माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून पण काही लोकांना धारकका आवडते हेच दुर्दैव आहे.>>> चर्प्स काही नाही ओ खूप लोकांना आवडतीये ती, ही शिरेल टॉप ला आहे टीआरपी त

शनायाची ममा यायच्या आधी डायव्होर्स केससाठी कोर्टाची तारीख पडली होती- पंधरा दिवसांनंतर.
पण शन्याच्या ममाने ते कॅलेंडरच खाऊन टाकलं. आता गुरूचा एक महिन्याचा नोटीस पीरियड किती महिने चालतो ते पाहू.

केडी स्वतःच्या घरात दोन बायकांना राहायला देऊन वर त्यांचा बिनपगारी नोकरही झालाय.

नवी नोकरी शोधताना तो प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर आधीच्या एम्प्लॉयरकडे चौकशी करतोच. त्यात राधिका चांगलं बोलली म्हणून गुरूने नव्या नोकरीवर लाथ मारली. राधिकाने त्याच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स केल्या असत्या, तर नोकरी न मिळायलाही तिलाच जबाबदार धरायला तो मोकळा.

आनंदजेनी प्रकरणी राधिका सौमित्रच्या भोचकपणाचा परिणाम त्यांच्या स्वतःच्याच लग्नात झाल्याचं दाखवायला धजावतील का हे लोक?
मेन लीड स्त्रीचा घटस्फोट आणि पुनर्विवाह झी मराठीने याआधी कधी दाखवलाय का?

राधिका ला दामिनी सारख्या पात्रासारखं दाखवायचा प्रयत्न आहे का? चीड‌ येते राधिका च्या भाषणबाज संवादाची...

भरत अवंतिका म्हणून सिरीयल होती खूप जुनी... त्यात तिच्या नवऱ्याचे विबास असतात.ते उघडकीस आल्यावर ती तिच्या जुळ्या मुलांना घेऊन माहेरी जाते...मग स्वतःच्या पायावर उभी राहते....नंतर रवींद्र मंकणी येतात तिच्या आयुष्यात त्यांच्यासोबत ती लग्न करते...आणि तिच्या नवऱ्याला सोडते अस होतं...
तेव्हा आम्ही खूप हसायचो त्या सिरीयल ला...लोक काहीपण दाखवतात वगैरे.....पण हे पाहिल्यावर ती सिरीयल जरा लॉजिकल वाटू लागलीय!

मलापण अवंतिकाच आठवली अने. मेन लीड स्त्रीचा घटस्फोट आणि पुनर्विवाह झी मराठीने याआधी कधी दाखवलाय का? >>> ह्या प्रश्नावर.

तीपण फार कंटाळवाणी केलेली नंतर, जाम पाणी घालत होते, स्मृतीभ्रंश काय नी काय.

संदीप कुळकर्णी आवडायचा मला किंवा आवडतो अभिनेता म्हणून, कॅरॅक्टर मात्र नव्हतं आवडलं. तो बायकोला फसवत रहातो ते नव्हतं आवडलं.

अवंतिका पाहिली आहे., त्यात पुनर्विवाह नाही दाखवला. दुसरं लग्न ठरल्यावर तिचा स्मृतिभ्रंश होतो.
शेवटच्या भागात ती नवर्‍याकडे परत जाणार , दुसरं लग्न करणार की एकटीच राहणार हे संदिग्ध ठेवलेलं.
त्या आधीच्या आभाळमायात नवर्‍याचे विबासं कळल्यावर नायिका त्याला सोडते

हो अवंतिका मध्ये लग्न नव्हतं दाखवलं पण शेवटचा भाग स्पष्ट आठवतो आहे...ती रवींद्र मंकणी ला मिठी मारते. आणि बाहेर दरवाज्यात तिचा आधीचा नवरा , ओह शीट अश्या एक्सप्रेशन मध्ये उभा असतो......म्हणजे आपण समजून जायचं की आता ती रवींद्र शी लग्न करणार

जेनी आणि आनंदच्या लग्नाची बैठक राधिकाच्या घरी का. लहान मुलं भातुकली खेळतात तसे जेनी आणि आनंदचे आईवडिल. तो आनंद तर किती दिवस जेनीला लग्नाचं विचारतही नव्हता, राधिका सगळ्या उठाठेवी करणार तेव्हा यांचं गाडं पुढे सरकणार. राधिकाला महान दाखवण्यासाठी बाकीच्यांना मुर्ख दाखवतात.

मला आठवतंय त्यानुसार अवंतिका शेवटी शेवटी एका अनाथाश्रमाच्या कामात रस घेऊ लागते (जगातले यच्चयावत प्रश्न मांडायचा चंग होता). तर त्या अनाथाश्रमात की पार्कात ती आपला निर्णय जाहीर करणार असते. सौरभ आणि शशांक दोघेही तिथे आशाळभूतपणे येतात. पण शेवट संदिग्ध होता.
इथे वाचता येईल.

तेच ना...राधिकाच्या घरी का बैठक?
आणि जेनीची आई बळंच स्कर्ट मधे दाखवली!
मला आधी वाटलं की ती राधिकाची वकील होती तीच आहे की काय!

आणि गुरवाची आई का अजूनही त्याच्या मागे मागे आहे? राय न बावा घरी...कुठे जाऊन राह्यला....?
कैच्या कैच एपिसोड...!!
गुरु काय जबरदस्तीने लग्न करतना दाखविला? आणि शनाया तर चक्क वेडसर वाटत होती काल....बावळट ही नाही!
पण....आपण कुठे चाललोय......... मी ही गिफ्ट फोडू....? अरे काय!!

मग, काल गुरोबाने शनायाला पळवुन लगीन केले का? आजकाल ही मालिका बघतच नाही. शेपूट वाढतच चालले आहे. वेड पांघरुन पेडगावला जाणारी राधिका, मुर्ख गुरुनाथ, लोभी शनया आणी तिची पाचकळ आई. यात तो केड्या नी त्याची मावशी हे दोन वेडे सामिल आहेतच.

मी काल जऽऽऽराशीच पाहिली. तेवढ्या भागात केड्याचा कॅमेरा बच्चाच्या आईने गहाण टाकून त्याच पैशाने केड्याला टोपी आणि ब्लेझर घेतल्याचं तेवढं मला कळलं.
पुढे पाहायची हिम्मत झाली नै माझी.

मला आठवतंय त्यानुसार अवंतिका शेवटी शेवटी एका अनाथाश्रमाच्या कामात रस घेऊ लागते (जगातले यच्चयावत प्रश्न मांडायचा चंग होता). तर त्या अनाथाश्रमात की पार्कात ती आपला निर्णय जाहीर करणार असते. सौरभ आणि शशांक दोघेही तिथे आशाळभूतपणे येतात. पण शेवट संदिग्ध होता. >>>>>>>>>> हो. अवंतिकाचा जेव्हा पार्शिअल स्मृतिभ्रन्श होतो तेव्हा तिला आपल सौरभशी लग्न झालेल आहे एवढच आठवत असत. सो, ती पुन्हा सौरभबरोबर राहते. एका रात्री ते फिजीकली जवळ येतात. अवन्तिका पुन्हा सगळ आठवल्यावर ती शशांकला सगळ सान्गते. शशांक तिच्यावर डाऊट घेतो आणि तिच्याशी नात तोडतो. ती दुखावली जाते. म्हणून शेवटी ती अनाथश्रमात काम करण्याचा निर्णय घेते. पण झी ५ वर जेव्हा मी शेवट बघितला तेव्हा अवंतिका शशांकने मागणी घातल्यावर लाजताना दाखवली आहे. मला रोहिणी निनावेच म्हणण पटत,
तीने सौरभ आणि शशांक दोघान्नाही सोडून परदेशी जायला हव होत. शशांकला सुद्दा तिने माफ करु नये.

मला रोहिणी निनावेच म्हणण पटत,
तीने सौरभ आणि शशांक दोघान्नाही सोडून परदेशी जायला हव होत. शशांकला सुद्दा तिने माफ करु नये >>>>>
रोहिणी निनावे एवढं सेन्सिबल बोलली??????? काय आश्चर्य आहे.
मी पूर्वी मानबा पहायचे तेव्हा या बाईला पाहिलं होतं, बस्स डोक्यातच गेली. म्हणजे पूर्वी कसं ऍक्टर्स इतके जबरदस्त अभिनय करायचे की लोक त्यांना खरंच देव समजायचे किंवा व्हिलनला शिव्या देणं, तिरस्कार करणं ही त्यांच्या अभिनयाची पावती असायची....... त्या अर्थाने नाही, पण निनावे मॅडमची देहबोली, कपडे, संवाद (लेखिका असून धन्य होते) किंवा टोटल अवतार पहाता त्या बाई सगळ्या आदर घालवून बसल्या.

Lol
नाही अजून.
लग्न लागलं असलं तरी ते इनव्हॅलिड आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

ईतके एपि जावे लागले गुरूमायला लेकाचे गुण कळायला. दहा रूपयाची नोट चोरली ही चूक गुरूने लहानपणी कबूल केली होती म्हणून आताही ती त्याला उपरती होण्याची वाट बघत होती, मधल्या काळात सुनेचे आणि नातवाचे काय धिंडवडे निघाले त्याची काहीच पर्वा नाही.

गुरु अगदीच निर्लज्जा सारखा बोलतो..म्हणे की, " माझी काय चूक आहे सांग ना? मी शनायावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न केलं...तर तुम्हाला का इतका प्रॉब्लेम?..अगदी सगळेच माझ्या विरुद्ध का? "
त्याला समजतच नाही ए की नक्की प्रॉब्लेम काये ते...! केड्याने त्याचे हे डायलॉग्ज भारी लिहीलेत पण! उर्मट, बेशरम माणसाच्या तोंडी शोभतील असे!

परवा लै हाणामारी झाली. राधिका, गुरु आणी शनया हे तिघे भैताड आणी गुरुमाता या लोकात तुंबळ युद्ध झाले. जिंकु किंवा मरु या आवेशाने गुरोबा एकलेच समरांगणात उतरले होते. शन्या बाळाला तिची आई हात धरुन घेऊन गेली. त्या आधी राधिका आणी गुरु मध्ये हातापाई झाली, मग गुरुमाताने गुरुबाळाच्या १०-१२ मुस्काटात हाणल्या. एवढे करुनही गुरु बाळ गिरे तो भी टांग उपर या आवेशात आहे.

नवर्‍याला म्हणले की रधिका देवळात पोलीसांना का नाही घेऊन आली, नवरा म्हणाला सिरीयल संपेल की मग.

Pages