झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही अपवाद वगळता अभिषेक पडेल हिरो आणि मिळेल त्या फालतू सिनेमात काम करणारा आहे. अनुराग कश्यप त्याच मापात मोजणं तुम्हालाच जमो.
>>>>>>>

ओके.
अनुराग कश्यप हे फार मोठे कलाकार आहेत हे समजले.
आणि एवढा मोठा कलाकार शाहरूखचा कट्टर फॅन आहे याचा आनंदच झाला.

फक्त अनुराग कश्यपचा मोठेपणा दाखवायला अभिषेक बच्चनला हलके लेखायची गरज नव्हती.

बर्र, त्यातही अनुराग कश्यपने शाहरूखवरच्या आंधळ्या प्रेमाने खोटा रिव्यू दिला असे म्हटले तर अनुराग कश्यप हा एक खोटारडा कलाकार होतो. मग तो अभिषेक पेक्षा महान कसा झाला? उलट अभिषेक बच्चनलाच राग यायला हवे की त्याला अश्या खोटारड्या कलाकारांच्या पंक्तीत बसवले जे कलेशी प्रतारणा करून दुसरीकडे इमान राखत खोटा रिव्यू देतात...

नक्की काय समजायचे मी आता तेवढे फक्त मला सांगा Happy

सात पाने संपत आली तरी चर्चा रिझल्ट अजुन झीरो !
>.>
पिक्चर हळूहळू बॉक्स ऑफिसवर जोर पकडतोय. जसा २०० करोडच्या घरात सरकेल तसा ईथे शुकाशुकाट होईल आणि मग एक पान भरायचे वांधे होतील...

पिक्चर हळूहळू बॉक्स ऑफिसवर जोर पकडतोय. जसा २०० करोडच्या घरात सरकेल तसा ईथे शुकाशुकाट होईल आणि मग एक पान भरायचे वांधे होतील...>>+११११११११११११११११११११११११

लोकांना आधी फक्त एकाच आईडीचा त्रास होता. आता तो आयडी व त्याची सावली अश्या दोन डोकेदुखी गळ्यात पडल्यात.>> +११११११११११११११११११११११११

लोकांना आधी फक्त एकाच आईडीचा त्रास होता. आता तो आयडी व त्याची सावली अश्या दोन डोकेदुखी गळ्यात पडल्यात.>> नाही हा

काही अपवाद आहेत माझ्यासारखे ☺️ मला ऋन्मेष चा न राग आला न तो कधी आवडला, पण हाब चे प्रतिसाद मला आवडतायेत, खासकरून हल्ली ते माबोवर जसे बागडतायेत ऋन्मेष ची री ओढत ते खूप मजेशीर आहे, त्यांच्यामुळे सगळे धागे विनोदी वाटतायेत, मस्तच एकदम Proud

उत्तम लिहीणार्या , प्रसिद्ध id ची ओळख दुसऱ्या id ची सावली म्हणून व्हावी या सारखे दुर्दैवी काही नाही.>> Lol
शंभर आयडी मिळून एका आयडीचे विनाकारण बुलिईंग करत असतील तर त्या एका आयडीच्या बाजूला सावलीसारखा मी शंभर वेळा उभा राहीन.
मी उत्तम वगैरे लिहितो हा तुमचा गैरसमज आहे आणि त्याचा इथे काही संबंध नाही.
Runmesh is not at fault here but you surely are.

लिखाण आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय का? लेखक चांगला आहे म्हणजे त्याने प्रतिसाद लोकांना हवे तसेच दिले पाहिजे का. हाब यांची वैयक्तिक मते त्यांना मांडायचा अधिकार आहे की.

रूनमेश परत सांगतो 200 cr भारतात अशक्य आहे, आता 100 cr देखील वाटत नाही होतील.
मी सिमबा बघायला जाणार आहे, तू शाखा फॅन आहेस तर नक्की झिरो थेटरात बघून बीसीनेस वाढव.. जमले तर बॅक टू बॅक शोस बघ, तेवढीच शाखा च्या बिजिनेस ला मदत ☺️

हायझेनबर्ग आणी ऋन्मेष एकच आहेत? >>>> वाटत नाही. पण भन्नाट भास्कर आणि ऋन्मेष एकच आहेत.

बादवे, बेकरी आणि टिपापा हि कोणत्या सोशल साईटसची नावे आहेत हे कुणी मला सान्गाल का?


बादवे, बेकरी आणि टिपापा हि कोणत्या सोशल साईटसची नावे आहेत हे कुणी मला सान्गाल का?
>>>
दोन्ही माबोवरीलच गप्पांची पाने आहेत.

टिपापा साठी अमेरिकेतलं आयुष्य या ग्रुपचे सदस्य व्हावे लागेल.

बेकरी म्हणजे बे एरिया कॅलिफोर्निया. त्यासाठी कॅलिफोर्निया या ग्रुपचे सभासद व्हावे लागेल.

ज्या काही बोचऱ्या कॉमेंट्स सोशल मीडियामध्ये आल्या त्यातली सर्वाधिक हद्द गाठलेली कॉमेंट:

"आता पेट्रोल पंपावरचा माणूस जरी झिरो बघा म्हटला तरी मी बघत नाही"

Biggrin Lol

अनुराग कश्यप हे फार मोठे कलाकार आहेत हे समजले

अरे पावट्या ,,ज्या इंडस्ट्रीतल्या माणसाने तुझे सारे काही व्यापून टाकले आहे किंवा व्यापून टाकल्याचे दाखवतोस त्या इंडस्ट्रीचा बेसिक अभ्यास तरी कर ..थोडे वाच .थोडे बघ .लग्गेच कळेल की तो कश्य्प किती मोठा छोटा आहे वगैरे/;; स्शिवाय आधी ही युज्ड टू हेट करण्जोहर कँप, म्हणजेच त्यातच आपला शारूक पण आला,, आणि आता त्यांचे व्यावसायिक संबंध झालेत आणि आणखी मोठे होऊ घातलेत ..तर हाडाचा कलाकार हाडाचा धंदेवाईक झाला की असे बोलणारच ना !!
आणि त्या बुटक्याला मोठे करण्यासाठी तुला काही मोठ्या काठ्या लागतीलच ना ..त्यासाठी तरी बघत वाचत जा इतरांचे ऐकत जा .
शारूबद्दल आम्हाला सारे माहिती आहे ..स्टार ऑफ द सेंचुरी. बास?? ? आता त्या झिरोबद्दल तुझ्याकडे नीट काही बोलण्यासारखे नसेल तर टळ रे बाबा इथून.. किती तो कोडगेपणा ; काय खुळ्यांचा शेजार नशिबात आला :अओ :

लिखाण आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय का? >> त्यांची गल्लत होत नाही पण लोकांची व्हावी म्हणून मुद्दाम तसे ते लिहितात. Proud

लेखक चांगला आहे म्हणजे त्याने प्रतिसाद लोकांना हवे तसेच दिले पाहिजे का. >> हो मग. चांगल्या अ‍ॅक्टरने लोकांच्या अपेक्षेनुसार 'टॉलरंट' सुद्धा असले पाहिजे. Wink

हाब यांची वैयक्तिक मते त्यांना मांडायचा अधिकार आहे की. >> माझे सोडा, आधी विषयाला धरून हवे ते आणि हव्या तितक्या वेळा मत मांडण्याचा अधिकार ऋन्मेषला आहे हे कळायला हवे. Lol

पावट्याजी माझी पुर्ण पोस्ट वाचा. केवळ एक वाक्य कोट करून, अर्थाचा अनअर्थ करून एवढी मोठी पोस्ट लिहू नका. नाहीतर मी तुमची पोस्टही पुर्ण वाचणार नाही.

रूनमेश परत सांगतो 200 cr भारतात अशक्य आहे,
>>>

सचिनची शंभर शतके आहेत. मग त्यात भारतात किती आणि भारताबाहेर किती काय फरक पडतो. तसेच पैसा भारतातून येऊद्या किंवा पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करून येऊ दे, काय फरक पडतो. कमाई ही कमाई आहे. डॉलरमध्ये झाली तर रुपयात कन्व्हर्ट करून घ्यायची.

उलट क्रिकेटमध्ये जसे परदेशात धावा करणे अवघड असते तसे चित्रपटांबाबतही भारताबाहेर कमाई करणे अवघड असावे. ईथे बसून तिथल्या प्रेक्षकांची नस पकडणे. किंबहुना जिथे हॉलीवूडचे चित्रपट बघायचा पर्याय उपलब्ध असतो तिथे बॉलीवूडपटाने टिकाव धरणे अवघडच.. असं मला वाटते. जे मत चुकीचेही असेल.

सचिनची शंभर शतके आहेत. मग त्यात भारतात किती आणि भारताबाहेर किती काय फरक पडतो. तसेच पैसा भारतातून येऊद्या किंवा पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करून येऊ दे, काय फरक पडतो. कमाई ही कमाई आहे. डॉलरमध्ये झाली तर रुपयात कन्व्हर्ट करून घ्यायची. >> +१११११११११११११११११११११११११११११११११११११ पर्फेक्ट

आता पेट्रोल पंपावरचा माणूस जरी झिरो बघा म्हटला तरी मी बघत नाही
>>>>>

छान विनोद आहे. मलाही आवडला.

पण यावरून एक सहज निरीक्षण सांगतो.
तिनही खानांपैकी कोणाचा चित्रपट फ्लॉप जातोय असे दिसले की ठराविक साच्यातील विनोद सोशलसाईटवर फिरू लागतात. तसेच जर चित्रपट हिट जाऊ लागला तर ५०० रुपये तिकीटाला खर्च करण्यापेक्षा शेतकरयांना दान करा किंवा पाचशे रुपयांची दारू प्या असे मेसेज फिरू लागतात.
सुपर्रस्टारपद हा एक काटेरी मुकूट असतो हेच खरे.

पावट्या हे आयडी माझ्याहीपेक्षा जास्त वैतागलेले दिसतायत. Rofl

एका वॉटस अप मेसेज मध्ये आलेला मेसेज : - त्या बुटक्या बकर्‍याला सांगा असे सिनेमे परत बनवलेस तर तिथे येऊन हाणिन.

देवा !!!

>> तिनही खानांपैकी कोणाचा चित्रपट फ्लॉप जातोय असे दिसले की ठराविक साच्यातील विनोद सोशलसाईटवर फिरू लागतात.

खानांशी किंवा अन्य कोणत्या व्यक्तीशी वगैरे याचा संबंध नाही असे माझे मत आहे. जेंव्हा एखाद्या कलाकृतीचा जाहिरातींमधून खूप गवगवा केला जातो, प्रेक्षकांच्या फारच अपेक्षा निर्माण केल्या जातात. पण प्रत्यक्षात मात्र त्या अपेक्षांना ती कलाकृती उतरत नाही तेंव्हा असे विनोद होणे स्वाभाविक असते. आचार्य अत्रेंच्या व्याख्येनुसार अपेक्षाभंगातून झालेला विनोद.

>> सुपर्रस्टारपद हा एक काटेरी मुकूट असतो हेच खरे.

सहमत आहे. जनरलाइझ करायचे तर सेलिब्रिटी होणे हाच काटेरी मुकुट असतो.

"झिरो"च्या अपयशाला (सध्याच्या बातम्यांनुसार तो फ्लॉप आहे) पटकथा, दिग्दर्शक आणि तांत्रिक सल्ले देणारी टीम हे तीन घटक जास्त कारणीभूत आहेत असे वाटते. ही सगळी जबाबदारी शेवटी निर्मात्याची असली तरी इट्स टीम फेल्युअर. चित्रपट म्हणजे खूप मोठे टीमवर्क असते.

जेंव्हा एखाद्या कलाकृतीचा
राजवटीचा जाहिरातींमधून खूप गवगवा केला जातो, प्रेक्षकांच्या जनतेच्याफारच अपेक्षा निर्माण केल्या जातात. पण प्रत्यक्षात मात्र त्या अपेक्षांना ती कलाकृती राजवट उतरत नाही तेंव्हा असे विनोद होणे स्वाभाविक असते

चला..... Lol धागा वळणावर गेला

आता पेट्रोल पंपावरचा माणूस जरी झिरो बघा म्हटला तरी मी बघत नाही
>>>>> हे मजेशीर आहे.

त्या बुटक्या बकर्‍याला सांगा असे सिनेमे परत बनवलेस तर तिथे येऊन हाणिन.>>. हे मात्र कैच्याकै आहे. त्या बुटक्या बकर्‍याने आवताण दिलेलं नव्हतं स्वतःचे पैसे खर्चुन सिनेमा बघाच आणि वर मला हाणा.

>> अपेक्षांना ती कलाकृती राजवट उतरत नाही तेंव्हा असे विनोद होणे स्वाभाविक असते
Lol Lol हो. क्षेत्र कोणतेही असो (क्रिकेट मध्ये सुद्धा घडते हे). तत्व तेच.

बुटक्या बकर्‍याने आवताण दिलेलं नव्हतं स्वतःचे पैसे खर्चुन सिनेमा बघाच आणि वर मला हाणा.
>>>>>

कर्रेक्टय..

मात्र बुटका बकरा हे नाव मला आवडले गेले आहे.
बकरयाला मी आजवर निव्वळ खातच आलोय. पण या प्राणीमित्राने त्याला थेट शाहरूखचा दर्जा दिलाय. ग्रेट !

पण प्रत्यक्षात मात्र त्या अपेक्षांना ती कलाकृती उतरत नाही तेंव्हा असे विनोद होणे स्वाभाविक असते.
>>>>

अमिताभ, अक्षय गेला बाजार रणवीर सिंग, रणबीर कपूर यांचा सिनेमा फेल गेला तर असे विनोद साधारण पणे दिसत नाहीत.
आता या लोकांकडून अपेक्षाच नसतात असे कोणाला म्हणायचे असेल..
तसेच खान मंडळींच्या चित्रपटांकडून जास्त अपेक्षा असतात असे म्हणायचे असेल...

तर मी आता संभ्रमात पडलोय ....

मात्र बुटका बकरा हे नाव मला आवडले गेले आहे.>>> काहीही काय
>>>>>

याता काहीही काय काय?
बकरा हा एक प्राणी आहे दॅट्स ईट. मला कोणी कुत्रा घोडा गाढव गेण्डा काहीही म्हटले तरी राग येत नाही. ते देखील अपल्यासारखेच या भूतलावरचे जीव आहेत. जर कोणी त्यांचा वापर एक अपशब्द म्हणून करत असेल तर त्या व्यक्तीला आपले मनुष्य असण्याचा अहंकार आहे असे समजावे ईतकेच.

Pages