झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण या सो कॉल्ड देशद्रोही आणि देशभक्तीच्या भांडवल केल्या गेलेल्या मुद्द्यांवरून त्याला कोणी जोखत असेल तर ते खेदजनक आहे. आणि चित्रपटावरील चर्चेच्या धाग्यावर अवांतर आहे. यामुळे त्याच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परीणाम होतो ईतकेच ईथे विषयास अनुसरून आहे. पण ते खरे खोटे करायची ही जागा नाही. त्यासाठी केदार जाधव यांचा एक धागा आहे. लोकांना शाहरूखचा ईतका राग का येतो? तिथे यावर चर्चा योग्य राहील.>> आधीच तो धागा लगोलग अपडेट केला आहे.

आणि जरा कमी जमली तर श्रमांची माती झाली. मग त्याचा चिखल बनवून तुडवायचे Happy

अर्थात हे देखील समजू शकतो
पण, कलाकृती न पाहताच ती जनली नाही हे आपल्याच मनाने ठरवूनच तुडवायला कोणी घेतले तर मात्र _ _ _ _ _ _ _ _ स्पीचलेस!

होना, जरा कमी जमलीय, खरं तर जमलीय पण लोकांना कळली नाहीय असे न बघता ठरवूनच हैदोस घालायचा. त्यापेक्षा स्पिचलेस बरे.
बघ मी चित्रपट कसा आहे: चांगला, बरा, वाईट कोणाचा अभिनय कसा आहे याबद्दल स्पीचलेस आहे कारण मी चित्रपट बघितला नाहीय.

मी या चित्रपटा बद्दल विधान केले नसून एका जनरल विधानावर केलेले जनरल विधान आहे. त्यात तू नसलेला किंवा तुला हवा तो अर्थ शोधत आहेस.

आता तुमचे ऋन्मेऽऽष ह्या अ‍ॅक्टरचा का उल्लेख करतात'
Submitted by टग्या on 28 December, 2018 - 14:42 >> ऋन्मेऽऽष पुन्हा फिरून शाहरूख आणि त्याचा सिनेमा ह्यावर नक्की येणार ह्याची ग्यारंटी देता येते तशी बाकीच्या लोकांची देता येत नाही म्हणून त्यांनी आधीच खबरदारी घेतलेली बरी.

बिपीनचंद्र, तुमची पोस्ट खूप आवडली. पाकिस्तान नाव ऐकलं की जनरली रॅशनल थिंकिंग बंद होऊन जातं आणि आम्ही इमोशनल देशभक्त होतो. पण यामध्ये कलाकार आणि सामान्य जनतेचा तिरस्कार नसतो. पाकिस्तानचा जो कुरापतखोर - विध्वंसक राजकारणी किंवा लष्करी भाग आहे, त्याचा हा तिरस्कार असतो.

पाकिस्तानी कलाकार घेण्यासाठी फक्त शाहरुख खानला दोष का? करण जोहरने सुद्धा ए दि है मु मध्ये फवादला घेतलं होतच की. आणि शाहरुख खान का आणि कसं घेईल? ते काम कास्टिंग डायरेक्टरचं असतं ना

आशुतोष हा मुखेर्जे लेवल डायरेक्टर नाहीय - स्वदेस (शाखा च्या अकटिंग मुळे ) , लगान ( स्क्रिप्ट मुळे ) चालले.
व्हाट्स युर राशी , खेळे हम जी जा से , मोहेंजोदडो विसरलात का त्याचे☺️

लगानची स्क्रिप्ट आशुतोष गोवारीकरचीच होती

अजून नाही
मीटर चालू आहे.
किंबहुना थिल्लर निघाल्याने लोकं पुन्हा झिरोकडे वळत आहेत..

@ बिपीनचंद्र, तुमची पोस्ट मला खरच आवडली. ह्याला म्हणतात लिखाण. कुठलेही टोमणे न मारता तुम्ही तुमचे मत दिले याबद्दल आभारी आहे.

असे म्हणतात की आपण जरी सामान्य नागरीक असलो, तरी दुसर्‍या देशात जातांना आपण आपल्या देशाचे प्रतिनीधी बनुन जात असतो. आपल्या बोलण्या वागण्या वरुनच आपल्या देशाची प्रतिमा बनवली जाते. तर शाहरुखने माहीरा किंवा करण जोहरने फवाद खानला घेतले याबद्दल मला काही आक्षेप नव्हता. कारण कलाकाराला देश, प्रांत, धर्म, जात याची मर्यादा नसावी असे मलाही वाटते, कारण गुलाम अली माझे आवडते.

पण माहीरा आणी फवाद जेव्हा आपल्या चित्रपटात काम करत होते तेव्हा / त्या दरम्यान भारतात कुठेतरी ( बहुतेक पंजाब ) बाँबस्फोट झाले आणी सालाबादप्रमाणे काही लोक गचकले. यानंतर माहीरा ताई व फवाद भाऊ दोघांना पत्रकारांनी या घटनेचा तुम्ही निषेध कराल का? यात तुमच्या देशाचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, तुमचे काय मत आहे असे विचारल्यावर दोघांनी कानावर हात ठेवत, काही बोलण्यास नकार दिला. नंतर फवाद भाऊ मायदेशी परतले व तिकडे त्यांनी भारताच्या सो कोल्ड ( कॉल्ड नाही हं ) दुट्टपीपणावर ठो ठो निशाणे मारले. आमचे शाहरुख भाऊ , सिनेमाच्या स्क्रिनिंग साठी माहीरा ताईंना बोलावयाला पण बिचकले. हे कुणी वाचले नसेलच. आणी हो हे सारे मटा, लोकसत्ता, सकाळ या पेपरात आले होते. कुठल्या शाहरुख द्वेष्ट्याने मला हे सांगीतले नाही .

मोदींविषयी मी खालच्या लिंक मध्ये लिहीले होते. पण हातात की बोर्ड आला की तो आपटुन आपटुन बडवणार्‍यांनी ते वाचले नसेल तर खाली वाचा बरं का. ते २०१५ साली लिहीले आहे, त्यामुळे मी पोस्ट आता एडीट करुन लिहीली आहे असे नाहीतर समजले जाईल.

https://www.maayboli.com/node/56827?page=5

च्रप्स, गोवारीकर फ्लॉप असेल हो. पण जेव्हा त्याचे नशीब जोरावर होते, तेव्हा अमीर, शाहरुखला घेऊन त्याने जे काही केले ते चांगलेच होते. त्यात फ्कत अमीर, शाहरुखचाच वाटा आहे असे समजु नका. मला मान्य आहे, त्याचे जोधा अकबर वगैरे पण फ्लॉप गेलेत. पण चांगली कथा व अ‍ॅक्टर असेल तर त्याचे तो सोने करतो.

@ बिपीनचंद्र, दोन देशांचे संबंध सुधारावे असे मलाही वाटते. दुबईत असतांना माझी पण पाकीस्तानी मुलगी, मैत्रिण बनली होती. घरी येणे जाणे पण होते. स्वभावाने खूप चांगली आहे ती. तीच काय, काही पाकीस्तानी टॅक्सी ड्रायव्हर पण खूप व्यवस्थीत बोलले. पण जेव्हा हे असे माहीरा सारखे सेलेब्रिटी येऊन घाण करतात ना, ते नको वाटते. अदनान विषयी माझ्या मनात कुठलाच किंतु नाही. तुम्ही ज्या पेपर विषयी बोलताय तो पण मी वाचला नाही. सामान्य लोकांना युद्ध नको आहे, पण आपल्यासारखाच एक दुसरा देश आहे आणी आपले सत्ताधारी तिथे दहशत माजवुन आपल्या सारखीच माणसे मारतायत याबद्दल पाकी लोकांना काहीच सोयरे सुतक नाही याचे मला आश्चर्य वाटते, बाकी काही नाही. काय आहे प्रेमात सुद्धा वन वे ट्रॅफीक नसतो हो, मग तिथे आपणच ( भारतीय ) नाचुन काय करणार?

<माहीरा ताई व फवाद भाऊ दोघांना पत्रकारांनी या घटनेचा तुम्ही निषेध कराल का? यात तुमच्या देशाचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, तुमचे काय मत आहे असे विचारल्यावर दोघांनी कानावर हात ठेवत, काही बोलण्यास नकार दिला. नंतर फवाद भाऊ मायदेशी परतले व तिकडे त्यांनी भारताच्या सो कोल्ड ( कॉल्ड नाही हं ) दुट्टपीपणावर ठो ठो निशाणे मारले. >
मला वाटतं, मायबोलीवर याआधीही (म्हणजे घडलं त्यावेळीच) याबद्दल लिहिलं गेलं आहे. (मी नव्हे)
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/fawad-khan-pakistani-...
Fawad Khan said, "I've been in Lahore since July as my wife and I had been expecting our second child.

I've received numerous requests from the media and from well wishers worldwide asking me for my thoughts on the sad incidents that took place in the past few weeks. As a father of two little children, I pray and wish like many others that together we can build and live in a more peaceful world. I believe we owe it to our children who will shape our tomorrow.

This is the first time I have spoken on the matter. Please disregard any other words attributed to me during this time because I have not said them. I thank all my fans and fellow artists from Pakistan, India and people in general all over the world who have shown continued support for their belief in love and understanding to unite a divisive world."

माहिरा खानने केलेली घाण?
https://www.indiatoday.in/movies/video/mahira-khan-pakistani-artists-con...

रईसच्या विरोधात राज ठाकरेंच्या मनसेने त्यांच्या स्टाइलमध्ये आंदोलन केले होते. तेव्हा शाहरुखला त्यांची भेट घ्यावी लागली. माहिरा खानला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवणार नाही असे शाहरुखने सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान इथल्या आर्टिस्ट्स की प्रोड्युसर्स संघानेही पाक कलाकारांवर बंदी घातली.

एका पाकिस्तानी मुलीने लिहिलेलं एक पत्र माहिरा खानने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलं होतं. इथे वाचता येईल.
त्यात पाकिस्तानबद्दल जे लिहिलंय तसं भारतातल्या कोण्या सेलिब्रिटीने भारताबद्द्ल म्हटलं तर त्याला अमीर खानला शिकवला तसा धडा शिकवला जाईल याची पूर्ण खात्री आहे.

मयेकर, एकीकडे तुम्ही मोदींनी शाली, साड्या, फुले, गजरे एकमेकात आदान प्रदान केले म्हणून त्यांना ( मोदी, देशाचे पंतप्रधान ) नावे ठेवताय आणी दुसरी कडे माहीरा कित्ती चांगली, तिच्या पोस्टस किती चांगल्या म्हणून इथे लिंकावर लिंका देत सुटलात. आता या तुमच्या दुट्टपीपणा साठी तुमच्यावर हसावे का रडावे हेही कळेनासे झालेय. मोदींनी प्रयत्न केले की ते वाईट, हास्यास्पद आणी कुठल्या पाकीने प्रयत्न केले की ते कौतुकास्पद? काय म्हणणार याला?

मी तुमच्या सारखी लिंका देण्यात माहीर नाही. ( तुमचे नी माझे काही बाबतीत कितीही आज वा पुढे वाजले तरी मोकळ्या मनाने हे ही जाहीर करेन की तुमच्या पोस्टस अभ्यासु असतात ) पण याच फवाद खानने जेव्हा त्याच्यावर चहु बाजूने टीका झाली तेव्हा उत्तर दिले, त्याला बराच अवधी लोटला होता. तो त्याच वेळी आपल्या पत्रकारांना हे सर्व सांगु शकला असता, पण मग सहानूभुती मिळाली नसती ना !

बाकी काहीही असो, आपले पत्रकार , त्यातल्या त्यात मराठी वृत्तपत्रे अजून इतकी निर्ढावलेली नाहीत की जे स्वतःच्या मनाने काहीही छापत बसतील. त्यांनाही विचारणारे आहेतच की.

१ तुमचं जे आडनाव असेल ते -
२६/११ होऊनही शाहरुखला पाक कलाकार का हवेत ?हा तुमचा प्रश्न. तर २६/११ होऊनही मोदी पाकशी मैत्री करू पाहत असताना त्याचवेळी शाहरुखने ते केले तर नेमका तो वाईट कसा? हे दाखवायला मला साडी, शाल इ. आणावं लागलं.
२. {माहीरा ताई व फवाद भाऊ दोघांना पत्रकारांनी या घटनेचा तुम्ही निषेध कराल का? यात तुमच्या देशाचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, तुमचे काय मत आहे असे विचारल्यावर दोघांनी कानावर हात ठेवत, काही बोलण्यास नकार दिला. नंतर फवाद भाऊ मायदेशी परतले व तिकडे त्यांनी भारताच्या सो कोल्ड ( कॉल्ड नाही हं ) दुट्टपीपणावर ठो ठो निशाणे मारले. >
यातलं काहीच झालेलं नाही हे दाखवायला मला वरच्या लिंक्स द्याव्या लागल्या. त्यात मी माहिरा कशी चांगली वगैरे काही म्हटलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय त्याच्या उलटच दोघेही बोलल्याचे दिसतेय.
फवादने स्पष्ट लिहिलंय की तो हल्ले होण्यापूर्वीच पाकिस्तानात गेला होता. त्याच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या.
(आधीचा तुमचा स्टँड - तो वाईट बोलला, आताचा स्टँढ- वाईट नाही बोलला का? मग उशिराच का बोलला.?

३. अनेक गोष्टींवर हितसंबंधी लोकांकडून सोशल मीडियात चुकीच्या, खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. मेनस्ट्रीम मीडियाने अशा सोशल मीडियातल्या पोस्ट्स बातम्या म्हणून दाखवल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.

माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी बातम्यांच्या लिंक्स दिल्यात.
तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम असाल तर त्या बातम्यांच्या लिंक्स द्याल.
तुम्ही जे वाचलं ते सोशल मीडियात नव्हे तर तुम्ही म्हणताय त्या वर्तमानपत्रांतच असा तुमचा दावा आहे.
मी दिलेल्या लिंक्स वाचूनही तुम्हांला आपल्या म्हणण्यावर कायम राहायचा हक्क आहेच.

माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी बातम्यांच्या लिंक्स दिल्यात.>>>>>धन्यवाद !! वाचल्यात, निदान काही गैरसमज दूर झालेत.

तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम असाल तर त्या बातम्यांच्या लिंक्स द्याल.>>>>>>> मी सगळे गैरसमज दूर झालेत असे म्हणणार नाही, कारण जेव्हा तुमच्या देशाचीच बाजू घ्यायची वेळ येते, तेव्हा सर्वप्रथम तुम्ही ( कोणीही सामान्य नागरीक ) वृत्तपत्रांवरच विश्वास ठेवता. ऐकीव बातम्यांवर नव्हे. कारण वृत्तपत्रे सरकारला जाब देऊ शकतात, आणी सरकार त्यांच्या अतीरंजीत बातम्यावर बंदी घालु शकते याची त्यांना जाणिव असते. आणी जेव्हा उरीची घटना घडल्यावर जो प्रक्षोभ उसळला होता, त्यात माझ्या सारखे त्या ठिकाणापासुन दूर रहाणारे लोक वृत्तपत्रे आणी बातम्यांवरच विश्वास ठेवणार ना? माझ्या साठी तेव्हा माझा देश आधी असेल की हे बाहेरुन आलेले कलाकार?

तुम्ही जे वाचलं ते सोशल मीडियात नव्हे तर तुम्ही म्हणताय त्या वर्तमानपत्रांतच असा तुमचा दावा आहे.>>>>>> हो, मी हे लोकसत्ता व मटा मध्ये वाचले होते. मी सोशल मिडीयावर ( मायबोली सोडुन ) अजीबात विश्वास ठेवत नाही. कारण सोशल मिडीयातुन केवळ अफवाच पसरवल्या जातात, आणी त्यातुन निरपराध माणसे, बायका, मुले मारली जातात, अमानवी पद्धतीने हत्या केल्या जातात. मध्यंतरी मी सनातन वर बंदी घातली पाहीजे असे एका दुकानात बोलल्यावर एका बाईने माझ्याशी तिथेच वाद घालायला सुरुवात केली, कारण ती सनातन संस्थेशी संबंधीत होती, त्यांचे प्रॉड्क्टस विकत होती. त्या दिवसापासुन मी बाहेर प्रत्यक्ष मत मांडणे पण सोडले.

मी दिलेल्या लिंक्स वाचूनही तुम्हांला आपल्या म्हणण्यावर कायम राहायचा हक्क आहेच.>>>>>> Happy

धन्यवाद मीरा आणि रश्मी.

रश्मीजी,

{{{ पण माहीरा आणी फवाद जेव्हा आपल्या चित्रपटात काम करत होते तेव्हा / त्या दरम्यान भारतात कुठेतरी ( बहुतेक पंजाब ) बाँबस्फोट झाले आणी सालाबादप्रमाणे काही लोक गचकले. यानंतर माहीरा ताई व फवाद भाऊ दोघांना पत्रकारांनी या घटनेचा तुम्ही निषेध कराल का? यात तुमच्या देशाचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, तुमचे काय मत आहे असे विचारल्यावर दोघांनी कानावर हात ठेवत, काही बोलण्यास नकार दिला. नंतर फवाद भाऊ मायदेशी परतले व तिकडे त्यांनी भारताच्या सो कोल्ड ( कॉल्ड नाही हं ) दुट्टपीपणावर ठो ठो निशाणे मारले. }}}

फवाद आणि माहिरा यांनी ते ज्या पाकिस्तानचे नागरिक आहेत त्या देशाविषयी खुलेआम निषेध व्यक्त करणार्‍या मुलाखती द्याव्यात अशी अपेक्षा आहे का? अहो त्यांना तिथे जिवंत राह्यचंय. शेजारच्या वहिनींनी डब्यात पाठविलेलं इडली सांबार कितीही चांगलं असलं ना तरीही त्यांचं खुलेआम कौतु़क केलं तर मला दोन दिवस घरात जेवण मिळणार नाही आणि तिथे पाकिस्तानात अशी भारताची बाजू घेणारी वक्तव्ये केली तर फवाद आणि महिराचं करिअरच नव्हे तर आयुष्यच संपायची धास्ती आहे. किंवा मग त्यांना इथे शरण देऊन कायमचं नागरिकत्व आणि तेही झेड प्लस सुरक्षेसह द्यायची पाळी येईल. पुन्हा त्यांना इथे फुकट का पोसायचं असाही प्रश्न इथले लोक विचारतीलच. त्यांनी भारताच्या बाजूने आणि पाकविरोधी चार ओळी जर बोलल्या तर त्याची इतकी मोठी किंमत न ते स्वतः चूकती करु शकतील ना आपली तयारी आहे.

हायझेनबर्फ / बर्ग उर्फ चाणक्य Proud मायबोली सोशल नाहीये असा तुमचा दावा आहे का? नाही, गडाबडा लोळताय म्हणून विचारले. Proud

मला वाटत या आधीही कधीतरी आपली भेट झालेली आहे. ज्या वेळी तुम्ही चाणक्य नावाने लिहीत होता, नॉट शुअर, पण वाटतय खरं ! Proud

< माहीरा ताई व फवाद भाऊ दोघांना पत्रकारांनी या घटनेचा तुम्ही निषेध कराल का? यात तुमच्या देशाचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, तुमचे काय मत आहे असे विचारल्यावर दोघांनी कानावर हात ठेवत, काही बोलण्यास नकार दिला. नंतर फवाद भाऊ मायदेशी परतले व तिकडे त्यांनी भारताच्या सो कोल्ड ( कॉल्ड नाही हं ) दुट्टपीपणावर ठो ठो निशाणे मारले. >

हे असं झाल्याचं प्रसारमाध्यमांत कुठे छापून आलंय का ते शोधतोय. मिळालं नाही. हे दोघे दहशतवादी हल्ल्यानंतर काही काळ या प्रकरणी बोलले नव्हते हे बरोबर. त्यांनी बोलावं अशी अपेक्षा इथे प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियातही व्यक्त होत होती. पण पत्रकारांनी त्यांना प्रत्यक्षात असं विचारलंय आणि त्यांनी बोलायला नकार दिलाय, असं झाल्याची तसंच पाकिस्तानात जाऊन दुसरं काही बोलल्याची बातमीही मिळाली नाही.
उलट माहिराने शेअर केलेलं पत्र बरंच काही सांगतंय. फवादचं स्टेटमेंट खूपच डिप्लोमॅटिक आहे, पण त्याअपेक्षा अधिक बोलणं त्याच्यासाठी अवघड आहे.

ओक्के बिपीनचंद्र, पण मग एवढी रिस्क घेऊन इकडे यावेच कशाला मग? तुम्हाला माहीत असेलच की एकदा पाकीस्तानात एका पार्टीत नुरजहां यांना सुनील गावस्कर भेटल्यावर, त्यांनी हे कोण ? मी यांना ओळखत नाही, फक्त ईम्रान खानला ओळखते असे सांगीतल्यावर त्या दुसर्‍या व्यक्तीने सुनिल गावस्करला विचारले की या कोण माहीत आहे का? तर गावस्कर म्हणाले की नाही, मी फक्त लता मंगेशकर यांनाच ओळखतो. असे कित्येक किस्से आहेत. बरेचसे पॉझीटिव्ह तर बरेच निगेटिव्ह आहेत.

आपल्या जगजीत सिंग यांना तिथे नंतर परवानगी का नाकारली गेली? कोणत्या हेतूने? आपण त्यांचे खुल्या दिलाने स्वागत करावे आणी त्यांनी आपल्या कलेला अस्पृष्य ठरवावे असे का? हे प्रश्न माझ्या मनात एक देशप्रेमी आणी एका लोकतंत्रावर विश्वास ठेवणार्‍या देशाची नागरीक म्हणून येतात त्यात काय गैर आहे?

बाकी उद्या दुसर्‍या धाग्यावर. मी अज्ञातवासी यांनाच सॉरी म्हणेन कारण त्यांच्या धाग्यावर निष्कारण वाद झाला.

मला भरत मयेकरां चे लिखाण आवडते कारण त्यांनी व्यवस्थीत लिंक देऊन त्यांचे मत मांडलेय.

बाकी हायझेनबर्ग, कायम दुसर्‍याला टोमणे मारण्यापेक्षा एकदा दुसरी बाजू पण समजून घ्या.

मायबोली सोशल नाहीये असा तुमचा दावा आहे का? >>> मी 'हो' म्हंटले तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? Rofl

मला वाटत या आधीही कधीतरी आपली भेट झालेली आहे. ज्या वेळी तुम्ही चाणक्य नावाने लिहीत होता, नॉट शुअर, पण वाटतय खरं ! Proud >>
मी 'नाही' म्हंटले तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? Rofl

बाकी हायझेनबर्ग, कायम दुसर्‍याला टोमणे मारण्यापेक्षा एकदा दुसरी बाजू पण समजून घ्या. >> Rofl हो हो !तोच प्रयत्न करतोय पण हसणेच आवरत नाहीये... काय करू. Rofl

मयेकर तुम्ही बरोबर बोलताय. ते मी ऑनलाईन नव्हते वाचले, कारण त्या वेळी मी माहेरी होते, माझ्या माहेरी घरी नेट नाही. आणी घरी फक्त पेपर येतो. त्यामुळे मला ते आज सकाळी शोधुनही नाही सापडले. कात्रणे कापुन सांभळुन ठेवणे हे घरी आवडते काम, पण राजकीय बातम्या कधी जपल्या नाहीत, त्यामुळे बर्‍याचश्या उत्तम लेखंकाचे लेख सुद्धा मी नुसते वाचले, पण ते नंतर रद्दीत गेल्याचे वाईट वाटते. अगदी मनमोहन सिंग यांनी आर्थिक मंदीत भारतीय अर्थव्यवस्थेला कसे सावरले याचा सुरेख लेख लोकसत्ता होता, तो पण जपला नाही. नाहीतर आज त्या धाग्यावर ते लिहु शकले असते. Sad

स्मार्ट फोन हातात असले तरी अजूनही मी मोबाईल वर मायबोली वा नेट बघत नाही. त्यामुळे सॉरी मी लिंक देऊ शकत नाही.

Pages