Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो. टुकार वर्जन ऑफ स मा ला.
हो. टुकार वर्जन ऑफ स मा ला.
श्रेयस आणि मधे अजुन एक
श्रेयस आणि मधे अजुन एक कोणीतरी दाखवला होता; तेव्हाच त्या मार्गावरून जाउन ऑलरेडी परत आल्ये!
पानवलकर सर, इशा सिरियल सोडून गेले का?
राधक्का म्हणजे सर्व देवतांचे
राधक्का म्हणजे सर्व देवतांचे मूर्त रूप असे त्या केड्याला दाखवायचे आहे.... त्याप्रमाणे तिच्यातल्या बर्याच देवता प्रेक्षकांच्या माथी मारून झाल्यावर असे लक्षात आले की आपली राधा देवी साक्षात न्याय देवता देखील आहे जर आपण तिचे हे गुण दर्शकांना दाखवले नाहीत तर मोठ्ठे नुकसान होईल... तेव्हा येथून पुढे सुद्धा अशी गुणी, निस्पृह नायिका बघावी आणि लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चॅनेल, आणि तमाम कलाकार यांना सहन करण्यासाठी तयार राहावे
पानवलकर दाताचे रूट कॅनॉल
पानवलकर दाताचे रूट कॅनॉल करायला गेले असावेत☺️
कानाला खडामध्ये आली होती आज
कानाला खडामध्ये आली होती आज अनिता दाते. मानबामधली फक्त जेनी आली होती मैत्रिण म्हणून, गुरू एव्हीमधून बोलला.
वरात बघितली का. वरात कमी आणि
वरात बघितली का. वरात कमी आणि राधिकाची दादागिरी जास्त होती. दोन महिन्यात शनाया कशी गुरूसाठी योग्य बायको नाही हे सिद्ध करणार सासूसुना आणि घटस्फोट देणार नाही ते वेगळंंच. कसली गळेपडू आहे राधिका, तो गुरू एवढा अपमान करतो तरी तोच हवाय तिला नवरा म्हणून. सौमित्र पिऊन आल्यासारखा झिंगत होता वरातीत.
धन्य धन्य हो राधिकाताई, मग
धन्य धन्य हो राधिकाताई, मग घटस्फोट मागायला कोर्टात का गेली होती. तेव्हा गुरूने पण का दिला नाही पटकन. काहीही मारतात प्रेक्षकांच्या माथी आणि प्रेक्षक बघतात आणि नंबर वन trp देतात.
राधिका आणि तिची सासू संसार
राधिका आणि तिची सासू संसार मोडण्यासाठी कायम फक्त शनायालाच दोष देत असतात. शनाया आणि आता तिच्या आईने सांगितले की गुरूचाही दोष आहे, तर ते त्यांना मान्य होत नाही. अगदी आता गुरूने शनायाशी जबरदस्तीने लग्न लावले, त्यासाठीही त्या शनायालाच जबाबदार धरतात.
जो काय धडा शिकवायचा तो शनायालाच असाच राधिकाचा प्लान दिसतो. हे पथेटिक आहे.
-------
शनायाला धमकी द्यायला राधिकाला कंपनीतलं फ्रॉड आठवलं पण तिच्या जिवावर बेतलेला अॅक्सिडंट घडवणारा खोटा फोन आठवला नाही.
ती बकुळातर अगदी डोक्यात जाते.
ती बकुळातर अगदी डोक्यात जाते. मोठी उद्योजिका वगैरे दाखवण्याचं काहीच कारण नव्हतं, हेच करायचं होतं तर कशाला घातला एवढा घाट. राधिकाला मुळात स्वत:ला सिद्ध करण्यात रसच नसतो. प्रमाण भाषेत बोलायची मध्ये ते तर सगळेच विसरलेत. गुलमोहर पाठीशी नसतं तर काय केलं असतं राधिकाने, उगा दुस-यांच्या जीवावर उड्या मारते. पहिले पाढे पंचावन्न तसं सासूसुनेला शनायाच चुकीची वाटते अजूनही.
बकुळा कुठे मोठी उद्योजिका आहे
बकुळा कुठे मोठी उद्योजिका आहे?
आधीच वाटलेलं सवत माझी लाडकी
आधीच वाटलेलं सवत माझी लाडकी वळणाने जाईल, बऱ्याच जणांनी लिहिलंही होतं पण ते पहिल्या सहा महिन्यांत हलक्याफुलक्या पध्ततीने दाखवून, वर्षभरात मालिका संपली असती तर गोष्ट वेगळी होती.
आता तो एवढा gone case गुरु तो हवाय आणि फक्त शनायाला नावं ठेऊन हाकलवून द्यायचे असेल तर totally trp मिळतोय म्हणून प्रेक्षकांच्या माथी काहीही मारतायेत. ही मालिका involved होऊन बघत राहणाऱ्या प्रेक्षकांना हातोहात फसवले जातंय आणि त्यांना trp दिल्याची किंमत मोजायला लागणार एकंदरीत असं दिसतंय, असो.
आणि गुरू काय महामाठ आहे.
आणि गुरू काय महामाठ आहे. बेअकल्यासारखे एक तर शनाया शी लग्न केले . इतक्या मोठ्या कंपनीचा कधी काळी सी ईओ होता ना? म्हणजे उच्चशिक्षित असणार (असे धरून चालू) तरी त्याला भारतातला साधा हिंदू विवाह कायदा त्याला माहित नसावा?
कोणत्या भ्रमात जगतोय तो?
आयतं तिला वेलकम करतोय.
आणि राधिका शनायाला घरी घेऊन आली त्यात याचं कौतुक काय?
दोन महिन्यात शनाया कशी
दोन महिन्यात शनाया कशी गुरूसाठी योग्य बायको नाही हे सिद्ध करणार सासूसुना आणि घटस्फोट देणार नाही ते वेगळंंच. >>>>>>> म्हणजे हि सिरियल दोन महिन्यात सम्पणार का ? राधिकाला ओव्हरकॉन्फिडण्स वाटतोय की मीच जिन्कणार. शनाया जिन्को आणि प्रेक्षकान्ची कायमची सुटका होवो.
प्रमाण भाषेत बोलायची मध्ये ते तर सगळेच विसरलेत. >>>>>>>> आ? आता पुन्हा 'करुन राहयले, बोलून राहयले' बोलायला लागली का?
वास्तविक जिवनात शनाया इतकं
वास्तविक जिवनात शनाया इतकं मुर्ख कुणी असतं का खरोखरी?
ट्विन्कल ट्विन्कल लिटिल स्टार, गॅरी और शनाया एक दुसरे से करते है प्यार?
नेहमी मापटं ओलांडण्या ऐवजी लाथेने उडवलेलंच का दाखवतात ?
हा शेपुतघाल्या गुरू लग्न करून
हा शेपुतघाल्या गुरू लग्न करून शन्या ला तिच्या ऐच्या घरी सोदून आलेला आनि राधिकाने शन्याला घरी आन्ल्यावर मात्र लाह्या फुतत्तात तसा फुततोय तनातना. मुर्ख कुथ्ला
कंट्रोल मिस दक्षिणा कंट्रोल:
कंट्रोल मिस दक्षिणा कंट्रोल.

दक्षु, किती रागवलीयस.
दक्षु,
किती रागवलीयस. 
राधिका:- माह्या नवरा- माह्या नवरा - माह्या नवरा- माह्या नवरा-माह्या नवरा-माह्या नवरा-माह्या नवरा- माह्या नवरा- माह्या नवरा- माह्या नवरा-माह्या नवरा- माह्या नवरा..
राधिकाची सासु उर्फ गुरुमायः- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु- माह्या गुरु.
हुश्श !! झाले एकदाचे बारा महिने
चांगलं झाले, आता लवकर त्या
चांगलं झाले, आता लवकर त्या मुर्ख धारकका आणि गुरुमय ला चांगला धडा शिकवला पाहिजे गुरू आणि शनया ने..
व्हिडिओमध्ये अनिता दातेच आहे
व्हिडिओमध्ये अनिता दातेच आहे का?
https://youtu.be/HE7APMCjCnY
अख्खी सिरीयलच भैताड झालीये..
अख्खी सिरीयलच भैताड झालीये..
अख्खी सिरीयलच भैताड झालीये..
अख्खी सिरीयलच भैताड झालीये..+११११११११
शन्या जरा स्मार्ट हवी होती.
शन्या जरा स्मार्ट हवी होती.
जरा ह्या राधाक्कालाच चांगलं ऐकवायला हवं तिने.
राधाक्काने तिला जबरदस्तीने आणलंय वरुन सगळे पांचट मिळुन तिची टर उडवताहेत. ती बकुळा पण तिला ध्यान म्हणते.
राधिका सायको म्हणते. आणि सगळे फिदीफिदी हसतात. काहीही.
इतकं कोण ऐकुन घेतं?
शन्याच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर स्वतःचा इतका इन्सल्ट होउ दिलाच नसता.
उलट राधाक्काचीच इज्जत काढली असती.
तुझा नवरा तुला सोडुन माझ्यामागे आला असं बोलुन.
आताची राधिका डीजर्व्ह धिस ओन्ली.
आणि कसले दोन महिन्याची मुदत? म्हणे दोन महिने बघणार की ही तुमचा संसार कसा सांभाळते ते.
तु बाई सांभाळलास ना इतकी वर्ष संसार मग काय झालं? काय मिळालं? शन्यासारखी सवत?
आणि नाही सांभाळता आला तिला संसार मग काय तु पुन्हा सांभाळायला घेणार का त्या गुरुला आणि त्याचा संसार?
आता ह्या सिरियलीत शन्या गुरु, गुरुमाय पेक्षा राधाक्का मुर्ख आहे.
हो. आता आचरटपणाचा कळस झालाय.
हो. आता आचरटपणाचा कळस झालाय. आणि लग्न टिकवण्यासाठी यशस्वी गृहिणी असल्याचं सिद्ध करणं गरजेचं असणं...पथेटिक पथेटिक..
तिकडे गुरूने कोणालाही , अगदी कायद्यालाही न जुमानता शनायाशी लग्न केलंय मग आता घटस्फोटासाठी दोन महिन्यांची इंटर्नशिप करायला लावायची काय गरज?
सवत माझी लाडकीची थीम उचललीय पण तिथे पहिल्या बायकोने हे सगळं न बोलता केलं होतं. इथे राधिका काढणार चिमटा आणि आव आणि बडबड धोबीपछाड दिल्याची.
कालच्या भागात सौमित्र सगळ्यात जास्त डोक्यात गेला. हा पण मोठी बिझिनेसमन ना?की अमेरिकेत नोकरी करतोय? पण रिकामटेकडाच दिसतोय
सवत माझी लाडकीची थीम उचललीय
सवत माझी लाडकीची थीम उचललीय पण तिथे पहिल्या बायकोने हे सगळं न बोलता केलं होतं. >>> बरोबर
कालच्या भागात सौमित्र सगळ्यात जास्त डोक्यात गेला. >>>>>>>>>>> +१ तो ख्या ख्या करुन हसतो तेव्हा तेव्हा माझ्या डोक्यात जातो. काल जास्तच गेला.
सौमित्र इरिटेटिन्ग आहे
सौमित्र इरिटेटिन्ग आहे पहिल्या पासूनच. व्हर्बल डायरिया निव्वळ.
मला कळत नाही गुरू ने इतक्या निक्षून मला तुझ्याबरोबर राहाय्चे नाही असे सांगितले आहे. तर त्याला परत परत धरून ठेवायचा हट्ट का? एव्हरी थिंग एल्स इज एक्स्ट्रनल. रिलेशनशिपचा गाभाच न श्ट झाल्यावर पुढची पिडा राहातच नाही ना?!
राधिकाला खरेच खूप हौस आहे सर्व तमाशा करायची. प्रायवसी कन्सेप्ट नाही. सर्व एका लो आयक्यू लेव्हल ला चालले आहे.
राधिकाला खरेच खूप हौस आहे
राधिकाला खरेच खूप हौस आहे सर्व तमाशा करायची. प्रायवसी कन्सेप्ट नाही. सर्व एका लो आयक्यू लेव्हल ला चालले आहे.>>>>
अगदी पहिल्यापासुनच. पण तेव्हा हिच्यावर अन्याय झालेला म्हणुन बाजु हिची बाजु पटत होती. आता तर बाई मूव्ह ऑन असं सांगावं तिला कुणीतरी.
टी आर पी कसा काढतात. मी
टी आर पी कसा काढतात. मी तरी कोणालाही ही सिरियल आवडल्याच ऐक्ल नाहीये.
रावी.. टी आर पी म्हणजे त्या
रावी.. टी आर पी म्हणजे त्या वेळेला किती टी व्ही सेट्स वर ती मालिका लागते त्याचा ग्राफ. तो मानबा चा सर्वांत वरचढ आहे!

त्याचा अर्थ ती आवडते असा होत नसून....इतर पाहतात म्हाणून घरात लावली जाणे, एकदा लावून बंद करणे, शिव्या देत देत पाहणे, तु पा रे पेक्षा बरी म्हणून रिलेटिव्हली पाहणे, पाव्हण्यांसाठी लावली जाणे......अशी काहीही वस्तुस्थिती असू शकते.
राधिका खरंच डोक्यात जाते आता...काय ही अधोगती!
काय ते फिदी फिदी हसणं.......कायते " ए..!! थांब शन्या...!!" असं म्हणत तिला दटावणं.......
वरची सस्मित ची पहिली पोस्ट पटली!
नाही तिला सांभाळता आला संसार...(म्हणजे नाहीच येणार! हे तिला करुच देणार नाहीत काही!)...तर राधक्का काय करणारे?
पण ह्यात संसार सांभाळणे आलेच
पण ह्यात संसार सांभाळणे आलेच पाहिजे तरच खरी बाई, कसाही असला तरी पुरूष चुकत नाही. अशी चुकीची गृ हित के माथी मारली जात आहेत. तिला दुसरे काही येत असेल . किंवा गुरु शनायाचे खरेच गोड असे प्रेम असेल तर रोज मॅगी खाल्ली व आठवड्यातून एकदा घर झाडले तर काय फरक पडतो. तिला येत नाही असेच निक ष ठरवणार व मग तिला नापास करून हाकलून देणार. दिस इज नॉट डन...
एक स्टेप मॉम सिनेमा आहे. त्यातही असेच नवे पात्र येते पोस्ट डिवोर्स. पहिली बायको पहिले खूप भापते. माझा संसार माझी मुले करून पण मग स्वतःला कॅन्सर झाल्याचे कळल्यावर हळू हळू मुलांना संसाराला गर्ल्फ्रेम्ड पक्षी जुलिआ रॉबर्ट च्या हवाली करते. ते ट्रांझिशन खूप मस्त घेतले आहे. ह्यात गफ्रे व नवर्याचे कामजीवन पण खूप चांगले आहे असे सूचित केले आहे. तसेही इथे काही दिसत नाही. अफेअर म्हणजे शॉपिन्ग लंच असे थोडी असते फक्त!! पण गुरू शनायाव्र दोघी बायका पहारा ठेव णार, सोसायटी वाले येता जाता टोक णार हे असह्य आहे.
गव्हाणीतला कुत्रा नावाची पंचतंत्रात कथा आहे तसे चालले आहे .
अमा...:खोखो:.....हो ना!!
अमा...
.....हो ना!!
राधिकाला खरेच खूप हौस आहे सर्व तमाशा करायची. प्रायवसी कन्सेप्ट नाही. सर्व एका लो आयक्यू लेव्हल ला चालले आहे.>>>
आणि सगळे मिळून शनायालाच का चिडवतात, दोषी ठरवितात तेच मला कळत नाही! बकुळा मावशीपासून ते महाजनींपर्यंत...राधिका ला सगळं पब्लिकली करायचे असते.
गुरुला मात्र काही बोलत नाही विशेष!
Pages