रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो डिजे, सुशल्या शेवंताचीच मुलगी दाखवलीय. मला कालचा प्रसंग आवडला. पोरे जेवत असतात. माधव व छाया दोघेही जेवुन जातात, पण दत्ता माईंना विचारतो, तू कधी जेवणार? प्रसंग छोटा होता पण मनाला स्पर्शून गेला. दत्ता माईना आई म्हणून स्वीकारतो.

तातु आणी पांडुबद्दल वाईट वाटले.

मला तर वाटलं दत्ताच्या आईला आणि पांडुच्या वडिलांना आण्णांनी मारलं तर त्याचा सुड हे दोघे मिळुन घेतात.
पण आधीच्या भागात म्हणजे नंतर असं काही दाखवलं नाही.
अगदी दत्ता माईचा मुलगा नाही हे पण कळुन आलं नाही. पांडु तर सगळाच इसारलेला.
आणि निलीमा नावाच्या वैज्ञानिक चेटकीणीने सगळे खेळ केलेले.

मन्दार च्या मागच्या पानावरच्या सर्व पोस्ट्स ना अनुमोदन.
मला पण आवडतेय ही सिरियल.
माई ला काहिहि झालं तरी हे माहित आहे की आण्णा कुणाचाही जीव घेतील तिचा नाही घेणार.
तातु माझ्या डोळ्यासमोरून हालत नाही Sad फारफार वाईट वाटले. एखाद्याने स्वभावाने किती गरीब असावे ? हुबेहुब अभिनय.

आण्णा आता पी.डब्ल्यु.डी. ऑफिसरच्या बायकोवर डोळा ठेवणार..!! कदाचीत तिचिच मुलगी सुसल्या असेल.. Uhoh>>>>>

हो, तिचीच मुलगी आहे सुसल्या. पण ती शेवंता (पी.डब्ल्यु.डी. ऑफिसरची बायको) तर प्रमाण मराठी बोलताना दिसते आहे, आणि तिचीच मुलगी सुसल्या तर अस्सल मालवणी बोलताना दाखवली होती!!!
हे कसे काय बुवा??????

ती शेवंता (पी.डब्ल्यु.डी. ऑफिसरची बायको) तर प्रमाण मराठी बोलताना दिसते आहे, आणि तिचीच मुलगी सुसल्या तर अस्सल मालवणी बोलताना दाखवली होती!!!>>>>>>> असां कसां? सुसल्याचो माय घाटावरची असतली आणी बापुस मातर मालवणी असयं ना. मगे ते चेडवा बापाचीच भाषा बोलुक असां.

मला वाटत की सुसल्या लहान असतांनाच अण्णांनी शेवंताला मारले असेल, आणी सुसल्याला त्यांच्या शेजारचे ( अण्णाचे शेजारी ) वाढवतात ना. म्हणून ती मालवणी बोलते, आणी तिची ती सांभाळ करणारी बाई अण्णांकडेच कामाला असतेना.

हो दक्षिणा, तातु चे काम करणार्‍याने खूप छान अभिनय केलाय. पण विग लावलेले नेने वकील आणी रघु गुरुजी पाहील्यावर मला फिसकन हसायला येते. Proud

tatu ani bhivri kuthe gele ashi shanka gharatil mulana yet nahi ka.. khas karun chhaya la. ka mulahi used to ahet khun vagaire mhanje rojachich gosht aslyasarkhi. datta pan lagech kharya aai la visarla.

गेल्या शनिवारी बाहुलीच्या गळ्यात फास अडकवुन फिरणारी आगाव छाया बघितली आणि लगोलग मुलांना ही सिरिअल बघायला मी तर बंदी घातली. Uhoh (त्यामुळे त्यांना तातुचा खुन बघायला मिळाला नाही.)

हे असे सारखे उठता-बसता खुन, आगाव मुले, मठ्ठ नाना, पांढरी बुब्बुळे करुन येणारी पात्रे बघितली की मालिका हिडीस पातळीवर जाते असे वाटते पण रोज रात्री १०.३० वाजता ते कोकणी घर, माई आठवली की नकळत टाटा स्कायच्या रिमोटवरचा अंगठा आपोआप १२०८ दाबतो. Rofl

हो, तिचीच मुलगी आहे सुसल्या. पण ती शेवंता (पी.डब्ल्यु.डी. ऑफिसरची बायको) तर प्रमाण मराठी बोलताना दिसते आहे, आणि तिचीच मुलगी सुसल्या तर अस्सल मालवणी बोलताना दाखवली होती!!!
हे कसे काय बुवा????? >>>>>> हो ..आणि भिवरी सुद्धा मालवणी बोलत नव्हती .पण दत्ता मात्र मालवणी बोलतोय.

भिवरी सुद्धा मालवणी बोलत नव्हती .पण दत्ता मात्र मालवणी बोलतोय>>>>> ह्यांका म्हणजे नाईकांका कळाक हुवा ना म्हणोन तो मालवणी बोलत आसा.

गेल्या शनिवारी बाहुलीच्या गळ्यात फास अडकवुन फिरणारी आगाव छाया बघितली >>>>> बादवे, ती आधीच्या सिरियलमध्ये छायाचा एक बाहुला ( की बाहुली?) दाखवला होता ती इथे दिसत नाही.

पण विग लावलेले नेने वकील > आधीच्या वेळेचे वकील (अभिनेता) वेगळे होते ना ? छान होते ते.
आणि निलीमा नावाच्या वैज्ञानिक चेटकीणीने सगळे खेळ केलेले. > वहिनी ठुबे ही जाड Proud

हे असे सारखे उठता-बसता खुन, आगाव मुले, मठ्ठ नाना, पांढरी बुब्बुळे करुन येणारी पात्रे बघितली की मालिका हिडीस पातळीवर जाते असे वाटते पण रोज रात्री १०.३० वाजता ते कोकणी घर, माई आठवली की नकळत टाटा स्कायच्या रिमोटवरचा अंगठा आपोआप १२०८ दाबतो. Rofl >>> +१११

तातूच्या खुनाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या छोट्या पांडूला आण्णांनी खोलीत कोंडले आणि कोंडताना 'जा काय बगलस ता सगळा इसरायचा' असे म्हटले. मला वाटते याचाच त्याच्या मनावर फार परिणाम होऊन मोठेपणी त्याला सर्व गोष्टी 'इसरायची' सवय लागली असावी!

मोठ्या दत्ताच्या (सुहास शिरसाट) नाकावर उजवीकडे एक चामखीळ आहे. अगदी तसेच चामखीळ लहान दत्ताच्या नाकावर तयार करणाऱ्या मेकअपमनच्या निरीक्षणशक्तीला मानले पाहिजे.

मात्र रात्रीचे दृश्य दाखविण्यासाठी भर उन्हात कॅमेराला निळा फिल्टर लावून शूटिंग करण्याची कल्पना ज्या कोणा सुपीक डोक्यातून आली आहे त्याचा कणकवली ST stand वर जाहीर सत्कार करण्यात यावा! (राखेचा भाग १ मध्ये तर हा प्रकार खूपच होता. एकदा पांडू का कोणी हरवला होता तेव्हा सगळे हातात torch घेऊन त्याला शोधत होते. हे दृश्य भर दुपारी निळा फिल्टर लावून चित्रित केले होते, ज्यात सगळ्यांच्या पायाखाली त्यांचीच सावली स्पष्ट दिसत होती!)
Rakhecha.jpg

कालच्या एपिसोडात तर आण्णाने शेवंतावर लाईन मारण्याचा अगदी कहर केला. आजच्या भागात तो काय करेल सांगता येत नाही. Biggrin

शेवंता गरीबीला कंटाळलेय. नवर्‍याला दरीद्री वैगेरे घा पा बोलत होती.
अण्णाच्या श्रीमंतीला, बडेजावला आणि स्टाइलला Happy भुलेल असं वाटतंय.

हे नवीन घर दिसतय. जुन्या घरी , आणखी एक जागा होती जिथे बेंच टाकलेला असायच, आता तो भागच नाहिये. ती नीलिमा तिथे बसून काम कराय्ची. घराला पायर्‍यांना कठडा होता .

छायासारखी आगावु पोरं नक्कीच असतात आणि कठोर दुष्ट पण. आमच्या गावी, एका वात्रटाने कुत्र्याच्या शेपटाला लवंगीची माळ लावलेली. ते गरीब जनावर पळत आले , माझ्या मामाने कळशीतले पाणी झपकन लांबून मारले आग विझवायाल. ते बदमाश कारटं लपलेलें.

शेवंताचे काम करणारी नटी खरच देखणी आहे, चेहेरा गोड आहे. डोळे पण मस्त ! काल सिरीयल संपल्यावर आजची झलक दाखवली. ती भुताड छाया, त्या गरीब दत्ताला टॉवेल बांधुन कौलावरुन सुपरमॅन सारखे उड म्हणते आणी नाही ऐकले तर मीच येऊन खाली ढकलेन असे बोलत होती. ते बघुन मला तिला पकडुन सणासण कानाखाली खेचाव्या वाटल्या. ह्या मारकुटीला ना कधीतरी अण्णांनी पकडुन जाम हाणले पाहीजे. माझे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी अजून अण्णांना शिव्याशाप देत नाहीये. Proud

शेवंताला पटवल्यावर बहुतेक अण्णा तिच्या नवर्‍याचा काटा काढतील, किंवा शेवंता चा नवराच तिला घरातुन हाकलुन देईल. कारण मागच्या सिरीयल मध्ये माई म्हणतात की शेवंताला त्यांनी घरात नाही घेतले म्हणून शेवंताने झाडावर लटकुन Hanging जीव दिला.

शेवंताचे काम करणारी नटी खरच देखणी आहे, चेहेरा गोड आहे. डोळे पण मस्त ! >>>> +१
एवढ्यात नको बै शेवंता लटकायला.

एवढ्यात नको बै शेवंता लटकायला. > नाहीच लटकणार एवढ्यात. तिची सुसल्या साधारण दत्ताच्या मुलीएवढीच दाखवल्ये. आत्ता तर अजुन दत्ता लहान आहे आणि अभिराम दाखव्वलाच नाहीये अजुन

हे नवीन घर दिसतय. जुन्या घरी , आणखी एक जागा होती जिथे बेंच टाकलेला असायच, आता तो भागच नाहिये. ती नीलिमा तिथे बसून काम कराय्ची. घराला पायर्‍यांना कठडा होता .
Submitted by झंपी on 31 January, 2019 - 14:42

घर तेच आहे. फक्त आधी कठडा नव्हता, मग बांधून घेतला असे दाखवायचे असेल. खालील व्हिडीओ पहा, त्यात सध्या दाखवण्यात येणाऱ्या घराच्या गोलाकार पायऱ्या असलेला भाग पुढे वाढवून कठडा बांधलेला दिसतो आहे.
https://abpmajha.abplive.in/videos/dhantedhan-ratris-khel-chale-kids-int...

Pages