तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतंय कि फारण्ड सुभा चे मायबोली वरचे खुफिया झेंडे आहेत. फार छान लिहितात आणि मग लोक एपिसोडस बघायला लागतात. ते झेंडे फसवून आणि हे हसवून लोकांना भरीस पाडताहेत. फारएण्ड, दिवे घेऊन लिहीत राहा Happy

कारण माहेरी कुठली बँक? (सर, कसं शक्य आहे??) पगाराचे पैसे (चिल्लर) पितळेच्या पोच आलेल्या डब्यात जात असतील थेट.. >>> लोल ऋयामा, वेलकम इथे Happy

आभा Lol

बाय द वे आता मला लक्षात आले की रोमान्सची परमावधी म्हणजे कपाळ-गाल किस पर्यंतच का आहे. मायराने अजून परवानगी दिली नसावी.

काल पोळीचा लाडू अर्धा एपिसोड होता आज सॉन्या किचन मध्ये जाउन सँड्विचेस बनवते. इशा त्यांना चहा नेउन देते. सँड्विचेस कुठले तर ब्रेड बटर,
व्हेज व्हेज टोस्ट व व्हेज चीज मला वाट्ते. मायरा मॅम घरी रेड कॅबेज, ब्रॉकोली, मशरूम्स पाठिवतात त्या नव्या वैनी परत पाठवून देतात. बंडखोर बंडू कुठली. व आंबाडीची भाजी, घोसाळ्याची भजी व तोंडल्याची दह्यातली कोशिंबीर बनवायचा वैनींचा प्लॅन आहे. ते ही लोकली सोर्स्ड भाज्या वापरून. किस खसियारे को नवाबी दिलवादी असे म्हणावे वाट्ते.

तत्पूर्वी आईबाबा टाइम्मशीन वापरून एकदम लगेच खिरीचे पॅकेट घेउन. कारण पिशवीत स्टील डबा आहे असे वाट्त नाही. बंगल्यात येतात.
आई जयदीप सॉन्या सर्वांना भेटतात. चहाला नाही नको म्हणतात. हा एक इन्फाइना ई ट लूप होउ शकतो. इथून फूड तिथे तिथून इथे. दहा मिनिटी भरून जातील कथेतली.

जावईबापू सासर्‍यांना ( पण ) खोलीत वर बोलवतात. ( अम्मो अग्गोबाई) व कृतक रागाचे प्रयोग करून शेवटी तुम्ही मॉला जॉवळचे सॉमजत नॉही सॉसरे बुवा म्हणॉन त्याच्या पण कप्पाळाचा पापा घेतात कि काय असे वाटले मला. परत कधी प्रश्न आल्यास मला आधी सांगा असे त्याने सांगितले अरण्याला. मला सर म्हणू नका असेही. हा तर ग्लोबल अलर्ट इशू झाला पाहिजे. ऑफिसात खर्‍या सरांना सर म्हणायची
भीती वाटू लागली आहे मजला तर.

आईबाबा व सर्व ज्या सोफ्याव्र बसतात तो सोफा व बंगल्याचा एकूण ले आउट मेन दार बदलल्या सारखे दिसते आहे. हे लाकडी दार आहे.
इतकाच हलका फुलका एपिसोड. आता पुढी ल भागात बाळ सरबाबांची वाट बघून त्यांना तोंचिको, आंची भा घोची भ भरवणार तत्पूर्वी
दोन तास टेबलाशी झोप काढत वाट बघेल. वाट पाहते रे.

झेंडे इज ऑन् द लुक आउट फॉर जालिंदर. जस्ट अ कॅजुअल अपडेट. ही इज सो नाइव. ही शु ड गो बॅक टू स्कूल.......

अरे हो, जयदीपने कौतुकाने बायको स्वयंपाक करते ह्याचे फोटो व मग तेच व्हि डीओ काढले. ते बघायला स्पेशल मोठे स्क्रीन्स मागवले आहेत म्हणे.

आय किड यु नॉट. हिने जर वरण भाताचा कुकर लावला तर तो काय करेल? असे वाटून जीव थरकापला.

सुभा काल निमकरांना मला सर म्हणु नका, आपल्यात काय नातं आहे तरी तुम्ही मला सर का म्हणता वैगेरे डायलॉग मारत होता. जे डायलॉग आधी इशाला बोलायला पाहिजे.

अमा... तोंचिको, घोचीभ, अंचीभा...मस्त! Happy

किस खसियारे को नवाबी दिलवादी .. Biggrin खसियारा म्हणजे काय?
तत्पूर्वी आईबाबा टाइम्मशीन वापरून एकदम लगेच खिरीचे पॅकेट घेउन. कारण पिशवीत स्टील डबा आहे असे वाट्त नाही. -- हे खूपच ग्रेट ऑब्झर्व्हेशन!

किस खसियारे को नवाबी दिलवादी .. Biggrin खसियारा म्हणजे काय?>> म्हणजे असाच कोणीतरी फालतू माणूस. मनोरंजन सिनेमात
संजीव कुमार जो एक होतकरू पोलीस शिपाई असतो. तो खानदानी नवाब असल्याचे नाटक करतो पण धड ऊर्दू पण बोला यला जमत नाही. बाकी वागणूक तर सोडाच. आपण काय दिवे लावले ते नंतर शम्मी कपूरला कॅफे मध्ये येउन उत्साहात सांगतो तेव्हा शम्मी कपूर कपाळावर हात मारून हे वाक्य म्हणतो. लै भारी सीन आहे.

म्हणजे इथे संदर्भ कसा तर आता श्रीमंत खानदानी सासर मिळाले आहे ना तर त्याचा आब राखू राहावे कि नै.? पन नाही तेच चाळ संस्कृती
फोर्स करून आणणार. घरचे पण भंजाळले आहेत. अरण्या हंबल ब्रॅग आहे व इशा रिवर्स स्नॉबरी खूप मारते. अंघोळीला चांगला फ्लफी
ट रकिश टावेल दिला तरी तो बाजूला ठेवून फाटका पंचाच नेइल. बघायला वैताग येतो इतकेच.

चाळ संस्कृतीला कमी लेखायचा आजिबात उद्देश नाही. विसंगती दाखवली फक्त मालिकेतली.

घरात लागणा र्‍या सामाना करता वस्तूंकरता requisition ? >>> सिरीयसली! जाम हसलो हे लोक स्ट्रेट चेहरा ठेवून असे संवाद कसे म्हणू शकतात याचा विचार करून. आता कंपनीच्या प्रोसेस प्रमाणे तीन इन्डिपेन्डण्ट कूकर मेकर्स कडून टेण्डर भरून घेउन मग हाय लेव्हल बोर्ड मीटिंग मधे ठरवणार का कुकर कोणाकडून घ्यायचा?

विक्याचे घर, ही १३ पैकी एक कंपनी दिसते.

ब्रेफाला पोळीचा लाडू केल्याचेही मायराला कळाले? त्याचे "transaction" आले की काय कंपनीच्या रेकॉर्ड्स मधे? आणि कॅलरी वाढणार म्हणे. एरव्ही हा खीर ओरपत असतो.

बाय द वे सकाळ कधी झाली? मधे हे लोक झोपलेच नाहीत का?*** कारण आधी ते सर/ईशा/झेंडे ईपालकांना पकडून आणतात, मग गाडीत गालावर लिपस्टिक, हापिसात फालतू सह्या वगैरे सगळे करून घरी येतात - तो सीन ईशा त्या ताटल्या घेउन वर जात असेपर्यंत तसाच सलग सीन आहे ना? मधे तो तासभर वर आलेला सूर्य दाखवतात तो सीन दिसला नाही. एकूण वरती अमांनी लिहीले तशी क्रोनॉलॉजी गंडली आहे. रात्रीचा स्वयंपाक करता करता ब्रेफाची वेळ झाली. वरती मायरा रिक्विझिशन बद्दल बोलत होती, तर ईशा जिना उतरून खाली येइपर्यंत घरी कूकर आला (अ‍ॅमेझॉन प्राइम नाउ सुद्धा इतक्या लौकर देत नाही). विक्याने नको म्हंटल्यावर ईशाबैंना वाइट वाटेपर्यंत लाडू कर्जतहून मुंबईत पोहोचले!

"मायरामॅम तुमचा ऑफिसमधल्या कामाचा भार मी कमी करू शकेन का नाही माहीत नाही" - इति ईशा. आजवरचा सर्वात विनोदी डॉयलॉग. पूर्वी "एकादशीच्या घरी शिवरात्र" म्हण ऐकली होती. तसेच काहीतरी वाटले. आधी मायराला काही काम नाही. ईशाला काही काम करता येत नाही. आणि ही तिचा भार कमी करणार!

"मी पोहे केलेत. त्यात दाणे घातलेत" अरे हे काय संवाद आहेत? नशीब, ते पोहे बशीत दिलेत. त्या खाली ट्रे आहे, ते मी खाली कढईत स्टीलच्या झार्‍याने तळून आणलेत वगैरे टाइप दादा कोंडक्यांच्या सखू च्या "डोईवर पाटी, पाटी मधे भाकरी, भाकरी वर तांब्या, तांब्यात दूध हाय गाईचं..." वगैरे टाइप काही म्हणत गात आली नाही. कदाचित फार होतंय म्हणून कट केले असावे.

ईशाला आता घरबसल्या ऑफिसातून पगार मिळतो असे दिसते.

*** झोपलेच नाहीत का म्हणजे रात्रच न झाल्याने. बाकी अर्थ काढू नयेत. मायरामॅम रागावतील.

अमा, श्रीमंत खानदानी सासर मिळाले आहे ना तर त्याचा आब राखू राहावे कि नै.? पन नाही तेच चाळ संस्कृती
फोर्स करून आणणार.>>> अगदी +१

@फारेण्ड Lol

बाय द वे सकाळ कधी झाली? मधे हे लोक झोपलेच नाहीत का?***
#######
रात्र व्हायला मनाई आहे.. रात्र धोक्याची असते Wink
सकाळी कसं गोड गोड पापा दिला की काम झालं

मायरामॅम तुमचा ऑफिसमधल्या कामाचा भार मी कमी करू शकेन का नाही माहीत नाही" - इति ईशा. आजवरचा सर्वात विनोदी डॉयलॉग. पूर्वी "एकादशीच्या घरी शिवरात्र" म्हण ऐकली होती. तसेच काहीतरी वाटले. आधी मायराला काही काम नाही. ईशाला काही काम करता येत नाही. आणि ही तिचा भार कमी करणार! >>>> हे वाचून फुटले मी. मायरा मात्र बिचारी इमाने इतबारे अभिनय करते आहे.

तो जालिंदरचा धोका तोंडी लावण्यापुरता आहे. जालिंदरला शूटिंगला वेळ झाला की धोका ऑन, इतर वेळी सगळं आलबेल Lol

सगळे प्रतिसाद मस्त! Happy

आधी होती दासी , पट्टराणी केले तीसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना..... असं काहीतरी म्हणतात ना?

एकसे एक प्रतिसाद आहेत वर.

*** झोपलेच नाहीत का म्हणजे रात्रच न झाल्याने. बाकी अर्थ काढू नयेत. मायरामॅम रागावतील.>> अर्थ काढून काढून तरी काय काढणार? कल्पनाशक्ती ताणूनही सुचत नाही काही.

रात्री इथे तसं काही होण्याची शक्यता नाही.. त्यासाठी झी ने वेगळी सिरिअल काढली आहे ..
रात्रीस खेळ चाले... इथे बेबी ला संसार म्हणजे भाजी करायची पोळी करायची.. भाजी निवडायची.. वड्या करायच्या .. येवढीच भातुकली माहित आहे..
आता काहिच रोमॅन्टिक दाखवत नसल्याने .. मी तर काल बघता बघता विसरुन गेले होते की हे दोघे नवरा बायको पण आहेत.. सुभा पण जिथे सगळे समोर आहेत तिथे रोमॅन्टिक होतो आणि बेडरुम मधे पोहे खातो .. Lol

ते नवरा बायको वाटत्च नाहीत, वयाच अन्तर असल तरी अभिनयावरून काहीतरी दाखव्ता आल असत प्रेमासारखं
सगळ प्लास्टिक प्लास्टिक वाटत राहत

सुभा पण जिथे सगळे समोर आहेत तिथे रोमॅन्टिक होतो आणि बेडरुम मधे पोहे खातो .. Lol >>>>>> हो..... एकटे असले कि... एकमेकाना भरवण्याच च काम करतात

रात्र व्हायला मनाई आहे.. रात्र धोक्याची असते Wink
सकाळी कसं गोड गोड पापा दिला की काम झालं >>>>> Rofl Rofl Rofl Rofl

बाय द वे आता मला लक्षात आले की रोमान्सची परमावधी म्हणजे कपाळ-गाल किस पर्यंतच का आहे. मायराने अजून परवानगी दिली नसावी. >>>>> Rofl Rofl Rofl

अमा, फारेण्ड भारी पोस्टी !! Biggrin
सुभा पण जिथे सगळे समोर आहेत तिथे रोमॅन्टिक होतो आणि बेडरुम मधे पोहे खातो .>> पोहे ऐवजी माती खातो असं चुकून पण बरोबर वाचून गेलो ! Wink

अमा, श्रीमंत खानदानी सासर मिळाले आहे ना तर त्याचा आब राखू राहावे कि नै.? पन नाही तेच चाळ संस्कृती
फोर्स करून आणणार.>>> +११११
@फारेण्ड Lol
धोक्याची रात्र, मायराची परवानगी, सकाळचा पापा, बेडरुममधे पोहे Lol Rofl Rofl Rofl

मला वाटते कपाळावरच्या पापाला इशाची उंची कारणीभूत असावी. Proud

सुभा पण जिथे सगळे समोर आहेत तिथे रोमॅन्टिक होतो आणि बेडरुम मधे पोहे खातो . >>> Lol हे तुफान परफेक्ट निरीक्षण आहे!

ते नवरा बायको न वाटण्याबद्दलही, टोटली.

झोपलेच नाहीत का म्हणजे रात्रच न झाल्याने. बाकी अर्थ काढू नयेत. मायरामॅम रागावतील.>> अर्थ काढून काढून तरी काय काढणार? कल्पनाशक्ती ताणूनही सुचत नाही काही. >>> Happy लोल हो. उद्या सकाळी ब्रेफाला काय करायचे यावर स्वगत म्हणत बसेल ईशा रात्रभर.

कौतुक आहे तुम्हा लोकांचे !! घरी आलेल्या पाहुण्यांसाठी म्हणून २ दिवस लावले तर डोके फिरले ...... !!
अभिनय, दिग्दर्शन, संकलन, दृश्यसातत्य राखणारे बारकावे (continuity) कसे नसावे याचा उत्तम वस्तुपाठ आहे ही मालिका....
सगळ्याचीच बोंब?! सगळ्यांकडून "माझे काम मी चुकूनही धड करणार नाही" असा बाँड लिहून घेतला असेल बहुतेक.

१. कुकरबद्दल बोलून ईशादेवी लाडू + मेथी थेऊन निघतात. उजव्या हातात मेथी ( ताजी, घट्ट बांधलेली जुडी, मुळे स्वतःकडे) आणि डाव्या हातात लाडू
२. जिना चढून येताना मेथी डाव्या हातात आणि लाडू उजव्या हातात. मेथीची मुळे काटकोनात फिरलेली..
३. सरंजामे- इ- खास कक्षाकडे येताना मेथी विस्कटलेली + कोमेजलेली आणि मातीवाली मुळे दिसत आहेत
४. पुन्हा मागे वळून जिन्यात बसताना मेथीला मुळे नाहीत, वरचे स्वच्छ देठ आहेत फक्त. आणि मेथीवाल्या हातात २ ताटल्या.
५. आधी (१-४ दृश्ये) मेथीला एक, लाडवाना एक अशी ताटली दिसतेय.
एका सलग दृश्यात इतका वैविध्यपूर्ण निष्काळजीपणा??

फ्लॅशबॅकमध्ये सरंजामे तिला दारावर टकटक केल्यावर ओरडतात ते बघून आसुरी आनंद झाला. आधीच्या सगळ्या शूटिंगमध्ये साठलेला राग बहुतेक त्या एका सीनमध्ये व्यक्त केला भावेंनी.

@ फारएण्ड
बाय द वे सकाळ कधी झाली? मधे हे लोक झोपलेच नाहीत का? >>>>> हो, दोन सलग सकाळीच दाखवल्या. सूर्य दाखवला मधे. तो पण बिचारा न मावळता पुन्हा उगवला मुकाट्याने.

@अमा
तत्पूर्वी आईबाबा टाइम्मशीन वापरून एकदम लगेच खिरीचे पॅकेट घेउन. कारण पिशवीत स्टील डबा आहे असे वाट्त नाही. >>>>
टेबलवर ठेवायचे बोन चायनाचे सर्विंग बाऊल असतात झाकणवाले तशा भांड्यातून लाडू गेले कर्जत ते मुंबई. खीर पण त्यातूनच आली असणार ..... न सांडता.... मुंबई ते कर्जत. पिशवी ओली नव्हती झाली. आज पुढे दिसेल.

Pages