माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुमाताने गुरुबाळाच्या १०-१२ मुस्काटात हाणल्या>>>>>>>>> ह्या सिरीयलमधे सगळ्यांनीच सगळ्यांच्याच मुस्काटात द्यायला पाहिजेत खरे तर.

देवळात गुरूने आनंद आणि सौरभ या मित्रांना दोष दिला - राधिकाचं डोकं फिरवल्याबद्दल.
घरी आईशी बोलताना - राधिका हलक्या कानाची आहे, शेजाऱ्यांनी तिच्या डोक्यात भरवलं.
म्हणजे मित्र आणि शेजारी नसते तर याचे पराक्रम पाहत राधिका मुळूमुळू रडत बसली असती आणि हे त्याच्या पथ्यावर पडलं असतं.
गंमत म्हणजे त्याचवेळी शेजारी राधिकाला पोलिसांत जा च म्हणून सांगत होते आणि ती तयार नव्हती.
शेजाऱ्यांचं आधीपासून ऐकलं असतं तर सगळं झेंगट कधीच संपलं असतं.

ह्या सिरीयलमधे सगळ्यांनीच सगळ्यांच्याच मुस्काटात द्यायला पाहिजेत खरे तर. >>> > Lol काय त्वेष आहे या पोस्टमध्ये Proud पण अगदी खरं आहे. आणि अगदीच नाही जमलं तर सगळ्या ऍक्टर्सनी त्या लेखकाच्या तरी नक्कीच ठेवून द्याव्यात. अतीच मूर्ख लिखाण आहे. चक्क दुसरी सिरीयल पण तेवढ्याच मठ्ठपणे लिहितो आहे तो, म्हणजे एकदा गंडला नाहीए तर एकुणातच ढ आहे.

काय त्वेष आहे या पोस्टमध्ये>>> Lol
गुरुमाता गुरुच्या मुस्काटात देतेय.
गुरुपिता गुरुमातेच्या मु दे
राधाक्का गुरुच्या मु दे
गुरु राधाक्काच्या मु दे
गुरुपिता गुरुच्या मु दे
शन्यामाय शन्याच्या मु दे
शन्या गुरुच्या मु दे
गुरु शन्यामायच्या मु दे
मावशी केडीच्या मु दे
केडी गुरुच्या मु दे
झालंच तर ...
श्रेयस आनंदच्या मु दे (जेनीला पटवलं म्हणुन)
जेनी श्रेयसला मु दे (आनंदला मु दि म्हणुन)
समिधा जेनीला मु दे (मागे काय तरी झालेले ना गैस म्हणुन
Lol
मला अजुन काय सुचत नाहीये तर कुणीही कुणालाही मु दिली (सिरीयलमधे) तरी चालेल Lol

सस्मित Rofl मेले मी हासून
मला वाटलं नंतर फक्त शॉर्टफॉर्मस च येतायत की काय?
माकेमुदे
केगुमुदे
रागुमुदे
रेगुमुदे Rofl

गुरू रादिकाला म्ह्त्ला मी शनायावर प्रेम करतो अनि तिच्यबरोबर लग्न करयच चलेन्ज पुर्न केलं मी जिन्कलो
मी जिन्क्लो? Uhoh

आणी प्रेक्षक स्वतःच्या .... >>> हो हे राहिलं Lol
मला वाटलं नंतर फक्त शॉर्टफॉर्मस च येतायत की काय?
माकेमुदे
केगुमुदे
रागुमुदे
रेगुमुदे>>>>>>>> Lol

मु दे माकेमुदे
केगुमुदे
रागुमुदे
रेगुमुदे
आणी प्रेक्षक स्वतःच्या >>>>>>>>> Rofl

ती रेवती तिला 'आता कशाला इतक सहन करतेस. एकदाचा घटस्फोट दे त्याला' म्हणतेय, तरीही हिच आपल एकच तुणतुण चालूच आहे, 'मी हयान्ना अशी अद्दल घडवणार आहे, त्याशिवाय मी नाव नाही लावणार, राधिका सुभेदार' नशीब, हयावेळी सौ, आणि मधल नाव गाळल ते.

केडीने तुपारे मधले सन्सकृतीरक्षक गुरुच्या घरात आणायला हवे होते. 'मी शनायावर प्रेम करतो, माझी ह्यात काहीच चूक नाही' म्हणे. Angry

झीमने फेसबुकवर महाएपिसोडला हे पोस्ट केल होतः

केड्याने चुकीच्या वेळी योग्य suggestion दिलंय की, योग्य वेळी चुकीचं suggestion दिलंय....?

नवीन प्रोमो तर कहरच आहे:

https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/835822590093780/

आणी प्रेक्षक स्वतःच्या .. >>> हे बेस्ट कारण तमाम प्रेक्षकांनी अजूनही ही सिरीयल नंबर वन वर ठेवलीय आणि कधी संपणार वाट बघतायेत, zee मराठी channel अशा सोन्याच्या कोंबडीला मारून टाकण्याची चूक करण्याइतकं मूर्ख आहे का. त्यांना profit जबरदस्त मिळतोय ह्या सिरीयलमुळे.

माझी काय चूक आहे सांग ना? मी शनायावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न केलं...तर तुम्हाला का इतका प्रॉब्लेम?..अगदी सगळेच माझ्या विरुद्ध का?
>>> यात खरच चूक काय आहे? लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे, धारकका ने सेपरेट व्हायला पाहिजे.

धारकका ने सेपरेट व्हायला पाहिजे. >>> राधाताई घटस्फोट मागत होत्या ना, पण हाच देत नव्हता ना. इथेच वाचलेलं. कोर्टात ह्यानेच विरोध केलेला ना.

माझी काय चूक आहे सांग ना? मी शनायावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न केलं...तर तुम्हाला का इतका प्रॉब्लेम?..अगदी सगळेच माझ्या विरुद्ध का?>>>
>>> यात खरच चूक काय आहे? लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे, धारकका ने सेपरेट व्हायला पाहिजे.>>>> +१ हे कधीच व्हायला हवं होतं.
पण राधाक्का अद्दल अद्दल खेळत बसली ना

गुरूला शनायाशी लग्न करून दाखवायचं होतं म्हणून त्याने केलं. आपला घटस्फोट झालेला नाही, नोकरी नाही, हे गावीही नाही.
जेव्हा राधिकाने घटस्फोट मागितला तेव्हा अफेअर लपवून ठेवलं. कोर्टात सांगितलं की तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हा घटस्फोट घेऊन करायचं होतं की दुसर्‍या प्रेमाशी लग्न.

आईला सांगतो की माझं राधिकावर कधीच प्रेम नव्हतं. लव्ह मॅरेज होतं ना? रधिकावर आपलं प्रेम नाही हा साक्षात्कार त्याला शनाया दिसल्यावरच झाला. स्वतःची प्रगती झाल्यावर फक्त गृहिणी असलेल्या गावंढळ बायकोचा कंटाळा आला आणि मॉड गर्लफ्रेंड आवडायला लागली.

यांची केस ज्या फॅमिली कोर्टात लागलीय, ते कोर्ट बंद पडलं बहुतेक. आणि गुरूच्या वडिलांना ऐनवेळी एलियन्सनी पळवलं.

यातली कॅरॅक्टर्स कॅरिकेचर्स आहेत. गृहिणी ही अतिकर्तव्यदक्ष - अगदी अख्ख्या सोसायटीसाठी गृहिणी. शेजारी आपल्या घरात गॅस स्टोव्ह नसल्यासारखे राधिकाच्याच फराळाची वाट बघतात.

गर्लफ्रेंड बिनडोक, पैसे , शॉपिंग, हॉटेलिंगसाठी आपला जन्म झालाय समजणारी.
आई चाळिशीतल्या मुलाला कुक्कुलं बाळ समजणारी.
---------------
"माझ्या नवर्‍याची बायको" हेच दाखवायचं होतं, म्हणून घटस्फोट दाखवला नाही. काल गुरूनेही शनायाला "तिच्या नवर्‍याची बायको" पढवलं.
आता राधिका शनायाला स्वतःच्या घरी आणणार आणि सुरुवातीच्या शीर्षकगीतात दाखवायचे तसे कांडणार.

यांची केस ज्या फॅमिली कोर्टात लागलीय, ते कोर्ट बंद पडलं बहुतेक. आणि गुरूच्या वडिलांना ऐनवेळी एलियन्सनी पळवलं.>>>>>>>>>> Lol

यातली कॅरॅक्टर्स कॅरिकेचर्स आहेत. गृहिणी ही अतिकर्तव्यदक्ष - अगदी अख्ख्या सोसायटीसाठी गृहिणी.
गर्लफ्रेंड बिनडोक, पैसे , शॉपिंग, हॉटेलिंगसाठी आपला जन्म झालाय समजणारी.
आई चाळिशीतल्या मुलाला कुक्कुलं बाळ समजणारी.>>>> + १

काल प्रोमोत दाखवलं राधाक्का नटुन थटुन, अगदी नथ वैगेरे घालुन भरजरी साडी नेसुन तिच्या नवर्‍याच्या बायकोला आणायला जाणार आहे.

ह्या सिरीयलमधे सगळ्यांनीच सगळ्यांच्याच मुस्काटात द्यायला पाहिजेत खरे तर. >>> >

अगदी आणि पाहणार्‍यांनी स्वतःच्या देखिल मुस्काडात मारुन घ्यायची! झी टिव्ही पॅकेज मधुन वगळायला हवा .. कसल्या सगळ्या भंगार सिरेली!

अगदी आणि पाहणार्‍यांनी स्वतःच्या देखिल मुस्काडात मारुन घ्यायची! > हो ते एक राहिलेलं. वर आलंय ते. Happy
सगळ्याच सिरीयली भंगार अगदी काहीही क्वालिटी नसलेल्या.

>>आई चाळिशीतल्या मुलाला कुक्कुलं बाळ समजणारी.
दुर्दैवाने हे वास्तव आहे, आणि अतिशय कॉमन आहे. अगदी कुक्कुलं बाळ नाही, पण चाळीशीतल्या मुलांनीही आई वडिलांचं सगळं ऐकावं, आणि तेवढंच ऐकावं अशी अपेक्षा घरोघरी दिसते.

श्रद्धा, संभाजी राजेंच्या सिरीयलची कोणत्याच सिरीयलशी बरोबरी होऊ शकणार नाही. बावनकशी सोन्यासारखी सिरीयल आहे ती. त्यातल्या एकेक पात्राचा ( अ‍ॅक्टर ) अभिनय हा लखलखीत आहे. आणी ती ऐतिहासीक सिरीयल आहे, ज्याच्यात तुम्ही ( तुम्ही म्हणजे निर्माता किंवा लेखक ) आपल्या मनासारखे काही पण वेडे बदल करु शकत नाही.

राधिकाची सिरीयल असो वा राणाची, त्यातले कलाकार अभिनय चांगलाच करतात, पण हे लेखक लोकच जिथे मेंदू बाजूला ठेऊन लिहीतात, तिथे हे अ‍ॅक्टर्स तरी काय करणार? उद्या राधिकाने सिरीयल सोडली तर तिथे दुसरी कोणी रडुबाई येईल, जशी शनया बदलली तशी.

अर्थात हे मी माझ्या मनातलं लिहीले आहे, तुझ्या पोस्टला धरुन धोपटाव अशा उद्देशाने नाही. Happy

@रश्मी >> Happy
अगदी योग्यच लिहिलयं तुम्ही. फक्त तेवढ्यासाठीच मी झी मराठी बघते.

किती तो फालतू पणा. जे पर्सनल बेडरूम मध्ये अर्धा तास डिस्कशन करून संपवता आले असते. त्याला इतके इतके खेचले आहे. इ तर लोकांच्या इन्वॉलव मेंटची आजिबातच गरज नाही. सासर्‍यांकडे पैसा आहे तर सुनेला व नातवाला मुंबईतच एक घर घेउन द्यायचे. डिवोर्स नंतर तिथे राहील. पण इथे सर्वांना सतत एकमेकांच्या जखमे वर मीठ चोळायचे आहे. मुव्ह ऑन प्रकारच नाही.

आता राधिका शनायाला स्वतःच्या घरी आणणार आणि सुरुवातीच्या शीर्षकगीतात दाखवायचे तसे कांडणार. >>>>>>>>>> राधिकाने शनायाला किती वेळा राबवून घेतलय. झाडू मारणे, लादीपोछा करणे, टेबल पुसणे वै वै. पण काय उपयोग झाला का? शनाया सुधारली का? नाही ना. हे अद्दल अद्दल घडवण्यापेक्षा एकदाचा काय ते घटस्फोट घे आणि सिरियल सम्पव म्हणाव. गुरुला अस का नाही राबवून घेत ही? ओ सॉरी, विसरलेच मी, तो तर ' पती परमेश्वर ना तिच्यासाठी', आणि पती परमेश्वरकडून असली कामे करवून घेणे म्हणजे महापापच.

<घटस्फोट घे आणि सिरियल सम्पव म्हणाव>
सिरिअल संपवायची नाहीए म्हणूनच तर घटस्फोट नाही ना घेत. नाहीतर घटस्फोट न घेण्याचं दुसरं कोणतंही कारण दिसत नाही. Lol

Pages