Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वजण आपली नंबर 1 trp भैताड
सर्वजण आपली नंबर 1 trp भैताड सिरीयल येकदम बेष्ट या भ्रमाच्या भोपळ्याच्या राहतात सगळे.... दे निड रियालिटी चेक बॅडली,>
> पण त्यांच्या साठी रिऍलिटी हीच आहे की लोकं कितीही शिव्या देऊ वा लाड करू, trp no 1 आहे न बास
मी सध्या टीव्ही वर कुठलीच शिरेल बघत नाहीये. फक्त इकडे वाचते, मज्जा येते तरी कधी कधी वाटते की इकडे पिसे काढायची म्हणून जास्त काढली जातात . पण ते वाचायला जास्त आवडते शिरेल बघण्यापेक्षा
मीरा....>>>राधिका कधीच छान
मीरा....>>>राधिका कधीच छान दिसली नाही या सिरीयल मध्ये. आणि ती दुसरी तुला पाहते रे ची नायिका सुद्धा कधीच, कुठल्याच कपड्यात छान दिसत नाही>>
>>> आणि अभिनय वाईट असल्याने लुक्स कडे लक्ष जातं.>> 100 टक्के सहमत....
राधिका मसाले ब्रँड खरच आणला
राधिका मसाले ब्रँड खरच आणला तर खपेल पटापट.
धारकका चे चित्र लावायचं.
राधिका कधीच छान दिसली नाही या
राधिका कधीच छान दिसली नाही या सिरीयल मध्ये. >>>>>>>>>++++++++११११११११ सहमत मीरा
अनिता दाते खरतर फार चान्गली
अनिता दाते खरतर फार चान्गली अभिनेत्री आहे पण कुठेतरी लेखक भुमिकेच आणी पर्यायाने अभिनेत्याची माती करतो... राधिकाचे काही लुक आवडले होते मला खरतर तिचा खोटा शेपटा काढुन टाकल्याने ती चान्गली वाटतिये पण गोर्या लोकाना जरा सटल मेकप लागतो हे मेकप करणार्याच्या लक्षात यायला हव.
त्या सोसायटीत एवढ्या बायका
त्या सोसायटीत एवढ्या बायका राहतात हे आज कळले. त्या बायकांना त्रास असण्याचं काय कारण. काही सोसायट्या लीव ईन वाल्यांना परवानगी देत नाहीत हे ऐकलं होतं पण दोन सवती एका घरात तेही मालकीच्या घरात राहतात तर सोसायटीला काय हरकत. राधिकाला स्वत:ची दुखभरी कहाणी किती किती लोकांंना ऐकवू असे झालेले असते नेहेमी. मिटींग संपल्यावर आलात म्हणे, मिटींग कसली तर राधिका कशी शनायाला हैराण करत आहे ते आणि आनंद कसा डाएट करूच शकत नाही या महत्वाच्या विषयांवर चर्चा. शनाया भर हळदीकुंकवात आल्यामुळे सासूसुनेची बरी जिरली.
कानाला खडा मध्ये अनिता दाते
कानाला खडा मध्ये अनिता दाते आलेली तो भाग पाहिला. तो झेन्डे झालेला तिचा मित्र आहे हे नव्यानेच कळल. अनिता आणि राधिका ह्यान्च्यात फरक आहे फक्त एक गोष्ट सोडून. तिकडे राधिका लोकान्ची जबरदस्तीने लग्ने लावते. अनिता ला सुद्दा आपल्या मित्र मैत्रिणीन्ची लग्ने लावून देण्याची खोड आहे. उमेश जगतापच (झेन्डे) असच मॅट्रिमोनिअल साईटवर प्रोफाईल टाकून लग्न लावून दिल. आता रुपाली शिन्दे ( जेनी) हिच्या मागे लागली आहे लग्नासाठी. लव मॅरेजपेक्षा अॅरेन्ज मॅरेज कस योग्य आहे ते पटवून देतायत बाईसाहेब रुपालीला.
काख मधे पण अनिता दाते डोक्यात
काख मधे पण अनिता दाते डोक्यात गेली. खूप लाऊड अति आत्मविश्वास वाटला तिच्यात
काख सिनेमा आहे का. कधी नाव
काख सिनेमा आहे का. कधी नाव ऐकले नाही.
कानाला खडा हो चंपा
कानाला खडा हो चंपा
वैतागू नका हो कुरुडी तिचे
वैतागू नका हो कुरुडी
तिचे आईवडिल आले होते मागे खवय्येमध्ये तेव्हा तिचे दुर्गुण सांगत होते म्हणून तिने यावेळी बोलवलेच नसेल त्यांना.
कुरुडी मला तर अहंकारी वाटली!
कुरुडी मला तर अनिता दाते अहंकारी वाटली!
कुरुडी मला तर अहंकारी वाटली!>
कुरुडी मला तर अहंकारी वाटली!>> तुम्हाला कुरुडी का अहंकारी वाटली ?? एका पोस्टवरुन असं ठरवू नये हो अज्ञातवासी.

निधी
निधी
निधी
निधी
काख मधे पण अनिता दाते डोक्यात
काख मधे पण अनिता दाते डोक्यात गेली. खूप लाऊड अति आत्मविश्वास वाटला तिच्यात मला तर अनिता दाते अहंकारी वाटली >>>>>>>>>>+++++++++१११११११११
निधी
माझे बालबोध विचार आणि शंका
माझे बालबोध विचार आणि शंका
1..ज्या अर्थी shanayala वाजत गाजत वरात काढून गृहप्रवेश करून समारंभ पूर्वक gharat आणले जाते त्या अर्थी सर्व सोसायटी आणि तमाम शेजारी पाजारी यांना काय चाललंय याची माहिती कल्पना असणे खूपच अपेक्षित आहे...
2. ज्या अर्थी कोणी कुणाच्या gharat राहावे, काय नात्याने राहावे इत्यादि सारख्या गोष्टी साठी ज्या सोसायटी मध्ये नियम असतील असे गृहीत धरून विचार केला तर waratisarkhya गोंगाट निर्माण करणार्या समारंभाला राधिका सुभेदार यांच्यासारख्या महान सदस्याने रीतसर परवानगीने shanayala आणले आहे असेच म्हणावे लागेल
3. वरील दोन्ही गोष्टी लक्षात घेता शनिवारी so called हळदी कुंकू साठी आलेले सदस्य अनभिज्ञ, कध्धी कध्धी न माहिती असल्यासारखे का वागत होते..???
4..जेव्हा राधाक्का नानीजी कडे रहात होती आणि गॅनाया जोडी समोरच रहात होते तेव्हा सोसायटीला हे नियम नव्हते का?
5. याही पेक्षा कहर म्हणजे ganaya जोडी ishakade रहात होते राजरोस पणे.. तेव्हा ही मंडळी काय करत होती?... सोसायटी मीटिंग, स्पर्धा वगैरे सुद्धा shanayane attend केल्या आहेत..
डोक्यावर पडलेल्या मा न बा च्या तमाम क्रू मेंबर्स ना दंडवत, नमस्कार
सुषमाताई एक नंबर पोस्ट
सुषमाताई एक नंबर पोस्ट
आणि राधाक्का आज सोसायटी मिटिंग मध्ये "माझ्याशी जी प्रतारणा झाली.. " असं म्हणण्या ऐवजी "माझी जी प्रतारणा झाली.." असं म्हणाली.
अरे ती सिरियल मरुदे.. पण
अरे ती सिरियल मरुदे.. पण चांगलं देवनागरीत टाईप करताना अधूनमधून रोमनमध्ये कसे आणि का टाईप करता शब्द??
अरे ती सिरियल मरुदे.. पण
अरे ती सिरियल मरुदे.. पण चांगलं देवनागरीत टाईप करताना अधूनमधून रोमनमध्ये कसे आणि का टाईप करता शब्द??>>nidhii, होतं असं कधी कधी... आणि अशा सीरियल पाहून तर आपण कोणती लिपी याचे भान राहातच नाही... पण मी हे आवर्जून लक्षात ठेवेन आणि टाइप करताना देवनागरीत टाइप होईल याची काळजी घेईन.. :
सोसायटी मिटिंग मध्ये
सोसायटी मिटिंग मध्ये "माझ्याशी जी प्रतारणा झाली.. " असं म्हणण्या ऐवजी "माझी जी प्रतारणा झाली.." असं म्हणाली. >>>अरे बापरे, दक्षिणा, बरं झालं आज माझा एपीसोड पहायचा राहिला होता... आता नाही पहाणार...
सुषमा ताई, फक्त तुम्हीच नाही.
सुषमा ताई, फक्त तुम्हीच नाही. आताशा दोन तीन जणांना या पद्धतीने टाईप करताना बघितलंय. आणि मराठी शब्द रोमनमधून वाचायला जाम वैताग येतो.
जाऊ दे हो, एखादं दुसरा शब्द
जाऊ दे हो, एखादं दुसरा शब्द रोमन आला तर काय होतंय..
काही शब्द मराठीत नीट उमटत नाहीत गूगल keybord वर.
कालचं राधिका चं भाषण ऐकून मला
कालचं राधिका चं भाषण ऐकून मला पुन्हा एकदा असं वाटलं की ही सिरियल कुणाच्या पर्सनल अजेंड्यावर चालू आहे. ग्रॉस ब्लेमींग आणि 'अशा' समस्त पुरुष जातीला धडा शिकविण्यासाठी मी
त्या इशाचे काय झाले? तिने पण
त्या इशाचे काय झाले? तिने पण सिरीयल सोडली का?
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...
असेच हळूहळू एक एक जण मालिका सोडून एकदाची बंद पडणार ?!
बरं होइल. ८ वाजता जरा
बरं होइल. ८ वाजता जरा चान्ग्ल्या मालिका हव्यात कारण मालिका किती पण भिकार असली तरी ही वेळ्च जादुई आहे टिआरपी मिळतोच हमखास
अगदी भिकार खेळ चालू आहेत..
अगदी भिकार खेळ चालू आहेत...तेच ते अन तेच ते..!! शन्याला भूक लागली..पिझा- पास्ता आण ना गॅरी....हो हो बच्चा ...!! जळका उपमा, शन्याची मम्मा, केड्याचे फुटकळ निरर्थक डायलॉग्ज, राधिका चा फुकटचा आव, रणरागिणी च्या थाटात एंट्री आणि दरवेळी फुसका बार, अक्कल शून्य आयडियाज, नाना नानी, महाजनी .................................

काहीच नवीन नाही..
काल तुपारेच्या आधी ह्याचा
काल तुपारेच्या आधी ह्याचा पुढचा भाग नजरेस पडला. भक्ती राधिकाला फोनवरुन 'अर्थव मोबाईल गेम्समुळे बिघडत चालला आहे.' सान्गत होती.
जर आई चुकीन्च्या माणसान्वर ( गॅरी, शनाया) सन्सकार करण्यात गुन्तली असेल आणि तिचे स्वतःच्या मुलाकडे लक्ष नसेल तर हे असेच होणार. शनाया सुद्दा म्हणत होती, 'आता कुठे गेले राधिकाचे सो कॉल्ड सन्सकार?' गुरुमायच नातवावर लक्ष नसत का? का सतत नाना- नानीकडे चकाटया पिटायला जात असतात? राधिकाचे सासरेबुवा अर्थवला चान्गले साम्भाळायचे, ते कुठे गेले?
गुरु काल लपुनछपून कुठल्या तरी जागेतून बाहेर पडत होता. राधिकाच्या ऑफिसमधल्या शिपायाने त्याला बघितल. गुरु शनायाला फसवून दुसर लफड करत असावा.
गुरु शनायाला फसवून दुसर लफड
गुरु शनायाला फसवून दुसर लफड करत असावा.> >>>
मला तर राधाक्काचे हे सोहळे बघुन गुरु - शन्याची दया येऊ लाग्लीये.
परव-तेरवाच्या एका एपिमधे तिने शन्याला जबरदस्ती कारल्याचा रस प्यायला लावला.
गुरु- शन्यापन मुर्खासारखे का तिथे रहातात.
Pages