Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधिकाने सवत माझी सायको
राधिकाने सवत माझी सायको म्हटलं, ते तिलाच फिट्ट आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=nd2UzwyAtTc
माह्या गुरु ला पाहुन घ्या की वो .
राधिकाने सवत माझी सायको
राधिकाने सवत माझी सायको म्हटलं, ते तिलाच फिट्ट आहे. >>>>>>> अगदी अगदी. शनाया तिला कुठल्या अॅन्गलने सायको वाटते? उलट हिच तिच्या मागे लागलेली असते सायकोसारखी.
आणि नाही सांभाळता आला तिला संसार मग काय तु पुन्हा सांभाळायला घेणार का त्या गुरुला आणि त्याचा संसार? >>>>>>>>> ++++++++++१११११११११
एक स्टेप मॉम सिनेमा आहे. त्यातही असेच नवे पात्र येते पोस्ट डिवोर्स. पहिली बायको पहिले खूप भापते. माझा संसार माझी मुले करून पण मग स्वतःला कॅन्सर झाल्याचे कळल्यावर हळू हळू मुलांना संसाराला गर्ल्फ्रेम्ड पक्षी जुलिआ रॉबर्ट च्या हवाली करते. ते ट्रांझिशन खूप मस्त घेतले आहे >>>>>>>> हो. हा चित्रपट मराठी आणि हिन्दीतही आला होता. मराठीत मृणाल कुलकर्णी होती, हिन्दीत काजोलचा ' वुई आर फॅमिली' होता.
ह्यात गफ्रे व नवर्याचे कामजीवन पण खूप चांगले आहे असे सूचित केले आहे. तसेही इथे काही दिसत नाही. अफेअर म्हणजे शॉपिन्ग लंच असे थोडी असते फक्त!! >>>>>>>>> अगदी अगदी. फक्त गुरु शनायाला ' मला किस दे' अस एकदोनदा सान्गतो. नुसत्या एका किसने काय होणार आहे?
पाव्हण्यांसाठी लावली जाणे. >>>>>>>> पाहुणे वेडे आहेत.
मला कळत नाही गुरू ने इतक्या निक्षून मला तुझ्याबरोबर राहाय्चे नाही असे सांगितले आहे. तर त्याला परत परत धरून ठेवायचा हट्ट का? >>>>>>>>> अर्थवसाठी म्हणे. खर तर आता अर्थवनेच तिला रोजरोजच्या कटकटीला वैतागून 'आई, तु घटस्फोट घे' अस म्हणायला हव.
पण ह्यात संसार सांभाळणे आलेच पाहिजे तरच खरी बाई, कसाही असला तरी पुरूष चुकत नाही. अशी चुकीची गृ हित के माथी मारली जात आहेत. >>>>>>>>>> +++++++++ ११११११११११ मला 'सवत माझी लाडकी' सुद्दा पटला नाही. शेवटी मोजो नाईलाजाने नीना कुलकर्णीला स्विकारतो अस वाटल. पण त्यात हे सर्व डिसेन्टली दाखवल होत.
झीची जुनी दुहेरी मालिका छान
झीची जुनी दुहेरी मालिका छान होती, याच विषयावरची. कमी भागांची होती. गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि गौरी यादव होत्या. गौरीची पहीलीच मालिका, काय काम केलेलं तिने अगदी सहज, मला जाम आवडलेली. लीड दोघांपेक्षा हीच जास्त आवडलेली मला. नंतर गौरी हिंदी कही तो होगामधे दिसली.
नुसत्या एका किसने काय होणार
नुसत्या एका किसने काय होणार आहे?
>> लोल.. फॅमिली सीरिअल मध्ये काय बोलणार तो..
आता तर ती रेवती पण मॅड सारखी
आता तर ती रेवती पण मॅड सारखी वागत आहे, गुप्तेला काय दम भरते की नेहा माझी मुलगी आहे, अरे जो चप्पल खायच्या लायकीचा आहे त्याला डोक्यावर घेणार आणि जो खराखुरा चांगला आहे त्याला दम भरणार!!!! फाल्तुपणा आहे सगळा. राधक्काची भयानक डार्क लिपस्टिक आणि शनीच्या आईचा टॉप अररारारा, भयंकर घाणेरडा होता
गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि
गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि गौरी यादव होत्या. > दुधारी नाव होतं बहुतेक. तीही पटली नव्ह्तीच.
गृहिणींविषयी चांगलं बोलून
गृहिणींविषयी चांगलं बोलून हक्काचा प्रेक्षक तयार करत आहेत. गृहिणी फक्त साडी नेसते हे कुठे बघितलं केड्याने. रेवतीला कसला माज आहे, गुप्तेचा सतत अपमान करत असते.
दुधारी नाव होतं बहुतेक. >>>
दुधारी नाव होतं बहुतेक. >>> दुहेरी. शेवट प्रतीकात्मक होता. भावाने घरी सांगितलेलं जागा नाही आणि ऐश्वर्या पाहुणे येणार म्हणून थोडे दिवस बाहेर जा सांगते कारण हे नातं लपवलेलं असते पण गिरीश गौरी प्रेम खरं वाटलेलं. शेवटी तिला दोन्हीकडून बाहेर पडायला लागलं असं दाखवलं आहे. मे बी trp नसेल म्हणून गुंडाळली असेल
किंवा त्या काळाशी सुसंगत असेल की मुलींनी दहा वेळा विचार करावा अशा नात्याचा, वेळेला कोणी उभं राहत नाही. स्वतः एकट्याने समर्थपणे तोंड देण्याची क्षमता असेल तर पुढे पाऊल टाकावं. कारण कायद्याने दुसऱ्या लग्नाला मान्यता नाहीये, अजूनही. गौरीच्या भूमिकेला अजिबात ग्रे शेड नव्हती, तिचं गिरीशवर मनापासून प्रेम होतं.
अर्थात मला या काळातही अमान्यचं आहे म्हणा, कायद्याविरुद्ध काही करणे.
४००
४००
काल राधिकाने मला हे चालत नाही
काल राधिकाने मला हे चालत नाही, ते चालत नाही असं किती वेळा म्हटलं ते मोजायला हवं होतं.
शनाया आणि गुरू त्यांचा त्यांचा स्वैपाक स्वतः करून खाणार आहेत, तर त्यांनी दुपारच्या चपात्या रात्री खाल्ल्याने राधिकाच्या पोटात का दुखावं?
साडी नेसणे ही गृहिणीपदाची पहिली कसोटी.
मी या मालिकेला राम राम ठोकलाय. आता टाटा स्कायला माझ्या पॅकमधून झी मराठी काढायला सांगतो, म्हणजे अगदी सर्फिंगचाही मोह होणार नाही.
नेटवर/अॅपवर मी मालिका पाहत नाही, त्यामुळे तोही प्रश्न नाही.
हा ग्रुपही सोडतो, म्हणजे "माझ्यासाठी नवीन"मध्ये मला हा धागा दिसणार नाही.
सध्या ही एकच भारतीय मालिका पाहत होतो. तीही बंद.
भरत किती तो वैताग.
भरत किती तो वैताग.

शिव्या घालण्यासाठी कुणीतरी / काहीतरी हवं ना आयुष्यात.
सरकारलाच किती शिव्या देणार सारख्या
साडी नेसणे, जेवण बनवणे वैगेरे बालिश पण सुरु झाला का राधाक्काचा?
शन्या का हिचा जाच सहन करतेय.
पुन्हा लिहिते शन्या स्मार्ट हवी होती.
राधाक्काला साडी नेसणे, जेवण बनवणे. शेजारी चाहा-जेवण नेणे, शेजार्यांशी नको तेवढा भोचकपणा करणे, दुधवाला, सफाईवाला, मोलकरीण, वॉचमन ह्याच्यांशी नको इतक्या सलगीने वागणे, पर्सनल गोष्टी सार्वजनिक चव्हाट्यावर आणणे आणि त्याबद्दल सतत सहानुभुती मिळवण्याशिवाय काहीही ठोस भुमिका न घेणे एवढंच जमतंय. मसाले बिझनेस वैगेरे स्वप्न होतं असं वाटतंय आता. कारण पाढे पंचावन्न.
साडी नेसणे, जेवण बनवणे वैगेरे
साडी नेसणे, जेवण बनवणे वैगेरे बालिश पण सुरु झाला का राधाक्काचा? > हे सगळं पूर्वीही झालय ना एक्दा? काल केस मोकळे सोडून स्वैपाक करत होत्या राधाक्का!
रावी,
रावी,
सगळ्या सिरीयलच्या सगळ्या हिरवणी सतत केस मोकळे सोडुनच असतात. अगदी गावात रहाणारी अंजली बाई, नंदुडी पण स्ट्रेट केलेले केस कायम
मोकळे ठेउनच असतात.
झोपताना, उठताना, किचनमधे काम करताना, स्वयंपाक करताना सगळ्या सगळ्या वेळेला केस गळ्यातच.
हो हो. खरच की .
हो हो. खरच की .
सगळ्या सिरीयलच्या सगळ्या
सगळ्या सिरीयलच्या सगळ्या हिरवणी सतत केस मोकळे सोडुनच असता>> अस कस म्हणतेस "समित ताई"
आठव एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली घनाई, सुप्रिया काकु, वल्ली काकु, कुहू (पिना लावुन)आणि खुद्द राधा,
रधिका आता शन्याला स्वतसर्ख
रधिका आता शन्याला स्वतसर्ख बनवयचा प्रय्त्न करतेय म्हन्जे गुरू तिला पन काकुबाई झाली म्हनून कन्तलेल आनि दुस्री शोधेल मग य दोघी मिलून तिचा छ्ल कर्तील, ओघाने अपला पन छ्ल होइल. आप्न म्ह्तारे होउ पन सिरिय्ल म्ह्तरी होनार नै नाव ब्द्लून येइल मझ्य नव्र्यची तिस्री बाय्को.
किल्ली, त्या सगळ्या नॉर्मल
किल्ली, त्या सगळ्या नॉर्मल बायका दाखवल्या होत्या. आताच्या झीनट्यांसारख्या सुप्परवुमन नव्हत्या.
आताच्या झीनट्या म्हणजे जगात जे जे काय चांगल आहे ते माझ्यात ठास्सुन भरलंय आणि जे काय वाईट आहे ते समोरचीत, जी कुणी असेल ती जाऊ, सासु, सवत वैगेरे, मधे ठासुन भरलंय अशा आहेत.
मग त्यात सुंदर, लांअबसडक, आजिबात जटा नसलेले, झोपुन उठल्यावरही तस्सेच्या तस्से असणारे केसही असणारच.
डॅन्ड्र्फ, केसगळती वैगेरे समस्या आपल्यासारख्या पामरांना.
दक्षु ताई, संताप आवरा हो..
दक्षु ताई, संताप आवरा हो.. कसं लिहीलय, हे लिहायला कीबोर्ड बदलायची इच्छा झाली नाही का
बरोबर आहे सस्मित ताई
झीनट्या>>
झीनट्या>>

मी सिरीयल बघत नाही, पण
मी सिरीयल बघत नाही, पण दक्षुकरता इथे येईन.
जाम वैतागलीय ती.
राधिकाने हा धागा वाचला तर तिला तीच एकमेव भैताड असल्याचा साक्षात्कार होईल.
हा हा...रश्मी खरंय...पण मागे
हा हा...रश्मी खरंय...पण मागे एकदा राधक्का म्हणाली होती की त्यांना सांगण्यात आलय निगेटिव्ह फीडबॅक कडे दुर्लक्ष करायचं आणि कामावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे त्यांना .. त्यामुळे ते इथे येत नसावेत आणि सर्वजण आपली नंबर 1 trp भैताड सिरीयल येकदम बेष्ट या भ्रमाच्या भोपळ्याच्या राहतात सगळे.... दे निड रियालिटी चेक बॅडली...
<<ओघाने अपला पन छ्ल होइल.
<<ओघाने अपला पन छ्ल होइल. आप्न म्ह्तारे होउ पन सिरिय्ल म्ह्तरी होनार नै नाव ब्द्लून येइल मझ्य नव्र्यची तिस्री बाय्को.<<< दक्षे
दक्षे भारी कमेंट, पाच वर्ष
दक्षे भारी कमेंट, किमान पाच वर्ष सिरीयल आरामात सुरु राहील अशाने. बघणारे आहेत हेही आणि trp देणारेही आहेत
भरत तुमचा संताप आणि निर्णय
भरत तुमचा संताप आणि निर्णय दोन्ही योग्य आहे.
साडी नेसणे ही गृहिणीपदाची
साडी नेसणे ही गृहिणीपदाची पहिली कसोटी. >>>>>>>> तिला साडी नेसायला लावली आणि स्वतः मात्र तिच्यासमोर गाउन, टि-शर्ट घालून वावरतेय.
शनायाला कष्टाच्या कामान्ची सवय नाही म्हणून तिला काम करायला लावणे एकवेळ समजु शकल असत. पण इथे तिला गृहिणी होण्याचे धडे दिले जात आहेत.
हे चॅलेन्ज एकतर्फी आहे. शनायाने सुद्दा तिला चॅलेन्ज दयाव की तुसुद्दा प्रेयसी बनून दाखव. नीना कुळकर्णीला दाखवल होत अस समाला मध्ये. म्हणजे यासाठी राधिकाला आणखी एक मेकओवर करावा लागेल.
राधिका गाउन, लाल टी शर्ट मध्ये दिसलीये मात्र छान. नवीन शनायाची साडी नेसायची हि कुठली भयाण पद्धत? आणि तिच्या ब्लाउजचा पॅटर्न? जुनी शनाया साडया छान नेसायची.
राधिका गाउन, लाल टी शर्ट
राधिका गाउन, लाल टी शर्ट मध्ये दिसलीये मात्र छान. >>>>
सुलू ती छान दिसणे ही।कल्पनासुद्धा नाही करवत मला. करायचा प्रयत्न जरी केला, तरी माझ्या डोळ्यासमोर ते ब्लेझर घातलेलं ध्यान येतं...
...मग मी वाचवा वाचवा करत डोंगराकडे पळत जातो...
...तसंही तिथे ब्लेझर विकत घ्यावं लागतं नाही!!!
मग मी वाचवा वाचवा करत
मग मी वाचवा वाचवा करत डोंगराकडे पळत जातो.>>
मग मी वाचवा वाचवा करत
मग मी वाचवा वाचवा करत डोंगराकडे पळत जातो.. >>>>>>>>
राधिका गाउन, लाल टी शर्ट
राधिका गाउन, लाल टी शर्ट मध्ये दिसलीये मात्र छान। >>>>>> सॉरीच, राधिका कधीच छान दिसली नाही या सिरीयल मध्ये. आणि ती दुसरी तुला पाहते रे ची नायिका सुद्धा कधीच, कुठल्याच कपड्यात छान दिसत नाही. या दोघीमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे यांची कॅरेक्टरर्स लिहिताना गंडली आहेत, या नायिका म्हणून पहाताना खूप ordinary आहेत आणि अभिनय वाईट असल्याने लुक्स कडे लक्ष जातं. दोघींचे कपडेपट भयाण फालतू आहेत आणि दोघींची सगळ्यात डोळ्यांना त्रास देणारी गोष्ट म्हणजे घाण शेड्सचे लीप कलर्स.आणि तेही लावताना ना ही बेस कोट, ना ही प्रायमरचा वापर. तुपारेची ईशा तरुण तरी आहे, पण रधिकाचे ओठ इतके सुरकुतलेले, रेषा रेषावाले आहेत की लीप कलर्स यक्क दिसतात. अशा बायकोला किस करायला नको, म्हणूनही नवरा डीवोर्ससाठी डेस्परेट झाला असेल. राधिकाचा चेहरा /स्कीन फार वाईट आहे. आधीच्या मेकअप मध्ये सगळा बेस कलर त्या सुरकुत्या खड्ड्यामध्ये दिसायचा आता अचानक चेहरा इतका स्मूथ करताहेत की ती प्लास्टिकी पांढरी दिसते. दोघी नायिकांचे मेकअपमन ताबडतोब बदलणं गरजेचं आहे.
Pages