माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबट गोड खरंय, तुझं म्हणणं तंतोतंत पटलं आहे. मला पण राधिकाला चिडताना पाहून थोबडवून काढावं वाटलं.

तर काय! Angry
राधिका सगळ्यांना अगदीच अद्वातद्वा बोलत सुटलेली! सासर्‍यांना पण!
कसला एव्हढा सती सावित्रीचा आव आणत्येय ही ? आणि का? हिला अजूनही गुरवासोबत संसार करण्याचीच इच्छा आहे का?
गुरुचं तर चांगलंच फावतंय. शन्या व तिची मम्मा चीड आणतात नुसती! अतिशय बेचव, निकृष्ट, स्वस्त मनोरंजन चाललेय..............................................!!!!!!!!!!!!!

जर कुठली मालिका बंद करावी असं वाटत असेल तर काहिच कायदेशीर मार्ग नाही का. का बाया बापड्या ही सिरियल बघून सिरियलच आयुष्य वाढवत आहेत

यु ट्यूबवर वाचलं की ही मालिका लवकर संपणार, शनाया निघून जाणार आणि राधिका गुरु एकत्र येणार.

अरे किती फालतूपणा. त्या राधिकाने div घेऊन मोकळं व्हायचं होतं. ह्या मालिकेचा उद्देश हाच होता तर इतकी वाढवायची कशाला. ती शनाया असतानाच हा शेवट करायचा. काय पण प्रेक्षकांनी डोक्यावर घेऊन कायम trp उत्तम दिला म्हणून ह्याचं फावलं काहीही दाखवायचं.

यु ट्यूबवर वाचलं की ही मालिका लवकर संपणार, शनाया निघून जाणार आणि राधिका गुरु एकत्र येणार. >>>>> रिलॅक्स, यु टयूबवरच्या बातम्या खोटया असतात.

Lol

बघत नाही त्यामुळे काहीच prblm नाही, कितीही वाढवा. फक्त इतकी वाढवल्यावर शेवट तरी काही सेन्सिबल करा.

अर्थात असाही शेवट बघण्याची इच्छा असणारे प्रेक्षक असतील. त्यामुळे मला सेन्सिबल वाटते तेच बरोबर असं माझं म्हणणं अजिबात नाही.

यु ट्यूबवर वाचलं की ही मालिका लवकर संपणार, शनाया निघून जाणार आणि राधिका गुरु एकत्र येणार.

अरे किती फालतूपणा. > पॉझिटिव्ह साईड बघ अन्जू ! ही मालिका लवकर संपणार Proud

रावी खरंच Lol

रोज प्रेमाने, कंटाळून बघणारे सुटतील तावडीतून हिच्या.

पॉझिटिव्ह साईड बघ अन्जू ! ही मालिका लवकर संपणार Proud

रोज प्रेमाने, कंटाळून बघणारे सुटतील तावडीतून हिच्या.>>>>>> +++++++११११११११

शनाया निघून जाणार आणि राधिका गुरु एकत्र येणार.
>>> शी यापेक्षा शनाया गुरूला सोडून जाणार आणि
पानवलकर आणि धारकका लिव्ह इन मध्ये जाणार, हे पण ऍक्सेप्ट केले असते.

आजच्या भागात शेतकर्‍यांच्या एकेक नमुन्याचं दर्शन झालं आणि अगदी positive positive वाटलं. इस्त्रीचे कपडे, भारीच घड्याळं, उगीच नावाला गळ्याभोवती कपडा, विशेषतः ती शेतकरी आजी बघून डोळे पाणावले. किती फुग्या सारखी हडकली होती शेतात राबराबून. Positivity चा कहर म्हणजे राधिका ला एकजण कर्मकहाणी सांगताना इतर लोक चक्क हसतमुखाने बघत होते..
पाणी foundation ने आमिरपेक्षा राधिका ला घेतलं तर बरं होईल.

इस्त्रीचे कपडे, भारीच घड्याळं, उगीच नावाला गळ्याभोवती कपडा, विशेषतः ती शेतकरी आजी बघून डोळे पाणावले. किती फुग्या सारखी हडकली होती शेतात राबराबून. Positivity चा कहर म्हणजे राधिका ला एकजण कर्मकहाणी सांगताना इतर लोक चक्क हसतमुखाने बघत होते..>>>>हो पाहिला तो शॉट. लयभारी राधाक्का. लयभारी केडाण्णा.

गुगु तेच म्हणायचे आहे. तिची राधिका म्हणून असणारी शेतकऱ्यांविषयी तळमळ आणि लोकप्रियता यांचा उपयोग करून घेतला पाहिजे हो..

राधिका अनिता दाते नावाने पाणी foundation मध्ये होती. >>> बरोबर. पहील्या सीझनमधे तिने काही गावांचं प्रतिनिधित्व केलं होतं, बरोबर कोण होतं विसरले. टीव्ही कलाकार वेगवेगळ्या चॅनेलवरचे वेगवेगळ्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत होते. दोन भाग बघितले होते पहीले, मग नाही.

कैच्या कैच..म्हणजे अगदीच कैच्या कैच सुरुय सध्या... शनाया सखरगावात जाते आणि राधक्का तिला गुंडांच्या तावडीतून सोडवते......असं काहीतरी ओझरतं पाहीलं...!!

आता राधिकाने गावाचा विकास करायचा ठरवलं आहे. समस्त राजकारणी लोकांनी मान खाली घातली पाहिजे! म्हणजे आपला मसाल्याचा उद्योग आणि नवऱ्याला वठणीवर आणणे हे महत्त्वाचे उद्योग सोडून विकासाच
महत्त्वाचं काम करणार राधिका! हे असच चालू राहिलं तर विधानसभेला उमेदवारी नक्की!

या सिरियल चे नाव बदलून "राधिका - सुपरवुमन!" असे करायला पाहिजे. ती काय वाट्टेल ते करून दाखवते!
३०० कोटी देऊन कंपनी घेते, सौमित्रला लग्नाला थांबवते, लग्नाच्या खरेदीला मदत करते. गावच्या जहागिरिदाराला दमदाटी! नि सतत त्या गुरू च्या आईसाठी काञ वाट्टेल ते करायचे.
आणि हे ३५ कोटी रु. कॅश नुसते बॅगेत ठेवले? किती दिवस? नि पानवलकरांनी त्या किल्ल्या खरे तर एक चेन लावून कायम स्वतःच्या खिशात ठेवायच्या ना? कुठेहि ठेवून देतात!!
नि अजूनहि गुरु च्या बाबतीत कुणि सावध नाहीत? ही असली भोळी माणसे एव्हढा मोठा धंदा करू शकतात?
मला बरेच काही काही समजत नाही.

असो. एकच वाटते - त्या राधिकेचे गुरूवर अजूनहि प्रेम आहे. नेहेमी त्याला फायदेशीर होईल असेच करत असते. दुसरी कुणि असती तर केंव्हाच घटस्फोट देऊन मोकळी झाली असती. आताशा काय घटस्फोट म्हणजे घराण्याची बेइज्जती वगैरे खुळ्या कल्पना राहिल्या नाहीयेत समाजात - विशेषतः भर गुरू बद्दल घरात, ऑफिसात सगळ्यांना पटले की तो किती वाईट आहे!

असे सगळे असले तरी मी दररोज बघतोच!

आज जेनंद च संगीत होते.
सौ आणि श्रेयस च अतिशय फालतु संचलन .
नाच मात्र छान होते.
ईथेही कंपनी तली सगळी लोक घरच कार्य म्हणून हजर होती.
कदम , रश्मी , गणू भाओजी आणि young पलटण , सगळ्यानी perform केलं

आज जेनंद च संगीत होते. >>>>>> प्रोमो बघितला. शेवटी गुरु देवदास स्टाईल तमाशा करणार आहे. राधिका आहेच नेहमीप्रमाणे ' अहो अहो' करत पाठीमागे.

आज जेनंद च संगीत होते. >>>>>> प्रोमो बघितला. शेवटी गुरु देवदास स्टाईल तमाशा करणार आहे. राधिका आहेच नेहमीप्रमाणे ' अहो अहो' करत पाठीमागे.

अरे काही updates द्या कि. काही कारणाने tv बंद आहे गेले 2 आठवडे. बाकी धाग्यावर आहेत updates. मानबाच्या धाग्यावर येऊ द्या काहीतरी
राधाक्का केडान्ना गुरवा कुठंवर आहेत

Pages