रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवंताचे काम करणारी नटी खरच देखणी आहे, चेहेरा गोड आहे. डोळे पण मस्त >>>>> मला ती शेवंता आणि सारख्याच वाटतात दिसतात. निलिमाच शेवन्ताशी काही नात तर नव्हत ना ? Uhoh

आभास हा... त्या सिरीयल च नाव >>>>>> त्यात कुशल बद्रिके खलनायक झाला होता.

माई लय डँबरटच असा.
आपल्या घोवाने इतके खुन केलियान तरी पोलिसात नेवूचाकाय्देवा?

देवाला , नवर्‍याची बुद्धी ठिक होवु दे म्हणून सांगत नाय आणि अण्णा परत येवु दे म्हणून वर प्रार्थना..

ते तातुला मारले तेव्हा खुप वाईट वाटले. गरीब नोकरांना इतकं माजोरंपणे मारणं किंवा तुसडेपणाने वागवणारी माणसं आहेत पाहिलेली. कसे काय मन धजावते काय माहित...

माई ललिता पवार वाटते तो एक बारीक डोळा पाहून..

माई ललिता पवार वाटते तो एक बारीक डोळा पाहून..>> ललीता पवारच्या बारीक डोळ्यात खत्रुडपणा ठासुन भरला होता पण माईच्या बारीक डोळ्यातुन मायेचा अखंड झरा वाहत असतो हाच काय तो फरक.

ही मालिका जबरदस्त टीआरपी खेचतेय . टाईम्स ने ऑलरेडी म्हणलय की दुसरा सीझन सुपरहिट होतोय म्हणून...
झी ला दर वेळी असं काहीतरी रत्न सापडतं आणि मग बाकी सगळ्या रोजगार हमी वाल्या सीरियल सुखेनैव चालू राहतात ...

दुसऱ्या सीझन मधील कलाकारांची नावे मिळतील का कुठे? मुले खूप छान काम करत आहेत . छाया तर एकदम खत्रूड आहे ...
Submitted by Mandar Katre on 2 February, 2019 - 05:37>>>

छोटा माधव – तन्मय खर्बे (गोवा)
छोटी छाया – मिताली साळगावकर (नालासोपारा)
छोटा दत्ता – सोहम जाधव
छोटा पांडू – स्वप्नील

अण्णा खरच डोक्यावर पडलेले आहेत, रंगेल, रगेल, लोभी, हेकणे सगळे काही आहेत. काल बेरीनाना चक्कर येऊन बेशुद्ध होतात, तरी हे ध्यान बापाला उचलायला जात नाही. उलट आपल्यावरचा धोका टळुन वडलांवर गेला याचे अण्णाला समाधान. काय रे रामा.

छायाची मजा वाटली. एकीकडुन तिच्या पात्राचा राग पण येतो आणी दुसरीकडे जाम हसू येते. ही लहानपणापासुनच इतकी ढालगज आहे तर. मला वाटले की आता छोटा दत्ता कौलावरुन खाली पडुन पाय मोडुन घेणार, पण छायाचाच तुटके कौल पडुन कपाळमोक्ष होतो.

इकडे पाटणकर बाई आणी अण्णा बहुतेक झिम्मा, फुगड्या खेळत बसणार आणी तिकडे पाटणकर ढगात जायच्या वाटेवर असणार. पाचीबा ला धरुन चांगली बदडली पाहीजे, काय पाणचट बाई आहे !!

बेरीनाना पडले , माई छायाला पाणी आणायला सांगते , छाया लगेचच माधव ला . जाम हसू आलं. त्या प्रसंगी ही छाया आपला तोरा सोडत नाही.

त्या पांडुचे काय दाखवलेच नाही खोलीत कोंडल्यावर?
दोन दिवस काय उपाशी राहुन जिवंत राहिला काय? काहीच कंट्युनिटी नाय..

काल दाखवला ना पांडू शेवटी. अण्णा दार उघडतात खोलीचं आणि आत कळकट्ट कपड्यात दाढी आणि केस वाढलेला पांडू अंधारात "इसारलंय" म्हणत असतो.

>>>दाखवला ना पांडू शेवटी. अण्णा दार उघडतात खोलीचं आणि आत कळकट्ट कपड्यात दाढी आणि केस वाढलेला पांडू अंधारात "इसारलंय" म्हणत असतो.<<
जगतो कसा न खाता पीता?
काहीही अचाट दाखवतात..

दिवसाला किमान एक ताट आत ढकललं , तर एका वर्षाची ३६५ ताटं.
७-८ वर्षांचा पांडू, १७-१८ वर्षांचा होतो, म्हणजे ३६५० ताटं कमीत कमी..
म्हणजे पांडू खरं तर बाहेर येण्याऐवजी दार उघडताच ताटांच्या चळतीवर बसलेला दाखवायला हवं होता ..
पळणारा छोट्या पायाचा अमिताभ, अचानक मोठ्या ढांगाचा अमिताभ होतो, असं सिनेमात चालून गेलं.. तेच इथे दाखवायचा प्रयत्न केला बहुतेक Happy !
....गे माजे बाय, ता केड्या हैसर पन श्टोरी लिवूक इलो की काय ! Wink

सकाळचे विधी कुठे करतो ... अचाटच दाखव्केय मग.>>>> ईईई झंपी Lol अगं काल मला पण तसेच वाटले की अंघोळ पांघोळ काय नाही, एवढ्याश्या खोलीत हा काय काय करत असेल ? तरी बरं स्वतः पांडुनेच पटकथा लिहीलीय, मग तोच इसरला का? काल माई जेव्हा छायाला साडी नीट करायला सांगतात तेव्हा ती, ईशा ( तुपारे मधली मंदकन्या ) सारखे हावभाव करते. Proud

मला वाटत की जेवल्यावर पांडु ते ताट त्याच फटीतुन बाहेर ढकलत असेल. अशीच ढकलाढकली चालू राहुन पांडू मोठा झाला असेल. पण धाकटा अभिराम कधी उगवला ते कळले नाही. सोमवारच्या भागात छोटी सुसल्या दाखवलीय.

छाया माधव मोठे झालेले दाखवलेत म्हणजे आता त्या छोट्या मुलांचा रोल संपला वाटत . छान काम करायची ती मुल , अजून काही दिवस दाखवायला हवे होते छोटे छाया माधव दत्ता.

देवकी , Rofl

>> पण धाकटा अभिराम कधी उगवला<<<. ते आमाला काय इचारता, अन्नांसी विचारा... अण्णा डबल मॅच खेळत होते... Happy

सुशल्याला पाटणकरबाईने खाटेवर भिंतीकडे तोंड करुन झोपायला लावले होते आणि मागे आण्णासोबत रासलिला रचायच्या बेतात होती तोवर पाटणाकरसाहेब दार ठोठाऊ लागले. आज बहुतेक पाटणकरची विकेट पडणार..!!

Pages