झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अमिताभ, अक्षय गेला बाजार रणवीर सिंग, रणबीर कपूर यांचा सिनेमा फेल गेला तर असे विनोद साधारण पणे दिसत नाहीत.

बराच काळ गाजावाजा करून खुप अपेक्षा निर्माण केलेत आणि चित्रपट फ्लॉप गेलाय असे अलीकडचे एखादे उदाहरण यांचे? (झिरो ची चर्चा दोन वर्षे झाली सुरु आहे)

बकरा हा एक प्राणी आहे दॅट्स ईट. मला कोणी कुत्रा घोडा गाढव गेण्डा काहीही म्हटले तरी राग येत नाही. ते देखील अपल्यासारखेच या भूतलावरचे जीव आहेत. जर कोणी त्यांचा वापर एक अपशब्द म्हणून करत असेल तर त्या व्यक्तीला आपले मनुष्य असण्याचा अहंकार आहे असे समजावे ईतकेच. >>> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
क्या बात! क्या बात!

ठग पण फ्लॉप गेला, आणी अमीरने त्याचे अपयश मान्य केले. काश बाकी भी लोग अमीर जैसे समझदार होते, जिन्हे अपनी गलतीका कमस कम एहसास तो होता है ! ( हिंदी सिनेमे जास्त पाहील्याचा परीणाम )

शाहरुख प्रेम बाजूला ठेवले की ऋन्मेष खूप व्यवस्थीत लिहीतो. जाता जाता, मला शाहरुख पण रोमँटीक हिरो म्हणून कधीच आवडला नाही. उलट स्वदेस मधले ये तारा वो तारा गाणे पाहील्यावर जाणवले की असे तरुण या देशाला पाहीजेत. चक दे मधला त्याचा तो प्लेअर कम टिचरचा रोल काहीतरी वेगळे करु पहात होता.

स्वदेस आणी चक दे इंडिया मध्ये शाहरुख कमी आहे आणी एक चांगला रोल करु पहाणारा अ‍ॅक्टर जास्त आहे. काय आहे, की आशुतोष गोवारीकर, सईद मिर्झा, प्रियदर्शन ( हेराफेरी नवा ) असे डायरेक्टर फार कमी आहेत जे एका अ‍ॅक्टर कडुन त्याची ओरीजीनल कला व प्रतिभेला उत्तम न्याय देऊन काम करवुन घेऊ शकतात.

जे काम ऋषीकेश मुखर्जींनी अमिताभकडुन करवुन घेतले तसे मनमोहन देसाईंना कधीच जमले नाही. काय करणार आपले नशीब !

आशुतोष हा मुखेर्जे लेवल डायरेक्टर नाहीय - स्वदेस (शाखा च्या अकटिंग मुळे ) , लगान ( स्क्रिप्ट मुळे ) चालले.
व्हाट्स युर राशी , खेळे हम जी जा से , मोहेंजोदडो विसरलात का त्याचे☺️

शाहरुख प्रेम बाजूला ठेवले की ऋन्मेष खूप व्यवस्थीत लिहीतो. जाता जाता, मला शाहरुख पण रोमँटीक हिरो म्हणून कधीच आवडला नाही.. >>> ते नेहमीच व्यवस्थित व्यवस्थीत लिहितात.... तुमच्या डोळ्यांना शाहरूख आवडत नाही म्हणून तेवढ्यापुरता ऋन्मेष ह्यांच्या लिखाणातला व्यवस्थीतपणा सुद्धा तुम्हाला दिसत नाही....
We choose to see what we want to see and we choose to believe what we want to believe.

"झिरो"च्या अपयशाला (सध्याच्या बातम्यांनुसार तो फ्लॉप आहे) पटकथा, दिग्दर्शक आणि तांत्रिक सल्ले देणारी टीम हे तीन घटक जास्त कारणीभूत आहेत असे वाटते. ही सगळी जबाबदारी शेवटी निर्मात्याची असली तरी इट्स टीम फेल्युअर. चित्रपट म्हणजे खूप मोठे टीमवर्क असते. >>> फ्लॉप असो वा नसो, पण ह्या लोकांच्या अपयशाचा शिक्का शाहरूखवर का मारावा? कारण तो सुपरस्टार आहे म्हणून? लूझर्स....
शाहरूख शंभर नंबरी सोने आहे... कधीही कुठेही झळकणारच.... सगळ्यांछ्या अपयशात त्याचेच एकट्याचे काम आणि यश ऊठून दिसणार.

राशी, मुखर्जी, देसाई, अमिताभ, ठ्ग्ज चा काय संबंध आहे ईथे? विनाकारण चर्चा का भरकवटताय? ईथे फक्त झीरो आणि शाहरूखवर बोला.
तुमच्या धाग्यांवर विनाकारण शाहरूख आणलेला चालेल का तुम्हाला?

सगळ्यांछ्या अपयशात त्याचेच एकट्याचे काम आणि यश ऊठून दिसणार.
>>>>
झिरोबाबत हे खरे आहे. पटकथा दिग्दर्शन स्पेशल ईफेक्ट वगैरेत माती खाल्ली गेलीय. शाहरूखचा करिश्मा कायम आहे. (ही ऐकीव माहीती आहे)
पण शाहरूखचे चाहते हे बुद्धीजिवी असल्याने ते गण्डलेल्या पटकथेकडे पाठ फिरवतात.
शाहरूखमध्ये मात्र लीडर क्वालिटी असल्याने तो यश सर्वांशी शेअर करतो पण अपयशाची जबाबदारी स्वताच्या शिरावर घेतो.

हे म्हणजे असे झाले की सचिनने शतक मारूनही भारत सामना हरला आणि लोकं सचिनलाच शिव्या घालणार की सचिनचे शतक झाले की आपण हरतो..

बराच काळ गाजावाजा करून खुप अपेक्षा निर्माण केलेत ..
>>>>
गाजावाजा केला म्हणजे अपेक्षा निर्माण केल्या असा अर्थच मुळात चुकीचा आहे.
गाजावाजा म्हणजे जाहीरातबाजी, मार्केटींग आहे ते, ईटस पार्ट ऑफ बिजनेस..
अपेक्षा आपणच निर्माण करतो, ते गाजावाजा करणारयाच्या हातात नसते.
उदाहरणार्थ आफताब शिवदासानी किंवा चंकी पांडेच्या चित्रपटाचा दहा वर्षे आधी गाजाबाजा केला तरी लोकांच्या अपेक्षा फार वाढतील असे वाटत नाहीत.
लोकं अपेक्षा धरतात कारण त्यांना शाहरूख हा आजही सुपर्रस्टारच वाटतो आणि तो आजही सुपर्रस्टारच आहे. पण पब्लिकला समजायला पाहिजे की चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो आणि त्याचा खरा हिरो वा हिरोईन त्याची पटकथा असते. मला ते समजले आहे म्हणून मी शाहरूखचा चित्रपट आहे या एकाच कारणामुळे कशीच चित्रपटाकडून अवाजवी अपेक्षा ठेवत नाही. आणि याचमुळे मला डिअर जिंदगीसारखा चित्रपटही आवडला होता.

शाहरूखचा करिश्मा कायम आहे. >> +१११११११११११११११११११

शाहरूखमध्ये मात्र लीडर क्वालिटी असल्याने तो यश सर्वांशी शेअर करतो पण अपयशाची जबाबदारी स्वताच्या शिरावर घेतो. >> प्रचंड अनुमोदन.
सिनेमातल्या हीरोने खर्‍या आयुष्यात जबाबदारीने हीरोसारखे वागले तरी लोक नावे ठेवतात. पण शाहरूख अशा लोकांचीपर्वा न करता ही जबाबदारी नेहमीच पार पाडतांना दिसतो.

हे म्हणजे असे झाले की सचिनने शतक मारूनही भारत सामना हरला आणि लोकं सचिनलाच शिव्या घालणार की सचिनचे शतक झाले की आपण हरतो.. >> नशीब असते एकेकाचे न काय.... Sad

आपण सर्वांनी कॉन्ट्री काढून ऋन्मेऽऽष आणि हायझेनबर्ग यांना झिरो ची तिकिटे द्यावीत का?
तीन तास मायबोलीला सुटका !

राशी, मुखर्जी, देसाई, अमिताभ, ठ्ग्ज चा काय संबंध आहे ईथे? विनाकारण चर्चा का भरकवटताय? ईथे फक्त झीरो आणि शाहरूखवर बोला.
तुमच्या धाग्यांवर विनाकारण शाहरूख आणलेला चालेल का तुम्हाला?

Submitted by हायझेनबर्ग on 28 December, 2018 - 19:47
उदाहरणार्थ आफताब शिवदासानी किंवा चंकी पांडेच्या चित्रपटाचा दहा वर्षे आधी गाजाबाजा केला तरी लोकांच्या अपेक्षा फार वाढतील असे वाटत नाहीत
'Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2018 - 21:05
आता तुमचे ऋन्मेऽऽष ह्या अ‍ॅक्टरचा का उल्लेख करतात'

अरे लोकांना न पहाताच टीका का करतात म्हणून नाव ठेवत आहेस ऋन्मेष, आणि स्वतः न पहाताच केवढा हैदोस घालत आहेस !

कुठे फेडशील हे पाप! smiley-confused013.gif

शाहरुख प्रेम बाजूला ठेवले की...

मला शाहरुख पण रोमँटीक हिरो म्हणून कधीच आवडला नाही

स्वदेस मधले ये तारा वो तारा

स्वदेस आणी चक दे इंडिया मध्ये शाहरुख कमी आहे

आले इथे प्रत्येक ठिकाणी शाहरुखचे नाव ?? आणी म्हणे धागा भरकटवला. Biggrin

बाकी इथे झीरोच्या धाग्यावर ऋन्मेषने रनबीर कपूर, अमीर , सलमान आणलेले चालतात, तेव्हा का आळीमिळी गुपचिळी असते? की तुम्हीच ऋन्मेष आहात? तसे जाहीर करा न मग. आणी नसाल तर उग्गाच ऋन्मेषची पाठराखण करणे थांबवा. आज २६/ ११ नंतर आपण पाकीस्तानी टिमशी खेळणे बंद केले आहे, तरीही शाहरुखने माहीरा खानला घेतलेच ना? त्याच्याबद्दल तर चक्कार शब्द नाही.

च्रप्स तुम्ही नेहेमीच अर्धवट वाचता का हो? जर स्वदेस मध्ये गोवारीकरने काही केले नाही, शाहरुखनेच सगळे काही केले तर मग लोक आज झीरोच्या नावाने का बोंबा मारतायत? स्वदेस ला काही नाही लोकांनी नावे ठेवली?

आँ? २६/११ नंतर त्यांच्या पंतप्रधानांना राज्याभिषेक समारंभाला बोलवलेलं चालतं, साडी आणि शालीची देवाणघेवाण चालते ; गुरुदासपूर २०१५ च्या दहशतवा हल्ल्यानंतर त्यांच्या पंप्रंच्या वाढदिवसाला आणि नातीच्या लग्नाला बिनबुलाए मेहमान म्हणून घेतलेलं चालतं, तर माहिरा खानसोबत सिनेमात काम केलं तर काय बिघडतं? पाकिस्तानचे पंप्र त्यांच्याच देशात भारताच्या पंप्रंइतके पॉवरफुल नसतील पण म्हणून काय माहिरा खान त्यांच्यापेक्षा अधिक पॉवरफुल ठरत नाही. पाकिस्तानशी क्रिकेट खेळणंही थांबवलेलं नाही. ते भारतात येऊन विश्वचषक खेळले.
समझौता एक्स्प्रेस अजूनही चालु आहे. नुकतीच एक भारतपाक बस सेवा सुरू झाली आहे. . दोन्ही देशांत व्यापार सुरू आहे.

पण आम्हांला आपला एकटा शाहरुख दिसतो. कैच्याकाय.

पण आम्हांला आपला एकटा शाहरुख दिसतो. कैच्याकाय.
>>>>>

दिसत नाही. तो दाखवला जातो.

आतिफ अस्लम सुद्धा पाकिस्तानी आहे ना. तो गातोय कि कित्येक चित्रपटात. पण हे लोकांना उंगलीनिर्देश करून दाखवले जात नाही.

पण शाहरूख सुद्धा हुशार आहे, तो या लोकांचा पब्लिसिटीसाठी वापर करतो. ईथेच बघा ना, कोण कुठली माहीरा खान, पण लोकांच्या डोक्यात ते नाव पक्के बसले. आणि सोबत रईस चित्रपटसुद्धा..

पण आम्हांला आपला एकटा शाहरुख दिसतो. कैच्याकाय.
>>>>>

दिसत नाही. तो दाखवला जातो.

आतिफ अस्लम सुद्धा पाकिस्तानी आहे ना. तो गातोय कि कित्येक चित्रपटात. पण हे लोकांना उंगलीनिर्देश करून दाखवले जात नाही.

पण शाहरूख सुद्धा हुशार आहे, तो या लोकांचा पब्लिसिटीसाठी वापर करतो. ईथेच बघा ना, कोण कुठली माहीरा खान, पण लोकांच्या डोक्यात ते नाव पक्के बसले. आणि सोबत रईस चित्रपटसुद्धा..

असो.
रश्मी तुम्ही हा मुद्दा बोललात हे फार छान केलेत. आता शाहरूख तुम्हाला न आवडण्याचे नेमके कारण समजले. त्याची ही बनवलेली ईमेज कुठेतरी तुमच्या डोक्यात आहे. याचमुळे तुम्हाला त्याचे नावही नकोसे वाटते. या कारणाशी मी वाद घालू शकत नाही. कारण आता आपण चित्रपटांच्या अनुषंगाने कितीही चर्चा केली तरी हा सोकॉलड देशद्रोही तुम्हाला चुकीचाच वाटणार. त्यामुळे तुम्ही शाहरूखबद्दल आपला राग कायम ठेऊ शकता Happy

{{{ आज २६/ ११ नंतर आपण पाकीस्तानी टिमशी खेळणे बंद केले आहे, तरीही शाहरुखने माहीरा खानला घेतलेच ना? त्याच्याबद्दल तर चक्कार शब्द नाही.}}}

या कारणासाठी जर शाहरुख आवडत नसेल तर कित्येक लोकांना नावडते बनवावे लागेल. सलमानच्या बजरंगी भाईजान मध्ये तो पाकिस्तानात जातो, तिथल्या लोकांचे मन जिंकतो. ती वाचा बसलेली मुलगी त्याला शेवटी मामा म्हणते. सलमानच्याच एक था टाईगर मध्ये तो पाकिस्तानी एजंटसोबत लग्न करतो आणि त्याकरिता चक्क भारताच्या रॉशीही शत्रुत्व पत्करतो. टाईगर जिंदा है मध्ये तर भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊन तालिबान्यांशी लढतात आणि शेवटी त्या बसमधून विजयी फेरी काढताना दोन्ही देशांचे झेंडे सोबतच फडकवलेले दिसतात हा सीन पब्लिकने थिएअटरमध्ये किती डोक्यावर घेतलाये ते पाहा. आपली दुश्मनी पाकिस्तानच्या आम जनतेशी नसून पाकिस्तानात (व भारतातही) असलेल्या दहशतवादी गटांशी आहे हे आपल्याला कधी समजणार?

कधी कधी वाटतं की आपण खरंच असहिष्णू झालो आहोत की काय? बेबी हा भारतीय सिनेमा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय गुप्तचरांनी केलेल्या यशस्वी लढ्याबद्दल होता. यात पाकिस्तान्यांचे नकारात्मक चित्रण आहे आणि याच सिनेमात भारतीय गुप्तचरांना मदत करणार्‍या एजंटची भूमिका पाकिस्तानी लोकप्रिय कलाकार मिकाल झुल्फिकार याने रंगविली आहे. ही भूमिका केल्याबद्दल त्याला कुठल्याही पाकिस्तानी संघटनेने दूषणे दिलेली नाहीत. समजा असाच एखादा पाकिस्तानी सिनेमा निघाला ज्यात भारतीयांची प्रतिमा नकारात्मक असेल आणि त्यात एखाद्या भारतीय लोकप्रिय कलाकाराने पाकिस्तानला सपोर्ट करणारे महत्त्वाचे पात्र रंगविले तर आपण भारतीय ते सहन करु का? त्यातही तो कलाकार शाहरुख असेल तर आपली प्रतिक्रिया किती टोकाची राहील?

शाहरुख त्याच्या आचरटपणामुळे, इतरांपेक्षा आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असा डंका सतत वाजविण्यामुळे डोक्यात जातो हे खरे असले तरीही त्याच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असण्याबद्दल त्याचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा द्वेष करणे चूकीचे आहे.

अदनान सामीचे उदाहरण घ्या. मला नाही वाटत त्याची भारतनिष्ठा कुठल्याही भारतीयापेक्षा कमी असेल. त्याच्या एका कॉन्सर्टनंतर आपल्या एका वृत्तपत्राने फायनली वूई गॉट द आन्सर टू पाकिस्तान्स नूसरत अली फतेह अली खान असे उद्गार त्याच्याविषयी छापले तेव्हा ते मुलाखतीत सांगताना त्याचे डोळे आनंदाने भरुन आले होते आणि तो प्रसंग अजिबात नाटकी वाटला नव्हता.

असो. पाकिस्तान व बांग्लादेश हे भारताचेच भाग होते गेल्या सत्तर वर्षांपूर्वी आणि त्यांच्यासोबत आपले कनेक्षन इतक्या सहजी तुटू शकत नाही. अंतूले एकदा मुलाखतीत म्हणाले होते की भारत पाकिस्तान व बांग्लादेश एकत्र व्हावेत व आपण या एकत्रित राष्ट्राचे सुलतान (होय हाच शब्द त्यांनी वापरला होता, पंतप्रधान नव्हे) व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. तिन्ही देश एकत्र करण्याच्या त्यांच्या इच्छेकरिता मी नक्कीच त्यांच्या बाजूने मत दिले असते आणि त्यांच्या त्या सुलतानपदालाही पाठिंबा दिला असता. असो. आपण आता हे त्यांचे स्वप्न पुरे करु शकत नसलो तरीही त्यांच्या कलाकारांचा द्वेष करणे योग्य नव्हे. भारतात त्यांच्या कामाचे कितीतरी चाहते आहेत. इथे मायबोलीवरच पाकिस्तानच्या टिवी सिरीयल्सचे धागे वाचून मी हम टीव्हीवरचे कितीतरी उत्तम कार्यक्रम यूट्यूबवर पाहिले आहेत. भारतीय सिनेमा आणि मालिकांत तिकडचे लोक (जसे की जावेद शेख) काम करतात तेव्हा ते प्रोजेक्ट अजुनच आकर्षक बनतात. मावरा हुकेन ने तर तिच्या सिनेमात दक्षिण भारतीय कर्मठ ब्राह्मण कन्येचे पात्र इतके हुबेहुब वठविले की ती पाकिस्तानी असल्याचा जराही संशय आला नव्हता.

तेव्हा पाकिस्तानी कलाकारांना घेतल्यावरुन शाहरुखला नावे ठेवण्याची गरज नाही. (हे कारण त्याला प्रचंड सहानुभूतीच प्राप्त करुन देईल) त्याच्या डोक्यात जाण्याविषयी इतर अनेक कारणे आहेत आणि रोज त्यात नव्याने भर पडेल याची तजवीज तो स्वतःच त्याच्या वागण्यातून करुन देत असतो.

धन्यवाद. इतर कोणी नाही तरी " मानव पृथ्वीकर " या पोस्टला नक्कीच लाईक करणार ही खात्री होतीच. काश सारे पृथ्वीकर्स मानव सिर्फ मानव ही होते. हिंदू मुस्लिम सिख इसाई यहूदी न होते.

च्रप्स तुम्ही नेहेमीच अर्धवट वाचता का हो? जर स्वदेस मध्ये गोवारीकरने काही केले नाही, शाहरुखनेच सगळे काही केले तर मग लोक आज झीरोच्या नावाने का बोंबा मारतायत? स्वदेस ला काही नाही लोकांनी नावे ठेवली?

>>> तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. स्वदेस मध्ये चांगले काम केलंय शाखा ने म्हणून त्याचा उदो उदो केला लोकांनी ( तुम्ही देखील), झिरो मध्ये माती खाल्ली म्हणून लोक बोंबा मारतायत. सिम्पल !!!☺️

बाकी तुम्ही व्हाट्स युर राशी, खेले हम जी जा से आणि मोहेंजोडरो पाहिले नाहीत का. गोवारीकर फ्लॉप माणूस आहे हो.

कला, क्रीडा ह्या एकतेचा संदेश देतात त्यात राजकारण, प्रांतवाद घुसडणारे लोक सडक्या मनोवृत्तीचे असतात.
देशाशी भांडण आहे म्हणुन त्यातील कलाकारांना दुश्मन समजणार्‍या मनोवृत्तीला वर ऋन्मेऽऽष, भरत आणि बिपीन ह्यांनी खूप छान उत्तर दिले आहे.
बिपीन ह्यांच्या शाहरूख बाबत मुद्द्यांशी असहमत आहे.. पण माझ्यापेक्षा ऋन्मेऽऽष त्यांना छान उत्तर देऊ शकतील असे वाटल्याने मी लिहिण्याचा हात आखडता घेतो.

पण शाहरूख सुद्धा हुशार आहे, तो या लोकांचा पब्लिसिटीसाठी वापर करतो. ईथेच बघा ना, कोण कुठली माहीरा खान, पण लोकांच्या डोक्यात ते नाव पक्के बसले. आणि सोबत रईस चित्रपटसुद्धा..>>+११११११११११११११११११११११११

छान पोस्ट बिपीनचंद्र.
शाहरूख आपल्या अभिनयात जी उर्जा ओततो ती एखाद्याला कमालीची प्रेरणादायी वाटू शकते तर एखाद्याला तितकीच इरीटेटींग. हे शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीवर ठरते.
या देशात गांधीजींना देखील कोणी महात्मा समजते तर कोणी देशद्रोही म्हणत गोळ्या घालते.
चित्रपटाबाबतही प्रत्येकाची समज उमज भिन्न असते. आणि त्या मुद्द्यावरून ईथे वाद चालतो.
पण या सो कॉल्ड देशद्रोही आणि देशभक्तीच्या भांडवल केल्या गेलेल्या मुद्द्यांवरून त्याला कोणी जोखत असेल तर ते खेदजनक आहे. आणि चित्रपटावरील चर्चेच्या धाग्यावर अवांतर आहे. यामुळे त्याच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परीणाम होतो ईतकेच ईथे विषयास अनुसरून आहे. पण ते खरे खोटे करायची ही जागा नाही. त्यासाठी केदार जाधव यांचा एक धागा आहे. लोकांना शाहरूखचा ईतका राग का येतो? तिथे यावर चर्चा योग्य राहील.

>> गाजावाजा केला म्हणजे अपेक्षा निर्माण केल्या असा अर्थच मुळात चुकीचा आहे. गाजावाजा म्हणजे जाहीरातबाजी, मार्केटींग आहे ते, ईटस पार्ट ऑफ बिजनेस. अपेक्षा आपणच निर्माण करतो, ते गाजावाजा करणारयाच्या हातात नसते.
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2018 - 22:35

जाहिरातबाजी हि अपेक्षा निर्माण करण्यासाठीच तर असते ना ओ. जाहिरातीतून अपेक्षा निर्माण होतात म्हणून तर लोक पैसे खर्च करायला तयार होतात. प्रोडक्ट कोणतेही असो. जाहिरात केलीच नाही किंवा प्रभावी नसेल तर लोक थोडेच स्वत:हून अपेक्षा निर्माण करतील.

>> उदाहरणार्थ आफताब शिवदासानी किंवा चंकी पांडेच्या चित्रपटाचा दहा वर्षे आधी गाजाबाजा केला तरी लोकांच्या अपेक्षा फार वाढतील असे वाटत नाहीत.
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2018 - 22:35

जाहिरातीचे शास्त्र हा पूर्ण वेगळा विषय आहे. पूर्ण नवीन गोष्टीची जाहिरात कशी करावी, किंवा एखाद्या नकारात्मक इमेज असलेल्या गोष्टीची जाहिरात कशी/किती करावी हे सगळे त्यात येते. पण अंतिम उद्देश तोच मी वर उल्लेख केलेला.

मला नाही वाटत जाहीरात ही अपेक्षा निर्माण करायला असते. जाहीरात ही लोकांपर्यण्त आपले प्रॉडक्ट पोहोचवायला आणि त्यांना आकर्षित करायला असते. अपेक्षा वाढवल्या तर त्या पुर्ण करायची जबाबदारी वाढते. एखादी सेम कलाकृती जर लोकांनी जेमतेम अपेक्षा ठेऊन पाहिली तर लोकांना ती आवडायचे चान्सेस जास्त असतात, जास्त अपेक्षा ठेवून पाहिले तर नेमके उलट होते. त्यामुळे कोणी लोकांच्या अपेक्षा वाढवायला पैसे खर्च करून आपल्याच पायावर धोंडा का बरे मारेल?

या प्रोसेसमध्ये शाहरूख हे नाव बघून लोकं स्वत:च आपल्या अपेक्षा वाढवत असतील तर ती वेगळी गोष्ट झाली, पण जाहीरातीमागचा हेतू नक्कीच अपेक्षा वाढवायचा नसतो, तर आपले प्रॉडक्ट खपवायचाच असतो.

शाहरूख आपल्या अभिनयात जी उर्जा ओततो ती एखाद्याला कमालीची प्रेरणादायी वाटू शकते तर एखाद्याला तितकीच इरीटेटींग. हे शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीवर ठरते.>> खूप छान प्रतिसाद ऋन्मेऽऽष.

Pages