वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायतोंडेच ट्रान्सफॉर्मेशन, सरताजमध्ये होणारा बदल आणि जितेंद्र जोशींचा काटेकर, मस्ट वॉच!>>+111
पगडीमध्ये सैफ छान दिसतो लव आजकल नंतर यातही

Breaking Bad>>>>> अहाहा ते दिवस... बिंज वॉचिंगचे.. Happy

लिंकसाठी धन्यवाद चैतन्य!

पगडीमध्ये सैफ छान दिसतो लव आजकल नंतर यातही>>>>अरे हो, मला तर ही सिमीलारीटी नाही आठवली. पण वाटत होतं, हा लूक केलाय याने कुठेतरी!

@ च्रप्स
पहिले चार पाच एपिसोड फ्री आहेत, ते आवडले तर मग तीन महिन्याचं शंभर रुपयाचं सबक्रिप्शन विकत घेता येईल.

अपहरण जिओसिनेमा वर फ्री आहे. व्होडाफोन अ‍ॅप वर पण फ्री आहे. आल्ट बालाजी वर सुरूवातीला या मालिका प्रदर्शित होतात नंतर जिओसिनेमावर येतात.

आल्ट बालाजी आता ३०० रूपयात वार्षिक वर्गणी आहे. त्यावरच्या गाजलेल्या मालिका द टेस्ट केस आणि बोस या आहेत. त्या ही जिओसिनेमावर उपलब्ध आहेत.

रागिणी एसएमएस, गंदी बात, ट्रिपल एक्स या मालिका तिथेच असल्याने आल्ट बालाजीची मेंबरशिप घेतल्यास लहान मुलांना या अश्लील मालिका उपलब्ध होऊ शकतात.

झी ५ ची "रंगबाज " पाहिली . आवडली . माझ्याकडून ४* तिग्मांशु धुलिया जबरदस्त
"अपहरण" ठीकठाक . ३*
"मिर्झापुर" जबरदस्त .पंकज त्रिपाठीचा फॅन झालो . ४.५*
"सेक्रेड गेम्स" आवडली . ३.५*
अमेझॉन "ब्रीथ" ठीकठाक ३*

या वीक मधेच संपवली "स्मोक" . खूप चॅन वेब सिरीज. जिम सरब (पद्मावती फेम ), कल्की, अमित, गुलशन देविया सत्यदीप मिश्रा, प्रकाश बेलवाडी अँड टॉम आल्टर ... मस्त मेजवानी..
अतिशय छान थ्रिलर सिरीज आहे. गुलशन देविया जबरदस्त ऍक्टर आहे (हंटर मूवी वाला ). एक से एक ऍक्टर नि काम केलाय . दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत.
शेवट अगदी उत्खनटवर्धक केलाय. दुसऱ्या season मध्ये बगु काय होतंय ...
गुल GHOOL पाहिली .. छान वाटली .
व्हाट्स युअर स्टेटस ने काही काळ बराच धुमाकूळ घातला ...
zakhmi पाहिली ... एक्दम पांचट वाटली...
सध्या .. THE इन्वेस्टीगेशन ... !!!

स्मोक आली तेव्हांच पाहिलेली. त्या वेळी हा धागा ठाऊक नव्हता. या मालिका आउटस्टँडींग नाहीत, पण सध्या उपलब्ध असलेल्या मनोरंजनामधे खूपच उजव्या आहेत. निराशा करत नाहीत.

स्पार्टाकस मधे हिंसाचाराचा अतिरेक आहे. युद्ध , द्वंद्व घातक असतेच. पण रक्ताच्या चिळकांड्या कशा उडतात हे अगदी तपशीलवार दाखवण्याची काय गरज होती हे समजले नाही.

House of cards बघायला सुरवात केली आहे. अमेरिकी राजकारणावर आधारित. मुख्य भूमिकेत Kevin असून तो डेमोक्रॅटिक पक्षाचा संसदेतील प्रतोद आहे. खासदारांच्या फोडाफोडी करणे हा त्याचा उद्योग ! अजून मोठे पद मिळवायची त्याची महत्वाकांक्षा.
त्याच्या बायकोच्या भूमिकेत Robin. अजून एक महत्वाची भूमिका आहे महिला पत्रकाराची, जी Kate ने केली आहे.
गतिमान कथानक. आवडतंय.

Smoke बघून संपवली .मजा आली. शेवटचा भाग जरा जास्त फिल्मी झाला, पण ठिकाय.
गुलशन देवया - भारी character आहे त्याच. खुद्द मोशे बराक ला सुनावतो .. लय भारी.
Tom Alter चा मोशे पहिल्यांदा आवडला , मग हळूहळू भीती वाटू लागली .बोलताना मान मोडायची सवय एकदम creepy .जीम सर्भ चा roy सगळ्यात भाव खाउन जातो. Yes पांत्रो

वेब सिरीज मध्ये नंबर एक गेम ऑफ थ्रोन मग
2) नार्कोस
3) सिक्रेड गेम्स
4) अल चापो
5) मिर्झापुर
आता नवीन मराठीत वेब सिरीज चालू आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी खूपच बोल्ड आहे पण सादरीकरण बेस्ट आहे

स्मोक कुठल्या चॅनलवर??? . एक बघून संपत नाहीये तर दोन नावं आली नवीन. किती टीव्ही/लॅपटॉप्/आयपॅड्/आयफोन बघू ? Proud

मॅकमाफिया ही मालिका पाहिली. उत्कंठावर्धक होती. थ्रिलर !
पण भारतीय वातावरणातल्या मालिका पहायला बरं वाटतं. मॅकमाफिया आणि स्मोक या जवळपास समांतर वाटल्या.

अपहरण पाहून संपवली . ऑल्मोस्ट , एका बैठकीत बघून टाकली .
सुरुवातीला "हे काय चालू आहे ?? " असा मूड झाला होता, पण त्याचा संदर्भ शेवटी शेवटी लागतो.
, पण तिसर्या भागापासून जाम पकड घेतली कथेने .
ट्वीस्ट वर ट्वीस्ट्स . शेवटचा ट्वीस्ट - डॉक्युमेन्टवाला - मात्र फारच फिल्मी वाटला .

सगळे अ‍ॅक्टर्स आवडले . अरूणोदय सिन्गची कॉमेडी "ब्लॅकमेल" मध्ये पाहिली होती .
त्याच्या उंचीचा चांगला उपयोग करून घेतला आहे कथेत . वरूण बडोला एक्दम वेगळ्या भूमिकेत दिसला .

काही संवाद , नरेशन आणि सीन्स फार विनोदी , क्रीस्प वाटले.
उदा: (ज्यानी मालिका पाहिली त्याना कळेलंं.. Happy )
दुबेजी : तुम्हे तैरना आता है ?
रंजना : नही
दुबेजी : तो वहां वापस काहे जा रही हो ?

रुद्र : अरे , लम्बा है लम्बा है , तो अब बच्चनजीको उठा लाये क्या ??

प्राईमवर 'फोर मोअर शॉट्स प्लीज' नावाची ४ मुलींची वेब सिरीज दिसतेय. त्यात मिलिंद सोमण, लिसा रे, प्रतीक बब्बर, किर्ती कुलहारी आहेत. विरे दि वेडींग किंवा बॅड मॉम्स टाईप वाटतेय.

मी एकेकाळी हॉरर मालिका, सिनेमे अधाशासारख्या पहायचो. धारप, मतकरींनी सवय लावली होती. मात्र मालिका , सिनेमा मधे ते फीलिंग कधी आले नाही. आता चांगल्या हॉरर मालिका वेबसीरीज येऊ लागल्या आहेत. पण संख्या एव्हढी आहे की ही बघू की ती बघू असे करत कुठलीच पाहिली जात नाहीये.

वूट ओरिजिनल्स वर ईट्स नॉट दॉट सिंपल १ आणि २ पाहिले. बरी वाट्ली वेबसीरीज. स्वरा भास्कर चा अभिनय छानच होता पण ते कॉरॉक्टर ईतकं काही आवडलं नाही. हुशार दाखवली आहे पण स्वार्थी वाटली मला तरी..

अपहरण सर्वं वेब सिरीज चा बाप आहे>>
दोन एपिसोड पाहिले कसेबसे पण पुढे झेपेना. स्क्रीनप्ले, अक्टिंग, डायरेक्षण सगळ्यात फसलेली वाटली सिरीज.

च्रप्स, कुठे बघताय अपहरण?
आम्ही जस्ट ‘ब्लॅक अर्थ रायझिंग‘ ही सिरिज बघून संपवली. आफ्रिकन जेनोसाईडवर आधारीत आहे.

सायो - अपहरण alt balaji वर आहे, पण इंटरनेट वर शोधाल तर सापडते काही साईट्स वर HD मध्ये फुल्ल सिरीज.
शेवट थोडा गंडला आहे पण बाकी फुल सिरीज जबरी ट्विस्टस आहेत.

Pages