला आली की ती लावते. अंधार झाला की ती बाहेर जाऊ शकत नाही, मी तिला किचनमध्ये येऊ देत नाही, ट्युबलाईट मध्ये तिच्या डोळ्यांवर स्ट्रेस येतो म्हणून वाचन फक्त दिवसा, मग बिचारी 7 ते 9.30 करणार काय? मग मी कटकट न करता तिला TV पाहू देते

त्या केड्याच्या दाढीत गोचीड आणी डोक्यावर असलेल्या केसात उवा सोडाव्याश्या वाटतायत. >>>> Biggrin किंवा उलटं पण चालेल Wink

मी पहात नाही दिसतात >>> ज्ये.ना. त्यांचा वेळ जावा म्हणून बघतात, त्यामुळे इच्छा नसताना 'स्वराज्यरक्षक संभाजी' ची वाट बघत 'जे जे लागेल, ते ते पहावे' लागते !
चिन्ध्या करायला मिळतात +१ Happy

आमच्याकडे पण आहेत ज्ये ना. राधिकाने शनायाला साडी नेसून आदर्श गृहिणी व्हायची एक पायरी शिकवली, त्यादिवशी त्यांना विचारले की हा आचरटपणा बघायचाय का?
त्यांनी रुकार दिल्यावर झी अन सबस्क्राइब केलं.

<शनायाने त्याच्यासाठी रोज स्वैपाक करू देत किंवा हॉटेल मधून आणू देत किंवा नुसते प्रेमाने पोट भरू देत? राधिकाचा संबंध काय?> नेमके हेच डायलॉग त्या दिवशी मारलेले. मला हे चालणार नाही चा पाढा चालला होता राधिकाचा.

झी ची सर्वाधिक घोळ असलेली मालिका असणार ही पंधरा दिवसांवर डायव्होर्सचं फायनल हिअरिंग होतं. त्यावर तीन एपिसोड खर्च केले असतील. मग लग्न लावून द्यायचं ठरल्यावर लेखकाच्या मेमरीतून डायव्होर्स डिलिट झाला तसा प्रेक्षकांच्या मेमरीतूनही ऑटोमॅतिक डिलिट व्हायला हवा की काय?

दक्षिणा, रश्मी Rofl

मग आता दुसरा रीची रिच न शोधता त्या दांडग्या रधिकाचे छळ का सहन करत तिथेच रहाते आहे? शनयाने राधिकाच्या जुलुमाना बाय करून आईकडे गेलं तर काय होईल? >>>>>>>>>> राधिकाने तिला धमकी दिलेली असते ना की तिच गुरुशी झालेल बेकायदेशीर लग्न पोलिसान्ना जाऊन सान्गेन म्हणून. त्यामुळे शनायाला राधिकाबरोबर राहाव लागत असेल.

मी पाहत होतो तेव्हा ऑफिसमधल्या फ्रॉडची धमकी दिलेली. शनायाने केलेला खोटा फोन, राधिकाचा अ‍ॅक्सिडंट, पोलीस केस हे पण डिलिट केलं मेमरीतून.
आणि दुसर्‍या लग्नाच्या केसची भीती गुरूला. शनायाला नाही. आणि राधिक काही गुरूवर केस करणार नाही.

हम बने तुम बने आवडतेय मला, कुठलाही अतिरेक नाही की ओव्हरडोस नाही, आपण रिलेट करु शकु असच कुटुन्ब दाखवलय.

दांडगी राधिका.... Biggrin
कैच्या कैच चालूय. किराणा सामान काय, राधिका चा आक्रस्ताळेपणा काय, गुरु मातेचं हाव नं बाई...करत माना डोलावणे काय....अथर्व ची टीचर काय...................अगदीच फालतूपणा!
आणि अगदीच असहनीय म्हणजे शनायाची मॉम! यक्स !
काय ते कपडे, काय ते वचावचा खाणं- बोलणं, काय लिप्स्टिक........!! कलंक अगदी..................!!!!

आणि अगदीच असहनीय म्हणजे शनायाचि मॉम! यक्स! >> अगदी अगदी. कोण बाई असं मुलिच्या मित्राच्या घरी नाक वर करून फुकट्यासारखी राहते? Uhoh

कोण बाई असं मुलिच्या मित्राच्या घरी नाक वर करून फुकट्यासारखी राहते?> शन्याची आई Lol
तो ह्या बायकांना घरी ठेवणारा मित्र किती महामुर्ख.

मी पाहत होतो तेव्हा ऑफिसमधल्या फ्रॉडची धमकी दिलेली. >>>>>>>> पण मी ही धमकी राधिका शनायाला आ़णि तिच्या आईला देताना पाहिलेल . Uhoh

Pages