झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, चमन, चाणक्य, ऋन्मेष, मी पाटील आहे सगळे हायझेनबर्गच आहेत... अजून काही मला माहित नसलेले पण तुम्हाला माहित असलेले आयडी सुद्धा ईथे लिहा. एक एक्झॉस्टिव लिस्ट झाली की माझ्या प्रोफाईलवर चिकटवतो... म्हणजे कोणाचा पुढे गोंधळ नको व्हायला Rofl

तुमच्या ड्यु आयडी बद्धल कल्पना नाही. तुम्ही चमनराव नावाने लिखाण करायचा हे माहीत आहे, नंतर तुम्ही डिस्प्ले नेम हायझेनबर्ग केले हे माहीत आहे. मध्ये चाणक्य केले असेल तर आयडिया नाही.

हो, च्रप्स, मी विसरले. ते चमन नाव होते. काहीतरी युद्ध या विषयावरुन त्यांनी कमेंट केल्या होत्या एवढेच आठवतेय, धन्यवाद नाव सांगीतल्याबद्दल.

याचा सुरेख लेख लोकसत्ता होता, तो पण जपला नाही. नाहीतर आज त्या धाग्यावर ते लिहु शकले असते
>>>
हे हॉरिबली आयकॉनिक आहे. आणि प्रचंड प्रातिनिधिक. Proud

अहो पण चमन होते की अजून काय होते त्याचा ईथे मी हसण्या किंवा न हसण्याशी काय संबंध आहे Lol
माफ करा पण तुम्ही एवढे (शाखाच्या चित्रपट, मग माहिरा खान मग फवाद, जगजीत, मग पाकिस्तान, आणि शत्रू देश, नूरजहां, गावस्कर , कात्रणं, लोकसत्ता) असे कायच्याकाय ठेसनं घेत तुमची ट्रेन ऑफ थॉट सुसाट जात आहे की हसू आल्या शिवाय रहात नाही. Biggrin
म्हणून म्हणालो तुम्ही लिहित रहा. Proud

पण आपल्यासारखाच एक दुसरा देश आहे आणी आपले सत्ताधारी तिथे दहशत माजवुन आपल्या सारखीच माणसे मारतायत याबद्दल पाकी लोकांना काहीच सोयरे सुतक नाही याचे मला आश्चर्य वाटते, बाकी काही नाही>>>>

त्या लोकांचा काहीही दोष नाही यात. त्यांना जन्मापासून शाळेत, कॉलेजात सर्वत्र भारत द्वेष शिकवला जातो.
पाकिस्तानातही गेल्या 10 वर्षात भरपूर स्फोट झालेत, कित्येक माणसे मेली. त्या सगळयामागे RAW आहे याबद्दल तिथल्या प्रत्येकाची खात्री असते. मागे पेशावरला शाळेत घुसून मुलांना मारले गेले ते भारतानेच केले म्हणून तेव्हा त्या पालकांनी भारताला शिव्याशाप घातले होते. इथे जसे पाकिस्तानबद्दल एकही चांगला शब्द काढला तर त्याची रवानगी थेट पाकिस्तानात करा म्हणून कल्लोळ होतो, तसेच तिकडेही आहे. दोन्ही देशातील जनता अगदी सारखीच आहे. जसे तिथे झालेल्या दहशतवादी घटनांचे आपल्याला काही सोयर सुतक नाही, तसेच त्यांना. आणि आपल्या लष्करावर झालेले हल्ले हे भारत मुद्दाम स्वतःच घडवून आणतो, त्यांना बदनाम करायला हेही त्यांना पटवून देण्यात आले आहे. महिरा व फवाद कसे निषेध करणार? त्यांना तिथेच राहायचे आहे शेवटी.

याचा सुरेख लेख लोकसत्ता होता, तो पण जपला नाही. नाहीतर आज त्या धाग्यावर ते लिहु शकले असते
>>>
हे हॉरिबली आयकॉनिक आहे. आणि प्रचंड प्रातिनिधिक>>>>> साजिरा, तुमच्यासारखे बरेचसे आहेत हो मायबोलीवर ज्यांना फक्त एकच चष्मा लावता येतो, आणी तो त्यांचा स्वतःचाच असतो, ज्यातुन ते त्यांना हवे तेच् बघतात आणी समजतात. तुम्ही आपले त्या पीपी वर पडुन रहा, काय कुचाळक्या करायच्या त्या तिथेच करा. दुसर्‍यालाही काही समजत असेल., त्याने / तिने काही वाचले असेल याची खात्री न बाळगता असली बाष्कळ विधाने करत रहा.

लोकसत्तात एका पत्रकाराने मागे माजी पी एम मनमोहन सिंग यांच्यावर एक चांगला लेख लिहीला होता, त्या विषयी मला लिहायचे होते, पण इथे फक्त दुसर्‍याला बायकी टोमणे मारत बसायचे एवढेच काम असते. तुम्ही काय किंवा ते हायझेन काय दोन्ही सरखेच.

बाकी हायझेनभाऊ / दादा जे कोण असाल ते, मागे तुमचे रडुन झालेच आहे की कोणीतरी बाई तुम्हाला पीडतायत वगैरे, तर त्यांना मी धन्यवादच देईन . Proud तुम्ही मनोरंजन करुन घ्या. ऑन लाईनच्या जमान्यात कागदाची काही वस्तु असते हे तुम्हाला मान्य नाही तर ते मी इग्नोर करेनच
आणी तुमचे प्रतीसाद यापुढे फाट्यावर जारले जातील. तुमच्या सारख्यांना हीच भाषा समजते.

दुसर्‍यालाही काही समजत असेल., त्याने / तिने काही वाचले असेल याची खात्री न बाळगता असली बाष्कळ विधाने करत रहा>> Rofl
अहो तुम्ही दर वाक्यागणिक नवीन संबंध नसलेले विषय हाताळत आहात.. मागच्या वाक्याचा पुढच्या वाक्याला काही सबंध असेल तर समजून घेता येईल ना Rofl
कदाचित तुम्ही खूप जास्त वाचन केले असेल आणि त्यापुढे आमचे ज्ञान तोकडे पडत असेल म्हणुन असे होत असेल..... माफ करा Biggrin

<. मागे पेशावरला शाळेत घुसून मुलांना मारले गेले ते भारतानेच केले म्हणून तेव्हा त्या पालकांनी भारताला शिव्याशाप घातले होते. >
इथेही काहींनी भावी दहशतवादी खपले म्हणून आनंद व्यक्त केला होता.
दोन्हीकडे फार फरक नाही. तुम बिल्कुल हम जैसे निकले

हायला काय धुमाकुळ आहे इथे Lol
धागालेखकांना फक्त आणि फक्त चित्रपटाबद्दलची ही चर्चा आवडत आहे असे दिसते. Happy
धागा दुसर्‍यांदा स्थलांतरीत करायचा नसतो का?

अहो कुचाळक्या ही फारफार. पुर्वी (सार्यांची कमी जास्त प्रमाणात कधीनाकधी असते तशी) मानसिक गरज होती. पण त्याचं प्रायश्चित म्हणून मी गेल्या शेेकडो वर्षांत इथं काही लिहिलंही नाही Proud (आता ही स्मायली आली म्हणजे तिथं कुचाळक्या असतात का? असो.)

मराठी वर्तमानपत्रांत शोधपत्रकारिता फारशी कधी नव्हतीच. आता तर. दिवसभर फेसबुक ट्विटरवर आपण जे बघतो वाचतो, ते दुसर्या दिवशी छापून आलेलं बघतो. लेख अग्रलेखांतली तटस्थ पत्रकारिताही आता तांदळातल्या खड्यासारखी शोधावी लागते. एकवेळ हेही अपरिहार्य आहे असं समजू. पण फारसा वेळ आणि बुद्धी वापरणे परवडत नसलेल्या सामान्य माणसाला रेडीमेड ओपिनियन्स तयार करवून देण्याचं पाप ही आपली सन्माननीय वृत्तपत्रे करत आहेत.

वर लोकसत्ता, शाहरूख, मनमोहन लेख किंवा तुमच्या पोस्टबद्ददल आणि एकुण विषयावर काहीच म्हणायचं नव्हतं. मात्र पत्रकारांबद्दलचं वाक्य आणि वरती कोट केलेला भाग वाचून जरा गंमत वाटली. नंतर लक्षात आलं, हे फार प्रातिनिधिक आहे. 'बहुसंख्यांचं मत' या अर्थाने. तुम्हाला वाटलं तसा कुचाळक्या हेतू नव्हता. तुम्हांला अॉफेन्सिव वाटल्यास सॉरी.
वरचा विषय आणखी जरा स्पष्ट करून सांगावासा वाटतो आहे. पण आता इथं नको. नंतर कधीतरी..

वर लोकसत्ता, शाहरूख, मनमोहन लेख किंवा तुमच्या पोस्टबद्ददल आणि एकुण विषयावर काहीच म्हणायचं नव्हतं. मात्र पत्रकारांबद्दलचं वाक्य आणि वरती कोट केलेला भाग वाचून जरा गंमत वाटली. नंतर लक्षात आलं, हे फार प्रातिनिधिक आहे. 'बहुसंख्यांचं मत' या अर्थाने. तुम्हाला वाटलं तसा कुचाळक्या हेतू नव्हता. तुम्हांला अॉफेन्सिव वाटल्यास सॉरी.
वरचा विषय आणखी जरा स्पष्ट करून सांगावासा वाटतो आहे. पण आता इथं नको. नंतर कधीतरी..>>>>> साजिरा, मुळात मला तुम्हाला सुद्धा खरच दुखावायचे नव्हते. पण वाहत्या गंगेत हात धुवायचा आहे ( इथे भरत मयेकर, मीरा, साधना वा बिपीन चंद्र यांना हे उद्देशुन नक्कीच नाही ) असे समजून तुम्ही ती पोस्ट लिहीलीत काय असा माझा मोठा गैरसमज झाला. हायझेन बर्ग यांच्या सतत च्या स्माईलींमुळे माझा तो राग नेमका तुमच्यावर निघाला , कारण तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, ते मला पटकन लक्षात आले नाही. त्या बद्दल मी तुमचीच माफी मागते. झाले गेल मी विसरले आहे, आणी तुम्ही पण मोठ्या मनाने ते सावराल अशी अपेक्षा.

निदान नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरी मला रागवायचे नव्हते, पण नेमके नको तेच झाले. माझ्याकडुन वरील वाद समाप्त !!!

अहो नाही नाही. रागबिगचा प्रश्नच नाही. आणि कशानेही किंवा उठ्सुठ दुखावले जाणं हे स्वतःपेक्षा इतरांवरच जास्त अन्याय्कारक आहे- हे माहिती आहे.
शिवाय फार पुर्वीच कुचाळक्या बंद केल्यापासून मी दुखावला जाणंही बंद झालं. Proud पाहिजे तर असाईनमेंट म्हणून मला दुखावण्याचा किंवा रागाला आणण्याचा प्रयत्न करून बघा.

तुमच्या पोस्ट मुळातच रागाला येण्यासारख्या किंवा दुखावणार्‍या नसतात. बहुसंख्य पोस्ट्स 'भाबड्या' या कॅटेगरीतल्या मात्र असतात. (आणि हे प्रकृतीला चांगलं की वाईट हे ज्याचं त्याने ठरवावं..)

बहुसंख्य पोस्ट्स 'भाबड्या' या कॅटेगरीतल्या मात्र असतात.
>> हे गृहीत धरुन या अवांतर चाललेल्या चर्चेमध्ये अजून अवांतर लिहीते.
@रश्मी, मी मायबोलीवर कोणाला ओळखत नाही, रोमात असते. मधून वेळ मिळाला, खूप इच्छा झाली तरच लिहीते.
तुम्ही 'भरत' या आयडीला 'मयेकर' म्हणून संबोधता असे काही वेळा जाणवले आहे.
मी स्वत: कमी वेळा इथे येउनही भरत यांनी निदान दोन वेळा "माझा आय डी भरत असून लोक मला मयेकर म्हणून का संबोधतात " असे लिहीलेले मला माहित आहे.
आतापर्यंतच्या तुमच्या पोस्टी वाचून तुम्ही तसे जाणीवपूर्वक करत नसाल अशी खात्री आहे. तसचं भरत यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत न पोचले असण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून भरत यांनी 31 December, 2018 - 12:54 ला लिहीलेलं
"तुमचं जे आडनाव असेल ते -" तुमच्या लक्षात आले नसावे.
आताच स्पष्ट करते की मी कोणाची वकील नाही किंवा ग्रुपमधली नाही तसेच स्पष्टीकरणही मागत नाही. पण माहित नसल्यामुळे एखाद्याला न पटणारी गोष्ट विनाकारण पुन्हा पुन्हा घडते आहे असे जाणवते म्हणून एवढे लिहीले.

तुम्ही 'भरत' या आयडीला 'मयेकर' म्हणून संबोधता असे काही वेळा जाणवले आहे.
मी स्वत: कमी वेळा इथे येउनही भरत यांनी निदान दोन वेळा "माझा आय डी भरत असून लोक मला मयेकर म्हणून का संबोधतात > >>>>>

त्यांचे नाव भरत मयेकर आहे हे त्यांनीच लिहिलेय की. त्यांचा आयडी भरत मयेकर होता, त्यांनी आता भरत. हा बदल केला.

माबोवर आयडी बदलले तरी जे जुन्या आईडीने ओळखतात ते नंतरही खूप वेळा त्याच आईडीने साद देतात. मी ऍशबेबी चे साधना करून कित्येक वर्षे लोटली, तरीही खुपजण त्याच आईडीने ओळखतात.

हायला हाब म्हणजे चमन? म्हणजे ते मॅरेथॉन आणि पळणे यावर लिहायचे ते का?
खरे असेल तर ओ काका काय फुका निरर्थक करून राहिले राव
तुमच्या व्यासंगी लिखाणाचा जबरा फॅन आहे
पुन्हा लिहायला घ्या आता मुकाट्याने

स्थलांतरित करून तिथे लिहिणार काय. झिरो संपलाय कधीच.☺️
नवीन Submitted by च्रप्स on 1 January, 2019 - 10:51

#####

चूक चूक चूक

झिरो हल्लूहलू २०० करोडच्या दिशेने कूच करतोय म्हणून काही विरोधक धाग्यावरून पसार झाले आहेत तर काही धागा भरकटेल कसा हे बघत आहेत.

पण मी हे हो ऊ देणार नाही !

जब तक जहां मे सुबह शाम है.....

त्यांचे नाव भरत मयेकर आहे हे त्यांनीच लिहिलेय की. त्यांचा आयडी भरत मयेकर होता, >>>>>>>
हो, पण नंतर त्यांनी आडनाव वापरले जाऊ नये म्हणून एक्सपलिसीटली सांगितले होते
पिनी याना +1

ओके ! पिनी, मी भरत मयेकर यांना आडनावाने हाक मारते ( म्हणजे लिहीते ) कारण ते कदाचीत माझ्या वयाचे असतील किंवा वयाने माझ्याहुन लहान- मोठे पण कदाचीत असतील. पण त्यांचा अनूभव खूप चांगला आणी व्यापक आहे. देशांतर करणार्‍या व्यक्तींची मने तशीच व्यापक होत जातात. मग अशा अनूभवी व्यक्तींना नावाने कशी हाक मारायची म्हणून मी त्यांना आडनावाने संबोधते. बाकी काही कुणाला कमी- जास्त बोलायचा वगैरे माझा हेतू अजीबात नाही.

साजिरा, धन्यवाद ! Happy माझी तुम्हाला पोस्ट ( आधी रागातली ) लिहून झाल्यावर माझा राग शांत झाला, आणी तुम्हाला तसे लिहील्याबद्दल वाईट पण वाटले. पण तेवढ्यात तुमची पोस्ट आल्याने शंकेचे निराकारण पण झाले. पण परत धन्यवाद , निदान नवीन वर्षात ( सुरुवात ) एकदम रागवण्या आधी जरा शांतपणे विचार करुन मग लिहावे असा संकल्प आजपासुन केलाय. होप, तो कायम राहो.

सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

रश्मी, नावाने संबोधण्याने अनादर होतो, असे मला अजिबात वाटत नाही. जे सदस्यनाम आहे, त्याने संबोधले जावे इतकेच.
असो.

झिरो हल्लूहलू २०० करोडच्या दिशेने कूच करतोय म्हणून काही विरोधक धाग्यावरून पसार झाले आहेत तर काही धागा भरकटेल कसा हे बघत आहेत.>>+११११११११११११११११११११११११

पण मी हे हो ऊ देणार नाही>> ह्याला म्हणतात खरी खिलाडू वृत्ती.
Never say die attitude.... जिओ

हायला हाब म्हणजे चमन? म्हणजे ते मॅरेथॉन आणि पळणे यावर लिहायचे ते का?>>चॅम्प, सदस्यनाव चमनचे हायझेनबर्ग बदलून 4-5 वर्षे तरी झाली. Happy

हायझेन बर्ग यांच्या सतत च्या स्माईलींमुळे माझा तो राग नेमका तुमच्यावर निघाला>> Biggrin
माझ्या स्मायलींमुळे राग Uhoh तुम्ही तुमच्या स्मायलीज मोजा पाहू एकदा. Lol पण मला काही तुमचा राग बिग नाही आला. उलट तुमच्या पोस्ट वाचून अजून जाम हसू येत आहे. Proud

जाउदे.. माफ करा असे मी आधी म्हंटलेच आहे.. तर आता हॅप्पी न्यू इयर म्हणुन टाकतो. Happy

Pages