Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजनंदिनी कोमामध्ये गेली
राजनंदिनी कोमामध्ये गेली असणार..........पण मग विस खोटारडा मुलगा ठरेल ना,तो तर हीरो आहे आणि बेबी"आय ट्रस्ट यू"हा मंत्र म्हणत असते.आणि त्यातछन बेबी जर पुनर्जन्मच असेल ,तर नंदूला मरावच लागेल.
मायराचा केमिकल लोचा खरच कळत नाही आहे,का वागते बर अशी ही,किती शहाणी मुलगी आहे.आणि खरतर मायरानेच गोळीची आठवण पहिले करून दिली,बेबीचा फोन नंतर आला,त्यामुळे मायराचा पहिला नंबर,बेबी दुसरी.
बेबीच ते "तिळगुळ घ्या गोड बोला वगैरे ऐकून"कान विटले.
झेंडेंच पण काही कळत नाही,विसच्या लग्नाचा जास्त आनंद तर झेंडेनाच झाला आहे
आणि यांच्यात मुलीया माहेरच्यांना बोलावण्याची पध्दत नाही का?
मायराचंही कॅरेक्टर गंडवल
मायराचंही कॅरेक्टर गंडवल लेखकाने!
मायरा जेव्हा वैतागून आज गोळी
मायरा जेव्हा वैतागून आज गोळी घेतलीत का म्हणाली तेव्हा मला वाटलं की विक्या त्या गोळ्या डोकं ठिकाणावर राहावं म्हणून घेतो की काय. आज गोळी घेतली नसेल म्हणून अशी वेड्यासारखी बडबड करतोय हा, अशा अंदाजात बोलली मायरा.
Tula pahate re serial Ending
Tula pahate re serial Ending soon | Subodh Bhave Live :
https://www.youtube.com/watch?v=W30J-C0-RPU&t=7s
बापरे आज चुकून एक भाग पाहिला
बापरे आज चुकून एक भाग पाहिला मी. खूपच भयानक मालिका आहे. भावे त्याच्या बायकोला बोलतो कोणी गिफ्ट दिलं की घ्यायचं नाही. गिफ्टमधे चुकून भातुकली निघाली तर दिवसभर तेच खेळत बसशील माझ्याकडे दुर्लक्ष होईल. नंतर ती बाहेर पडते आणि चकवा लागल्यासारखी परत खोलीत जायचा रस्ताच विसरते. तीची सासू शोधत येते तेव्हा मला वाटलं ही आता बोलेल 'बाई एकटी फिरत जाऊ नको हरवशील घरात, तू बाहेर पडलीस ना की भिंतीवर आणि दरवाजांवर खडूने फुल्या मारत जा म्हणजे तूला तुझी रुम लक्षात राहील.' नंतर ती मायरा बाबांना सांगते लग्नाचा खर्च १० करोड झाला. अरे तुमच्या लग्नाची एक पत्रिकाच दीड लाखाची होती ना. ६०० ७०० पत्रिकांचेच दहा करोड होतात. बाकी सगळा खर्च झेंडे मायराने केला काय?
साधारण ८-१० वर्षांपूर्वी
साधारण ८-१० वर्षांपूर्वी काटा रुते कुणाला नावाची मालिका आली होती, तुपारेची स्टोरीही़ कारुको सारखीच असेल अस वाटतंय.
काटा रुते मध्ये सुद्धा शैलेश दातारने एका वयस्कर आणि श्रीमंत बिझीनेसमनचा रोल केला होता, तो आपल्या बहिणीच्या आग्रहामुळे त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या अनाथ व गरीब नायिकेशी लग्न करतो (स्नेहा वाघ). अर्थात त्यांनी त्याच्या पहिल्या पत्नीची माहिती नायिकेपासून लपवलेली असते. त्याच्या पहिल्या बायकोचा त्याच्या बहिणीने दिलेल्या धक्क्यामुळे गर्भपात झालेला असतो व ती कधीहि आई बनू शकणार नसते.
ह्याचा जबरदस्त मानसिक धकका बसल्यामुळे ती वेडसर होते व एका बाहूलिलाच तिचे बाळ मानू लागते. तिला सर्वांपासून लपवून एका बंद खोलित ठेवलेले असते जिथे कोणीहि सहसा जाऊ शकत नाही. पहिल्या बायकोच्या वडिलांनी त्यांची प्रचंड अशी प्रॉपर्टी आपल्या नातवाच्या म्हणजेच मुलिच्या अपत्याच्या नावावर केलेलि असते. पण आता पहिल्या बायकोला मूल नसल्यामुळे व होणे शक्य नसल्यामुळे ती प्रॉपर्टी मिळवणे शक्य नसते. म्हणून नायिकेला होणारे मूल तिला फसवून पहिल्या बायकोला देण्याचा त्यांचा प्लॅन असतो. जेणेकरून पहिली बायको शहाणी होईल बाळ मिळाल्याने आणि तिच्या वडिलांची प्रॉपर्टीही मिळवता येइल. नायिकेला त्या बंद खोलिचा आणि त्यामधल्या वेडसर पहिल्या बायकोचा शोध लग्नानंतर बहुतेक ती स्वतः प्रेग्नंट असल्यावर लागतो. आणि ती खूप ममतेने तीची सेवा करू लागते. नक्की आठवत नाही पण नायिकेला बहुतेक हाकलून देतात तिचे बाळ ताब्यात घेऊन. तुपारेची कथा हि साधारण काटा रुते कुणाला सारखी असण्याची शक्यता आहे, असा एक अंदाज.
बोकलत
बोकलत

saketa.....तुम्ही म्हणता तस
saketa.....तुम्ही म्हणता तस असेलही,सुरुवातीला विसच उतू जात असलेल प्रेम बघून मला कुसुम मनोहर लेलेची पण आठवण झाली होती.पण या मालिकेने एवढा अपेक्षाभंग केला आहे की आता त्यांनाच नक्की काय दाखवायच हे कळत नसाव
मध्येच केड्याला वाटत की पुनर्जन्माचा खेळ खेळावा,मग तशा काही हिऔट्स देतो,मध्येच त्याला वाटत नंदूला जिवंत दाखवून मानबा मानबा खेळाव.त्यात ही इरिटेट करणारी बेबी,सळीकडे बोंबाबोंबच आहे.
ह्याना काय हकलुन लावल आहे
ह्याना काय हकलुन लावल आहे का. office मधुन.. kaa paise naheet rent dyayala.... लग्न झाल्या पासुन office che सगळे scenes बाहेरच दाखवत आहेत. garden madhye
नीट scene पाहिला तर.. शेवटच्या scene madhye sagle pantag udavat asatnaa jalinder दिसला होता.. to फक्त as usual आपल्यालाच दिसला .. baki chyana nahee

हे लक्षातच नाही आलं. सगळे
हे लक्षातच नाही आलं. सगळे पैसे लग्नातच संपले असतील, निर्मात्याचेही आणि सरंजामेचेही.
ते हार्ट शेप्ड वडी
ते हार्ट शेप्ड वडी निवडल्यानन्तर विस रॉमेन्टिक झाला ते फक्त Dialogues बोलण्यापुरतीच. ते Dialogues पण कैच्याकैच होते. ती वडी विसने खाल्ली का, विस आणि ईशा दोघान्नी मिळून खाल्ली असेल तर ती कश्यापद्दतीने
खाल्ली असेल. ते काहीच दाखवले नाही. आता हयान्च्या कडून काही रॉमेन्टिक पाहायला मिळेल ही अपेक्षा न केलेलीच बरी.
मायराचंही कॅरेक्टर गंडवल लेखकाने! >>>>>>>+++++++१११११११११
Normally घरी कोणी पाहुणे आले तरी आपण घरचे कपडे बदलून तयार होतो ईथे तर उत्सव असून सगळे त्याच कपड्यांमध्ये. >>>>>> अगदी अगदी. विससकट ऑफिसचा स्टाफ सुद्दा फॉर्मल कपडयान्मध्ये आले.
saketa मलाही ती बन्द खोली पाहून काटा रुते कुणालाचीच आठवण आली.
Tula pahate re serial Ending
Tula pahate re serial Ending soon >>>> NO! गेम ऑफ थ्रोन्स बंद करावी की तुपारे यात जर नासा वगैरेंनी जागतिक व्हॉट्सअॅप पोल घेतला तर तुपारे चालू ठेवावी हेच आपले मत असेल, आणि पुन्हा मी "हे जमेल तितक्या लोकांबरोबर शेअर करा" असा संदेशही देइन.
फारेंड, आजचा एपिसोड
फारेंड, आजचा एपिसोड पाहील्यानंतरही आपले हेच मत कायम असेल अशी आशा करावी काय?
मला तर डाऊट येऊन राहीलाय की राजनंदीनीच गेमा करतिये. जालिंदर तिचाच पेरलेला माणूस असावा. देवीवाली बाई पण तिनंच ठेवलीये बातम्या द्यायला. पारावरची देवी पण सामिल असणार कटात. आईसाहेब आणि त्यांची ती दासी पण राजनंदीनीची हस्तक असणार. तो एक रिटायर्ड नोकर पण तिच्या माहेरचा असणार.
फारएण्ड...
फारएण्ड...
(पुढे काय बोलायला शब्दच नाहीत, सिरियलीत ते आश्चर्य चकित होऊन एकदाच नाव घेऊन शाॅक्ड होऊन पाहत राहतात तसं झालंय माझं)
आज ईबाळ आजारी कशाने पडलं अचानक??
फारएण्ड,नका हो नका,इथे मी कधी
फारएण्ड,नका हो नका,इथे मी कधी एकदाची खरी स्टोरी चालू होऊन मालिका संपेल याची वाट पाहात आहे,बेबी झेपतच नव्हती पण आता सुभा पण नाही बघवत आहे.लिमिटेड एपिसोड्स म्हणजे नक्की किती?
पण आज विस बेबीने राजनंदिनी हे नाव घेतल्यावर घाबरला का?
मेधावि.......।तुमची स्टोरी ....लई बेश्ट,एक दिवस अँडिशन करत आहे
बेबी पण नंदूचा राईट हँड असेल का.जसा झेंडे विसचा आहे.
जालिंदर कसला फिट आहे. सुम्माट
जालिंदर कसला फिट आहे. सुम्माट पळत होता. सुभाला ढेरी धरून फाकफूक करत त्याच्या मागे धावताना बघून दया आली.
इशाबाळाचा पापा रोज दाखवणं कंपल्सरीये का?
आणि वि सचा मोठेपणा पहा..
आणि वि सचा मोठेपणा पहा.. ईशाच्या आईबाबांना, भेट झाली नाही तर नमस्कार सांगितला... एवढेच वाटते तर त्यांना वस्तीसाठी सांगता येत नाही का.. अगदी मुलीच्या सासरी टाइप मुद्दा असेल तरी सांगायला काय हरकत आहे
इशाबाळाचा पापा रोज दाखवणं
इशाबाळाचा पापा रोज दाखवणं कंपल्सरीये का?>>>
कपाळावर पापा हा गालावरचा पापा
कपाळावर पापा हा गालावरचा पापा समजावा -इति झी च्या सेन्सॉर्ड सिरियल्स
प्राचीन bang on... मला वाटलं
प्राचीन bang on... मला वाटलं तो म्हणेल आईबाबांना राहिला सांग पण कसलं काय. तसही एकाअर्थी बरच झालं नाहीतर 3 4 एपिसोड त्यावर घालवले असते.
विक्रांत ज्या पद्धतीने झेंडेशी बोलला त्यावरून एक गोष्ट तर नक्की की त्याचा past किंवा upcoming role gray आहे. बघुया दिग्दर्शकाच्या मनात काय आहे.
इशाबाळाचा पापा रोज दाखवणं
इशाबाळाचा पापा रोज दाखवणं कंपल्सरीये का? >>>> तो सहा अंगुळं खाली आला की गाडं रूळावर आलं आणि बंद झाला की काहीतरी भयानक बिनसलं .... असा काहीतरी विचार असावा त्यामागे
(On serious note , अवांतर , मला आपला बच्चनज् अभिमान आठवला . बिनसणार नातं किती सूचकतेने सांगितल होतं )
कपाळावर पापा हा गालावरचा पापा
कपाळावर पापा हा गालावरचा पापा समजावा -इति झी च्या सेन्सॉर्ड सिरियल्स >>>
तरी मराठी सिरीज ची मजल गालापर्यंतच दिसते 
>> तो सहा अंगुळं खाली आला की
>> तो सहा अंगुळं खाली आला की गाडं रूळावर आलं आणि बंद झाला की काहीतरी भयानक बिनसलं .... असा काहीतरी विचार असावा त्यामागे

↑^^^^^^^^^^^
लग्न झाल्यावर रोमेन्स संपतो म्हणतात तेच खरे.. हे दोघे काहीच नवीन नाही , रुटीन तर आहे असं वागताहेत लग्नाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी..
लग्नाआधी मात्र रोमिओ ज्युलिएट .. लैला मजनू झाले होते अगदी
काही डायलॉग/ प्रसंग तर ठरले आहेत
1 विकू : खूप सुंदर दिसते आहेस
२ इशा: लोक बघता आहेत विकू: मग काय बघू दे ना
3 हात पुढे करून हातात हात मागून घ्यायचा मग अगदी ओघाने आलेय आपोआप मारलीये अशी मिठी
आणि आता रोजचा गोड गोड पापा
आणि आजच्या एपिसोड मध्ये
आणि आजच्या एपिसोड मध्ये काहीही कारण नसताना आजारी पडायला काय झालं बाळाला? आणि हाईट म्हणजे त्या लेडी डॉक्टर ला विसं स्वतःच जायला सांगतो हे पाहून फुटले मी.
सान्वी हाच प्रश्न मी पण
सान्वी हाच प्रश्न मी पण विचारला होता इथेच तर उत्तर नाही मिळालं. मग न राहवून साबांना विचारलं, तर त्या म्हणे, "तो जालिंदर आला ना समोर त्याला बघून घाबरली असेल. "

जालिंदरने ईबाळाला भाॅऽऽऽऽक केलं का काय??
सगळ्यांनी आठवण काढली त्यामुळे
ईथल्या सगळ्यांनी आठवण काढली त्यामुळे जालिंदर आला.
आजकाल सर्व प्रसंगांना हिंदी
आजकाल सर्व प्रसंगांना हिंदी गाणी बॅकग्राउण्डला लावतात. मग जालिंदर चे गाणे काय होते? बचना ऐ हसींनो?
नायक नही खलनायक हूं मै...
नायक नही खलनायक हूं मै...
हो तो जालिंदरच समोर आल्यावर
हो तो जालिंदरच समोर आल्यावर विक्रांत सsSSSSSSर करुन ओरडत पळाली आणि आजारी पडली.
डॉक्टर ला विसं स्वतःच जायला
डॉक्टर ला विसं स्वतःच जायला सांगतो हे पाहून फुटले मी.>> मी ही
ती डॉक पण मिळाला बाई एकदाचा चान्स सुभा सोबत काम करायचा ह्या खुशीत होती
Pages